Skip to main content

आपल्या मालोजीचे कचकून अभिनंदन

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 30/04/2016 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडलं तर पहिल्याच पानावर आपल्या मालोजीची बातमी. शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली. तुझा अभिमान वाटतो मित्रा. अधिक माहिती येथे पहा. a
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23177
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

मालोजीराव अभिनंदन. बातमी सांगितल्याबद्दल वल्लीसेठ आभार. -दिलीप बिरुटे

हे फारच मोठे काम केले आहे, मालोजीराव यांचे अभिनंदन आणि आभार !!

सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे.. तुम्ही धर्माचे (शिवबावरील अनन्य्साधारख प्रेम भक्ती) भक्कम पालन करता आहात , अभिनंदन आणि तुमच्या व्यासंगाला/पाठपुराव्याला कुर्नीसात. नाखु मावळा

In reply to by नाखु

नाखु मावळ्याशी सहमत अन्या शिपाई

अरे मस्तच बातमी आहे ही मालोजी रावांचे दणकून अभिनंदन आणि वल्लींचे आभार. पैजारबुवा,

@
शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली.
http://www.sherv.net/cm/emo/happy/cheering-clapping-smiley-emoticon.gif कचकून अभिनंदन! http://www.sherv.net/cm/emoticons/new-year/confetti-smiley-emoticon.gif आणी जोरदार टाळ्यांचा कडकडाट! http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hands-clapping-applause-smiley-emoticon.gif

मालोजीरावांचे मनःपूर्वक अभिनंदन ! तुम्ही मोलाची कामगिरी बजावली आहात !! उद्याच्या महाराष्ट्रदिनानिमित्त ही तुम्ही महाराष्ट्राला दिलेली प्रसंगोचित भेटच समजायला हवी !!!

In reply to by खेडूत

+१

मालोजीराव, ____/\____ आपल्याकडून एक पार्टी तुम्हाला. वल्लीशेठ धन्यवाद.

In reply to by सुबोध खरे

खरे सरां सारखे व्यक्ती सोबतीला, आन मालोजी राव किस्सा सांगायला समोर बसलेले. बाब्बो, कल्पना करूनच आमचं इमाईन ढगात पोचलय.

In reply to by बाबा योगीराज

खरे सरांबरोबरच आम्ही आमच्या सगळ्या आयडींकडून पार्टीसाठी हातभार लावू. खाण्यास व आर्थिक देखील. मालोजीराव हार्दिक आभार. आमच्या राजांचे दर्शन घडवल्याबद्दल. अभिनंदन तर आहेच.

नुसते शिवाजी महाराजांच्या नावाने "गहिवर" काढणारे आज वर खूप पाहीले आणि पाहत आहोत. (याबद्दल लिहावेसे वाटत नव्हते पण राहवले नाही) पण प्रत्यक्ष कृती करणारे फार कमी त्यात एक मालोजीराव आहेत. त्यांना साष्टांग दंडवत.

अभिनंदन

अभिनंदन मालोजीराव! अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी.

राजे तन मन धन सारंच झोकून देऊन काम केलेलं दिसतंय. कुर्निसात __/\__

आज एक मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान वाटला! ही बातमी मित्र - नातेवाईक यांच्यापर्यंत पोचवताना जो आनंद होईल तो काय सांगावा! जय शिवराय! Sandy

अभिनंदन. खूपच छान काम. याविषयी सविस्तर वाचायला आवडेल.

_/\_ अभिनंदन आणि मानाचा मुजरा.

मालोजीरावांनी नाव सार्थ केलं अगदी......मोहीम फत्ते केली.... बहोत खूब !

_/\_ मुजरा घ्या मालक! तुमचे मित्र आहोत याचा प्रचंड अभिमान वाटतो.

मालोजी मुजरा स्वीकारा

_/\_ अभिनंदन आणि मानाचा मुजरा.

अगायो मालोजीराव जगदाळे तुम्हीच होय !!! दंडवत घ्या मालक. कुठेशी असता तेही सांगा, एखादी सिंगल माल्ट तुमच्या पायाशी घालावी या विचारात आहे.