कवचकुंडले!
"अर्जुना उचल ते गांडीव! लाव तो बाण! भेद हे कवच!"
अर्जुनाचा डोळ्यावर विश्वासच बसेना!
सूर्यपुत्र परत आला होता!
'नाही बंधु, नाही! बंधुहत्येचे पाप पुनश्च माझ्या माथी मारू नकोस!"
"माझं मरण अर्जुना तु नाही तर मी स्वतः लिहिलं होतं. असशील तु योद्धा, असशील तु जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर, तर स्वीकार आव्हान!"
"बंधु तूच माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ होतास!"
"सर्वश्रेष्ठत्वाची भीक नकोय मला.आयुष्यभर भीकच मागत आलोय मी. मरणानंतरतरी अधिकाराचा हक्क दे!"
अर्जुनाने मोठ्या कष्टाने बाण उचलला.
"तो बाण नव्हे, तुझं सर्वश्रेष्ठ अस्त्र काढ. सोड ब्रम्हास्त्र माझ्यावर!'
अर्जुनाने मोठ्या कष्टाने ब्रम्हास्त्र कर्णाच्या दिशेने सोडले.
"बंधु माफ कर मला!" अर्जुन उच्चारला!
ब्रम्हास्त्र कर्णाच्या दिशेने झेपावले!
क्षणार्धात आसमंत उजळून निघाले!
ब्रम्हास्त्र भेदुन कर्ण डौलाने उभा होता.
'कसं शक्य आहे? मग युद्धात कर्ण कसा हरला?'
कर्ण अर्जुनाकडे बघून निराशेने हसला!
"नात्याची कवचकुंडले सर्वात अभेद्य असतात बाळा! ती जर आडवी आलीत तर कुठलाही बाण ती भेदु शकत नाहीत!"
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्तच!!!
thanks vijubhou
फारच छान आहे
छान आहे!
thanks ananda ani ace
फार उत्तम लिहिलय
सुंदर आवडले. बाजीराव मस्तानी
कळलं नाही.
पुन्हा वाचा नक्की समजेल!
इतका वेळ नाही.
जाऊ द्या मग!
खूपच छान!!!
भारीच की !
मंडळी महाभारतावरील ही दूसरी
बिनधास्त लिही. कुणाला समजत
पहिली कथा - मरण!www.misalpav
धन्यवाद मंडळी आपल्या
कर्ण आणि अर्जुन एकाच
अर्जुनाने अंजलिका बाण वापरुन
हो तोच बाण वापरला होता!
ओके ..
सूडने विचारले तेव्हा का नाही
अहो त्यांना वेळच नव्हता!
त्यांना एकदा वाचल्यावर परत
भाऊ/तै, माझा प्रश्न सरळसोट
'पुन्हा वाचा नक्की समजेल' यात
bhau umajala nahi kahi!
सूडने विचारले तेव्हा का नाही
डेडपूल हा पतिल्मित नक्कीच
तुम्ही आहात का मग? :प
काय स्रुजातै! हीच पदवी मिळाली
हलकं घ्या हो मांत्रिक बुवा.
हो नक्कीच! काय जादा बोललो
ताई अहो मी कधीतरी कप्तान आणि
तुम्ही विनोद केला असलात तरी
कप्तान सारख्या दिलदार माणसाला
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
दू दू दू कप्तानराव!!!
छ्या. खरं बोलायची सोय नाही
आता बास
सुरवंट म्हणालं आता बालिशपणा
खीक्क्क्क्क्क!!!!
=))
विषय माझा आणि मांत्रिकरावांचा
वरील दोन प्रतिसाद ऐकून अशक्य
ब्लॅकपूल? काय फालतूगिरी आहे?
अरे जौ दे ना भावा! दुर्लक्ष
तुम्ही दोघांनी काय
राव तुम्ही धडाधड आरोप करत
हा सभ्य प्रतिसादच दाखवतो की