साहित्य
२४ मोठे श्रिम्प/प्रांन्स (साफ करून,शेपटी सकट)
२/३ कप आपल्या आवडीची बियर (चिल्ल्ड)
१ अंड
१/२ कप + १/४ कप मैदा
१ १/२ (दिड) चमचा बेकिंग पावडर
१ चमचा काळीमिरी पावडर
२ कप किसलेले सुक्के खोबरे (शक्यतो पांढराच भाग)
मीठ, चवीनुसार
तेल, तळण्यासाठी
कृती
एका बाउल मध्ये अंड, १/२ कप मैदा, बियर आणि बेकिंग पावडर एकत्र करावी. ह्यात एक चिमुट मीठ आणि १ चमचा काळीमिरी पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
दोन वेग वेगळ्या पसरट भांड्यान मध्ये १/४ कप मैदा आणि २ कप खोबरे घ्यावे.

श्रिम्प/प्रांन्स, आधी मैद्यात घोळवून, मग बियर-अंड मिश्रणातून घोळवून, शेवटी किसलेल्या खोब्र्यातून घोळवून घेणे. हे खोबरे लावलेले श्रिम्प/प्रांन्स, एका प्लेट मध्ये काढून ३०-४५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवणे.

कढईत तेल गरम करून, मध्यम आचेवर सर्व श्रिम्प/प्रांन्स खरपूस तळून घेणे.
शेझवान सॉस किंवा थाई स्वीट ग्रीन चिली सॉस (ह्याची रेसिपी टाकेन लवकरच) बरोबर सर्व करा.
टीप
तळून घायचे नसल्यास ओवन मध्ये बेक करू शकता. फक्त वरून थोडा तेलाचा हाथ किंवा ऑईल स्प्रे मारावा.
प्रतिक्रिया
बियर घालण्याचं कारण?
बियर ने चव वेगळी येते. बियर
In reply to बियर घालण्याचं कारण? by सूड
एग्जॅक्टली. खरपूस तळल्यावर
In reply to बियर घालण्याचं कारण? by सूड
आणि खोबर्याचा कीस? तो किती
In reply to एग्जॅक्टली. खरपूस तळल्यावर by आदूबाळ
आणि ती पण चिल्ड??
In reply to बियर घालण्याचं कारण? by सूड
बियर ने चव येते। बियर मुळे
सुंदर पाकृ.
वल्लाह
एकदम झक्कास
खल्लास
हा अजून एक फोटो
वेगळीच पाककृती दिसतेय.पण
धन्यवाद
In reply to वेगळीच पाककृती दिसतेय.पण by नूतन सावंत
थाई स्वीट चिली सॉस ची रेसिपी ....
भारीच