Skip to main content

कोकोनट बियर ब्याटर श्रिम्प/प्रांन्स

लेखक केडी यांनी बुधवार, 27/04/2016 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
Coconut Beer Batter Shrimp साहित्य २४ मोठे श्रिम्प/प्रांन्स (साफ करून,शेपटी सकट) २/३ कप आपल्या आवडीची बियर (चिल्ल्ड) १ अंड १/२ कप + १/४ कप मैदा १ १/२ (दिड) चमचा बेकिंग पावडर १ चमचा काळीमिरी पावडर २ कप किसलेले सुक्के खोबरे (शक्यतो पांढराच भाग) मीठ, चवीनुसार तेल, तळण्यासाठी कृती एका बाउल मध्ये अंड, १/२ कप मैदा, बियर आणि बेकिंग पावडर एकत्र करावी. ह्यात एक चिमुट मीठ आणि १ चमचा काळीमिरी पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. दोन वेग वेगळ्या पसरट भांड्यान मध्ये १/४ कप मैदा आणि २ कप खोबरे घ्यावे. steps श्रिम्प/प्रांन्स, आधी मैद्यात घोळवून, मग बियर-अंड मिश्रणातून घोळवून, शेवटी किसलेल्या खोब्र्यातून घोळवून घेणे. हे खोबरे लावलेले श्रिम्प/प्रांन्स, एका प्लेट मध्ये काढून ३०-४५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवणे. steps कढईत तेल गरम करून, मध्यम आचेवर सर्व श्रिम्प/प्रांन्स खरपूस तळून घेणे. शेझवान सॉस किंवा थाई स्वीट ग्रीन चिली सॉस (ह्याची रेसिपी टाकेन लवकरच) बरोबर सर्व करा. टीप तळून घायचे नसल्यास ओवन मध्ये बेक करू शकता. फक्त वरून थोडा तेलाचा हाथ किंवा ऑईल स्प्रे मारावा.

वाचने 8853
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

बियर ने चव येते। बियर मुळे ब्याटर हलके होते. आणि अर्थात हा पदार्थ थंडगार बियर सोबतच खावा. बियर मध्ये अंड घातल्यामुळे ते बाईंडिंग चे काम करते, त्यामुळे खोबरे वाया जात नाही. ३० ते ४५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे बिअरची चव व्यवस्थित उतरते कोळंबीत.

केदार लै झक्कास. फक्त आम्हाला प्रॉन्सचं पथ्य आहे :( तेव्हा कुणी करून घातले तर १-२ चिंगळ्या खाऊ.

लै झ्याक. अती अवांतर:- इनोचा ठोक विक्रेता शोधावा लागणार वाटतय.

जरा हटके आहे पण आवडलं. फक्त फोटो पुर्ण डिश चे हवे होते.

वेगळीच पाककृती दिसतेय.पण मध्यम आचेपेक्षा मंद आचेवर तळावे लागतील नाहीतर खोबरे जळण्याचा संभव असू शकतो. बाकी प्रॉन्स दिसताहेत ऊचलून घास घ्यावेत असे. ती थायी स्वीट चिली सॉसची कृती टाका लवकर.