माणूस मोठा की त्याचा अहंकार, असा प्रश्न विचारला तर साहजिकच उत्तर असेल माणूस. अनेकदा हे आपल्याला कळत असतं पण वळत नाही, आपण स्वतःपेक्षा या 'अहं' ला जीवापाड जास्त जपतो.
या अहंकाररूपी शत्रूला आपल्या मनातून, जगण्यातून हद्दपार करण्याऐवजी आपण त्याचे कोडकौतुक करतो, त्याला डोक्यावर बसवून मिरवतो, खतपाणी घालून वाढवतो, जोपासतो. मात्र त्यानंतर हा अहं आपल्यालाच डोईजड कधी होऊ लागतो कळतही नाही, त्यापायी आपण इतरांशी शत्रुत्व पत्करत राहतोच, अणि त्याहून वाईट म्हणजे स्वतःचेही शत्रू बनत जातो.
आपण स्वतःपुरता विचार केला तरी आपल्याला जाणवेल, आपल्यात अहंकार आहे की नाही.. असेल तर का आहे..
कशाबद्दल आहे.. नसेल तर अतिउत्तम. अशी निर्विकार, नि:स्वार्थी भावावस्था फार थोड्या लोकांना प्राप्त करता येते.
सहसा सामान्यात सामान्य माणूस म्हटला तरी त्याच्यात कसला न कसला अहंकार असतो. आपल्यात काही चांगले गुण असतील तर त्याचा थोडाफार अभिमान असणे वाईट नाही, एखाद्याकडे तसेच कर्तृत्व असेल तर तो अहंकार त्याला शोभतोही, मात्र अती अहंकारी व्यक्ति इतर लोकांपासून, समाजापासून वेगळी पडत जाण्याची शक्यता जास्त असते.
फक्त उदाहरण म्हणून इथलाच अलीकडील एक अनुभव सांगेन, येथील एका विभागाकडून लेखमालेसाठी लेख लिहीण्याबद्दल विचारणा झाली होती, विषय जिव्हाळ्याचा असल्याने मीही आनंदाने होकार दिला. नंतर त्या विभागातील काही सदस्यांबरोबर माझे किरकोळ मतभेद झाले, अशावेळेस आपल्यातील 'इगो' नामक प्रकार येता जाता दुखावून घ्यायला बसलेलाच असतो त्याप्रमाणे तो दुखावला गेला आणि मी तो लेख लिहू शकणार नाही असे त्यांना कळवून टाकले.
इथे माझ्याकडून काही वेगळ्याच व्यक्तिंचा राग तिसर्याच गोष्टीवर, गरज नसतांना, संदर्भ नसतांना काढला गेला,
फक्त 'अहं' मुळे. यात चूक पूर्णपणे माझी होती, नुकसानही माझेच होणार होते, तसे ते झालेच.
अर्थात तो लेख मी काही झाले तरी लिहीणार होते, त्याप्रमाणे तो लिहीला, प्रकाशितही केला, त्याचे समाधान आहेच,
मात्र केवळ इगोला महत्व देऊन एक अतिशय उत्तम संधी हातातून घालवली याचे दु:ख त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.
(वरील उदाहरण हे फक्त प्रातिनिधीक म्हणून दिले आहे, तो लेखाचा आणि चर्चेचा विषय नाही.)
माणसाचे व्यक्तिमत्व म्हणजे फक्त त्याचे वागणे बोलणे दिसणे इतकेच नसून, त्याचे 'असणे' ही महत्वाचे. हे असणे सुधारण्यासाठी, आपल्यातील सर्व दुर्गुण मिटवून सर्वार्थाने निर्विकार होण्यासाठी काय करावे..?
हा अहं जो माणसाचा फार मोठा शत्रू आहे, ज्यापायी माणूस इतरांपासून, स्वतःपासूनही दूर जात असतो, स्वतःला हरवून बसतो, तो अहं हळूहळू, थोडाथोडा करत एक दिवस पूर्णपणे मिटवण्यासाठी, 'स्व' खर्या अर्थाने गवसण्यासाठी काय करावे ?
आपल्याला माहित आहे की आपण या विशाल अवकाशातील मात्र एक अतिसूक्ष्म कण आहोत ज्याच्या असण्या-नसण्याने या चराचर सृष्टीला, अखिल ब्रम्हांडाला काहीएक फरक पडणार नाही, तर मग हा वृथा अहंकार कशासाठी...
आपण सर्वज्ञानी नाही हे व्यवस्थित कळत असतांनाही आपण तसे आहोत हे कायम स्वतःला आणि इतरांनाही पटवून देण्याचा अट्टाहास कशासाठी...
अहंकार नष्ट कसा करावा आणि त्यावर विजय कसा मिळवावा ?
वाचन संख्या
26661
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहंकार नष्ट कसा करावा आणि
चांगला विषय.
अहंकार नष्ट कसा करावा आणि त्यावर विजय कसा मिळवावा?
छ्या !!!!
In reply to अहंकार नष्ट कसा करावा आणि त्यावर विजय कसा मिळवावा? by मुक्त विहारि
अरेच्च्या.. लग्गेचं धुळवड
In reply to अहंकार नष्ट कसा करावा आणि त्यावर विजय कसा मिळवावा? by मुक्त विहारि
माझ्या मते 'तळमळ' असणे सर्वात
फार गहन विषय आहे आणि फार गंभीर प्रतिसाद आहेत.
बोकोबा, हे शक्य आहे का? डेबिट
In reply to फार गहन विषय आहे आणि फार गंभीर प्रतिसाद आहेत. by बोका-ए-आझम
शक्य नाहीये
In reply to बोकोबा, हे शक्य आहे का? डेबिट by वैभव जाधव
मला असले धागे वाचण्यात आजकाल
शम्त
In reply to मला असले धागे वाचण्यात आजकाल by अभ्या..
नीलमोहर तुम्ही एका छान
उपासना,
In reply to नीलमोहर तुम्ही एका छान by विजय पुरोहित
दृष्टिकोन बदला
In reply to उपासना, by नीलमोहर
छानच भागवत साहेब...
In reply to दृष्टिकोन बदला by शाम भागवत
थोडासा अंहंकार असावाच, तो
सहमत!
In reply to थोडासा अंहंकार असावाच, तो by प्रचेतस
सहमत आहे.
In reply to थोडासा अंहंकार असावाच, तो by प्रचेतस
अहंकार नष्ट का बुवा करायचा ?
१००% सहमत.
In reply to अहंकार नष्ट का बुवा करायचा ? by मितान
परिपूर्ण
In reply to अहंकार नष्ट का बुवा करायचा ? by मितान
अहंकार थोडा असणे चांगले हे कबूल,
.
अगदी खरंय...इगोला न कुरवाळता
In reply to . by सस्नेह
नीमो चांगला विषय.
असो. एकच पिंक टाकतो.. अहंकार
मला अहंकार नाही याचा पण
In reply to असो. एकच पिंक टाकतो.. अहंकार by आनन्दा
अहंकारावर विजय कसा मिळवावा ?
आता कस मिपावर आल्यासारख
In reply to अहंकारावर विजय कसा मिळवावा ? by प्रसाद गोडबोले
बाब्बौ..काय तो अब्यास.
In reply to अहंकारावर विजय कसा मिळवावा ? by प्रसाद गोडबोले
गिर्जा, झाल्या गोष्टी सोडून
In reply to अहंकारावर विजय कसा मिळवावा ? by प्रसाद गोडबोले
प्रिय मित्र किसन ,
In reply to गिर्जा, झाल्या गोष्टी सोडून by किसन शिंदे
प्रगो , क्या बात है !
In reply to प्रिय मित्र किसन , by प्रसाद गोडबोले
तुम्च्या अहंकारावर कोणी
In reply to अहंकारावर विजय कसा मिळवावा ? by प्रसाद गोडबोले
टाकलीस काडी !
In reply to तुम्च्या अहंकारावर कोणी by टवाळ कार्टा
काहिही हा सृ (का स्रु???)
In reply to टाकलीस काडी ! by स्रुजा
मग काय ! त्या विचारतायेत
In reply to काहिही हा सृ (का स्रु???) by टवाळ कार्टा
या वाक्यात "स्लॅश"च्या ऐवजी
In reply to तुम्च्या अहंकारावर कोणी by टवाळ कार्टा
ख्या ख्या ख्या
In reply to या वाक्यात "स्लॅश"च्या ऐवजी by डॉ सुहास म्हात्रे
=))
In reply to या वाक्यात "स्लॅश"च्या ऐवजी by डॉ सुहास म्हात्रे
थोडा वेगळा विचार करत आहे.
मी तर लई भारी विचार करतोय.
कृपया
In reply to मी तर लई भारी विचार करतोय. by DEADPOOL
काय करावे बरे
अहंकारावर विजय कसा मिळवावा ?
अहंकारा वर विजय मिळवायचा आहे
मुद्दा बरोबर आहे,
In reply to अहंकारा वर विजय मिळवायचा आहे by जेपी
मनाच्या प्रॉब्लेमवर मनच उत्तर सुचवतं
इथे सदस्य असताना असा प्रश्न
ईगो प्रत्येकालाच असतो. जो असा
अहंकार आणि गर्व या एकच कल्पना
अहंकार मिटवण्याचा मार्ग
अहंकार की लडाई ...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बारिश... :- Yaariyanमदनराव मस्तच प्रतिसाद...
In reply to अहंकार की लडाई ... by मदनबाण
मस्त!
In reply to अहंकार की लडाई ... by मदनबाण
स्वत:चे अस्तित्व
अहं सोडायच्या पायऱ्या ...
ओके
In reply to अहं सोडायच्या पायऱ्या ... by उगा काहितरीच
परत १-११ अहंकार सुटेपर्यंत
In reply to ओके by नीलमोहर
:)
In reply to परत १-११ अहंकार सुटेपर्यंत by सुबोध खरे
नाही होणार. जस्ट ट्राय इट !
In reply to ओके by नीलमोहर
एक लांबलचक प्रतिसाद लिहिला
अरेच्च्या! हा धागा वाचायचा
अभिमान आणि अहंकार....
पन्नास झाले ..अंहकार कमी झाला
अरेच्चा..
असा कमी करावा :
_/\_
In reply to असा कमी करावा : by एस
आज बरेच दिवसांनी मिपावर आलो
सहमत!
In reply to आज बरेच दिवसांनी मिपावर आलो by प्रसाद गोडबोले
नियंत्रण
शेवटी ज्याला याची जाणीव असते
In reply to नियंत्रण by पाटीलभाऊ
तुमच्या लिखाणातच तुमचे उत्तर
अहम