✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मि पा सदस्यांचे मत हवे आहे

S
shindebv यांनी
Wed, 04/27/2016 - 14:31  ·  लेख
लेख
हि साईट मला खूप आवडते आणि मी ह्या साईट चा खूप वर्षां पासून आस्वाद घेत आहे. हा माझा पहिलाच लेख आहे तरी चूक भूल माफ असवी. खूप दिवसांपासून स्वतःचा काही तरी उदयोग सुरु करावा असा विचार डोक्यात होता. पण जास्त भांडवल न अडकवता चांगला उद्योग चालू करणे अवघड वाटत होते. आणि मराठी माणूस जोखीम जरा जपूनच घेतो कारण बर्याचश्या मराठी माणसांच्या घरी उद्योग हा त्यांच्या आजपर्यंतच्या पिठीत कोणीच केलेला नसतो RISK !!!!. शेवटी अर्धांगिनी ने नेहमी प्रमाणे साथ व प्रोत्साहन दिल्याने कमी भांडवलात online दुकान (मुलांच्या कपड्याचे ) काढायचे ठरविले. माझी साईट https://joypie.in आता चालू झाली असून २-३ orders येतात. मला माझ्या नव्या साईट विषयी मिसळ पाव सदस्यांचे मत जाणून घ्यायचे आहे तसेच कोणत्याही गोष्टीत काही मार्गदर्शन मिलाले तर खूपच चांगले - ज्याचा मला माझ्या उद्योगात जम बसायला उपयोग होईल . कृपया मार्गदर्शन करून मदत करावी. धन्यवाद https://joypie.in
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11075 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

सर्व प्रथम स्वताच उद्योग सुरु

स्पा
Wed, 04/27/2016 - 14:36 नवीन
सर्व प्रथम स्वताच उद्योग सुरु केल्याबद्दल अभिनंदन , तेही ओंलैन शॉपिंग बेस्ड . चांगला निर्णय आहे थोडे पेशन्स लागतील, पण योग्य मार्केटिंग केलत तर चांगले रिटर्न्स मिळतील. साईट पण छान आहे. हळू हळू प्रोडक्टकलेक्शन वाढवा. तुमच्या प्रोडक्ट चे फोटो शूट अजून चांगले करा कारण त्यावरच पुढचे सारे अवलंबून आहे शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

तुमच्या प्रोडक्ट चे फोटो शूट

प्रसाद गोडबोले
Wed, 04/27/2016 - 14:47 नवीन
तुमच्या प्रोडक्ट चे फोटो शूट अजून चांगले करा कारण त्यावरच पुढचे सारे अवलंबून आहे
मोलाचा सल्ला ! आपल्या ओळखीत मिपावरचे कोणी फोटो शुटिंग करणारे आहेत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

घ्या !!!

वेल्लाभट
गुरुवार, 04/28/2016 - 12:28 नवीन
घ्या !!! खुद्द इस्पा हे लिहीत असताना ओळखीत वगैरे कशाला शोधताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अभिनंदन!

चांदणे संदीप
Wed, 04/27/2016 - 14:49 नवीन
वर स्पा यांनी म्हटल्याप्रमाणे...
तुमच्या प्रोडक्ट चे फोटो शूट अजून चांगले करा कारण त्यावरच पुढचे सारे अवलंबून आहे
साईट पाहून आलो...आणि हेच्च वाटले! जाहिरातीसाठी : (तुम्ही कदाचित केल असेल-नसेल) वेबसाईटचे नाव, एक छानसा लोगो, कपड्यांचा फ़ोटो आणि संपर्कासाठी पत्ता, मस्तपैकी कलरमध्ये प्रिण्ट काढून रिक्षांच्या मागे लावा. पुणे, पिंपरी- चिंचवडात चांगली जाहिरात होईल. शुभेच्छा!! Sandy
  • Log in or register to post comments

बहुमुल्य सल्ल्या बद्दल धन्यवाद

shindebv
Wed, 04/27/2016 - 15:05 नवीन
फोटो शूट निट करण्याचा सल्ला आवडला. मला पण ते वाटत होते पण बर्याच साईट वर चांगले दिसणारे कपडे घेतल्या नंतर तेव्हढे चांगले वाटत नाही म्हणून जसे आहे तसे फोटो शूट कारायचा निर्णय घेतला होता जेणे करून लोकांना फसवणूक झाली असे वाटू नये पण आता तुमच्या सगळ्यांच्या सल्ल्याने निर्णय बदलाणार आहे. सर्व मि पा करांना facebook like करून सहकार्य करण्याची विनंती https://www.facebook.com/joypie.in मदती साठी जयंत कुलकर्णी यांचे विशेष आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

स्वागत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/27/2016 - 14:59 नवीन
मिपावर स्वागत. ऑनलाइन दुकानासाठी शुभेच्छा. आपल्या दुकानाची इथे जाहिरात तशी झालीच आहे, आता ऑर्डर्स वाढायला हरकत नसावी किमान अनेकापर्यन्त ही माहिती गेलीच आहे, आपल्या दुकानाची जाहिरात वाट्सपवर आपली हरकत नसेल तर मी ' ना नफ़ा ना तोटा' या तत्वावर शेयर करू का, तितके कळवावे. व्हेरायटीज आणि मार्केटपेक्षा स्वस्त वाटलं पाहिजे आणि तत्तपर सेवा पाहिजे बस देखो कल का दिन आपका है. बाय द वे, डबल एक्सेलचा टी शर्ट आहे का ? कॉलर वाला पाहिजे, असेल तर लिंक द्या, पटलं आणि स्वस्त वाटले तर दोन घेईन. -दिलीप बिरुटे (ग्राहक)
  • Log in or register to post comments

सर अहो ते बालकांसाठीचे दुकान

विजय पुरोहित
Wed, 04/27/2016 - 15:02 नवीन
सर अहो ते बालकांसाठीचे दुकान आहे. तुमच्या मापाचे तिथे कसे मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुन्हा लहान मुल होणार असाल तर

shindebv
Wed, 04/27/2016 - 15:11 नवीन
पुन्हा लहान मुल होणार असाल तर मिळेल पण ते कितीही इच्छा असून कोणालाच ते जमलेले नाही. तुम्हाला जमले तर सांगा, सर्वाना फायदा होईल. whatsapp पच काय कुठेही जाहिरात झालेली कधीहि चांगलेच आहे. तुमचे मोलाचे सहकार्य होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

असंय का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/27/2016 - 15:17 नवीन
मला वाटलं मोठ्यांसाठी पण असणार ? छ्या,मुड़च गेला माझा. मोठ्यांचे पण ठेवा. टी शर्ट आणि जीन्स प्यांट. लहान मुलांचे कपड़े मोठ्या माणसाच्या कपड्यापेक्षा महाग का असतात कोणी सांगेल का ? बाय द वे, तुम्ही लहान मुलांचेच कपड़े ठेवावेत असा विचार आला कितीही महाग कपड़े असले आणि आपली कितीही इच्छा नस्ली तरी पोरांच्या तोंडाकड़े पाहुन आपण पैसे खर्च करतोच. -दिलीप बिरुटे (पालक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

बाय द वे, तुम्ही लहान

shindebv
Wed, 04/27/2016 - 15:23 नवीन
बाय द वे, तुम्ही लहान मुलांचेच कपड़े ठेवावेत असा विचार आला कितीही महाग कपड़े असले आणि आपली कितीही इच्छा नस्ली तरी पोरांच्या तोंडाकड़े पाहुन आपण पैसे खर्च करतोच. अगदी बरोबर आहे. पण आजून सुरुवात असल्यामुळे discount ठेवला आहे आणि तश्या पण किमती जास्त नाही ठेवलेल्या. तुमचे मत कळवावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नवीन व्यवसाय सुरू केल्याबद्दल

श्रीगुरुजी
Wed, 04/27/2016 - 15:14 नवीन
नवीन व्यवसाय सुरू केल्याबद्दल अभिनंदन! प्रसिद्धी करण्यासाठी अजून काही गोष्टी करता येतील. तुमच्याकडे स्टॉक किती आहे कल्पना नाही. पुरेसा स्टॉक असेल तर हिंजवडी आयटी पार्कमधील इन्फोसिससारख्या काही कंपन्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यासाठी त्यांचे मोठे सभागृह मोफत वापरायला देतात. तिथे प्रदर्शन भरवून काही डिस्काऊंट देऊन विक्री करता येते. तसेच आयटी कंपन्यातील मित्रांना ईमेल मार्फत तुमच्या व्यवसायाची जाहिरात पाठवून त्यांना त्यांच्या कंपनीतील बुलेटिन बोर्डवर ती जाहिरात फॉरवर्ड करण्यास सांगा. तसेच व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही वेगवेगळ्या ग्रुप्सवर जाहिरात पाठविता येईल.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 04/27/2016 - 15:28 नवीन
ऑनलाईन विक्रीची आयडिया चांगली आहे. पण त्यामुळे तुम्ही ऑनलाईन ग्राहकांना टार्गेट करायची युक्ती शोधा. म्हणजेच वेबसाईट जास्तीत जास्त लोकांना कशी कळेल हे बघा. गुगलवर किंवा तत्सम वेबसाईटवर आपली जाहिरात झळकवायला किती खर्च येतो बघा. ऑफलाईन ग्राहकांसठी विक्रीची काय सोय आहे? अजुन एक--फ्लिपकार्ट/अमेझॉन बरोबर टाय अप करुन बघा. त्यांच्या ऑर्डर प्रत्यक्षात तुमच्यासारखे व्यावसायिकच पुरवतात.
  • Log in or register to post comments

flipkart आणि amazon वर

shindebv
Wed, 04/27/2016 - 15:35 नवीन
flipkart आणि amazon वर विकायचा विचार केला होता पण त्यांचे comission ४% ते २४% आहे जे शेवटी ग्राहकाला द्यावे लागते मग ते आपण स्वतः विकून कमी करू शकतो म्हणून हि साईट काढली. ओफ् लाईन ग्राहकान साठी आजून तरी काही पर्याय नाही. शॉप चे भाडे ४०००० न परवडणारे आहे. हे कसे आपला जॉब चालू ठेवून करता येते :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

स्वत:ची साईट वनवण्यासाठी कीती

कविता१९७८
गुरुवार, 04/28/2016 - 07:50 नवीन
स्वत:ची साईट वनवण्यासाठी कीती खर्च आला?? बाकीची माहीतीही देउ शकता का ईथे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shindebv

साईट बनवण्या साठी जास्त खर्च

shindebv
गुरुवार, 04/28/2016 - 15:23 नवीन
साईट बनवण्या साठी जास्त खर्च नाही येत पण वेळ द्यावा लागतो आणि थोडी technology ची माहिती असेल तर खूप सोपे जाते. खूप माहिती आंतरजाला वर उपलब्ध आहे. तुम्ही bigrock.in वर domain register करून hosting प्लन चेक करू शकता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

अभिनंदन आणि व्यवसायातील उत्तम

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 04/27/2016 - 15:41 नवीन
अभिनंदन आणि व्यवसायातील उत्तम यशासाठी अनेकानेक शुभेच्छा ! कोणी मराठी माणूस असा स्वतंत्र व्यवसाय करताना पाहून खूप आनंद होतो. सभासदांकडून होणार्‍या मार्गदर्शनाचा खूप उपयोग होईल. असे सहकार्य पाहिले की मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान वाटतो !
  • Log in or register to post comments

मस्त हो शिंदे सरकार. आवडली

अभ्या..
Wed, 04/27/2016 - 15:57 नवीन
मस्त हो शिंदे सरकार. आवडली आयडीया. आता तुम्ही शिंदे म्हणजे आमच्या किसनरावांच्या भावकीततलेच. लैच जवळचे. सो एक आयडीया खास तुमच्यासाठी. कस्टमाइज्ड टीशर्ट बनवा. मी देईन तुम्हाला. पाहिजे त्या साइजचे, पाहिजे त्या मटेरिअलचे, पाहिजे त्या डिझाइनचे. रेट अगदी फॅक्टरी रेट. बघा बाबा. तुमची जाहीरात अन धंदा होइल. माझा कस्टमर फिक्स होइल. जमतेय का?
  • Log in or register to post comments

यूनिक प्रोडक्ट ठेवा

मन्याटण्या
Wed, 04/27/2016 - 16:04 नवीन
जरा हटके प्रोडक्ट जे बाजारात सहसा मिळत नाहीत असे ठेवा. कपडे विकणाऱ्या खुप साइट्स आहेत, स्पर्धेत टिकून रहायला काहीतरी वेगळेपण असायला हव.
  • Log in or register to post comments

मान्य

shindebv
Wed, 04/27/2016 - 16:11 नवीन
मान्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्याटण्या

साईट आवडली. प्रचार केला जाईल.

एस
Wed, 04/27/2016 - 16:09 नवीन
साईट आवडली. प्रचार केला जाईल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

shindebv
Wed, 04/27/2016 - 16:13 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

तंतोतंत शुभेच्छा

नाखु
Wed, 04/27/2016 - 16:19 नवीन
अभिनंदन आणि व्यवसायातील उत्तम यशासाठी अनेकानेक शुभेच्छा ! कोणी मराठी माणूस असा स्वतंत्र व्यवसाय करताना पाहून खूप आनंद होतो.
आठ ते पाच वाला चाकरमानी
  • Log in or register to post comments

जमतील तेवढ्या मॅटर्निटी हॉस्पिटलमधे

विवेक ठाकूर
Wed, 04/27/2016 - 16:30 नवीन
या उपक्रमाची पोस्टर्स लावा.
  • Log in or register to post comments

साईट बघितली बाकी साईट्सच्या

क्रेझी
Wed, 04/27/2016 - 16:32 नवीन
साईट बघितली बाकी साईट्सच्या मानाने थोडी साधी वाटली. कपडे पण ठीक आहेत पण किंमत जास्त वाटली आणि वयोगट म्हणून तुम्ही ९-१२वर्षे असे लिहीले आहे पण त्याला क्लिक केल्यावर लहान मुलांचेच कपडे दिसले. तिथे ९-१२महिने असे अपेक्षित आहे का? अजुन व्हरायटी पाहिजे बुवा तरच ऑनलाईन शॉपिंगला मज्जा येते :) बाकी प्रयत्न चांगला आहे, शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

गॅरी ट्रुमन
Wed, 04/27/2016 - 17:04 नवीन
तुमच्या व्यवसायाला हार्दिक शुभेच्छा. काही मुद्दे १. तुमचा व्यवसाय ई-कॉमर्समध्ये आहे. ई-कॉमर्स हे प्रचंड स्पर्धात्मक क्षेत्र आहे. या क्षेत्रात अ‍ॅमॅझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील इत्यादी मातबर मंडळी आधीच आहेत. फ्लिपकार्ट, स्नॅपडीलने मध्यंतरी कित्येक कोटी डॉलर्सचे फंडिंग आणले. सध्या तो ओघ मंदावला असला तरी या क्षणी तरी फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या ठिकाणी बर्‍याच कमी किमतीत वस्तू विकणे त्यांना शक्य होते.कमी भांडवलात तुम्ही व्यवसाय सुरू केला असेल तर किंमत या गोष्टीवरून इतरांना तोंड देता येणे कठिण आहे. तेव्हा सल्ला हा की तुमच्याकडे एखादी गोष्ट स्पेशलाईझ्ड ठेवा. म्हणजे एखादी (किंवा अनेक) गोष्टी केवळ तुमच्याकडे मिळतील अशी काहीतरी गोष्ट तयार करा आणि विका हा सल्ला. अन्यथा जर इतर ठिकाणी ज्या गोष्टी मिळतात त्याच तुमच्याकडेही मिळायला लागल्या आणि फ्लिपकार्टवाल्यांचे डीप पॉकेट असल्यामुळे तिथे स्वस्तात मिळायला लागल्या तर ग्राहकांची संख्या मर्यादित राहिल हा धोका आहे. फ्लिपकार्ट-स्नॅपडीलवाल्यांचे हे स्वस्तात विकायचे बिझनेस मॉडेल किती काळ चालेल याची कल्पना नाही. पण सध्या तरी ते चालू आहे असे दिसते. २. सध्याचा जमाना मोबाईल अ‍ॅपचा आहे. हळूहळू वेबसाईट बरोबरच अ‍ॅपही चालू करायचा विचार करा. ३. फेसबुकवर तसेच गुगलवर (सर्चइंजिन ऑप्टिमायझेशन करून) टारगेटेड जाहिराती देता येतात. उदाहरणार्थ शेव्हिंग प्रॉडक्ट विकणार्‍या एका कंपनीची अशीच टारगेटेड जाहिरात मला गेल्या काही दिवसांपासून फेसबुकमध्ये दिसत आहे. म्हणजे अमुक एका वयोगटातील, भारतातील शहरांमध्ये राहणार्‍या पुरूषांना ही जाहिरात दिसावी अशा प्रकारची टारगेटेड जाहिरात आहे ती. तशाप्रकारची टारगेटेड जाहिरात फेसबुक-गुगलमध्ये द्यायचाही विचार करा. ४. तुमच्या व्यवसायाचे एक फेसबुक पेज सुरू करा. त्यावर मधूनमधून काही ऑफर, कुपन कोड वगैरे कॅम्पेन केल्यास ते चांगले होईल. सध्या सुचले हे मुद्दे लिहिले. तुमच्या व्यवसायास हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

उपयोगी सुचनान बद्दल धन्यवाद.

shindebv
गुरुवार, 04/28/2016 - 11:59 नवीन
उपयोगी सुचनान बद्दल धन्यवाद. सगळ्यांची सूचना लक्षात घेवून फोटो शूट चांगले करण्यास सुरुवात केलेली आहे . बाकी गोष्टी पण अमलात आणल्या जातील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

प्रथम व्यवसायास हार्दिक

संदीप डांगे
गुरुवार, 04/28/2016 - 00:57 नवीन
प्रथम व्यवसायास हार्दिक शुभेच्छा. मराठी माणसाने उद्योगधंद्यांचा विचार करावा हे माझे नेहमीच मत राहिले आहे. वेबसाईटवरुन तुम्ही कपडे विक्रीचा व्यवसाय सुरु केलाय जे कौतुकास्पद आहेच. जाहिरात करतांना थोडी सावधानता बाळगा असे म्हणेन. तुमचे पॉकेट किती खोल आहे हे माहिती नाही तरी नोकरी सांभाळून करताय म्हणून थोडी काळजी घ्या. आता महत्त्वाचे : हा रिपोर्ट तुमच्या वेबसाईटबद्दल आहे. http://nibbler.silktide.com/en_US/reports/joypie.in ह्यात ज्या सूचना दिल्यात त्यावर विचार करुन अंमलबजावणी करा. मला स्वतःला जाणवलेले काही मुद्दे असे १. लोड व्हायला खूप वेळ घेते. कुठल्याही नेटवर्कला वेबसाईट ३ सेकंदात दिसली पाहिजे. इमेजेस साईज (केबीमधे) कमी ठेवा. स्क्रिप्ट्स गुंतागुंतीच्या असतील तर लोडिंगला वेळ घेते. त्यासाठी तुमचा डेवलपर अतिशय उत्तम पाहिजे. इथे कोणतीही कंजूषी करु नये. शेवटी वेबसाईट तुमचे दुकान आहे. लवकर उघडले नाही तर ग्राहक परत जाईल. मिपावरचे डेवलपर मदत करु शकतील २. वरायटी आणि ऑप्शन्स वाढवा. सुरुवात आहे म्हणून ठिक आहे असे म्हणणार नाही. कारण तुमची वेबसाईट लोकल वाटायला नको. स्पर्धा आहे त्यामुळे ग्राहकाला ऑप्शन्स भरपूर देणे आवश्यक आहे. दुकानात साडी दाखवणारे एका बाईला इतक्या साड्या दाखवतात तो अ‍ॅप्रोच असला पाहिजे. तुमच्या ग्राहक ह्या स्त्रिया बहुसंख्याने असतील हे लक्षात ठेऊन प्लानिंग करा. ३. स्पाने सांगितल्या प्रमाणे दर्जेदार प्रोडक्ट फोटोग्राफी इज मस्ट. एखादा हौशी फॅशन फोटोग्राफर आणि दहा बारा वेगवेगळ्या साईजची मुले घेऊन आठवड्यातून एकदा फोटो शूट करत चला. हौशीला सांगा, फुल्ल ढिल दिलिय तुला, पाहिजे ते कर, पैसे मागू नको ;) पॅशन असणारे काम नीट करतात, शिवाय त्याला पैसे व रेफरंस मिळतीलच. ४. तुमच्या वेबसाईटची काहीतरी युनिक ओळख असली पाहिजे, त्यासाठी ग्राहकांचा सर्वे करा. त्यांना भेडसावणार्‍या समस्या जाणून घ्या, स्पर्धकांचे लुपहोल्स शोधा. माझा त्याबाबतीत अभ्यास नाही, नाहीतर काहीतरी क्लु दिला असता. वेबसाईट वर ट्रॅक्शन यायला लागणारा वेळ अनेक घटकांवर अवलंबून आहे. त्यातला सर्वात मोठा घटक पैसा आहे. उत्पादन किंवा सेवेचा दर्जा हा नंतरचा भाग झाला, आधी साइटविजिट्स होणे महत्त्वाचे. मोठ्या कंपन्या बेसुमार पैसा ओततात तेव्हा त्यांना तसे ट्रॅक्शन मिळते. तसे करणे तुम्हाला शक्य होणार नाही तस्मात् ऑनलाईन अ‍ॅडवर्टाइजिंगमधे पैसे घालवू नका. टार्गेटेड अ‍ॅड हा प्रकार वर गॅरी यांनी सांगितला तो छोट्या कंपन्यांना फारसा लाभदायक नाही हा अनुभव आहे. महिन्याला दहा लाख इतके फक्त फेसबुकचे बजेट ठेवत असाल तर उपयोग होतो. बाकी हजार पाचशे रुपये डेली बजेट म्हणजे फेसबुकची धन आहे. वेबसाईटवर ट्रॅन्जॅक्शन्स मोठ्या प्रमाणात व्हायला खुप वेळ जाईल. धीर ठेवा. तुमच्यासारखीच सेवा देणारे अनेक आहेत म्हणून नाराज व्हायचं नाही, खचून जायचं नाही. सोशलमिडिया जसे की व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व ट्विटरचा वापर योग्य पद्धतीने फुकट करणे हे उपयुक्त ठरेल. लहान मुलांशी संबंधित जिव्हाळ्याच्या विषयांवर दोन तीन ब्लॉग सुरु करा, इंग्रजी, मराठी. इथले काही सदस्यही त्यावर आपले लेख देऊन तुम्हाला मदत करु शकतील. ह्या ब्लॉगपोस्ट तुमच्या फेसबुक पेजद्वारे शेअर करा, व्हॉट्सएपवरुन शेअर करा. ह्यात सातत्य ठेवा . तुमच्याकडून सेवा घेतलेल्यांचे फीडबॅक टाका. मुलांनी ते कपडे घातलेत असे फोटो (पालकांची हरकत नसेल तर) पेजवर हॅप्पी कस्टमर म्हणून शेअर करा. दर महिन्याला काहीतरी कॉन्टेस्ट ठेवा, व विजेत्यांना मोफत टीशर्ट इत्यादी द्या. ऑनलाईन खरेदीदारांना आकर्षित करण्याचा एक महामार्ग म्हणजे डिस्काऊंट. ते लक्षात ठेवा. वेगवेगळ्या स्कीम्स पसरवत राहा. काही तरी हटके, लक्ष वेधून घेणारे कृत्य सुरुवातीच्या काळात कराल तर वेबसाईटवर विजिट्स वाढतील, ती लक्षातही राहील. उदा. आता शाळेसाठी मुलांची नव्या वर्षाची खरेदी होते तेव्हा जुने कपडे पडून असतात. ते दान देण्यासाठी कॅम्पेन चालवू शकता. त्यातून युआरएल व तुमची वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल. पुण्यात साधारणतः ५० हजार ते ७० हजार स्त्रिया दरवर्षी प्रसूत होतात. म्हणजे साधारण तुम्हाला दरवर्षी किमान १० हजार नवे ग्राहक उपलब्ध होतात (जे ऑनलाईन खरेदी करु शकतात, करतात) खास नवजात बालकांसाठीच्या कपडे व अ‍ॅक्सेसरीजसाठी विवेक ठाकूर यांनी म्हटल्याप्रमाणे मॅटर्निटी होम्समधे जाहिरात करु शकता. त्यासाठी एक करता येईल. काही मॅटर्निटी होम्सशी टाय अप करुन प्रसूत होणार्‍या मातेस एक (पन्नास रुपयाचा) बुके व शुभेच्छा कार्ड (डिझाइन, कन्सेप्ट, प्रिंटींग : अभ्या..) पाठवून कस्टमर रिलेशनशिपसाठी प्रयत्न करु शकता. त्या नव्या मातेला व कुटुंबियांना हा अ‍ॅप्रोच निश्चितच आवडेल व तुमची दखल घेतली जाईल. सुरुवातीला साधारण महिन्याला पाच सात हजार खर्चात तुम्ही चांगले गुडविल मिळवू शकाल. मिपावरची मान्यवर डॉक्टरमंडळी त्यांच्या मित्र/मैत्रिणींच्या मॅ. होम्समधे तुमच्यासाठी शब्द टाकू शकतील. ऑनलाईनमधे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचणे शक्य होते. पण अपरिमित कष्ट करण्याची तयारी हवी. छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायाला सहाय्यक होईल अशी स्वस्त मस्त सोशलमीडियासाठीची सेवा मी सुरु केली आहे. ह्या फेसबुक पेजवर आपल्याला अधिक माहिती मिळेल https://www.facebook.com/365Virals-1130927097002173/ अधिक प्रश्न वा शंका असल्यास व्यनि करु शकता वा फोनवर संपर्क साधू शकता. धन्यवाद! परत एकदा खूप खूप शुभेच्छा. आपली उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा!!!
  • Log in or register to post comments

संदीप डांगे आपले विशेष आभार .

shindebv
गुरुवार, 04/28/2016 - 11:56 नवीन
संदीप डांगे आपले विशेष आभार . फार उपयोगी माहिती दिली . सगळे मि पा कर खरे मराठी आहेत. लोग उगाच म्हणता कि एक मराठी माणूस दुसऱ्याचे पाय ओढतो . आपण पण बदलोय हे मि पा वरून जगाला दिसतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नवीन व्यवसायासाठी भरपूर

किसन शिंदे
गुरुवार, 04/28/2016 - 01:14 नवीन
नवीन व्यवसायासाठी भरपूर सार्या शुभेच्छा मालक.! एखाद्या कपड्याची मागणी संस्थळावरून टाकल्यानंतर किती दिवसात (लागणारा एकुण वेळ) ते पार्सल मागणी करणार्यांपर्यंत पोचते?
  • Log in or register to post comments

ते ओर्डर कुठून आलीय

shindebv
गुरुवार, 04/28/2016 - 12:07 नवीन
ते ओर्डर कुठून आलीय त्याच्यावर अवलंबून असते . आम्ही ओर्डर बहुतेक वेळेस २४ तासात कुरीर कंपनी कडे देतो जेणे करून लवकरात लवकर पोचावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

शिंदे साहेब तुमचे अभिनंदन.

खटपट्या
गुरुवार, 04/28/2016 - 04:17 नवीन
शिंदे साहेब तुमचे अभिनंदन. आता सांगा की ही साइट तुम्ही बनवली कशी? थोडी माहीती त्याबद्दल दील्यास बरे होइल...
  • Log in or register to post comments

साईट बनवण्या साठी वेगवेगळी

shindebv
गुरुवार, 04/28/2016 - 12:13 नवीन
साईट बनवण्या साठी वेगवेगळी पर्याय उपलब्ध आहेत त्या पैकी सोपे असे joomla wordpress magento etc... security reason मुळे काय वापरले ते सांगत नाही आहे पण थोडी technology ची माहिती असेल तर खूप सोपे जाते. खूप माहिती आंतरजाला वर उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

शुभेच्छा!!

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 04/28/2016 - 05:14 नवीन
नव्या व्यवसायातील प्रगतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!! संदीप डांगे यांच्या प्रतिसादात खूप महत्वाचे मार्गदर्शन आहे.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

साहना
गुरुवार, 04/28/2016 - 05:28 नवीन
शुभेच्छा! संदीप डांगे ह्यांचा प्रतिसाद फार उपयोगी ठरेल. कमी खर्चांत मराठी लोकां कडे पोचायचे असेल तर मला व्ययक्तिक संदेश पाठवा
  • Log in or register to post comments

आपणास शुभेच्छा.

रेवती
गुरुवार, 04/28/2016 - 05:48 नवीन
आपणास शुभेच्छा. साईट आवडली. जसे कपडे/ वस्तू आहेत तसेच फोटू देताय ते आवडले तरी मी त्यातील तज्ञ नाही. बाकीचे म्हणतायत तेही बरोबर आहे. आपल्या साईटचा प्रचार केला जाईल.
  • Log in or register to post comments

नवव्यवसायाबद्दल कौतुक,

वेल्लाभट
गुरुवार, 04/28/2016 - 12:30 नवीन
नवव्यवसायाबद्दल कौतुक, अभिनंदन, शुभेच्छा ! शक्य तशी शक्य तितकी झैरात करण्यात येईल, प्रामाणिकपणे.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

असंका
गुरुवार, 04/28/2016 - 12:42 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मिपावर स्वागत आणि तुमच्या ऑनलाइन व्यवसायासाठी अनेक शुभेच्छा.

नीलमोहर
गुरुवार, 04/28/2016 - 16:08 नवीन
तुम्ही व्यवसायाचा नुसता विचार करत न बसता त्यात प्रत्यक्ष उतरलात ही खूपच कौतुकास्पद गोष्ट, हे सहजासहजी जमणारे नाही, त्यासाठी अभिनंदन. वेबसाईट चांगलीच झाली आहे, अजून थोडी आकर्षक बनवता आली, आणखी काही नावीन्य आणता आले तर पहाल. अर्थात व्यवसाय वाढेल तसे या गोष्टी होतीलच, साईटमध्येही अजून पुष्कळ बदल होत राहतील. साईटवर कपड्यांच्या अजून विविध व्हरायटीज, वेगवेगळे प्रकार ठेवू शकता, त्यासोबतच लहान मुलांच्या इतरही वस्तू जसे खेळणी, स्टेशनरी, पुस्तके, बॅग्ज इ.बर्‍याच गोष्टी हळूहळू विक्रीसाठी अ‍ॅड करू शकता. मात्र या गोष्टी टिपीकल न ठेवता त्यातही काही वेगळेपण असेल हे बघितले तर बरेच. कोणताही व्यवसाय करतांना पेशन्स ठेवावा लागतोच, शिवाय व्यवसायात बाकीच्या इन्व्हेंटरीज, त्याचा खर्चही बराच असतो त्यामुळे लगेच नफा होईलच असे नाही, सुरूवातीला कमी ऑर्डर्स असल्या तरी अजून जाहिरात आणि प्रमोशननंतर त्या नक्कीच वाढतील, त्या दॄष्टीने प्रयत्न सुरू ठेवावेत. तुमच्या व्यवसायाची उत्तरोत्तर प्रगती आणि भरभराट होवो, यासाठी ऑल द बेस्ट.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

shindebv
Fri, 04/29/2016 - 15:55 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

आपल्या व्यवसायास शुभेच्छा

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 04/28/2016 - 16:57 नवीन
आपल्या व्यवसायास शुभेच्छा तसेच शक्य तितकी झैरात करण्यात येईल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

shindebv
Fri, 04/29/2016 - 15:55 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा