Skip to main content

दिवेआगरमधील आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहिती हवी आहे.

लेखक गौतमी यांनी मंगळवार, 19/04/2016 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
इथे दिवेआगर व त्याच्या आजुबाजुच्या बघणेबल ठिकाणांविषयी माहितीपर एखादा लेख आहे का?

वाचने 9266
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

उन्हाळ्यात कोकणात जाताय? फार उन लागेल. किती दिवस आहेत हाताशी? दिवेआगरला मुक्काम केलात तर एक दिवस हरिहरेश्वर, श्रीवर्धन बघा.एक दिवस मुरुड,जंजिरा बघा. एक दिवस दिवेआगर बीचवरच खेळा. झाले ३ दिवस.

अहो मी मुळची कोकणातल्या माणगावची.. पण काही कारणांमुळे माणगाव वगळता जास्त फिरण झाल नाही, ह्यावर्षि अनायासे संधी चालुन आली आहे म्हणुन जायचा विचार करतेय...२दिवस घरी आणी २-३ दिवस फिरणार.

गौतमीतै, तुमच्या साठी खास, दिवे आगार भटकंतीचे चार धागे दिलेत, ते ही तुम्ही मुळच्या माणगावच्या असल्यामुळे ! सहल झाल्यावर वृतांत टाकायला विसरु नकात. अन लगोलग पिंचिमध्ये मिपाकटटा आयोजित करुन टाका. मुक्तविहारी अन प्रचेतस याना प्रमुख पाहुणे म्हणुन बोलवुयात

In reply to by चौथा कोनाडा

मुवि व प्रचेतस याना प्रमुख पाहुणे म्हणून नाही प्रमुख स्पॉन्सरर म्हणून बोलवा. एक प्रगतीशील शेतकरी व दुसरे वजनदार व्यक्तिमत्व !

In reply to by चौकटराजा

:-))) लै धम्माल येइल. एक जण वानवळा आणेल अन दुसरा त्याचे इव्हॅल्युएशन करेल. :-))) अन चौरा पेशल जज ! चला, हव्वा येवु द्या !

चौथा कोनाडा... खूप खूप धन्यवाद लिंक्स दिल्याबद्दल. दिवेआगरला जाऊन आले. वृत्तांत लिहायला अजून वेळ नाही मिळालाय पण जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर जमेल तेवढ लिहायचा प्रयत्न करते. तूर्तास फक्त धन्यवाद. (खूप खूप मदत झाली मिपा वरील बहुतेकांच्या वृत्तांताची)

In reply to by गौतमी

तलकाडू : एक प्रवास मला जर कुणी सांगितलं असतं की तुला अनपेक्षितपणे अचानक, वाळूत बुडून गेलेल्या मंदिर संस्कृतीला भेट द्यायचा योग येणार आहे, तर मी अजिबात विश्वास ठेवला नसता. “वेळेशी शर्यत” करत हा योग साधला गेला त्याचीच ही कहाणी! म्हैसूर मधली ती प्रसन्न सकाळ अवतरली. बाकीचे सगळे आवरे पर्यंत म्हटलं,जरा लॉजच्या बाहेर जाऊन चौकशी करून यावी. रस्त्यावर येऊन एका स्वच्छ छानशा हॉटेल मध्ये . . . . . http://www.misalpav.com/node/29188 आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद ! वेळ काढुन वृतान्त जरुर लिहा. प्रत्येकाचे अनुभव वेगळे, त्या अनुभवांची / भटकंतीची खुमारी वेगळी. आम्हाला ही आनंदlलुटता येइल त्याचा ! तो पर्यंत आमचा एक भटकंती वृतांत वाचा :

:)

ईथे मी 'पाटिल खानावळ' बद्दल बरच ऐकुन होते पण चक्क माझी निराशा झाली. जेवण अगदीच भिक्कार होत. (मला तरी तस वाटल आणी घरच्यांनाही नाही आवडल. सुरमई थाळीत दिलेली सुरमई फ्राय शिळी लागली.) याउलट आम्ही दुसरीकडे ओर्डर दिली रात्रीच्या जेवणासाठी. त्याचं नाव श्री. मंगेश कोसबे. मोबाईल नं. ९४०३६४७०९४ त्याच्याकडे राहण्याची आणि जेवणाची छान सोय होते. समुद्रकिनाऱ्याजवळच त्यांची वाडी आहे. जेवण इतक सुंदर होत. अहाहा। मस्त पापलेट फ्राय आणि कोलंबीच कालवण, मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी, भात आणि कोशिंबीर एकदम मस्तच. (मु. पो. दिवेआगर, सत्यवान सावित्री पाखाडी, ता. श्रीवर्धन, जि. रायगड. मो. ८७९३११३८३४ / ९२०९११५५७४ )

In reply to by गौतमी

मंगेश कोसंबी यांची मस्त माहिती. उपयोगी पडेल. ( हा भटकंती वृतांताचा प्रोमो समजावा का? या प्रोमो वरुन आश्वासक लिखाणाची अपेक्षा निर्माण झालीय )

In reply to by गौतमी

कोणत्याही गोष्टीची सुरुवात नेहमी अडखळतच होत असते, आपल्यातल्या लेखकपणाची जाणीव स्वतःच्या कळत-नकळतच होत असते ! तेव्हा अनुभव नाही म्हणुन लिहायला बिचकु नका. ल्ह्या बिनधास्त ! मिपाकर आपलेच आहेत ! मिपा मस्त आहे. मिपाकर लिहायला नेहमीच उत्तेजन देत असतात (उदाहरणार्थ, मी :-)

In reply to by मुक्त विहारि

पुढचा मिपाकट्टा मंगेश कोसंबे कडेच करुयात. म्हंजे दोन तीन शतकी कट्टापेशल धागे काढायचा त्रास वाचला ! जय मुवि , जय प्रचेवल्ली ! :-)))

In reply to by मुक्त विहारि

पण दिवेआगरला जेवण म्हणजे बापटांशिवाय पर्याय नाही. साधे पण सुंदर शाकाहारी भोजन. त्यांच्याकडचे मोदक काय वर्णावे..आहाहाहा.

In reply to by प्रचेतस

मी गेली कित्येक वर्षे "बापटांकडेच" जेवत आहे.अर्थात डोंबोलीतल्या. आणि खिम्याचे किंवा कोलंबीचे सारण भरलेले मोदक खाल्यापासून, ते खोबरे-गूळ घातलेले मोदक आम्हाला रुचेनासे झालेत. अर्थात तुमच्या बरोबर कट्टा करायचा म्हणजे खाण्याबाबतीत आणि पिण्याबाबतीत पण तडजोड करूच. वेरूळला गेलो तर मात्र खाण्या-पिण्या बाबतीत तडजोड करणार नाही, हे आधीच सांगीतलेले बरे.

In reply to by मुक्त विहारि

हाहा. वेरुळला मात्र तडजोड करायलाच लागेल. अजिबातच पर्याय उपलब्ध नाहीत. ज्योतिर्लिंग आणि जैन लेणी असल्याने वेरुळ गावात शाकाहारीच ठिकाणे आहेत.

In reply to by प्रचेतस

आयला, इथे पण तडजोड?????????????????????? असो, खाण्या-पिण्याच्या अहंकाराला तिलांजली द्यावी लागणार. पण तुमच्या बरोबर लेणी पहायची असल्याने तो अहंकार गुंडाळायला लागणार.

In reply to by मुक्त विहारि

नंतर औरंगाबादेत किंवा वाटेत ढाब्यावर करू की सामिष कट्टा. बिरुटे सर आहेतच. त्यांना माहिती आहेत ठिकाणं.

In reply to by मुक्त विहारि

मूवी दादा, वल्ली शेठ, औरंगाबाद कडून वेरूळ कड जाताना सर्व प्रकारची 'सोय' होते. काळजी नसावी. रहायला हाटील शोधत असाल तर एकदा हिरण्य रिसॉर्ट जालावर शोधून बघा. मस्त तंबूत राहण्याची व्यवस्था होईल. सूचना:- हिरण्य वाला माझा कुणीही लागत नाही. औरंगाबाद मधील काहीस वेगळं ठिकाण म्हणून सुचवलं आहे. येथे माझा कसलाही संबंध नाही.

In reply to by बाबा योगीराज

राहायला माझं नेहमीच ठरलेलं आहे वृंदावन. अगदी लेणीपासून २ मिनिटे चालत अंतरावर. हिरण्यबद्दल बरंच ऐकलंय.

In reply to by प्रचेतस

बापट बोले तो एकदम सही ! इतर पाच सात ठिकाणी जेवुन बघितले.... शेवटी बापटांकडचेच आवडते/ले. साधे पण चविष्ट सुंदर जेवण याचे सुरेख उदाहरण