....तसं नाहीये
समुद्राच्या अंगी आवेग भिनायला
भरतीची जोड लागते
.
संध्येला कातर व्हायला
सूर्यास्ताची वेळ लागते
.
चातकाच्या आतुरतेला
वसंताची ओढ लागते
.
पाण्याला नितळ व्हायला
स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो
.
मातीला गंधाळायला
पहिल्या पावसाची सर लागते
.
प्राजक्त ओघळायला
पहाटेची साथ लागते
.
मोगर्याला गजरा व्हायला
धाग्याची गाठ लागते
.
मऊ साय धरायला
दुधाला धग लागते
.
साध्या पाण्याचे थंडगार तुषार
व्हायला कड्यावरुन कोसळावे लागते
.
हवेला कुंद व्हायला
धुक्याची हाक लागते
.
इतकचं काय,
चंद्र उठून दिसायलासुद्धा
रात्रीचे आंगण अन्
चांदण्यांचे कोंदण लागते
.
पण तुझं तसं नाहीये गं
तुझं... तसं नाहीये
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२८/०५/२०१३)
ओह्हो. सिंप्ली ग्रेट रे.
पाण्याला नितळ व्हायला
+१
आहाहा
मस्त..........!
कविता बनवायला
सहमत आहे
छान कविता
आवडले
मस्तच मिका.. क्या बात है...
गविंशी सहमत!!
मिका,
सर्वात जास्त आवडलं ते
मिका मिपाचा हिरा आहे हिरा.
ह्याचा ऑटोग्राफ घेऊन ठेवा रे
खूप आवडली.मोगर्याला गजरा
मोगर्याला गजरा व्हायला धाग्याची गाठ लागतेह्या ओळी सर्वात आवडल्या.पण तुझं तसं नाहीये गं
sundar..
सुंदर... फार आवडली..
आवडली कविता.
सुरेख कविता.
अप्रतिम !!
छान!
व्वा!