Skip to main content

....तसं नाहीये

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 26/06/2013 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्राच्या अंगी आवेग भिनायला भरतीची जोड लागते . संध्येला कातर व्हायला सूर्यास्ताची वेळ लागते . चातकाच्या आतुरतेला वसंताची ओढ लागते . पाण्याला नितळ व्हायला स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो . मातीला गंधाळायला पहिल्या पावसाची सर लागते . प्राजक्त ओघळायला पहाटेची साथ लागते . मोगर्‍याला गजरा व्हायला धाग्याची गाठ लागते . मऊ साय धरायला दुधाला धग लागते . साध्या पाण्याचे थंडगार तुषार व्हायला कड्यावरुन कोसळावे लागते . हवेला कुंद व्हायला धुक्याची हाक लागते . इतकचं काय, चंद्र उठून दिसायलासुद्धा रात्रीचे आंगण अन् चांदण्यांचे कोंदण लागते . पण तुझं तसं नाहीये गं तुझं... तसं नाहीये |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२८/०५/२०१३)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6255
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

ओह्हो. सिंप्ली ग्रेट रे. आम्हाला प्रतिसाद द्यायला पण शब्द हुडकावे लागतात. तुझं तसं नाहीय्ये रे मिका.

पाण्याला नितळ व्हायला स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो
पाण्याला नितळ व्हायला किरणांची झालर लागते कविता अन कल्पना दोन्ही आवडल.

शेवटच्या दोन ओळी....... क्या बात हैं...

कविता बनवायला उपमांची प्लेट लागते.. कडवी बांधायला यमकांची जुडी लागते.. पण तुझं तसं नाहीये रे मिका.. तुझं तसं नाहीये. .......... कविता ठीक. शेवटच्या दोन ओळीत सगळा जीव आहे, बाकीची जुळणी उत्स्फूर्त नाही. तू फार वरचं स्टँडर्ड सेट करुन ठेवलं आहेस, तेव्हा चूक तुझीच.

In reply to by गवि

शेवटच्या २ ओळींसाठी बाकी रचना केल्यासारखे वाटले. म्हणजे काय, ही रचना वाटली. उत्स्फूर्त आविष्कार नाही वाटला नेहमीसारखा. तरी ठीक. उन्नीस-बीस चालतंय कधी मधी! :)

गविंशी सहमत!! शेवटच्या दोन ओळीच अख्खी कविता खाऊन टाकतात.

महौल इतका जबरी झालयं की आता यावर उतारा यायलाच हवा!

ह्याचा ऑटोग्राफ घेऊन ठेवा रे कुणीतरी माझ्यासाठी. ज्येष्ठ कवी पद्मविभूषण मिसळलेला काव्यप्रेमी ह्यांचा संदेश नि स्वाक्षरी. ;)

पण तुझं तसं नाहीये गं तुझं... तसं नाहीये वाह! सगळी कविता वाचल्यावर हा शेवट समर्पक आहे.

Namaskaar Mi.Ka. mastach.. khoop diwasanni yeNe zhaale ani tumchi kavita wachaayla miLali. sundarach..

खूप सुरेख आहे! शब्दान्ना जुळुन यायला भावनान्ची साथ लागते. :)