मारीचझंपीचे (बंगाली) कम्युनीस्ट ( )मृग ( )
आंतरजाल न्याहाळताना कोणतीशी दडपशाहींची यादी नजरे समोर उगवली, सहसा दडपशाहीच्या कथांमध्ये केवळ पात्रे बदललेली मनुष्य सर्वत्र सारखा असतो असा विचार करत फारसे डिटेल्स न वाचता वेगाने पुढे गेलो पण एक वेगळच नाव दिसलं मारीचझंपी, स्थळनामांची गमंत असते काय असेल या स्थळनामा मागे या उत्सुकतेने डिटेल्स उघडले. मारीचझंपी हे एक बेट आहे, पश्चिम बंगालच्या सुंदरबनातील एक संरक्षीत वन्यक्षेत्र हे लक्षात आलं.
माझ्या प्रमाणेच तुम्ही कितीही कम्युनीस्ट नसा काही भारदस्त भारतीय कम्युनीस्टांची नाव तुमच्या मनाच्या कुठेतरी चांगली जागाही अडवून असतात मग त्यात त्यांचा एखादा सादगीपूर्ण मुख्यमंत्री असतो, कुठे सोमनाथ चटर्जी असतात, कुठे सिताराम येचुरी असतात, तसचं एक नाव ज्योती बसूंच. ज्योती बसू अस एक नाव ज्याने पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री झाल्या नंतर काँग्रेसला न झेपलेले लँड रिफॉर्मची यशस्वी अंमलबजावणी करुन कसेल त्याची जमीन आणि भूमीहीनांना जमीन हे अधिक यशस्वीपणे करुन दाखवल हे आठवत होतो आठवण्याच कारण ज्योती बसूंनी बनवलेली कम्युनीस्ट बंगालची प्रतिमा आणि त्यांच्याच मुख्यमंत्रीय कारर्कीर्दी सुरवातीची मारिचझंपी घटना कम्युनीस्टांच्या सगळ्या बेस्ट ऑफ सकारात्मक प्रतिमेवर '?' चिन्ह उपस्थीत करणारी पण कुठेच वाच्यता न होणारी !
काय झालं या मारिचझंपीला ? जवळपास सहा हजार निर्वासीत कुटूंबांना (तिस-ते चाळीस हजार लोक) आरक्षीत वन्यक्षेत्रार अतीक्रमीत उद्घोषीत करुन हुसकाऊन लावल गेल. काय वावग होतं यात ? तांत्रिकदृष्ट्या ते पुर्णतः अतीक्रमण असावं आणि अतीक्रमण उठवणार्या प्रशासनाच्या उद्देश्यात खूप गैर असेलच असे नाही. मग प्रश्न कुठे आहे ? हे तथाकथिक अतीक्रमण करते बंगाली कम्युनीस्टांनी -ज्योती बंसूंनी- स्वतःच आमंत्रण दिलेले होते, सत्तेत विरोधीपक्षात असताना आश्वासन दिलेले होते सत्तेत आल्यानंतर त्यांच्या मंत्री महोदयांनी व्यक्तीशः जाऊन बोलावणे दिले होते. कोण होते हे अतीक्रमणकारी लोक ? १९४७ च्या फाळणी नंतर बांग्लादेशाचा राहता निवास सोडून यावे लागलेले हिंदू(-दलीत) निर्वासीत. बांग्लादेशातून आल्या नंतर सुरवातीस पश्चिम बंगाल मध्ये पाच निर्वासित कँपातून यांना ठेवल होत तत्कालीन काँग्रेस सरकारने पश्चिम बंगालवर लोकसंख्येचा ताण पडतो आहे असे सांगत या लोकांना उत्तराखंड, मध्यप्रदेश, ओरीसा अशा राज्यातून कँप उघडून देऊन सक्तीच स्थलांतर करवल यात काँग्रेसच्या भुमिकेत तथ्य असेलही पण बांग्लादेशातून स्थलांतर झालेल्यांना कदाचित कम्युनीस्ट त्यातल्या त्यात जवळचे असावेत आणि कदाचित त्यावेळच्या काँग्रेस समोर कम्युनीझम हे मोठे आव्हान असावे. प्रशासकीय कारण असो वा राजकारण काही असो पण सर्वच कँपातील निर्वासितांनी बंगाल सोडण्यास लावू नये म्हणून उपोषणे केलेली पण जसे काही वेळा राजा ऐकत नाही तसे इथे सरकारने/ काँग्रेसने आपले खरे केले १९४७च्या बंगाली निर्वासितांना भारतभर विखरुन दिले. असो एकुण १९७७ मधील आणिबाणी नंतर प. बंगालात कम्युनीस्ट सत्तेत आले तो पर्यंत सातत्याने कम्युनीस्टांनी या विषयावर भावनिक राजकारण करत भारतात विखुरल्या गेलेल्या बंगाली निर्वासितांना प.बंगालात वापस आणण्याच्या मोठ्या गप्पा केल्या. अगदी सत्तेत आल्या नंतरही त्यांचे मंत्री ओरिसात जाउन व्यक्तीशः जाऊन आमंत्रण देते झाले. आणि तब्बल तीस वर्षांनतरही बंगाली माणूस पश्चिम बंगालाकडे मोठ्यासंख्येने परतू लागला पण तो परततोय तो पर्यंत निवडून आलेल्या ज्योती बसू सरकारने पुर्ण कोलांट उडी मारत येऊ लागलेल्या दिड एक लाख लोकांना वापस जाण्यास सांगितले.
जसे काही वेळा राजा ऐकत नाही तसे काही वेळा प्रजाही ऐकत नाही. ओरीसातून आलेल्या सतीश मंडल या नेत्याने त्यांचा बंगाली समूह सुंदरबनातील मारीचझंपी या छोट्या रिकाम्या बेटावर नेला. बेटावर नव्याने आलेली हि पुर्वनिर्वासित बंगाली मंडळी हिंदू(-दलित) होती बांग्लादेशातून पशिम बंगाल, तिथून ओरीसा असा प्रवास करुन झाल्या नंतर नव्या बंगाली लोकात राहण्या स्वप्नांच्या खातर जवळच सर्व विकुन स्व खर्चाने बेटावर जाऊन राहीली वर्षाभरात बेटावर नव्याने आयुष्य आणि छोट्या अर्थव्यवस्थेची उभरणी मोठ्या कष्टाने केलेली. पण १९७९ येते तर कम्युनीस्ट तारणहारांची मने बदलली होती त्यांनी त्यांना सक्तीने जाण्यास सांगितले. ते नाही म्हणाले तर अन्नपाणी ब्लॉक केले न्यायालयाने अन्नपाणी ब्लॉक करु देण्यास मनाई केली तर त्यांना वेगळी जागा देऊन नव्हे अत्याचार करुन घालवले गेले. अत्याचार केला गेला असावा असे प्राथमीक वर्णनांवरुन दिसते पण एवढ्या सर्व वर्षात ते सातत्याने नाकारले गेले. त्याची ना कम्युनीस्टांना खंत न कोणत्या विरोधीपक्षाला खेद ! असे ते मारीचझंपी
मारीचझंपी या बेटाच्या नावाला काय म्हणाव योगायोग सुवर्णमृगाचा की मृगजळाचा ?
संदर्भ
https://en.wikipedia.org/wiki/Marichjhapi_incident#cite_note-mi2-3
https://bangalnama.wordpress.com/2009/07/06/the-silence-of-marichjhapi/
http://www.telegraphindia.com/1100118/jsp/frontpage/story_11996337.jsp
http://www.hindustantimes.com/kolkata/ghost-of-marichjhapi-returns-to-haunt/story-4v78MhnW2IZVCQMPfDObqO.html
http://timesofindia.indiatimes.com/city/kolkata/Wound-still-raw-for-Marichjhapi-survivors/articleshow/18281775.cms
https://www.quora.com/What-really-happened-at-Marichjhapi
https://books.google.co.in/books?id=r7ar3x8KAOsC&pg=PA100&lpg=PA100&dq=marichjhapi+massacre&source=bl&ots=16hb_n3XeE&sig=QMjEn1oxV_RV5SqQRcc7nqEIiGw&hl=en&sa=X&ei=ITIdVKthipe4BJ_IgMAD&ved=0CFEQ6AEwCDgK#v=onepage&q=marichjhapi%20massacre&f=false
realindianews.blogspot.in/2012/06/hindutva-experiment-is-being-extended.html
https://en.wikipedia.org/wiki/Namasudra
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेख अत्यंत माहितीपूर्वक!
अजून जरा लिहावयास हवे होते
हो हेच वाटलं मलाही!
माहितीपूर्ण लेखन
हे मारीचझंपी होताना केंद्रात
अहो,
हम्म
हा काळ इंदीरा गांधींना पाडून
निवडणुका आणि त्यांचे राजकारण
पुर्वबंगालातील जनतेस
दांभिकपणामध्ये
:)
बोका म्हणतात तसे त्यांनी संधी
सर, त्यांना एकदा सोडून दोनदा संधी मिळाली होती.
..
जेव्हा ते हिंदू असतात तेव्हा