✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मातृभूमीला 'माँ' म्हणण्याची गरज का?

व
विवेकपटाईत यांनी
Wed, 04/13/2016 - 21:20  ·  लेख
लेख
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संततिः समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते. अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे. पुरातन काळापासूनच आपण आपल्या भरत भूमीला आई म्हणतो. युरोपियन लोक हि देशाला पितृभूमी म्हणतात. एकदा का देशाला आपण माता /पिता मानले कि देशात बंधुत्वाचे वातावरण आपसूक निर्मित होते. जिथे सोख्य असेल तिथे शांती, आणि समृद्धी हि आलीच प्रकृतीने हिमालयापासून समृद्रापर्यंत एक विशिष्ट भूभागाची रचना केली आहे. या भू-भागात अनेक भाषा-भाषी, पंथ आणि जातींचे लोक राहतात. एकाच राजाचे राज्य नेहमीच या भूभागावर राहील, हे संभव नाही. सत्तेसाठी युद्ध हे अटळ आहेच. आपल्या देशात सत्ता बदलली तरी लोकांवर जास्त अत्याचार होत नव्हते. कारण लोकांमध्ये बंधुत्व भाव आहे. आपले ऋषी-मुनि दूरदर्शी होते. धर्म आणि जातीच्या नावाने संपूर्ण भरत भूमीत राहणार्या लोकांना सांस्कृतिक दृष्ट्या एक सूत्रात बांधणे शक्य नाही हे त्यांना माहित होते. प्रत्येकाला त्याचीच भाषा, जाती आणि पंथ श्रेष्ठ वाटतो. पण देशाच्या मातीप्रती लोकांच्या मनात आत्मीयता उत्पन्न करणे शक्य होते. आपल्या ऋषींनी हेच केले. सकाळी म्हणण्याचे श्लोक म्हणजे प्रात:स्मरणची रचना केली. लोकांच्या मनात देशाची माती आणि तिथे जन्मलेल्या महापुरुषांप्रती आदर भाव जागृत करणे हाच दूरदर्शी ऋषींचा उदेष्य हेतू होता. उदा: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती. नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु. महेन्द्रो मलय: सह्ये देवतात्मा हिमालय:. ध्येयो रैवतको विन्ध्यो गिरिश्चारावलिस्तथा. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका. पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. रोज सकाळी प्रात:स्मरण केल्याचा परिणाम, लोकांच्या मनावर नकळत होतोच. घरात नळाच्या पाण्याने किंवा गावात विहिरीच्या पाण्याने, स्नान करत असताना आपण देशातील सर्व नद्यांच्या पाण्याने आंघोळ करण्याचा आनंद घेतो. यमुनेच्या पाण्यात स्नान करताना माझ्या मनात कावेरी नदीत स्नान करण्याची इच्छा उत्पन्न होते. सर्व पर्वतांचे आणि नगरांचे दर्शन घेण्यासाठी यात्रेची इच्छा होणारच. भरतभूमी वर जन्म घेणार्या आपल्या पूर्वजांप्रती आपल्या मनात आदर आणि श्रद्धा निर्माण करण्याचे काम हि आपल्या ऋषींनी केले. भारतभूमीत जन्म घेणारी महान विभूती मग ती स्त्री असो वा पुरुष, त्यांची स्मृती नेहमी आपल्याला राहावी म्हणून त्यांना हि प्रात:स्मरणात स्थान दिले. आयुष्यभर संघर्ष करून आपले उद्दिष्ट साध्य करणार्या आपल्या ५ महान स्त्रियांचे आपण रोज प्रात: स्मरण करतो: अहल्या द्रोपदी सीता तारा मंदोदरी तथा. पंचकन्या स्मरेनित्यं महापातक नाशनम्. तसेच पुण्यश्लोको नलो राजा... ‘अश्वत्थामा बलिर्व्यासो... सारांश अश्यारीतीने पुरातन ऋषींनी आपल्या मनात या देशाच्या माती आणि पूर्वजांच्या प्रती आपल्या मनात आदर आणि भक्तीभाव उत्पन्न केला. आज आपण आपल्या पूर्वजांची पूजा करतोच मन देशाच्या मातीला ‘भारत माँ’ संबोधून तिची हि पूजा करतो. जेंव्हा देशाचे राजकीय दृष्ट्या शेकडों तुकडे झालेले होते, त्याच वेळी आदी शंकराचार्यांनी देशाच्या चारी भागात चार मठांची स्थापना केली. चार धाम यात्रेची सुरवात बहुधा आदी शंकराचार्यांमुळेच सुरु झाली असेल. शाक्त पंथीयांनी देशात विभिन्न भागात (पाकिस्तान सहित) ५२ शक्तीपीठांची स्थापना केली. शैवांनी देशात विभिन्न प्रांतात १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना केली. जवळपास सर्व हिंदू तीर्थ क्षेत्री जैनांनी सुद्धा आपली मंदिरे उभारली. गुरु गोविंद जर काही काळ आणिक जिवंत राहिले असते तर निश्चित कन्याकुमारीला हि एक गुरुद्वारा बांधला असता. असो. आज हि विभिन्न स्थानांवर भरणार्या कुंभ मेळ्यात देशातील सर्व ठिकाणाहून यात्रेकरू येतात, सर्व पंथीय साधू सन्यासी, यात्री एकत्र बसून चर्चा करतात. अश्यारितीने देशातील सर्वपंथांनी, या मातीप्रती लोकांचे प्रेम, श्रद्धा आणि आदरण निर्माण करण्यात महत्वाचे योगदान दिले आहेत. देशाला मातृभूमी किंवा आई मानण्याने, देशात राहणार्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होतोच या शिवाय एक राजनीतिक सत्ता स्थापन करण्यात हि यश येते. आपल्या देश्यात शेकडों चक्रवर्ती झाले. एकदा दिल्ली काबीज केली कि संपूर्ण देशाची सत्ता सहज प्राप्त होत होते हे आपण इतिहासात पाहिलेच आहे. आत्ताचेच उदाहरण घ्या. देशाला स्वतंत्रता मिळण्याच्या वेळी देशात ६०० पेक्षा जास्त राजे-महाराजे होते. त्यातील अधिकांश राजा-महाराजांनी स्व:खुशीने आपल्या राज्यांचे भारतात विलीनीकरण केले. तेथील जनतेने हि विरोध केला नाही. कारण विभिन्न राज्यात राहणारी लोक या देशाला ‘भारत माँ’ म्हणून ओळखत होते. भारतमाते प्रती त्यांच्या मनात श्रद्धाभाव होता. इस्लाम मध्ये देशाला मातृभूमी मानण्याची अवधारणा नाही. पण धर्मावर आधारित बंधुभावाची अवधारणा आहे. त्यांच्या मनात आपल्या गैर इस्लामिक पूर्वजांप्रती सम्मानाची भावननेला हि स्थान नाही. तेथील जनतेला एकत्र ठेवण्याचा कुठलाच दुआ उरलेला नाही. एकाच देशात राहणारे लोक, एकच धर्म मानणारे, पंथ, कबीला, जातीच्या नावावर एका दुसर्याच्या विरुद्ध लढत आहे. कोण स्वकीय आणि कोण परीकीय हे कळण्याची बुद्धी हि त्यांच्यात उरलेली नाही. जे लोक त्यांच्या कबील्याचे किंवा पंथाचे नाही, त्यांची हत्या करण्यात त्यांना काहीच वाईट वाटत नाही आहे. मग लहान मुले असो किंवा स्त्रिया सर्वांचाच वध होतो. लाखोंच्या संख्येने लोकांना आपली जन्मभूमी सोडून शरणार्थी बनावे लागले आहे. ह्या देशांचा संपूर्ण विनाश झालेला आहे. एकच धर्म मानणारे बंधुभावाने राहू शकतात, हि अवधारणा फोल ठरली आहे. गेल्या शतकात दोन विश्व युद्ध इसाई धर्म मानणार्या युरोपियन देशांत झाले. नेपाल हिंदू धर्मावलंबी असला तरी भारताशी त्याचे संबंध चांगले नाही. इस्लामी देशांची परिस्थिती तर आपण पाहताच आहोत.. ज्या देशांत त्यांची पूर्वजांना सम्मान दिल्या जातो, तेथील परिस्थिती वेगळी आहे. इराणी लोक आज हि अग्निपूजक जाल, रुस्तम, सोहराब यांचे तराणे गातात, तिथे शांती आहे. ५००० पेक्षा जास्त द्वीपसमूह आणि भारताप्रमाणे भिन्न-भिन्न जनजातीय असलेल्या इंडोनेशियात लोक एकत्र राहतात. रामायण आणि महाभारतातल्या कथांनी आणि चीनी परंपररेनी तिथल्या लोकांना एकत्र जोडलेले आहे. मिस्त्रच्या लोकांना आपल्या पिरामिड आणि त्यांना बनविणार्या पूर्वजांवर गर्व आहे. नील नदी प्रती त्यांच्या मनात आदर भाव आहे. परंतु आजकाल इस्लामी कट्टरता त्यांच्या मनात त्यांच्या पूर्वजांप्रती अनादर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचेच परिणाम आज मिस्त्रचे लोक भोगत आहेत. १९४७ मध्ये भारताच्या ज्या भागात इस्लाम मानणारे लोकांची संख्या जास्त होती, तो भूभाग देशापासून वेगळा झाला त्याचे कारण हेच. पण हे इथेच थांबणार नाही, देशाच्या मातीप्रती आदर नसल्यामुळे पाकिस्तानचे भविष्यात आणखीन हि तुकडे होण्याची संभावना नाकारता येत नाही. आज तिथे अराजकतेचे वातावरण आहे. बलूच, पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी सर्वच दुसर्याला आपले शत्रू समजतात. जर इस्लामी जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर मातृभूमीला आईचे स्थान देण्याची अवधारणा इस्लाम मध्ये समाविष्ट करावी लागेल. अर्थात हे कार्य इस्लामी विद्वानांच करावे लागेल. एकदा देशाला आई म्हंटले कि त्या भूमीत जन्म घेणार्या सर्व पंथीय आणि जातीय लोकांविषयी बंधुत्व भाव आपसूक निर्माण होतो. लोक एका दुसर्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. देशात शांती प्रतिस्थापित होते. आज आपल्या देशाला ‘भारत माता’ म्हणण्याचा विरोध काही अतिशहाणे पुरोगामी करीत आहे. एक तर त्यांना इतिहासाचे ज्ञान नाही. होणार तरी कसे? अंग्रेजानी देशावर राज्य करण्यासाठी ‘फूट डालो राज करो’ च्या नीतीचे अवलंबन केले होते. त्या साठी त्यांनी आपल्या पुरातन इतिहासालाच खोटे ठरविले. हेतू आपल्या पूर्वजांप्रती आपली श्रद्धा नष्ट करणे. एकदा लोकांच्या मनात ते वेगवेगळे आहेत, हि भावना रुजविली कि त्यांच्यात दुही माजविण्यात यश येतेच. त्याच साठी देवासुर संग्राम म्हणजे आर्य आणि द्रविडांचे युद्ध. असा इतिहास शिकवणे सुरु केले. आज देशाला स्वत्रंत होऊन हि ७० वर्षे झाली तरी हि आपल्याला पूर्वजांचा खरा इतिहास शिकविला जात नाही. अंग्रेजानी त्यांच्या स्वार्थासाठी तैयार केलेला खोटा इतिहास शिकून तैयार झालेले अतिशहाणे आपल्या भूमीला ‘माता’ कसे मानणार. भारत मातेच्या बर्बादीचे नारे लावणारे त्यांचे हिरो झालेले आहे. या विद्वानांना एवढे हि कळत नाही, एकदा भारत माते विषयी आपली श्रद्धा नष्ट झाली तर या मातीचे शंभर तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. मग लिबिया आणि इराक सारखी आपली गत व्हायला कितीस वेळ लागेल. हे टाळायचे असेल, तर उद्यापासूनच आपल्या मुला-बाळांना प्रात: स्मरणीय श्लोक शिकवा. आपल्या देशातील नद्या, पर्वत, पवित्र सरोवरे, पुरातन ऋषी-मुनि, राजा-महाराजा, बादशाह आपले सणवार त्यांच्या मागच्या कहाण्या इत्यादी बाबत माहिती दिली तरी चालेल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
32632 वाचन

💬 प्रतिसाद (184)

प्रतिक्रिया

मी इथे बादशाह शब्द हि टाकला

विवेकपटाईत
गुरुवार, 04/14/2016 - 14:27 नवीन
मी इथे बादशाह शब्द हि टाकला आहे. आपल्या पूर्वजांच्या इतिहासाला १००० वर्ष आधीच्या इतिहासाला हिंदू इतिहास म्हणणे एक संकुचित विचार धारा आहे. लोक गेल्या १००० वर्षांतच मुसलमान होणे सुरु झाले, ४०० वर्षांत इसाई. सर्वांचे पूर्वज इथेच राहणारे होते. इथल्या मातीत जन्म घेणारे सर्व महापुरुष वंद्निया आहे. राम कृष्ण माझे नव्हे तर इतर धर्मांच्या लोकांचे हि पूर्वज आहे. इथे नमूद करतो, २००५ मध्ये प्रधान मंत्री सोबत जकार्ता येथे गेलो होतो. तिथे आम्हाला इंडोनेशियाच्या इतिहासाची आणि स्वातंत्र्य युद्धाची जुजबी माहिती दिली. ५००० हून अधिक द्वीपांवर बसलेल्या विभिन्न जातीय समूह असलेल्या देशाला एकत्र कसे ठेवावे हा एक प्रश्न उपस्थित झाला होता. तेंव्हा त्यांनी 'जड़ों की और लौटो' हां नारा दिला. गैर इस्लामी पूर्वजांना हि साम्मानाचे स्थान दिले. पण इथे आपणच स्वत:... काही बोलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

आपल्या गैर इस्लामिक

नाना स्कॉच
गुरुवार, 04/14/2016 - 14:33 नवीन
आपल्या गैर इस्लामिक महापुरुषांना सन्मानाचे स्थान दिले जात नाहीये असे आपल्याला वाटते का पटाईतजी ?? असे वाटत असल्यास का वाटते म्हणे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

राम कृष्ण माझे नव्हे तर इतर

मराठी कथालेखक
गुरुवार, 04/14/2016 - 14:45 नवीन
राम कृष्ण माझे नव्हे तर इतर धर्मांच्या लोकांचे हि पूर्वज आहे.
रामयण आणि महाभारत या निव्वळ कथा (किंवा महाकाव्य म्हणू ) आहेत. ते कुणाचे पुर्वज नाहीत. आणि फक्त इस्लाम वा ख्रिश्चन धर्माचा प्रश्न नाही भारतात इतरही धर्माचे आहेत (जैन, बौद्ध , पारशी ई) त्यांनी हिंदू धर्माचे तत्वज्ञान जबरदस्तीने का स्वीकारावे. मुळात देशाचा, समाजाचा गाडा सुरळीत चालण्याकरिता आजच्या काळात धर्म उपयोगी पडत नाही. त्याकरिता देशाची राज्यघटना आहे. देशाच्या राज्यघटनेबद्दल आणि लोकशाही मुल्यांबद्दल आदर आणि ममत्व असावे असे मला वाटते. पुर्वीच्या काळी धर्म हा समाजव्यवस्थेचा कणा होता आणि राजांनाही धर्माच्या आधाराने राज्य चालवणे योग्य ठरे (धर्माधिष्ठित न्यायदान, राजकर्तव्ये ई) त्यावेळी ती गरजच होती. पण आता आपल्याकडे राज्यघटना आहे जी शास्त्रोक्त पद्धतीने , अभ्यासपुर्वक लिहिलेली आहे. मंथनातून बनविलेले कायदे आहेत (त्यात त्रुटी असतीलही , पण त्या दूरही केल्या जावू शकतात) थोडक्यात धर्म (मग तो कोणताही असो) ज्यात शेकडो -हजारो वर्षापुर्वी काही चांगल्या गोष्टी सांगितल्यात आणि आज जर तो अपरिवर्तनीय असेल तर माझ्या मते तो कालबाह्य आणि बहुतांशी निरुपयोगी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

राज्यघटना आणि लोकशाही मुल्य!

ट्रेड मार्क
Fri, 04/15/2016 - 01:15 नवीन
राज्यघटना आणि लोकशाही मुल्य यांच्याबद्दल त्या त्या देशातील सर्व नागरिकांना आदर असायला पाहिजे ना? भारतात फक्त हिंदू राज्यघटना आणि देशाचे कायदे पाळतात. मुसलमान फक्त सोयीनुसार त्यांना पाहिजे ते घेतात - उदा. सामाजिक कायदे - हे त्यांच्या सोयीनुसार तथाकथित शरिया मध्ये लिहिलंय असं सांगून ४ बायका करणार, ३ वेळा तलाक म्हणले, मग फोन वर, समस, स्काईप, कायप्पा ई ई कसे ही सांगितले तरी ते बाईने मानलं पाहिजे. वर कोर्टाला यात लक्ष घालायचा अधिकार नाही म्हणतात. आता या उलट - आरक्षण, गुन्हेगाराला शिक्षा ई ई मात्र भारतीय संविधानाप्रमाणे पाहिजे. इतर मुस्लिम देशात बलात्कार करणाऱ्यासाठी दगडाने ठेचून मारायची शिक्षा आहे. पण इथे मात्र ते सोयीप्रमाणे कोर्ट सांगेल तसे अशी भूमिका घेतात. निर्भयावर जीवघेणे अत्याचार करणारा फक्त १८ वर्षे वयाला काही दिवस कमी पडल्यामुळे फक्त ३ वर्ष सुधारगृहात राहून सुटला. एक तरी अल्ला का बंदा म्हणाला का हे चुकीचे आहे. या नराधमाला सगळ्यात जास्त शिक्षा झाली पाहिजे. इस्लामिक बँकिंग मध्ये व्याज घ्यायला बंदी आहे. इथे किती मुसलमान इस्लामिक बँकिंगचे कायदे पाळतात? सध्या फक्त एकाच धर्म हजार वर्षांपूर्वी लिहिलेले कायदे इतरांवर लादायचा प्रयत्न करतोय. ते पण सगळे कसे सोयीनुसार. शरिया सर्वांनी पाळला पाहिजे म्हणायचं आणि मग अंगावर आलंच तर शरिया वेगळा आणि कुराण वेगळं म्हणून पळ काढायचा. एकीकडे कुराणात शांततेचे संदेश आहेत म्हणायचं पण अमलात मात्र शरिया आणायचा. दुटप्पीपणा आहे सगळा. त्यामुळे असोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

भारतात फक्त हिंदू राज्यघटना

तर्राट जोकर
Fri, 04/15/2016 - 01:44 नवीन
भारतात फक्त हिंदू राज्यघटना आणि देशाचे कायदे पाळतात हास्यास्पद विधान. त्यामुळे असोच. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हास्यास्पद का?

ट्रेड मार्क
Fri, 04/15/2016 - 07:19 नवीन
तुमच्याच भाषेत म्हणतो विदा द्या. सिद्ध करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

काहिच्या काही विधानं तुम्ही

तर्राट जोकर
Fri, 04/15/2016 - 07:24 नवीन
काहिच्या काही विधानं तुम्ही करायची आणि विदा मी का म्हणून द्यायचा? बा भै बा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

अपेक्षित प्रतिसाद

ट्रेड मार्क
Fri, 04/15/2016 - 07:26 नवीन
जेव्हा तुम्ही माझ्या विधानाला आक्षेप घेताय तेव्हा तो आक्षेप का ते तुम्हीच सांगायला पहिजे. नसेल जमत तर राहूदे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तुमच्या वाक्यातच विदा आहे मी

तर्राट जोकर
Fri, 04/15/2016 - 07:29 नवीन
तुमच्या वाक्यातच विदा आहे मी ते वाक्य हास्यास्पद का म्हटले आहे ह्याचा. कळत नसेल तर राहू दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हा हा

ट्रेड मार्क
Fri, 04/15/2016 - 07:34 नवीन
ही तुमची पेटंट स्टाईल झाली आहे. पुढे प्रतिसाद नकाच देऊ. उगाच फालतू गोल गोल फिरण्यात मला इंटरेस्ट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तुमच्या कलगीतुर्यात बोलतो आहे म्हणून आगाऊ माफ़ी मागतो, पण

नाना स्कॉच
Fri, 04/15/2016 - 07:52 नवीन
,ट्रेड मार्क भाऊ जितपत मला माहिती आहे त्यानुसार, बहुपत्नीत्व (स्पेसिफिकली द्विभार्या असणे) हे फ़क्त मुसलमान लोकांना लीगल नसुन गोवा राज्यात रहिवास असणाऱ्या हिंदूंना सुद्धा आहे असे ऐकले आहे ब्वा, कोणी गोयंकर ह्यावर प्रकाश टाकू शकेल काय?? असल्यास असे प्रोविशन का आहे?? त्यामागे बॅकग्राउंड काय आहे? ह्याचे कुतूहल आहे! खालील प्रमाणे माहीती मिळाली बुआ
The Hindu men have the right to bigamy under specific circumstances mentioned in Codes of Usages and Customs of Gentile Hindus of Goa (if the wife fails to deliver a child by the age of 25, or if she fails to deliver a male child by the age of 30). For other communities, the law prohibits bigamy.
स्त्रियांच्या इतक्या हिडिस ऑब्जेक्टिफिकेशनला कधी कोणाला विरोध करताना नाही पाहिले बुआ! आता बहुपत्नीत्वाला विरोध आहे का फ़क्त मुसलिम लोकांतील बहुपत्नीत्वाला विरोध आहे ते समजल्यास बरे पडेल पुढे बोलायला, नाही जसं तुमचं कायमचं एक म्हणणे असते की "ब्वा अमुक मुद्द्यावर मुस्लिम धर्ममार्तण्ड काही कसे बोलत नाहीत" तसाच प्रश्न पडतो, की "ब्वा नवरात्री मधे 9 दिवस पूजा करुनही शेवटी स्त्री जोखली जाते ती तिच्या जनन क्षमता अन त्यातही मुलगे जन्माला घालायच्या क्षमतेच्या परिमाणावर" एरवी शिर्डी साईबाबा ह्यांचे देवत्व ते पाश्चात्य संस्कृती वगैरे बोलणाऱ्या धर्ममार्तण्डन्ना (आपल्याच धर्मातल्या) पोर्तुगीज सिविल कोड मधली ही प्रोविशन बरी चालतात, त्यावर कधी कोणी बरे बोलत नाही! असो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

नाय बा

पैसा
Fri, 04/15/2016 - 13:55 नवीन
कधीच ऐकले नाही. उलट गोव्यात समान नागरी कायदा आहे. हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्याना लग्नाचे रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे. गोव्यात जन्मलेले मुस्लिम एकच लग्न करू शकतात आणि तलाकने घटस्फोट होत नाही. हिंदूंच्या बाबत सांगायचे तर मी इतक्या वर्षात एकाच वेळी दोन बायका असलेला एकही माणूस बघितला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

मला

नाना स्कॉच
Fri, 04/15/2016 - 14:31 नवीन
ह्या लिंक मधे माहीती मिळाली, ती चुक असल्यास

माहीतगार साहेब कृपया इकडे लक्ष देणे (विकी लिंक असल्यामुळे ही विनंती करतोय)

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

इस्लामिक बँकिंग मध्ये व्याज

मराठी कथालेखक
Fri, 04/15/2016 - 12:30 नवीन
इस्लामिक बँकिंग मध्ये व्याज घ्यायला बंदी आहे. इथे किती मुसलमान इस्लामिक बँकिंगचे कायदे पाळतात?
म्हणजेच मुस्लिम व्यक्ती बँकेतून कर्ज घेतल्यास व्याजाचे हप्ते भरतो ना ? त्याने तसं करु नये असं म्हणायचं आहे का तुम्हाला ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

फायदा वाटून घ्यावा

ट्रेड मार्क
Fri, 04/15/2016 - 16:57 नवीन
इस्लामिक बँकिंगमध्ये व्याज देणे घेणे हे शरियाच्या विरुद्ध आहे. वेळेअभावी विंग्रजीत चोप्य पास्ते करतोय - Consider two persons, one of whom has capital but no special skills in business, while the other has managerial skills but possesses no capital. They can co-operate in either of two ways: Debt-financing (the western loan system): The businessman borrows the capital from the capital-owner and invests it in his trade. The capital-owner is to get back his principal and an additional amount on the basis of a fixed rate, called the interest rate, as his compensation for parting with liquidity for a fixed period. The claim of the lender for repayment of the principal plus the payment of the interest becomes viable only after the expiry of this period. This payment is due irrespective of whether the businessman has made a profit using the borrowed money. In the event of a loss, the borrower has to repay the principal amount of the loan, as well as the accrued interest, from his own resources, while the capital-owner loses nothing. Islam views this as an unjust transaction. Mudarabah (the Islamic way, or PLS): The two persons co-operate with each other on the basis of partnership, where the capital-owner provides the capital and the other party puts his management skills into the business. The capital-owner is not involved in the actual day-to-day operation of the business, but is free to stipulate certain conditions that he may deem necessary to ensure the best use of his funds. After the expiry of the period, which may be the termination of the contract or such time that returns are obtained from the business, the capital-owner gets back his principal amount together with a pre-agreed share of the profit.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

,,

mugdhagode
गुरुवार, 04/14/2016 - 14:47 नवीन
तुमच्या हिंदु नियमानुसार मनुष्य मागच्या फक्त तीन पिढ्याना तर्पण देउ शकतो. ( चु भु दे घे). यामागे संकेत हाच आहे की मनुष्य जवळची नाती जास्त प्रेमाने संभाळतो.. पाचशे वर्षापुर्वी ज्यांचे धर्मांतर झाले आहे , त्यांचे खापर- खापर - खापर पणजोबा राम कृष्ण होते , हे टेक्निकली जरी करेक्ट असले तरी ते प्रॅक्टिकली अ‍ॅक्सेप्टेबल नाही... उद्या समजा शास्त्राने असे सिद्ध झाले की भारतातील या पूर्वजांचे अतीमूळ पूर्वज आफ्रिकेतुन आले... मग आफ्रिकेतील लोक तुम्हाला बोलले की दोन आफ्रिकन पुर्वजांचीही उदा नेल्सन मंडेला वगैरे नावे त्या पाच स्मरणीय नावात घाला , तर तुम्ही तयार व्हाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

.....

mugdhagode
गुरुवार, 04/14/2016 - 15:01 नवीन
यातही एक गंमत आहे बरं का. मागच्या तीन पिढ्या म्हणजे कोणत्या ? बापाकडच्या. मातृकुलातील पूर्वजांचा संबंध येत नाही. आईकडल्या मागच्या तीन पूर्वजांची नावे तरी आठवतात का ? मग दुसर्‍या धर्मातील लोकाना पाच हजार पूर्वीचे वेगळ्या धर्मातील पूर्वज जवळचे न वाटणं यात नवल ते काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

चला, परत पंख लागण्याची तयारी चालू आहे.

बोका-ए-आझम
गुरुवार, 04/14/2016 - 20:52 नवीन
It's not a question of 'if', it's a question of when.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

पटाईतकाका

बोका-ए-आझम
गुरुवार, 04/14/2016 - 11:54 नवीन
लेख आवडला. देशाविषयी प्रेम आणि अभिमान असेल तर माता म्हणा, पिता म्हणा किंवा सखा म्हणा - काहीही फरक पडत नाही. आईशी कुणाचीही सर्वात जास्त जवळीक असते म्हणून देशाला माता म्हटलं जातं. रच्याकने सगळे युरोपियन्स आपल्या देशाला पितृभूमी म्हणत नाहीत. फक्त जर्मन्स म्हणतात. बाकी सगळे मातृभूमीच म्हणतात.
  • Log in or register to post comments

..

mugdhagode
गुरुवार, 04/14/2016 - 11:57 नवीन
मुमताजमहल , जोधाबाई , मदर टेरेसा , इंदिराजी व आमची आज्जी यांच्यावर प्रातःस्मरणीय श्लोक उर्दु किंवा इंग्रजीत करुन मिळेल का ?
  • Log in or register to post comments

संघाच्या लोकांनी त्यांच्या

विवेकपटाईत
गुरुवार, 04/14/2016 - 14:18 नवीन
संघाच्या लोकांनी त्यांच्या हिशोबाने सावरकर, हेडगेवार, गांधी, मदन मोहन मालवीय यांचे नाव प्रात: स्मरणात टाकले. प्रत्येकाला त्याच्या दृष्टीने स्वतंत्रता आहे. बाकी लेख आपल्या देशाला आई म्हणण्या बाबत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

जनत

viraj thale
गुरुवार, 04/14/2016 - 13:25 नवीन
जनत
  • Log in or register to post comments

उगाच हवेत भावनिक गोळीबार लेख!

नाना स्कॉच
गुरुवार, 04/14/2016 - 15:08 नवीन
उगाच हवेत भावनिक गोळीबार लेख! असो!.
  • Log in or register to post comments

अरब देशात त्यांच्या जातीनिहाय

'पिंक' पॅंथर्न
गुरुवार, 04/14/2016 - 15:16 नवीन
अरब देशात त्यांच्या जातीनिहाय पासपोर्टचा रंग पण वेगवेगळा असतो....
  • Log in or register to post comments

मोकळ्या वावरात मोकळे

Ram ram
गुरुवार, 04/14/2016 - 18:33 नवीन
मोकळ्या वावरात मोकळे हाेण्यासाठी जाताना पाकिस्तानला चाललो असे का बरे म्हणतात बरं
  • Log in or register to post comments

मोकळ्या वावरात मोकळे

Ram ram
गुरुवार, 04/14/2016 - 18:35 नवीन
मोकळ्या वावरात मोकळे हाेण्यासाठी जाताना पाकिस्तानला चाललो असे का बरे म्हणतात बरं
  • Log in or register to post comments

नाय बॉ आम्हि लंडन ला जात असतो

होबासराव
गुरुवार, 04/14/2016 - 18:59 नवीन
जंत झाले का बरे? का बरेच झाले ?
  • Log in or register to post comments

बापाची कबर वाळायच्या आत

गॅरी शोमन
Fri, 04/15/2016 - 10:32 नवीन
बापाची कबर वाळायच्या आत सर्वात बापाच्या धाकट्या आणि तरुण पत्नीशी निकाह करु पहाणार्‍या " त्यांना " आई समजली नाही तर मातृभुमी काय समजणार ?
  • Log in or register to post comments

ह्या

नाना स्कॉच
Fri, 04/15/2016 - 10:53 नवीन
सगळ्यांचा संबंध फ़क्त वारस अन दमड़ी ह्याच्याशी असतो, आपल्या महान धर्मात तर नात्यांतर्गत संबंधास धर्माने मान्यता दिली आहे म्हणतात बुआ, असे नसल्यास हे नियोग काय असते हे ज़रा समजावून सांगाल का कृपा करुन? नाही आमचेच काही गैरसमज असले तर क्लियर होतील असे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी शोमन

नियोग

बोका-ए-आझम
Mon, 04/18/2016 - 08:52 नवीन
हा जर स्त्रीला त्या पुरूषापासून मूल होऊ शकत नसेल - म्हणजेच तिच्यात दोष नसेल पण तो काही कारणाने मूल देण्यास असमर्थ असेल किंवा तिचा पती हयात नसेल आणि तरीही तिला मूल हवं असेल तर उपयोगात आणला जातो. नियोग हा शक्यतो दिराबरोबर असावा अशी पद्धत आहे. हा संदर्भ महाभारतात आहे आणि मी आनंद साधल्यांच्या ' हा जय नावाचा इतिहास आहे ' मध्ये वाचलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

नियोगाचे नियम वाचले!

नाना स्कॉच
Mon, 04/18/2016 - 22:32 नवीन
शुद्ध मखलाशी अन आधुनिक समाजशास्त्रीय परिमाणानुसार ते फ़क्त अन फ़क्त व्यभिचाराचे एक भिकार समर्थन वाटले.असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

शिवाय

नाना स्कॉच
Mon, 04/18/2016 - 22:51 नवीन
तुम्ही सांगितलेले नियोग सन्दर्भ वाचले तरी मी सुरुवातीलाच म्हणलेले सगळ्यांचा संबंध फ़क्त वारस अन दमड़ी ह्याच्याशी असतो, हे वाक्य चुक ठरते काय???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

हजारो वर्षांपूर्वीची पद्धत

ट्रेड मार्क
Tue, 04/19/2016 - 00:19 नवीन
हजारो वर्षांपूर्वीची पद्धत तुम्ही आत्ताच्या निकषांवर तपासून बघत असाल तर ते चूकच नाही का? इथे एक दोन दशकांपूर्वी लग्नाआधी बॉय फ्रेंड/ गर्ल फ्रेंड असणे चुकीचे मानले जायचे. फारच जवळीक झाली असेल तर मग काय विचारायलाच नको. आजकाल असे मित्र (एक नव्हे) नसतील तर मुलात किंवा मुलीत काहीतरी वेगळा प्रोब्लेम आहे असे समजले जाते. शारीरिक जवळिकीचे वय अनुभवण्याचे वय आजकाल १४-१५ वर्षे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

दुरुस्ती

ट्रेड मार्क
Tue, 04/19/2016 - 00:20 नवीन
शेवटचे वाक्य "शारीरिक जवळिक अनुभवण्याचे वय आजकाल १४-१५ वर्षे आहे." असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

इथे एक दोन दशकांपूर्वी

तर्राट जोकर
Tue, 04/19/2016 - 00:29 नवीन
इथे एक दोन दशकांपूर्वी लग्नाआधी बॉय फ्रेंड/ गर्ल फ्रेंड असणे चुकीचे मानले जायचे.
आता नाही मानले जात?
आजकाल असे मित्र (एक नव्हे) नसतील तर मुलात किंवा मुलीत काहीतरी वेगळा प्रोब्लेम आहे असे समजले जाते.
असे कुठे समजले जाते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

तुम्हाला बोलण्याचा रोख कळत नाही बहुतेक

ट्रेड मार्क
Tue, 04/19/2016 - 02:17 नवीन
आता तुमच्या सारखेच गोल गोल फिरुया
आता नाही मानले जात?
मानलं जातं का? कुठे? कुठल्या वयोगटात?
असे कुठे समजले जाते?
नाही समजले जात का? कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आम्ही कधीच गोल गोल फिरत नाही

तर्राट जोकर
Tue, 04/19/2016 - 03:40 नवीन
आम्ही कधीच गोल गोल फिरत नाही साहेब, आम्ही मुद्दा धरुन असतो, लोक रिंगणात फिरतात गोल गोल, गोल गोल फिरत विषय नेतात भलतीकडे मग आमचं तर नावच कानफाट्या. तुमच्याकडे आताही उत्तर नाही म्हणून कांगावा करत आहात. जरा आयडींकडे पुर्वग्रहदुषित नजरेने बघणं सोडाल तर काही खरं. मुद्द्यावर बोलणं जमत असेल तर बोला नाही तर वैयक्तिक मत व्यक्त केले असे म्हणा आणि व्हा बाजुला. वर ते हास्यास्पद विधान सिद्ध करता येत नाही तर तेव्हाही फुगडी घालायला गेलात आणि धपकन पडलात. आताही तेच. बाकी ज्यापद्धतीने तुम्हाला हे दोन प्रश्न विचारलेत ती मिपाची नेहमीची पद्धत आहे, अनेक सदस्य वापरतात चर्चेत. हेच प्रश्न दुसर्‍या कोण्या आयडीने विचारले असते तर तुम्ही असेच प्रत्युत्तर केले असते का? 'लोकमत ऑक्सिजन' छाप मते गंभीर चर्चेत मांडणे तुम्हाला आवडत असेल तर मला काही समस्या नाही. वेन्जॉय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

अशी तुमची समजूत आहे

ट्रेड मार्क
Tue, 04/19/2016 - 06:49 नवीन
माझ्याकडे उत्तर नाही अशी तुमची समजूत आहे. उगाच स्वताकडे पाहून इतरांना तसेच समजू नका. चल मुद्दा सिद्ध करण्यासाठी उत्तर देतो पण आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे निरीक्षण महानगरांमधले आहे. १. आता फारसे कोणी मनावर घेत नाहीत. एकवेळ मुलाचे/ मुलीचे आईवडील थोडे प्रश्न विचारू शकतील पण तरुणाईमध्ये या गोष्टीचा एवढा taboo केला जात नाही. २. परत हे उदाहरण सुद्धा तरुणाईचेच आहे. वय वर्षे १५ असणाऱ्या मुला मुलींमध्ये हा सामान्य चर्चेचा विषय आहे. आणि जर का कोणाला विरुद्ध लिंगी जवळची मैत्री नसेल तर चेष्टा होते. त्यातूनही कॉलेज मध्ये पण नसेल तर मग मित्र मंडळींमध्ये चर्चा होते की त्या व्यक्तीला समान लिंगी व्यक्तींमध्ये रस आहे असे वाटायला लागते. आता मूळ मुद्दा - मी असे म्हणण्याचे कारण की मी प्रतिवाद केला होता नानांचा. ते म्हणत होते नियोग पद्धत आत्ताच्या दृष्टीने कशी चुकीची आहे. जे तुम्ही उचललेत ते फक्त उदा म्हणून दिलेले होते. आता तुमच्या प्रतिसादामुळे मूळ मुद्दा राहिला बाजूला आणि उदाहरणांवर चर्चा चालू झाली. हे जनरल ओब्सर्वेशन आहे. तुमचाच काय कोणाच्याही आयडी ने असे केले असते तरी हेच उत्तर आले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

व्यभिचार कसला त्यात?

बोका-ए-आझम
Tue, 04/19/2016 - 10:31 नवीन
आज जी artificial insemination पद्धत वापरली जाते त्यात sperm donors असतात. त्यात आणि नियोगात काय फरक आहे? आणि बहुपत्नीत्व हा व्यभिचार नाहीये का तुमच्या मते? का व्यभिचाराचे नियम फक्त स्त्रियांनाच लागू होतात असं तुमचं म्हणणं आहे? तसंही आजच्या काळातील व्यभिचाराच्या संकल्पना पुराणकालीन किंवा भूतकालीन आचरणाला लावणे आणि vice versa हा मूर्खपणाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

एक एक करुन उत्तरे माझ्यापरीने

नाना स्कॉच
Tue, 04/19/2016 - 11:10 नवीन
1. आर्टिफिशल इंसेमिनेशन वर काय बोलणार! शास्त्रोक्त पद्धतीने लॅब मधे भ्रूण विकसित करणे अन उत्कट प्रणयभाव सहित नैसर्गिक संभोग ह्यात जर मानवी भावना आपल्याला अकाउंट मधे घ्यायच्या नसल्या तर नाईलाज आहे! नियोग क्रिया अन आधुनिक आर्टिफिशल इंसेमिनेशन एकच आहे तर आर्टिफिशल इंसेमिनेशन क्लिनिक्स गरजच का पडली असती भारतात?? नियोग बरं होतं की! इंफ्रास्ट्रक्चर मधे फ़क्त एक बेडरुम असली का भागले, फुकट कश्याला बुआ बायो सेफ्टी लेवल 3 लॅब वगैरे उघडत बसावे ? 2 होय बहुपत्नीत्व व्यभिचार आहे (माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून) अन नियोग सुद्धा! मुळ फ़क्त वारस निर्माण करणे आहे दोहोंत अन त्या साठी धर्ममताने (दोन्ही धर्मानी) विधीनिषेध गुंडाळुन त्याला नैतिकतेचा मुलामा द्यायचा प्रयत्न केलाय हे आपण मान्य कराल काय?? 3 व्यभिचाराचे नियम फ़क्त स्त्रियांना लागु होतात असे मला म्हणायचे नाहीये , तर मुळात व्यभिचारात स्त्री अन पुरुष दोघे ही असल्यामुळे दोघांना लागु होतात असे वाटते, आता काही माझे प्रश्न 1 नियोग नियमात "स्त्री ने पुत्रप्राप्तीसाठी परपुरुषासोबत संबंध ठेवल्यास त्यात वासना किंवा उत्कट प्रणयी भाव न ठेवता फ़क्त कर्तव्यबुद्धी ठेवावी" किंवा "नेमके अमुक अवयव दृश्य अन अमुक अदृश्य ठेवावे" असले खुळचट नियम आहेत, ह्या सगळ्यांचा निर्वाळा देणार कोण?? नियोग क्रिया झाल्यास त्यात कर्तव्यभाव होता की आकर्षण हे कोण ठरवणार? नियोग पद्धतीआडून आधुनिक काळात किती अत्याचार होत आहेत स्त्री वर ह्याची आपल्याला कल्पना आहे का? ता.क. - मी आपल्या धर्मात सुद्धा असला मुर्खपणा अस्तित्वात होता/आहे असे म्हणणे म्हणजे दुसऱ्या धर्माची भलामण असा होत नसतो, किमान तुमच्या सारख्या सुजाण माणसाने ते करू नये ही विनंती, धर्म दाढ़ीवाला असो वा टीळेवाला मला फरक पडत नाही अन जन्माने टीळेधारी असल्यामुळे मी सदरहु प्रवृत्तीची पाठराखण सुद्धा करणार नाही! बघा पटले अन पचले तर , बाकी तुम्हाला मला व्यक्तिगत पातळी वर उतरून मुर्ख वगैरे म्हणायचे असले तर तो तुमचा वैयक्तिक वकुब असेल अन माझे दुर्दैव! असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

काय गैर आहे नियोगात?

भंकस बाबा
Tue, 04/19/2016 - 15:27 नवीन
एकतर महाभारतीय दाखले दिले की त्याची टिंगल उड़वायची व् सरल पद्धती सांगितली की त्यात व्यभिचार शोधयचा. म्हणजे गिरा तो भी टांग ऊपर! जर सर्व उपाय करून थकल्यावर इच्छुक मातापित्यानि नैसर्गिक मार्ग अवलंबिला ,जो दुसरा कोणताही इलाज नसल्यामुळे आलेला आहे, तर त्यात गैर काय? टिंगल उड़वायची असेल तर कुमारी माता प्रकरण जे एका धर्मात वंदनीय आहे त्याची उडवताना आम्ही दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

नानासाहेब,

भंकस बाबा
Tue, 04/19/2016 - 15:31 नवीन
तुम्हाला कृत्रिम गर्भधारणेमधिल यशपयशाचे प्रमाण माहित आहे का? त्यासाठी येणारा खर्च माहीत आहे का? टिका करायची म्हणुन तुम्ही एकाच धर्माच्या पाठी हात धुवून लागलेले आहात. ही एखादी विकृति समजायची का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

टिका करायची म्हणुन तुम्ही

तर्राट जोकर
Tue, 04/19/2016 - 15:34 नवीन
टिका करायची म्हणुन तुम्ही एकाच धर्माच्या पाठी हात धुवून लागलेले आहात. ही एखादी विकृति समजायची का? अगदी हेच निरिक्षण आणी हाच प्रश्न इथल्या अनेक आयडींबद्दल आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

काय राव इतक्यातल्या इतक्यात

नाना स्कॉच
Tue, 04/19/2016 - 16:02 नवीन
काय राव इतक्यातल्या इतक्यात म्हणजे हातच्या काकणात सुद्धा सेलेक्टिव रीडिंग??
ता.क. - मी आपल्या धर्मात सुद्धा असला मुर्खपणा अस्तित्वात होता/आहे असे म्हणणे म्हणजे दुसऱ्या धर्माची भलामण असा होत नसतो, किमान तुमच्या सारख्या सुजाण माणसाने ते करू नये ही विनंती,
इतके ढळढळीत लिहिले आहे तरी दुर्लक्ष?? अर्थात ते सुजाण वगैरे चुकून कॉपी झाले ते नका तुम्ही मनाला लावुन घेऊ हो! नुसते नाव वाचुन किती द्वेष कराल एखाद्याचा! असो शिवाय तुम्हाला कृत्रिम गर्भधारणेमधिल यशपयशाचे प्रमाण माहित आहे का? त्यासाठी येणारा खर्च माहीत आहे का? ह्याच्या बद्दल बोलायचे झाले तर बुआ ओके एक क्षण मानले की तुम्ही म्हणता ते खरे आहे पण मग नियोग विधीचे सगळे नियम पाळले जातात हे कोण सांगू शकेल? ते नियम पाळले गेले नाहीत तर नियोग विधी धर्मबाह्य असेल का?? माझा मुख्य आक्षेप आहे तो खुळचट नियमांना, नियोगी संबांध ठेवले त्यावेळी भावनाविहीन वातावरण होते की नाही हे कसे चेक करणार ह्याचे उत्तर द्याल कृपया करुन! , कसंय न लहानपणीपासुन सायंकाळी रामरक्षा म्हणली की आम्ही रामाचे चरित्र समजून घ्यायचो त्या "एकपत्नीव्रती रणकर्कश राम राम" अश्या रघुरामाचे आम्ही भक्त आहोत! म्हणून आम्हाला नियोग मुर्खपणाचा खेळ वाटतो, शिवाय कसं आहे की आमची रामभक्ति काय आहे हे तुम्हाला समजवुन द्यायला तुम्ही कोण्या पीठाचे शंकराचार्य लागून गेलेले नाही. त्यामुळे ज़रा हिशेबात रहा. ता . क - परत वैयक्तिक होऊ नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

उद्धिष्ठ काय आहे?

भंकस बाबा
Tue, 04/19/2016 - 19:43 नवीन
अपत्यप्राप्ति हे उद्विष्ट असेल तर त्याकडे बघा ना ! उग्गाच फाटे का फोडत् आहात. रच्याकने रामरक्षा म्हणनारा पुरुष नसतो काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

तुम्हाला नियोगाचे नियम माहीती

नाना स्कॉच
Tue, 04/19/2016 - 19:58 नवीन
तुम्हाला नियोगाचे नियम माहीती आहेत काय? नसल्यास एकदा मिळवून वाचा मग बोलु. अन हो डोळसपणे रामरक्षा म्हणणारे रामचरित्राचे वाचक सुद्धा असतात अन प्रभुने घालुन दिलेल्या एकपत्नीव्रताचा आदरही करतात असो! अन सुसंस्कृत माणसे उद्दिष्ट उर्फ़ साध्यच पाहात नसतात तर "साधन" सुद्धा महत्वाचे असते! एक कॉन्सेप्ट असते बघा साधनशुचिता म्हणून, बघा झेपली तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

हे नियोगाचे नियम म्हणजे काय?

प्रचेतस
Wed, 04/20/2016 - 11:45 नवीन
हे नियोगाचे नियम म्हणजे काय? ते वेदांत आहेत, उपनिषदांत आहेत, आरण्यकांत आहेत,ब्राह्मणांत आहेत का पुराणांत आहेत का अजून कुठे आहेत? तुम्हाला संदर्भ माहीत असल्यास नक्की इथे ते द्यावेत. मला ते ग्रंथ मिळवून नियम वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

..

mugdhagode
Wed, 04/20/2016 - 12:14 नवीन
पुत्रकामेष्टी यज्ञ करुन मुल होते तर पुन्हा नियोग का करत होते म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

रामायणाचा काळ वायला गो.

प्रचेतस
Wed, 04/20/2016 - 12:16 नवीन
रामायणाचा काळ वायला गो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

तुझी परिक्षा घेतली गो ! खरे उत्तर !!....

mugdhagode
Wed, 04/20/2016 - 12:23 नवीन
पुत्रकामेष्टी यज्ञापेक्षा नियोग फारच स्वस्तात व्हायचा गो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा