Skip to main content

मातृभूमीला 'माँ' म्हणण्याची गरज का?

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 13/04/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संततिः समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते. अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे. पुरातन काळापासूनच आपण आपल्या भरत भूमीला आई म्हणतो. युरोपियन लोक हि देशाला पितृभूमी म्हणतात. एकदा का देशाला आपण माता /पिता मानले कि देशात बंधुत्वाचे वातावरण आपसूक निर्मित होते. जिथे सोख्य असेल तिथे शांती, आणि समृद्धी हि आलीच प्रकृतीने हिमालयापासून समृद्रापर्यंत एक विशिष्ट भूभागाची रचना केली आहे. या भू-भागात अनेक भाषा-भाषी, पंथ आणि जातींचे लोक राहतात. एकाच राजाचे राज्य नेहमीच या भूभागावर राहील, हे संभव नाही. सत्तेसाठी युद्ध हे अटळ आहेच. आपल्या देशात सत्ता बदलली तरी लोकांवर जास्त अत्याचार होत नव्हते. कारण लोकांमध्ये बंधुत्व भाव आहे. आपले ऋषी-मुनि दूरदर्शी होते. धर्म आणि जातीच्या नावाने संपूर्ण भरत भूमीत राहणार्या लोकांना सांस्कृतिक दृष्ट्या एक सूत्रात बांधणे शक्य नाही हे त्यांना माहित होते. प्रत्येकाला त्याचीच भाषा, जाती आणि पंथ श्रेष्ठ वाटतो. पण देशाच्या मातीप्रती लोकांच्या मनात आत्मीयता उत्पन्न करणे शक्य होते. आपल्या ऋषींनी हेच केले. सकाळी म्हणण्याचे श्लोक म्हणजे प्रात:स्मरणची रचना केली. लोकांच्या मनात देशाची माती आणि तिथे जन्मलेल्या महापुरुषांप्रती आदर भाव जागृत करणे हाच दूरदर्शी ऋषींचा उदेष्य हेतू होता. उदा: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती. नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु. महेन्द्रो मलय: सह्ये देवतात्मा हिमालय:. ध्येयो रैवतको विन्ध्यो गिरिश्चारावलिस्तथा. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका. पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. रोज सकाळी प्रात:स्मरण केल्याचा परिणाम, लोकांच्या मनावर नकळत होतोच. घरात नळाच्या पाण्याने किंवा गावात विहिरीच्या पाण्याने, स्नान करत असताना आपण देशातील सर्व नद्यांच्या पाण्याने आंघोळ करण्याचा आनंद घेतो. यमुनेच्या पाण्यात स्नान करताना माझ्या मनात कावेरी नदीत स्नान करण्याची इच्छा उत्पन्न होते. सर्व पर्वतांचे आणि नगरांचे दर्शन घेण्यासाठी यात्रेची इच्छा होणारच. भरतभूमी वर जन्म घेणार्या आपल्या पूर्वजांप्रती आपल्या मनात आदर आणि श्रद्धा निर्माण करण्याचे काम हि आपल्या ऋषींनी केले. भारतभूमीत जन्म घेणारी महान विभूती मग ती स्त्री असो वा पुरुष, त्यांची स्मृती नेहमी आपल्याला राहावी म्हणून त्यांना हि प्रात:स्मरणात स्थान दिले. आयुष्यभर संघर्ष करून आपले उद्दिष्ट साध्य करणार्या आपल्या ५ महान स्त्रियांचे आपण रोज प्रात: स्मरण करतो: अहल्या द्रोपदी सीता तारा मंदोदरी तथा. पंचकन्या स्मरेनित्यं महापातक नाशनम्. तसेच पुण्यश्लोको नलो राजा... ‘अश्वत्थामा बलिर्व्यासो... सारांश अश्यारीतीने पुरातन ऋषींनी आपल्या मनात या देशाच्या माती आणि पूर्वजांच्या प्रती आपल्या मनात आदर आणि भक्तीभाव उत्पन्न केला. आज आपण आपल्या पूर्वजांची पूजा करतोच मन देशाच्या मातीला ‘भारत माँ’ संबोधून तिची हि पूजा करतो. जेंव्हा देशाचे राजकीय दृष्ट्या शेकडों तुकडे झालेले होते, त्याच वेळी आदी शंकराचार्यांनी देशाच्या चारी भागात चार मठांची स्थापना केली. चार धाम यात्रेची सुरवात बहुधा आदी शंकराचार्यांमुळेच सुरु झाली असेल. शाक्त पंथीयांनी देशात विभिन्न भागात (पाकिस्तान सहित) ५२ शक्तीपीठांची स्थापना केली. शैवांनी देशात विभिन्न प्रांतात १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना केली. जवळपास सर्व हिंदू तीर्थ क्षेत्री जैनांनी सुद्धा आपली मंदिरे उभारली. गुरु गोविंद जर काही काळ आणिक जिवंत राहिले असते तर निश्चित कन्याकुमारीला हि एक गुरुद्वारा बांधला असता. असो. आज हि विभिन्न स्थानांवर भरणार्या कुंभ मेळ्यात देशातील सर्व ठिकाणाहून यात्रेकरू येतात, सर्व पंथीय साधू सन्यासी, यात्री एकत्र बसून चर्चा करतात. अश्यारितीने देशातील सर्वपंथांनी, या मातीप्रती लोकांचे प्रेम, श्रद्धा आणि आदरण निर्माण करण्यात महत्वाचे योगदान दिले आहेत. देशाला मातृभूमी किंवा आई मानण्याने, देशात राहणार्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होतोच या शिवाय एक राजनीतिक सत्ता स्थापन करण्यात हि यश येते. आपल्या देश्यात शेकडों चक्रवर्ती झाले. एकदा दिल्ली काबीज केली कि संपूर्ण देशाची सत्ता सहज प्राप्त होत होते हे आपण इतिहासात पाहिलेच आहे. आत्ताचेच उदाहरण घ्या. देशाला स्वतंत्रता मिळण्याच्या वेळी देशात ६०० पेक्षा जास्त राजे-महाराजे होते. त्यातील अधिकांश राजा-महाराजांनी स्व:खुशीने आपल्या राज्यांचे भारतात विलीनीकरण केले. तेथील जनतेने हि विरोध केला नाही. कारण विभिन्न राज्यात राहणारी लोक या देशाला ‘भारत माँ’ म्हणून ओळखत होते. भारतमाते प्रती त्यांच्या मनात श्रद्धाभाव होता. इस्लाम मध्ये देशाला मातृभूमी मानण्याची अवधारणा नाही. पण धर्मावर आधारित बंधुभावाची अवधारणा आहे. त्यांच्या मनात आपल्या गैर इस्लामिक पूर्वजांप्रती सम्मानाची भावननेला हि स्थान नाही. तेथील जनतेला एकत्र ठेवण्याचा कुठलाच दुआ उरलेला नाही. एकाच देशात राहणारे लोक, एकच धर्म मानणारे, पंथ, कबीला, जातीच्या नावावर एका दुसर्याच्या विरुद्ध लढत आहे. कोण स्वकीय आणि कोण परीकीय हे कळण्याची बुद्धी हि त्यांच्यात उरलेली नाही. जे लोक त्यांच्या कबील्याचे किंवा पंथाचे नाही, त्यांची हत्या करण्यात त्यांना काहीच वाईट वाटत नाही आहे. मग लहान मुले असो किंवा स्त्रिया सर्वांचाच वध होतो. लाखोंच्या संख्येने लोकांना आपली जन्मभूमी सोडून शरणार्थी बनावे लागले आहे. ह्या देशांचा संपूर्ण विनाश झालेला आहे. एकच धर्म मानणारे बंधुभावाने राहू शकतात, हि अवधारणा फोल ठरली आहे. गेल्या शतकात दोन विश्व युद्ध इसाई धर्म मानणार्या युरोपियन देशांत झाले. नेपाल हिंदू धर्मावलंबी असला तरी भारताशी त्याचे संबंध चांगले नाही. इस्लामी देशांची परिस्थिती तर आपण पाहताच आहोत.. ज्या देशांत त्यांची पूर्वजांना सम्मान दिल्या जातो, तेथील परिस्थिती वेगळी आहे. इराणी लोक आज हि अग्निपूजक जाल, रुस्तम, सोहराब यांचे तराणे गातात, तिथे शांती आहे. ५००० पेक्षा जास्त द्वीपसमूह आणि भारताप्रमाणे भिन्न-भिन्न जनजातीय असलेल्या इंडोनेशियात लोक एकत्र राहतात. रामायण आणि महाभारतातल्या कथांनी आणि चीनी परंपररेनी तिथल्या लोकांना एकत्र जोडलेले आहे. मिस्त्रच्या लोकांना आपल्या पिरामिड आणि त्यांना बनविणार्या पूर्वजांवर गर्व आहे. नील नदी प्रती त्यांच्या मनात आदर भाव आहे. परंतु आजकाल इस्लामी कट्टरता त्यांच्या मनात त्यांच्या पूर्वजांप्रती अनादर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचेच परिणाम आज मिस्त्रचे लोक भोगत आहेत. १९४७ मध्ये भारताच्या ज्या भागात इस्लाम मानणारे लोकांची संख्या जास्त होती, तो भूभाग देशापासून वेगळा झाला त्याचे कारण हेच. पण हे इथेच थांबणार नाही, देशाच्या मातीप्रती आदर नसल्यामुळे पाकिस्तानचे भविष्यात आणखीन हि तुकडे होण्याची संभावना नाकारता येत नाही. आज तिथे अराजकतेचे वातावरण आहे. बलूच, पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी सर्वच दुसर्याला आपले शत्रू समजतात. जर इस्लामी जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर मातृभूमीला आईचे स्थान देण्याची अवधारणा इस्लाम मध्ये समाविष्ट करावी लागेल. अर्थात हे कार्य इस्लामी विद्वानांच करावे लागेल. एकदा देशाला आई म्हंटले कि त्या भूमीत जन्म घेणार्या सर्व पंथीय आणि जातीय लोकांविषयी बंधुत्व भाव आपसूक निर्माण होतो. लोक एका दुसर्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. देशात शांती प्रतिस्थापित होते. आज आपल्या देशाला ‘भारत माता’ म्हणण्याचा विरोध काही अतिशहाणे पुरोगामी करीत आहे. एक तर त्यांना इतिहासाचे ज्ञान नाही. होणार तरी कसे? अंग्रेजानी देशावर राज्य करण्यासाठी ‘फूट डालो राज करो’ च्या नीतीचे अवलंबन केले होते. त्या साठी त्यांनी आपल्या पुरातन इतिहासालाच खोटे ठरविले. हेतू आपल्या पूर्वजांप्रती आपली श्रद्धा नष्ट करणे. एकदा लोकांच्या मनात ते वेगवेगळे आहेत, हि भावना रुजविली कि त्यांच्यात दुही माजविण्यात यश येतेच. त्याच साठी देवासुर संग्राम म्हणजे आर्य आणि द्रविडांचे युद्ध. असा इतिहास शिकवणे सुरु केले. आज देशाला स्वत्रंत होऊन हि ७० वर्षे झाली तरी हि आपल्याला पूर्वजांचा खरा इतिहास शिकविला जात नाही. अंग्रेजानी त्यांच्या स्वार्थासाठी तैयार केलेला खोटा इतिहास शिकून तैयार झालेले अतिशहाणे आपल्या भूमीला ‘माता’ कसे मानणार. भारत मातेच्या बर्बादीचे नारे लावणारे त्यांचे हिरो झालेले आहे. या विद्वानांना एवढे हि कळत नाही, एकदा भारत माते विषयी आपली श्रद्धा नष्ट झाली तर या मातीचे शंभर तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. मग लिबिया आणि इराक सारखी आपली गत व्हायला कितीस वेळ लागेल. हे टाळायचे असेल, तर उद्यापासूनच आपल्या मुला-बाळांना प्रात: स्मरणीय श्लोक शिकवा. आपल्या देशातील नद्या, पर्वत, पवित्र सरोवरे, पुरातन ऋषी-मुनि, राजा-महाराजा, बादशाह आपले सणवार त्यांच्या मागच्या कहाण्या इत्यादी बाबत माहिती दिली तरी चालेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 32732
प्रतिक्रिया 184

प्रतिक्रिया

In reply to by mugdhagode

संघाच्या लोकांनी त्यांच्या हिशोबाने सावरकर, हेडगेवार, गांधी, मदन मोहन मालवीय यांचे नाव प्रात: स्मरणात टाकले. प्रत्येकाला त्याच्या दृष्टीने स्वतंत्रता आहे. बाकी लेख आपल्या देशाला आई म्हणण्या बाबत आहे.

मोकळ्या वावरात मोकळे हाेण्यासाठी जाताना पाकिस्तानला चाललो असे का बरे म्हणतात बरं

मोकळ्या वावरात मोकळे हाेण्यासाठी जाताना पाकिस्तानला चाललो असे का बरे म्हणतात बरं

बापाची कबर वाळायच्या आत सर्वात बापाच्या धाकट्या आणि तरुण पत्नीशी निकाह करु पहाणार्‍या " त्यांना " आई समजली नाही तर मातृभुमी काय समजणार ?

In reply to by गॅरी शोमन

सगळ्यांचा संबंध फ़क्त वारस अन दमड़ी ह्याच्याशी असतो, आपल्या महान धर्मात तर नात्यांतर्गत संबंधास धर्माने मान्यता दिली आहे म्हणतात बुआ, असे नसल्यास हे नियोग काय असते हे ज़रा समजावून सांगाल का कृपा करुन? नाही आमचेच काही गैरसमज असले तर क्लियर होतील असे वाटते

In reply to by नाना स्कॉच

हा जर स्त्रीला त्या पुरूषापासून मूल होऊ शकत नसेल - म्हणजेच तिच्यात दोष नसेल पण तो काही कारणाने मूल देण्यास असमर्थ असेल किंवा तिचा पती हयात नसेल आणि तरीही तिला मूल हवं असेल तर उपयोगात आणला जातो. नियोग हा शक्यतो दिराबरोबर असावा अशी पद्धत आहे. हा संदर्भ महाभारतात आहे आणि मी आनंद साधल्यांच्या ' हा जय नावाचा इतिहास आहे ' मध्ये वाचलेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

शुद्ध मखलाशी अन आधुनिक समाजशास्त्रीय परिमाणानुसार ते फ़क्त अन फ़क्त व्यभिचाराचे एक भिकार समर्थन वाटले.असो.

In reply to by नाना स्कॉच

तुम्ही सांगितलेले नियोग सन्दर्भ वाचले तरी मी सुरुवातीलाच म्हणलेले

सगळ्यांचा संबंध फ़क्त वारस अन दमड़ी ह्याच्याशी असतो,

हे वाक्य चुक ठरते काय???

In reply to by नाना स्कॉच

हजारो वर्षांपूर्वीची पद्धत तुम्ही आत्ताच्या निकषांवर तपासून बघत असाल तर ते चूकच नाही का? इथे एक दोन दशकांपूर्वी लग्नाआधी बॉय फ्रेंड/ गर्ल फ्रेंड असणे चुकीचे मानले जायचे. फारच जवळीक झाली असेल तर मग काय विचारायलाच नको. आजकाल असे मित्र (एक नव्हे) नसतील तर मुलात किंवा मुलीत काहीतरी वेगळा प्रोब्लेम आहे असे समजले जाते. शारीरिक जवळिकीचे वय अनुभवण्याचे वय आजकाल १४-१५ वर्षे आहे.

In reply to by ट्रेड मार्क

इथे एक दोन दशकांपूर्वी लग्नाआधी बॉय फ्रेंड/ गर्ल फ्रेंड असणे चुकीचे मानले जायचे.
आता नाही मानले जात?
आजकाल असे मित्र (एक नव्हे) नसतील तर मुलात किंवा मुलीत काहीतरी वेगळा प्रोब्लेम आहे असे समजले जाते.
असे कुठे समजले जाते?

In reply to by तर्राट जोकर

आता तुमच्या सारखेच गोल गोल फिरुया
आता नाही मानले जात?
मानलं जातं का? कुठे? कुठल्या वयोगटात?
असे कुठे समजले जाते?
नाही समजले जात का? कुठे?

In reply to by ट्रेड मार्क

आम्ही कधीच गोल गोल फिरत नाही साहेब, आम्ही मुद्दा धरुन असतो, लोक रिंगणात फिरतात गोल गोल, गोल गोल फिरत विषय नेतात भलतीकडे मग आमचं तर नावच कानफाट्या. तुमच्याकडे आताही उत्तर नाही म्हणून कांगावा करत आहात. जरा आयडींकडे पुर्वग्रहदुषित नजरेने बघणं सोडाल तर काही खरं. मुद्द्यावर बोलणं जमत असेल तर बोला नाही तर वैयक्तिक मत व्यक्त केले असे म्हणा आणि व्हा बाजुला. वर ते हास्यास्पद विधान सिद्ध करता येत नाही तर तेव्हाही फुगडी घालायला गेलात आणि धपकन पडलात. आताही तेच. बाकी ज्यापद्धतीने तुम्हाला हे दोन प्रश्न विचारलेत ती मिपाची नेहमीची पद्धत आहे, अनेक सदस्य वापरतात चर्चेत. हेच प्रश्न दुसर्‍या कोण्या आयडीने विचारले असते तर तुम्ही असेच प्रत्युत्तर केले असते का? 'लोकमत ऑक्सिजन' छाप मते गंभीर चर्चेत मांडणे तुम्हाला आवडत असेल तर मला काही समस्या नाही. वेन्जॉय.

In reply to by तर्राट जोकर

माझ्याकडे उत्तर नाही अशी तुमची समजूत आहे. उगाच स्वताकडे पाहून इतरांना तसेच समजू नका. चल मुद्दा सिद्ध करण्यासाठी उत्तर देतो पण आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे निरीक्षण महानगरांमधले आहे. १. आता फारसे कोणी मनावर घेत नाहीत. एकवेळ मुलाचे/ मुलीचे आईवडील थोडे प्रश्न विचारू शकतील पण तरुणाईमध्ये या गोष्टीचा एवढा taboo केला जात नाही. २. परत हे उदाहरण सुद्धा तरुणाईचेच आहे. वय वर्षे १५ असणाऱ्या मुला मुलींमध्ये हा सामान्य चर्चेचा विषय आहे. आणि जर का कोणाला विरुद्ध लिंगी जवळची मैत्री नसेल तर चेष्टा होते. त्यातूनही कॉलेज मध्ये पण नसेल तर मग मित्र मंडळींमध्ये चर्चा होते की त्या व्यक्तीला समान लिंगी व्यक्तींमध्ये रस आहे असे वाटायला लागते. आता मूळ मुद्दा - मी असे म्हणण्याचे कारण की मी प्रतिवाद केला होता नानांचा. ते म्हणत होते नियोग पद्धत आत्ताच्या दृष्टीने कशी चुकीची आहे. जे तुम्ही उचललेत ते फक्त उदा म्हणून दिलेले होते. आता तुमच्या प्रतिसादामुळे मूळ मुद्दा राहिला बाजूला आणि उदाहरणांवर चर्चा चालू झाली. हे जनरल ओब्सर्वेशन आहे. तुमचाच काय कोणाच्याही आयडी ने असे केले असते तरी हेच उत्तर आले असते.

In reply to by नाना स्कॉच

आज जी artificial insemination पद्धत वापरली जाते त्यात sperm donors असतात. त्यात आणि नियोगात काय फरक आहे? आणि बहुपत्नीत्व हा व्यभिचार नाहीये का तुमच्या मते? का व्यभिचाराचे नियम फक्त स्त्रियांनाच लागू होतात असं तुमचं म्हणणं आहे? तसंही आजच्या काळातील व्यभिचाराच्या संकल्पना पुराणकालीन किंवा भूतकालीन आचरणाला लावणे आणि vice versa हा मूर्खपणाच आहे.

In reply to by बोका-ए-आझम

1. आर्टिफिशल इंसेमिनेशन वर काय बोलणार! शास्त्रोक्त पद्धतीने लॅब मधे भ्रूण विकसित करणे अन उत्कट प्रणयभाव सहित नैसर्गिक संभोग ह्यात जर मानवी भावना आपल्याला अकाउंट मधे घ्यायच्या नसल्या तर नाईलाज आहे! नियोग क्रिया अन आधुनिक आर्टिफिशल इंसेमिनेशन एकच आहे तर आर्टिफिशल इंसेमिनेशन क्लिनिक्स गरजच का पडली असती भारतात?? नियोग बरं होतं की! इंफ्रास्ट्रक्चर मधे फ़क्त एक बेडरुम असली का भागले, फुकट कश्याला बुआ बायो सेफ्टी लेवल 3 लॅब वगैरे उघडत बसावे ? 2 होय बहुपत्नीत्व व्यभिचार आहे (माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून) अन नियोग सुद्धा! मुळ फ़क्त वारस निर्माण करणे आहे दोहोंत अन त्या साठी धर्ममताने (दोन्ही धर्मानी) विधीनिषेध गुंडाळुन त्याला नैतिकतेचा मुलामा द्यायचा प्रयत्न केलाय हे आपण मान्य कराल काय?? 3 व्यभिचाराचे नियम फ़क्त स्त्रियांना लागु होतात असे मला म्हणायचे नाहीये , तर मुळात व्यभिचारात स्त्री अन पुरुष दोघे ही असल्यामुळे दोघांना लागु होतात असे वाटते, आता काही माझे प्रश्न 1 नियोग नियमात "स्त्री ने पुत्रप्राप्तीसाठी परपुरुषासोबत संबंध ठेवल्यास त्यात वासना किंवा उत्कट प्रणयी भाव न ठेवता फ़क्त कर्तव्यबुद्धी ठेवावी" किंवा "नेमके अमुक अवयव दृश्य अन अमुक अदृश्य ठेवावे" असले खुळचट नियम आहेत, ह्या सगळ्यांचा निर्वाळा देणार कोण?? नियोग क्रिया झाल्यास त्यात कर्तव्यभाव होता की आकर्षण हे कोण ठरवणार? नियोग पद्धतीआडून आधुनिक काळात किती अत्याचार होत आहेत स्त्री वर ह्याची आपल्याला कल्पना आहे का? ता.क. - मी आपल्या धर्मात सुद्धा असला मुर्खपणा अस्तित्वात होता/आहे असे म्हणणे म्हणजे दुसऱ्या धर्माची भलामण असा होत नसतो, किमान तुमच्या सारख्या सुजाण माणसाने ते करू नये ही विनंती, धर्म दाढ़ीवाला असो वा टीळेवाला मला फरक पडत नाही अन जन्माने टीळेधारी असल्यामुळे मी सदरहु प्रवृत्तीची पाठराखण सुद्धा करणार नाही! बघा पटले अन पचले तर , बाकी तुम्हाला मला व्यक्तिगत पातळी वर उतरून मुर्ख वगैरे म्हणायचे असले तर तो तुमचा वैयक्तिक वकुब असेल अन माझे दुर्दैव! असो!

In reply to by नाना स्कॉच

एकतर महाभारतीय दाखले दिले की त्याची टिंगल उड़वायची व् सरल पद्धती सांगितली की त्यात व्यभिचार शोधयचा. म्हणजे गिरा तो भी टांग ऊपर! जर सर्व उपाय करून थकल्यावर इच्छुक मातापित्यानि नैसर्गिक मार्ग अवलंबिला ,जो दुसरा कोणताही इलाज नसल्यामुळे आलेला आहे, तर त्यात गैर काय? टिंगल उड़वायची असेल तर कुमारी माता प्रकरण जे एका धर्मात वंदनीय आहे त्याची उडवताना आम्ही दिसत नाही.

In reply to by नाना स्कॉच

तुम्हाला कृत्रिम गर्भधारणेमधिल यशपयशाचे प्रमाण माहित आहे का? त्यासाठी येणारा खर्च माहीत आहे का? टिका करायची म्हणुन तुम्ही एकाच धर्माच्या पाठी हात धुवून लागलेले आहात. ही एखादी विकृति समजायची का?

In reply to by भंकस बाबा

टिका करायची म्हणुन तुम्ही एकाच धर्माच्या पाठी हात धुवून लागलेले आहात. ही एखादी विकृति समजायची का? अगदी हेच निरिक्षण आणी हाच प्रश्न इथल्या अनेक आयडींबद्दल आहे. =))

In reply to by भंकस बाबा

काय राव इतक्यातल्या इतक्यात म्हणजे हातच्या काकणात सुद्धा सेलेक्टिव रीडिंग??
ता.क. - मी आपल्या धर्मात सुद्धा असला मुर्खपणा अस्तित्वात होता/आहे असे म्हणणे म्हणजे दुसऱ्या धर्माची भलामण असा होत नसतो, किमान तुमच्या सारख्या सुजाण माणसाने ते करू नये ही विनंती,
इतके ढळढळीत लिहिले आहे तरी दुर्लक्ष?? अर्थात ते सुजाण वगैरे चुकून कॉपी झाले ते नका तुम्ही मनाला लावुन घेऊ हो! नुसते नाव वाचुन किती द्वेष कराल एखाद्याचा! असो शिवाय तुम्हाला कृत्रिम गर्भधारणेमधिल यशपयशाचे प्रमाण माहित आहे का? त्यासाठी येणारा खर्च माहीत आहे का? ह्याच्या बद्दल बोलायचे झाले तर बुआ ओके एक क्षण मानले की तुम्ही म्हणता ते खरे आहे पण मग नियोग विधीचे सगळे नियम पाळले जातात हे कोण सांगू शकेल? ते नियम पाळले गेले नाहीत तर नियोग विधी धर्मबाह्य असेल का?? माझा मुख्य आक्षेप आहे तो खुळचट नियमांना, नियोगी संबांध ठेवले त्यावेळी भावनाविहीन वातावरण होते की नाही हे कसे चेक करणार ह्याचे उत्तर द्याल कृपया करुन! , कसंय न लहानपणीपासुन सायंकाळी रामरक्षा म्हणली की आम्ही रामाचे चरित्र समजून घ्यायचो त्या "एकपत्नीव्रती रणकर्कश राम राम" अश्या रघुरामाचे आम्ही भक्त आहोत! म्हणून आम्हाला नियोग मुर्खपणाचा खेळ वाटतो, शिवाय कसं आहे की आमची रामभक्ति काय आहे हे तुम्हाला समजवुन द्यायला तुम्ही कोण्या पीठाचे शंकराचार्य लागून गेलेले नाही. त्यामुळे ज़रा हिशेबात रहा. ता . क - परत वैयक्तिक होऊ नका!

In reply to by नाना स्कॉच

अपत्यप्राप्ति हे उद्विष्ट असेल तर त्याकडे बघा ना ! उग्गाच फाटे का फोडत् आहात. रच्याकने रामरक्षा म्हणनारा पुरुष नसतो काय?

In reply to by भंकस बाबा

तुम्हाला नियोगाचे नियम माहीती आहेत काय? नसल्यास एकदा मिळवून वाचा मग बोलु. अन हो डोळसपणे रामरक्षा म्हणणारे रामचरित्राचे वाचक सुद्धा असतात अन प्रभुने घालुन दिलेल्या एकपत्नीव्रताचा आदरही करतात असो! अन सुसंस्कृत माणसे उद्दिष्ट उर्फ़ साध्यच पाहात नसतात तर "साधन" सुद्धा महत्वाचे असते! एक कॉन्सेप्ट असते बघा साधनशुचिता म्हणून, बघा झेपली तर.

In reply to by नाना स्कॉच

हे नियोगाचे नियम म्हणजे काय? ते वेदांत आहेत, उपनिषदांत आहेत, आरण्यकांत आहेत,ब्राह्मणांत आहेत का पुराणांत आहेत का अजून कुठे आहेत? तुम्हाला संदर्भ माहीत असल्यास नक्की इथे ते द्यावेत. मला ते ग्रंथ मिळवून नियम वाचायला आवडतील.

In reply to by भंकस बाबा

ओके म्हणजे ही कॉन्सेप्ट आपणांस झेपलेली नाही किंवा झेपणार नाही असे दिसते आहे. असो! तुम्ही बरोबर आम्ही चुक आमचे सगळे मुद्दे अन शब्द परत घेतो! जो जे वांछिल तो ते लाहो! प्राणिजात!!

In reply to by नाना स्कॉच

हो नाही झेपलि, मग काय म्हणणे आहे तुमचे? एक पूरी दुनिया सोडली तर एकपत्नीव्रत पाळणारे तुम्हीच! चायला विश्वामित्राला नाय झेपलि आणि इथे आम्हाला जमवायला सांगत आहेत. विश्वामित्र इथे हिंदुचा प्रतिनिधि म्हणुन घेऊ नका, इतर धर्मात पण असे बहुत दाखले आहेत.

In reply to by नाना स्कॉच

एकीकडे म्हणताय उत्कट प्रणय. नियोग हा अपत्यप्राप्तीसाठी केला जातो. प्रणयाचा संबंध काय आहे त्यात? आणि जर आकर्षण असेल तर तो व्यभिचार कसा काय? तुमच्या व्यभिचाराच्या संकल्पना (नियोगाबद्दल) गंडलेल्या आहेत असं नम्रपणे नमूद करु इच्छितो. आधुनिक काळात नियोगाच्या नावाने स्त्रीवर अत्याचार होत आहेत - हे जरा इस्कटून सांगा. अत्याचार हे कुठल्याही परिस्थितीत वाईटच. पण म्हणून नियोग कसा वाईट? हुंडा पद्धत वाईट आहे म्हणून लग्न वाईट असं म्हणाल का तुम्ही? अजून एक. मी तुम्हाला मूर्ख म्हणालो नाही. तुमच्या विचारांना मूर्खपणा असं म्हटलं. त्याचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात असा घेऊ नका. जर तसं तुम्हाला वाटलं असेल तर क्षमस्व. मी विवाहबाह्य संबंध हे व्यभिचारात येतात, जर त्यात दोन्हीपैकी एक जोडीदार दुस-या जोडीदाराच्या विश्वासाचा गैरफायदा घेत असेल तर - असं मानतो. त्यामुळे बहुपत्नीत्व हा माझ्यालेखी व्यभिचार आहे. पण नियोग नाही.

In reply to by बोका-ए-आझम

एकीकडे म्हणताय उत्कट प्रणय. नियोग हा अपत्यप्राप्तीसाठी केला जातो. प्रणयाचा संबंध काय आहे त्यात? आणि जर आकर्षण असेल तर तो व्यभिचार कसा काय? तुमच्या व्यभिचाराच्या संकल्पना (नियोगाबद्दल) गंडलेल्या आहेत असं नम्रपणे नमूद करु इच्छितो. अहो माझ्या संकल्पना गंडलेल्या नाहीत बोका साहेब तर सभ्यतेच्या किमान मर्यादेमुळे मी इथे नीटसा बोलु शकत नाहीये, आपली परवानगी असल्यास मी व्यनि मधे माझे म्हणणे नीट मांडू शकेल. आगाऊपणा बद्दल क्षमस्व शिवाय तुमच्या एकंदरित वकुबावरुन आपल्याशी चर्चा करणे बुद्धिवर्धकच असेल ! माझ्याकडून जर चुक असेल तर्क तर मी बदलायला तयार असतो हे वे सां न :)

In reply to by mugdhagode

hahhaaa

तार्किक दृष्टीने पाहावयास गेल्यास आपण राहत असलेल्या किंवा जेथे जन्म झाला आहे अशा प्रांताला मातृ असे संबोधणे गैर वाटते. मग प्रश्न हा पडतो कि पिता कोण? तसेच देशाला "भारतमाता" असे संबोधून त्याला मूर्त स्वरूप देणे(मुर्ती) हेसुद्धा अप्रस्तुत वाटते. शिवाय त्या भारतमातेला चार हात आहेत असे दाखवले आहे,मागे सिंह उभा आहे,एका हातात ध्वज आहे वगैरे दाखवले आहे.अजून 100 वर्षांनी लोकांचा असा समज व्हायचा कि भारतमाता नावाची कोणी देवी खरोखरच होऊन गेली कि काय? तेव्हा मुर्त स्वरूप देणे हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे पण इथे तो गैरलागू आहे असे वाटते.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

मातृभाषा म्हणजे "आईशी (आई-वडील असेही म्हणू शकतो) असलेली संवादाची भाषा" ना ? की भाषा हीच आई ? मग मातृभूमी म्हणजे जिथे "जिथे जन्मलो /वाढलो ती भूमी" इतकाच अर्थ असावा असे मला वाटते. बाकी कुणाला मातेसमान मानावे अथवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसेच तार्किक मुद्दे ही आहेत (भूमी ही माता तर पिता कोण ई) बरं समोरचा माणूसही त्याचा भूमीचा पूत्र आहे (तोही तिला माता म्हणतोय) , म्हणजे माझा बंधू झाला, तर मी त्याच्यावर अगदी भावाप्रमाणे बिन्दिक्कत विश्वास ठेवू का ? बंधूत्वाबद्दलच बोलायचे तर जेव्हा एखाद्या देशात मोठी आपत्ती येते तेव्हा इतर अनेक देशांकडून मदतीचा ओघ येतो, म्हणजे मातृभूमी एक नसूनही बंधुत्व मानले जावू शकते ना ? बाकी भाषा आणि संवाद संस्काराचा व सवयीचा भाग वेगळा. काही लोक येता जाता प्रत्येकाला (शेजारी, दुकानदार ई कुणीही) काका, काकू, मावशी, दादा , ताई ई संबोधने वापरतात. असे संबोधण्याने नाते निर्माण होते का ? नक्कीच नाही. पण हा फक्त सवयीचा भाग असतो. मला तरी उगाचाच कुणाला असे संबोधायला आवडत नाही (म्हणजे खास ओळख, जवळिक नसताना)

In reply to by मराठी कथालेखक

तुमचे म्हणणे पटले. पण,एका देवीप्रमाणे मूर्त स्वरूप देवून चार हात,मागे सिंह,एका हातात त्रिशूळ,दुसर्या हातात झेंडा वगैरे दाखवणे गैर वाटते,हाच तर खरा मुद्दा आहे म्हणूनच त्याविरोधात फतवे निघतायेत.

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे.
श्लोकामध्ये "अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त" हा उल्लेख दिसत नाही. प्रक्षिप्त साहित्य असेच तयार होत असावे काय? ;)

In reply to by प्रचेतस

घ्या! नैले पर दैला !! पण पटाईत सरांचा वाल्मिकी रामायणाचा अभ्यास दांडगा आहे ! ते नक्की सांगतील रेफेरेंस तंवर वेट एंड वॉच

In reply to by जेपी

ओ आय सी!! असा सगळा प्रकार झाला तर एकंदरित!! तरीच म्हणले टोटल का जुळेना! कुठल्या ब्र व्रात्य पोराने बाटलीतुन 2 टाक मौज काढून त्यात पाणी भरले!! असो!! ढ़ोसु *आनंदभरे *आनंद = ग्लास =)) =))

In reply to by प्रचेतस

शाळेत असताना माझी मातृभूमी निबंध आला की सुरुवात या श्लोकाने व्हायची. पण रामाला मातृभूमी म्हणजे नेमकं काय अपेक्षित होतं ? अयॉध्या ? भारतदेश ? भारतात पूजल्या जाणार्‍या हिंदू देवांची रिजर्व ब्यान्कम्हणजे लंका ना ? रामाच्या मातृभुमी संक्ल्पनेत लंकाही असायलाच हवी होती ना ? अब्दालीही परकीय , लंकाही परकीय ... मग संघाच्या अखंड हिंदुस्तानाच्या नकाशात अफगाणिस्तान ते लंका व्हाया म्यानमार का दाखवतात ?

In reply to by mugdhagode

मुग्धे..मुग्धे...!!! श्लोक नीट वाच की गं. तुला मातृभूमि हा शब्द कुठे दिसला ते सांग की गं. जननी जन्मभूमिश्च अशी सुरुवात आहे की गं. म्हणजे माता आणि जन्मभूमि. ह्यात मातृभूमि तुला कुठे दिसली गं? जन्मभूमि म्हणजे जिथे जन्म झाला ती भूमि. ह्यात मातृ पितृ कुठे येतो गं?
अब्दालीही परकीय , लंकाही परकीय ... मग संघाच्या अखंड हिंदुस्तानाच्या नकाशात अफगाणिस्तान ते लंका व्हाया म्यानमार का दाखवतात ?
तेव्हाचा भूभाग अशोकाच्या साम्राज्याचा हिस्सा होता गं.

In reply to by प्रचेतस

प्रचू डार्लिंग .... मीही तेच लिहिले आहे .. त्या काळात जन्मभूमी हीच कल्पना होती.... कारण तेंव्हा आपापल्या राज्यात किंवा जवळपासच लोक जन्मायचे... नवरा आफ्रिकेला ... बायको तिथं बाळंतली.. जन्मस्थान आफ्रिका ... मातृभूमी भारत ... असले प्रकार तेंव्हा नव्हते. त्यामुळे जन्मभूमी हाच शब्द होता. आज तालुका जिल्हा गाव राज्य अशी विभागणी असल्याने जन्मस्थान या गोष्टीला बर्थ सर्टिफिकेट पुरतेच महत्व आहे. आणि मातृभूमी म्हणजे देश ... नागरिकत्व देणारा .. भारत . म्हणुनच मी विचारलं की रामाला जन्मभूमी शब्दात नेमकंकाय अपेक्षित होतं ? अयॉध्या की जंबूद्वीप / भारतवर्ष / इंडिया ?

In reply to by mugdhagode

प्रचू डार्लिंग
अत्मबंध सर कुठे अहात तुम्ही?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

mugdhagode नावाचा आयडी माझा नाही- : मुग्धा गोडसे :::

In reply to by mugdhagode

किंवा नाही हे बघ बरं बाळ मुग्धा. उगाचच प्रचू डार्लिंगला त्रास देऊ नकोस. तो ऐकून घेतो म्हणून काय कडेवर बसशील लगेच?

In reply to by बोका-ए-आझम

तो ऐकून घेतो म्हणून काय कडेवर बसशील लगेच?
=)) =)) स्मायल्या परत अणा रे.

In reply to by होकाका

हम्म दुसरं काही नसलं कि, तारक फतेह,तस्लिमा नसरीन,जावेद अख्तर यांची उदाहरणे येतात लगेच.

In reply to by दिग्विजय भोसले

=))=))

In reply to by दिग्विजय भोसले

ती पाकिस्तान अन बांगलादेशची घाण आमच्या देशात अजिबात नको! आणि आमची कोणतीच माय बुरख्यात कधी राहू नये!

In reply to by पैसा

पुणेरी मुलींचा बुरखा चालेल का ?

In reply to by पैसा

मुग्धाला, बुरखा आणि स्कार्फ यातला फरक सम्जत नसेल तर कठीण आहे ! दादुला समजून घ्या की हा प्रतिसाद आणि हेत्वारोप (नक्की)जुना, फक्त आय्डी नवीण आहे ! बुवा रोज(ची) निशी तून साभार

In reply to by नाखु

लांडक्यांना असे फरक कळत नसावेत. ही घाण पार्टिशन्च्या वेळीच घालवायला हवी होती. आता 'गुजरात' करावं लागतंय. हे राम!

In reply to by पैसा

मुद्दा तो नाही, "भारत मात कि जय" या घोषणेमध्ये राष्ट्रवाद नसून त्याला धर्मवादाची किनार आहे. एरवी चित्रांमध्ये दाखवल्या जाणर्या भारतमातेला एखाद्या हिंदू देवीचे स्वरूप दिलेले आहे,त्यामुळे ते काहींना खटकते, याऊलट एखादी मुसलमान स्त्री भारतमाता म्हणून दाखवली तसेच सिंह,त्रिशूळ या हिंदू प्रतिंकांव्यतिरिक्त दुसरी प्रतिके दाखवली तर चालेल का? असा प्रश्न त्या घोषणेवरून राळ उडवणार्यांना आहे.अर्थात त्यांना तसे चालणार नाही. म्हणजेच याऊलट काही कट्टर मुसलमानांनादेखील हिंदू प्रतिके चालणार नाहीत.म्हणून त्या कथित भारतमातेचा जयजयकार करण्यात त्यांना आकस वाटतो. असा सरळ मुद्दा आहे हा.