Skip to main content

कन्या मानव्याची

लेखक gsjendra यांनी रविवार, 17/04/2016 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी अधीर मी बधीर मी रुधिर सबंध विश्वाचे मी स्तन्य मी चैतन्य चिवचिवाट अनन्य घरट्यातल्या चिमण्यांचा मी नागीन मी जोगीण मी वाघीण जगातल्या क्रांतीयूद्धाची मी स्वच्छंद मी अनिर्बंध मी मुक्तगंध अपत्य निसर्गाचे मी मोहिनी मी रोहिणी वंश वाहिनी प्रचंड जगपसर्‍याची मी सौंदर्य मी माधूर्य मी चातूर्य घराचे घरपण गजेंद्र भोसले आत्मशोध (काव्यसंग्रह)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3358
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

मी केळं मी शहाळ मी रताळ उपासाला सिताफळ मी भेंडी मी वांगी मी पुंगी लालचुटुक गाजराची मी रिक्षा मी एसटी मी पी एम टी काळ्या कळकट धुराची मी म्हमद्या मी म्हादु मी साधू चल करुया जादू मी कावळा मी सावळा मी मावळा सतरा इंच छातीचा मी दगड मी बोकड मी मी माकड नारळाच्या झाडावरचे मी गाल मी पाल मी साल पिकलेल्या फणसाचे मी ओके मी ओके मी ओके ओके ओके हा टाटाचा ओके टाटाचा ओके धुण्याचा साबण कपडे जादा धोने वाला ओके जादा चलने वाला ओके ओके हा टाटाचा ओके टाटाचा ओके धुण्याचा साबण टाटाचा ओके धुण्याचा साबण टिंग टिंगटि डिंग श्रोते हो आता ऐकुया काही ठळक बातम्या......... पैजारबुवा,

In reply to by प्रचेतस

=))

In reply to by जेपी

म्हणतात धो धो धुणे..... एक डाव धोबीघाट पंखा नाखु

मी प्लेट मी वेट मी सेट शेक प्रोटीनचा मी फसल मी मसल मी कसल बेटकुळ्या फुगलेल्या मी गजर मी अधर मी जबर गाडा आयुष्याचा मी शोध मी बोध मी क्रोध हरवलेल्या वेळाचा

आऽराऽरा पार बाजार उठवलाय की.. माझेही दोन पैसे... मी ओटा मी गोटा मी काटा पायात रुतणारा मी भांग मी रांग मी बांग मशिदीत दिली जाणारी मी भक्ष मी दक्ष मी अक्ष स्वतःभोवती फिरणारा मी मंदी मी कंदी मी संधी हातातुन निसटणारी मी वेग मी आवेग मी वेध भविष्याचा जेंद्र चौसले अत्मबोध (स्वतःला स्वत:चा )

मी मोठा मी खोटा मी सोटा पाठीत बसणारा मी अढी मी गढी मी दाढी नको तेंव्हा वाढणारी मी कडका मी धडका मी फडका इथली धूळ तिकडे करणारा मी खत्री मी संत्री मी मंत्री काय्द्यातून(सलामत) निसटणारा मी धागा मी जागा मी त्रागा अवकाळी भूच्छत्रीचा. खत्मशोध (कुणाला कशाचा )

अरारा! श्री कवी-धागाकर्ते, वाईट वाटून घेऊ नका. कविता लिहिण्यातली तुमची भावना पोचली. पण बाकी सगळ्या विडंबनकारांना दाद दिल्याशिवाय रहावत नाही! =))

मूळ कवींसकट इतरही सर्वांना __/\__ (आत्ता वेळ नाही, नाहीतर आमीबी भर घातल्यावीण सोडलं नसतं ;)

कविता म्हणल्यावर असं चालायचंच आपल्या माणसांनी असं खचकाटून बोलायचंच