✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क !

व
विवेक ठाकूर यांनी
Sat, 04/16/2016 - 14:53  ·  लेख
लेख
पैसा , वेळ आणि काम ही दैनंदिन टेंशनची तीन प्रमुख कारणं आहेत . काहीही आणि कितीही साधना केली तरी हे तीन प्रश्न सोडवल्याशिवाय जीवनात स्वास्थ येणं असंभव . आपल्या प्रत्येक दिवसाचा सगळा प्राईम टाईम याच तीन गोष्टींवर व्यतीत होत असतो . तस्मात , या तीन आयामात मजा आली तर जगण्यात आपसूक मजा येते . या तीन डायमेंन्शसपैकी काम सेंट्रल आहे कारण वेळ आणि पैसा त्याच्याशी निगडित आहेत . थोडक्यात काम नसेल ( उदा . रविवार ) तर वेळ आणि पैसा दुय्यम ठरतात . आणि त्याही पुढे जाऊन काम आनंदाचं झालं तर वेळ आणि पैसा बहुतांशी परिणाम शून्य होतात . कामाच्या बाबतीत एक सार्वत्रिक गैरसमज असाये की मनाजोगतं काम नाही त्यामुळे मजा येत नाही . या गैरसमजामुळे फार मोठा अनर्थ ओढवला आहे. कारण हे म्हणजे, पत्नी मनासारखी नाही त्यामुळे वैवाहिक जीवनात सुख नाही म्हणण्यासारखं आहे . त्यात पत्नी निदान व्यक्ती तरी आहे त्यामुळे तिच्याबाबतीत काही प्रमाणात कलह संभव आणि स्वाभाविक आहे . पण काम तर सर्वस्वी न्यूट्रल आहे. ते पूर्णपणे व्यक्ती निरपेक्ष आहे. त्यामुळे कामाच्याबाबतीत, ते करणार्‍याचा दृष्टीकोनच कायम निर्णायक आहे . थोडक्यात , एकदा का मनानं ठरवलंकी आपण करत असलेल्या कामात काही मजा नाही की जीवनाचा बाजा वाजलाच म्हणून समजा . मग त्या कामात व्यतीत केलेला वेळ आणि त्यातून मिळणारा पैसा, फारसा आनंद देऊ शकत नाहीत . तर सांगायची गोष्ट अशी की मनाजोगतं काम ही आयुष्यात मनासारखी पत्नी मिळण्यासारखी दुर्लभ घटना आहे . बर्‍याच सायकॅट्रीस्टसनी यावर `गेटींग अॅडजेस्टेड टू द सिच्युएशन '( किंवा वेल अॅडजस्टेड पर्सनॅलिटी ) हा एकमेव नामी पर्याय शोधला आहे . थोडक्यात , ` आहे त्याच्याशी विनातक्रार जुळवून घ्या , सुखी व्हाल', असा मनाला गप्प करण्याचा उपाय सुचवला आहे. आणि जगातल्या बहुतेक सर्व सो कॉल्ड हॅपी दिसणार्‍यांनी तोच आचरणात आणलेला दिसतो . असे लोक मग ` रिटायरमंट नंतर मजा करू ' अशी मनाची समजूत काढून, स्वतःला नेटानं कामाला जुंपून घेतात . सुट्टीच्या दिवशी जमेल आणि झेपेल तेवढी मजा करतात . सोमवारची नकोनकोशी आठवण मनाला पुढची काही तरी स्वप्न दाखवत सुसह्य करतात. ही झाली कर्मयोगाची सायकिक ट्रिटमेंट . आध्यात्मिक ट्रिटमेंट तर त्याहून भारी आहे आणि अर्थात असायलाच हवी ! आध्यात्मात `निष्काम कर्मयोग' किंवा ` फलापेक्षारहित कर्मयोग ' सांगितला जातो . थोडक्यात , पैशाकडे न बघता निव्वळ कामाचा आनंद घ्या हा तो राजमार्ग ! पण हा प्रकार जितका जोरात राबवाल तितका मानसिक दुफळी निर्माण करतो . कारण एकतर काम आवडत नसलं तरी पगाराच्या आशेनं, वेतन आयोगाकडे नजर लावून , प्रमोशनची स्वप्न पाहात ; पब्लिक सकाळी उठल्यापासून कामाचा गाडा ओढत असतं. त्यात आता ` कोणतीही अपेक्षा न करता' ही सगळी झकमारी करायची म्हणजे अवघड होऊन बसतं . या कर्मयोगी विचारसरणीमुळे कामाला गौरव प्राप्त होणं तर दूरच, पैशाला अवाजवी महत्व मिळालंय. म्हणजे सरकारी कामात बेतहाशा भ्रष्टाचार आणि प्रायवेट सेक्टरमधे जीवघेणी स्पर्धा . सरकारी कार्यालयातला माणूस निब्बर झालायं आणि खाजगी क्षेत्रातला निव्वळ यंत्रवत काम करतोयं. कामाची मजा म्हणावी तर इकडेही नाही आणि तिकडेही नाही . तर काय असेल कामाच्या आनंदाचं रहस्य ? पहिली गोष्ट, काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असतांना सुरु केलेलं काम कायम सृजनात्मक असतं. हा विकल्प म्हणजे मनाची समजूत असेल तर उपयोग नाही. वास्तविकात तुम्हाला केंव्हाही काम बंद करता यायला हवं . दुसरी गोष्ट, या `ऑप्शन नॉट टू वर्क' मधे कामाची कंटीन्यूटी आणि सृजनात्मकता दोन्हीही अंतर्निहित आहेत . असा विकल्प असेल तर काम किती आनंदाचं होईल याची तुम्ही कल्पना करू शकता. आणि तिसरी गोष्ट, अशा कामात मग वेळ आणि पैसा दोन्ही दुय्यम होतात . कामाची ऐच्छिकताच, कामाचा इतका आनंद देऊन जाते की फलप्राप्ती बोनस ठरते. आणि जिथे आनंद आहे तिथे तणाव अशक्य आहे. काय आधार आहे या विचारामागे ? तर मुळात कार्य हा अस्तित्वाचा छंद आहे , कंपलशन नाही. ज्या वेळी काम कंपलशन म्हणून केलं जातं त्यावेळी आपण अस्तित्वापासून वेगळे झाल्यासारखे वाटतो. आपली समग्रता हरवते. आपली सृजनात्मकता लयाला जाते. केवळ फलप्राप्तीच्या आशेनं आपण कामाचं ओझं वाहातो आणि त्यातून कालनिर्मिती होते. हा काल दुहेरी असतो, एकीकडे तो कालावधी संपण्याची इच्छा निर्माण करतो आणि दुसरीकडे काम वेळेत संपवण्याचं टेंशन तयार करतो . या विकल्पाचा दुसरा पैलू तर त्याहूनही थोर आहे . अशा चित्तदशेत काम करणार्‍या व्यक्तीला एका क्षणी अचानक उलगडा होतो की काम केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर चालू आहे, आपल्याला त्याची फक्त जाणीव होतेयं. आपण सदैव अकर्ता आहोत. कामाच्या यशापयशाचा आपल्याशी काही संबंध नाही. आपण परिणामापासून मुक्त आहोत ..... आणि हा `ऑप्शन नॉट टू वर्क' आपल्याला कायमच उपलब्ध होता! तुमचं कामच तुमचा छंद होतं, मग ते कुठलही काम असो. कामाच्या आनंदामुळे फलाशा दुय्यम होते आणि वेळेचं मनानं निर्माण केलेलं ओझं दूर होतं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
24694 वाचन

💬 प्रतिसाद (180)

प्रतिक्रिया

खरं सांगायचं तर , लेख काही

उगा काहितरीच
Sat, 04/16/2016 - 15:03 नवीन
खरं सांगायचं तर , लेख काही झेपला नाही. तस्मात आपला पास .
  • Log in or register to post comments

लेखात न झेपण्यासारखं काही नसावं

विवेक ठाकूर
Sat, 04/16/2016 - 22:22 नवीन
काम न करण्याचा विकल्प निर्माण करणं हे साहस आहे. फक्त कल्पना करुन पाहा. एकदा मुद्दा कळला की त्या दिशेनं आयुष्यात बदल घडवणं सुरु होतं.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sun, 04/17/2016 - 07:34 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

"पहिली गोष्ट, काम न करण्याचा

कंजूस
Sun, 04/17/2016 - 09:22 नवीन
"पहिली गोष्ट, काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असतांना सुरु केलेलं काम कायम सृजनात्मक असतं. हा विकल्प म्हणजे मनाची समजूत असेल तर उपयोग नाही. वास्तविकात तुम्हाला केंव्हाही काम बंद करता यायला हवं ." काम बंद!
  • Log in or register to post comments

आध्यात्मात `निष्काम कर्मयोग'

आनन्दा
Sun, 04/17/2016 - 10:43 नवीन
आध्यात्मात `निष्काम कर्मयोग' किंवा ` फलापेक्षारहित कर्मयोग ' सांगितला जातो . थोडक्यात , पैशाकडे न बघता निव्वळ कामाचा आनंद घ्या हा तो राजमार्ग ! पण हा प्रकार जितका जोरात राबवाल तितका मानसिक दुफळी निर्माण करतो . कारण एकतर काम आवडत नसलं तरी पगाराच्या आशेनं, वेतन आयोगाकडे नजर लावून , प्रमोशनची स्वप्न पाहात ; पब्लिक सकाळी उठल्यापासून कामाचा गाडा ओढत असतं. त्यात आता ` कोणतीही अपेक्षा न करता' ही सगळी झकमारी करायची म्हणजे अवघड होऊन बसतं .
लगे रहो.. अवांतर - आपल्याला कामापासून मुक्ती नसल्यामुळे आज पण कामच करत आहे. तस्मात पास.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद दिला असता, पण सध्या

आदूबाळ
Sun, 04/17/2016 - 11:36 नवीन
प्रतिसाद दिला असता, पण सध्या काम बंद असल्याने देऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments

मला पण

पैसा
Sun, 04/17/2016 - 11:37 नवीन
मला पण स्वयंपाकाचं काम बंद करायचंय. घरातले दु दु लोक रोज उठून हॉटेलचं खायला तयार नाहीत!
  • Log in or register to post comments

थोड कळतय अस वाटेपर्यंत आमची

जेपी
Sun, 04/17/2016 - 12:03 नवीन
थोड कळतय अस वाटेपर्यंत आमची गाडी रुळावरुन घसरली..
  • Log in or register to post comments

लोकांना ऑप्शन नॉट टू वर्क

विवेक ठाकूर
Sun, 04/17/2016 - 12:20 नवीन
म्हणजे काम बंद असं वाटतंय ! कारण आपल्याला फक्त दोनच पर्याय माहितीयेत, कामाला जुंपून घेणं किंवा काम बंद ! स्वतःच्या मर्जीनं काम करणं हा कामातल्या आनंदाचा फंडा आहे .
  • Log in or register to post comments

मग सोप्या भाषेत समजावा माऊली.

आदूबाळ
Sun, 04/17/2016 - 13:58 नवीन
मग सोप्या भाषेत समजावा माऊली...
अशा चित्तदशेत काम करणार्‍या व्यक्तीला एका क्षणी अचानक उलगडा होतो की काम केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर चालू आहे, आपल्याला त्याची फक्त जाणीव होतेयं. आपण सदैव अकर्ता आहोत. कामाच्या यशापयशाचा आपल्याशी काही संबंध नाही. आपण परिणामापासून मुक्त आहोत
"बटाट्याची चाळ" मध्ये पुलंनी एक प्रसंग रंगवला आहे. "...बाबांचा सूर असा काही लागला की बाबलीबाई समोरच्या ताटातल्या शेंगा वातीसारख्या वळू लागल्या. काही भगिनींना अशा वेळेला हमखास येणारी पेंग येऊ लागली." वर दिलेल्यासारखं वाक्य वाचलं की त्या इफेक्टचं मिपा-व्हर्जन येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

अभ्याला दिलेल्या प्रतिसादात सविस्तर उलगडा आहे

विवेक ठाकूर
Sun, 04/17/2016 - 15:32 नवीन
कामात स्वच्छंद आला तर आणि तरच अकर्ता गवसण्याची शक्यता आहे. It is really the other way round. In spirituality, people try a non-sense of reaching the Constant Steady State, which is also called the Presence or our True Nature by trying futile meditations. To me Work is the Real Meditation. The Life is to be solved primarily at that stage. If one can bring this `Option Not to Work' in one's activity, one is most likely to stumble upon the Truth. अर्थात, या फार दुरच्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा `ऑप्शन नॉट टू वर्क' हे साहस जमायला हवं तर मग ती पुढची पायरी आहे. इथे मी काही तरी काल्पनिक लिहीतोयं असा समज व्हायला नको म्हणून अकर्ता किंवा साक्षी ही सर्वमान्य आध्यात्मिक वस्तुस्थिती नमूद केलीये इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ओके. काल्पनिकता नकोच. आणि

आदूबाळ
Sun, 04/17/2016 - 17:15 नवीन
ओके. काल्पनिकता नकोच. आणि तात्त्विक पातळीवर (अ‍ॅट अ प्रिन्सिपल्स लेव्हल) लिहिलेलं माझासारख्या अनेक सामान्य मिपाकरांना कळत नाही हे उघडच आहे. आपण असं करूया का? आम्ही सगळे मिळून सगळ्यांच्या आयुष्यात घडणारी एक सिच्युएशन बनवतो. ती सिच्युएशन डोक्याला शॉट देणारी, ज्यात प्रचंड मनस्ताप होतो अशी बनवू. तो मिपाकरांचा लसावि आहे असं समजा. मग त्यावर ही सगळी तत्त्वं कशी लावायची हे तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगा. या स्टेप्स सर्वसामान्य मिपाकराला आचरणात आणता येण्याजोग्या असल्या, आणि अंतिम रिझल्ट म्हणून डोक्याचा शॉट / मनस्ताप कमी झाला तर या तत्त्वांच्या उपयुक्ततेचं प्रात्यक्षिकच घडेल. हे चालेल का? करूया का असं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

ती सिच्युएशन डोक्याला शॉट

अभ्या..
Sun, 04/17/2016 - 17:25 नवीन
ती सिच्युएशन डोक्याला शॉट देणारी, ज्यात प्रचंड मनस्ताप होतो अशी बनवू. तो मिपाकरांचा लसावि आहे असं समजा.
कोणता धागा वगैरे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

डन !

विवेक ठाकूर
Sun, 04/17/2016 - 17:26 नवीन
फक्त सिच्युएशन दैनंदिन कामाशी संबंधित हवी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हो अर्थातच. ओव्हर द टॉप किंवा

आदूबाळ
Sun, 04/17/2016 - 17:30 नवीन
हो अर्थातच. ओव्हर द टॉप किंवा लाखात एकदा घडणारी सिच्युएशन नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

कामाच्या आनंदाचा नियम हरेक कामाला लागू होतो

विवेक ठाकूर
Sun, 04/17/2016 - 17:38 नवीन
त्यामुळे सर्जन असो, सुपरस्टार असो की अगदी भिक मागायचं काम असो, उत्तर एकच आणि निर्विवाद आहे. त्यामुळे माझ्याबाजूनं काहीच प्रश्न नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

लसावी...

अर्धवटराव
Mon, 04/18/2016 - 12:12 नवीन
लसावी म्हणा कि मसावी... सगळ्या परिस्थितीत चालणारा एक फॉर्म्युला आहे. "सद्यः परिस्थितीत मी काय करायला हवं" हे सांगणारं इंजीन प्रत्येक माणसाच्या मनात/मेंदुत निसर्गाने इन्स्टॉल केलं असतं. त्याचं ऐकुन शरीर, बुद्धीला त्या कामी जुंपायचं. कधि कधि या इंजीनातुन अनेक स्वर उमटतात, गोंधळल्यासारखं होतं. मग थोडं नीट ऐकायचं. टाइम शेअरींग करुन त्यातल्या प्रत्येक स्वराला जस्टीस देणारी यंत्रणा बरोब्बर उत्तर देते. कधि हे प्रकरण अव्यवहार्य वाटतं. पण तरिही तो कौल घ्यायचा. बेस्ट पॉसीबल रिजल्ट हमखास मिळतात. शिवाय इंजीन आपला फॉर्म्युल्यात अनुभवातुन करेक्शन करत असतं. माणसाचं मन स्वभावतः स्वार्थी असतं. आपला इंट्रेस्ट ते कधि नजरेआड होऊ देत नाहि. त्यामुळे या फॉर्म्युल्याने आपलं नुकसान होत नाहि. इन फॅक्ट, कळत नकळत आपण याच फॉर्म्युलाने वागत असतो. त्यात डोळस सातत्य ठेऊन बघायचं बस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अर्धवट राव

विटेकर
Tue, 04/19/2016 - 12:14 नवीन
अर्धवट राव , केव्हा पासून असे होतेय ? काही डॉकटर , हकिम , वैद्य लोकांना दाखवले का ? तुमचा चक्क संक्षी होत चालला आहे ! उपचार घ्या हो लवकर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

याला कॉम्प्लीमेण्ट म्हणावं...का कसं...

अर्धवटराव
Tue, 04/19/2016 - 22:49 नवीन
आमच्या आय्डी पण पंख लागणार कि काय ?? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

छे हो ,

विटेकर
Wed, 04/20/2016 - 15:00 नवीन
ते सोडून सोडा ..तुम्हाला कोण पंख लावत नाही ! तुमच्या प्रतिसादावरुन असे वाट्ले की माता सरस्वती आपल्या अंगुलीत अवतीर्ण होऊन आपल्या कळ्फलकावर साल्सा करत आहे ! म्हणून एक्दम संक्षी आठ्वले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अर्धवटराव जर संक्षी असतील तर

वैभव जाधव
Wed, 04/20/2016 - 17:31 नवीन
अर्धवटराव जर संक्षी असतील तर वि.ठा.(विटूकाका नव्हे) कोण असतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

मी हे वाचलं का भास होत आहे.

भीमाईचा पिपळ्या.
Sun, 04/17/2016 - 12:28 नवीन
मी हे वाचलं का भास होत आहे. घंटा काय कळलं नाही.
  • Log in or register to post comments

जगण्याच्याtतीन बेसिक गरजा

चौथा कोनाडा
Sun, 04/17/2016 - 14:08 नवीन
जगण्याच्याtतीन बेसिक गरजा अन्न, वायफाय अन मिपा हे कुणी तहहयात द्यायला तयार असेल तर आम्ही : नॉट टू वर्क: हा ऑप्शन स्वीकारायला तयार आहोत.i
  • Log in or register to post comments

अशा कामात मग वेळ आणि पैसा

अभ्या..
Sun, 04/17/2016 - 14:19 नवीन
अशा कामात मग वेळ आणि पैसा दोन्ही दुय्यम होतात . कामाची ऐच्छिकताच, कामाचा इतका आनंद देऊन जाते की फलप्राप्ती बोनस ठरते.
अहाहाहाहा. परफेक्ट विवेकजी. अगदी इथलेच उदाहरण द्यायचे म्हणजे आपल्या मिपाचे बॅनर करायचे असते. रात्री हपिसातून यायलाच दहा अकरा वाजलेले असतात. एखाद दुसरे रिमाइंडर आलेले असते पण तगादा नसतो. पैसा हा म्याटर तर नसतोच. अगदी नाही केले तरी कुणी बोलणारे नसते. मनापासून करायच्या इच्छेने काम चालू करतो. अगदी पटकन होउन जाते हो. आपल्या त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन सोहळ्याचे बॅनर हो. माझे मलाच इतके आवडले की बस्स. शिवाय नंतर दाद मिळते ती तुम्ही म्हणता तशी बोनसच की. तुम्च्या लेखातले सगळे काही कळले नाही मला पण जेवढे रिलेट करता आले ते भावले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

@ अभ्या...

विवेक ठाकूर
Sun, 04/17/2016 - 15:07 नवीन
लेखावरचा पहिला सेंसिबल आणि मुख्य म्हणजे अनुभवातून आलेला प्रतिसाद! अगदी नाही केले तरी कुणी बोलणारे नसते. मनापासून करायच्या इच्छेने काम चालू करतो. कर्मयोगाचं हेच तर गमक आहे ! स्वच्छंद ! पण लोकांना कामाची बळजबरी झालीये. त्यामुळे त्यांना एकतर ते ओढावं लागतं किंवा करु नाही असं वाटतं. या दोन्हीही निरुपयोगी चित्तदशा आहेत. अशा मानसिकतेतून कामाचा आनंद कसा मिळेल? आणि स्वच्छंद ही काही कल्पना नाही. अभ्या जे करतो तेच मॉडेल प्रत्यक्ष व्यावहारात पण आणता येतं, फक्त जिगर हवी ! आणि जिगर म्हणजे उर्मटपणा नाही. ती स्वतःच्या स्पेसमधे काम करण्याची हिंमत आहे. आणि हे साहस एकदाच करावं लागतं . रोजरोज मरत जगण्यापेक्षा एकदा साहस करणं केंव्हाही श्रेयस. आणि काय आहे ते साहस? तर फक्त इतकंच की आपण प्राथमिक आहोत आणि काम दुय्यम आहे. याचा अर्थ आपण कामच करणार नाही असा होत नाही. आपण आपल्या मर्जीनं काम करु. आणि जेंव्हा करु तेंव्हा इतकं समरसून करु की फलाकांक्षा आणि वेळ यांचा काही रिलेवंसच राहाणार नाही. मग कामात येणारी मजा आणि आपली पराकोटीला पोहोचलेली सृजनात्मकता, काम वेळेपूर्वीच संपवते. याचा अर्थ काम झाल्यावर बिलींग होत नाही असा नाही. पण कामात मिळालेला आनंद बिलाची रक्कम हृदयाशी जोडत नाही. चेकच्या वाटेकडे डोळे लावून बसलोयं असं होत नाही. गृहिणींच्या बाबतीत तर हे इतकं सोपं आणि उघड आहे की फक्त आपलं बुद्धी कौशल्य वापरायचा आवकाश. आणि तिथे तर फलप्राप्ती लगोलग आहे. आपण केलेल्या कामाचा आनंद स्वच्छ दिसणार्‍या घरात, उत्तम झालेल्या स्वयंपाकात, अनायसे झालेल्या शारिरिक कष्टात, आपल्या लोकांशी जोडले जाण्यात अंतर्निहित आहे. इन फॅक्ट, आपल्या आनंदात दुसर्‍यांना सामिल करुन घ्यायला गृहकृत्यासारखी दुसरी गोष्ट नाही. पण लेखात म्हटलंय तसं पब्लिकला पैसा कामापेक्षा श्रेष्ठ वाटतो! त्यामुळे संसाराचा केंद्रबिंदू असलेल्या गृहकृत्याकडे सुद्धा एक ओझं आणि उगीच इतरांना उपकृत केल्याचा भाव आणल्यावर त्यातली मजाच हरवून जाते. तर सांगायचं म्हणजे जगातलं कुठलंही काम व्यक्ती निरपेक्ष आहे. ऑल वर्क पर से इज न्यूट्रल. तस्मात, स्वच्छंद घरकामात आणला काय की व्यावहारिक कामात आणला काय, तो कामाची मजा देऊन जातोच. आणि हा खरा कर्मयोग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वोक्के.. एकच प्रश्न पडलाय.

आनन्दा
Sun, 04/17/2016 - 15:31 नवीन
वोक्के.. एकच प्रश्न पडलाय. एक इंजिनीअर झालेला पोरगा आहे. पोरगा आहे हुशार, पण काही कारणाने त्याला नोकरी मिळत नाहीये. योगायोगाने त्याला कोणीतरी कामावर ठेवतो, पण ते काम आहे डेटा एंट्रीचे, म्हणजे त्याच्या क्षमतेचा, शिक्षणाचा शून्य वापर, आणि आवडीचा तर प्रश्नच नाही. पण पापी पेटका सवाल असल्यामुळे त्याला ते करावे लागतेय. अश्या मुलाला आपण काय सल्ला द्याल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

अश्या मुलाला आपण काय सल्ला

मोदक
Sun, 04/17/2016 - 15:52 नवीन
अश्या मुलाला आपण काय सल्ला द्याल? Poverty is a state of mind. श्री श्री राहुलजी गांधी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

कामाच्या स्वरुपाचा आणि मोबदल्याचा प्रश्नच कुठे येतो?

विवेक ठाकूर
Sun, 04/17/2016 - 15:57 नवीन
डेटा एंट्री सोडा, मी तर घरकामात सुद्धा तितकीच मजा आहे हे अनुभवानं सांगतो. आपली नज़र कामाला असलेल्या सामाजिक प्रतिष्ठेकडे आणि खरं तर त्यातून मिळणार्‍या मोबदल्यावर आहे त्यामुळे कामाचं ओझं वाटतं. If you can understand me the situation is exactly reverse. The least remunerative is the work, the most potential it has to give pleasure to the doer. आणि एक गोष्ट नक्की, जो डेटा एंट्रीच काम उत्तम करेल त्याच्याकडे आपसूक जास्त कौशल्य लागणारी कामं येतील . जो त्यातच खळखळ करेल त्याची प्रगती होण्याची शक्यता कमी कारण कामचुकार अशी अपकिर्तीच त्याला अडसर ठरेल. फार लांबच्या आणि काल्पनिक गोष्टी सध्या दूर ठेवा. अगदी साधी स्वतःची गाडी धुण्याची गोष्ट घ्या. ते कर्मच आहे, तिथे ही ते गाडी धुणार्‍याला सुपूर्द करण्याचा पर्याय आहे. पण कधी मन लावून ते काम करुन पाहा. कामाचा आनंद कामातच अंतर्भूत आहे. सदैव आपल्या दिमतीला असलेली गाडी, नुसती स्वच्छ होऊन चमकतांना बघितली तरी जीव हरखून जातो. कामाचा मोबदला हा कामातून मिळणार्‍या आनंदातच सामिल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

ठाकुर साहेब, तुम्ही फक्त

चौथा कोनाडा
Sun, 04/17/2016 - 21:03 नवीन
ठाकुर साहेब, तुम्ही फक्त कामाचा आनंद, स्वचछंद या बद्दलच बोलताय. बेसिक उदर निर्वाहा साठी लागणारा पैसा व कष्ट व प्रचंड या बद्दल काहीच बोलत नाहीय. हे म्हंजे शुद्ध अध्यात्म झाले.! सध्याच्या काळात वाढत्या गरजा महागाई या नुसार प्रत्येकाची आर्थिक गरज वेगवेगळी आहे अन त्या साठी करावा लागणारा जॉब हा आनंद देणारा नसेल तर काय करायचे ? तुम्ही म्हणताहेत कामाचा आनंद (जॉय ऑफ वर्क ) ते सर्व भरल्या पोटी करायचे विचार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

कामाचा आनंद अत्यंत मूलभूत आहे

विवेक ठाकूर
Sun, 04/17/2016 - 21:28 नवीन
त्यामुळे सगळा फोकस त्याच्यावर आहे. एकदा काम उत्तम झालं की मोबदला मिळतोच. तस्मात, मी 'मा फलेशु कदाचन' असं कदापी म्हणणार नाही. जर तुम्ही लेखात विशद केलेली चितदशा कामापूर्वी निर्माण करु शकलात तर दोन्ही आयाम सार्थ होतील. म्हणजे कामाचा आनंद, जो पैशापेक्षा थोर आहे , तोही मिळेल आणि योग्य मोबदल्यावरही तुमचा अधिकार राहील कारण तो व्यावहार आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

हे ठीक आहे.. थोडं जास्तीच

आनन्दा
Mon, 04/18/2016 - 11:04 नवीन
हे ठीक आहे.. थोडं जास्तीच ऑप्टिमिस्टिक होतय. प्रत्यक्ष आयुष्यात हे घडायला नशीब लागते.
जो त्यातच खळखळ करेल त्याची प्रगती होण्याची शक्यता कमी कारण कामचुकार अशी अपकिर्तीच त्याला अडसर ठरेल.
याच्याशी अंशतः सहमत.
आपली नज़र कामाला असलेल्या सामाजिक प्रतिष्ठेकडे आणि खरं तर त्यातून मिळणार्‍या मोबदल्यावर आहे त्यामुळे कामाचं ओझं वाटतं.
माझ्या दृष्टीने हे साहजिक आहे, कारण माझ्या डोक्यावर किमान क्षक्ष लाखाचे कर्ज आहे, आणि त्याचा हप्ता जाईल एव्हढी तरी मासिक कमाई मला आवश्यक आहे. असो - तात्विक पातळीवर या प्रतिसादाशी सहमत आहे, पण व्यावहारिक पातळीवर हे राबवताना बर्‍याच अडचणी येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

अगदी हेच ल्हायला आलोय.

चौथा कोनाडा
Mon, 04/18/2016 - 23:13 नवीन
अगदी हेच ल्हायला आलोय. Love like you've never been hurt Dance like nobody's watching Work like you don't need the money हाच सर्वज्ञात विचार ठाकुर साहेबानी मांडलाय. हे सगळं भरल्यापोटी म्हणायचं ! तुमच्या सारखी ग्राउंड रियालिटी पाहिलीकी यातली दाहकता कळेल. बरेच एम टेक झालेले युवक काही बेसिक काम करत पैसे मिळवत राहतात हे जवळुन पाहतोय. नावडीचं काम पैसे बर्यापैकी मिळतात म्हणुन ओढावे लागतेय. हं, आता हेच काम आवडुन घ्या व कर्मयोगाचा आनंद लुटा असे म्हणत असतील तर तो वेगळाच मुद्दा आहे. आणि हो, उगाच काहीतरी म्हणतात त्यानुसार शब्दांचे पोकळ बुरुज उभा करत ठाकुर साहेबानी लेखाचा किल्ला लढवलाय. लेख पाल्हाळिक झाल्यामुळे त्याच्या आशय व्यक्त करण्यातली धार गेलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

तुम्हाला मुद्दा कळत नाहीये

विवेक ठाकूर
Tue, 04/19/2016 - 13:19 नवीन
त्यामुळे लेख किल्ला लढवल्यासारखा वाटतोयं. सुबोधजींचा प्रतिसाद वाचलात तर सगळं क्लिअर होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

विठासाहेब,

चौथा कोनाडा
Tue, 04/19/2016 - 20:20 नवीन
विठासाहेब, अर्धवटराव, भीमाईचा पिपळ्या, आनन्दा आणि माझा असे प्रतिसाद काळजीपुर्वक वाचा म्हंजे मला/आम्हाला काय म्हणायचंaआहे ते तुमच्या लक्ष्यात येइल. बुरुज अन किल्ल्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुरुवातीच्या अन इतर काही प्रतिसादावरुन हे कसले बुरुज आहेत हे वेगेळे सांगायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

ज्यांनी अनुभवातून प्रतिसाद दिलेत

विवेक ठाकूर
Tue, 04/19/2016 - 22:07 नवीन
उदा . अभ्या , सुबोधजी, काही प्रमाणात गॅरी ट्रुमन त्यांचे प्रतिसाद वाचले तर तुम्हाला लेख कळू शकेल . ज्यांना मुद्याच कळला नाही त्यांचे प्रतिसाद वाचून काय उपयोग ? शिवाय मी लेख अनुभवातूनच लिहीलायं आणि सर्व प्रामाणिक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत . तस्मात , मला किल्ला लढवण्याची गरजच नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

वर दिलेल्या यादीत

विवेक ठाकूर
Tue, 04/19/2016 - 22:30 नवीन
चित्रगुप्तांचं नांव लिहायचं राहीलं . त्यांनी सृजनशील कामात येणाऱ्या अडचणी कामाची खुमारी कशी वाढवतात याचा समर्पक दाखला दिला आहे . आणि मुख्य म्हणजे ते 'ऑप्शन नॉट टू वर्क ' या चित्तदशेतून काम करतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

वर दिलेल्या यादीत

विवेक ठाकूर
Tue, 04/19/2016 - 22:30 नवीन
चित्रगुप्तांचं नांव लिहायचं राहीलं . त्यांनी सृजनशील कामात येणाऱ्या अडचणी कामाची खुमारी कशी वाढवतात याचा समर्पक दाखला दिला आहे . आणि मुख्य म्हणजे ते 'ऑप्शन नॉट टू वर्क ' या चित्तदशेतून काम करतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

याचा अर्थ आपण कामच करणार नाही

अप्पा जोगळेकर
Mon, 04/18/2016 - 17:16 नवीन
याचा अर्थ आपण कामच करणार नाही असा होत नाही. आपण आपल्या मर्जीनं काम करु. आणि जेंव्हा करु तेंव्हा इतकं समरसून करु की फलाकांक्षा आणि वेळ यांचा काही रिलेवंसच राहाणार नाही. मग कामात येणारी मजा आणि आपली पराकोटीला पोहोचलेली सृजनात्मकता, काम वेळेपूर्वीच संपवते. तुम्ही अशा पद्धतीने काम करता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

तुम्ही अशा पद्धतीने काम करता का ?

विवेक ठाकूर
Mon, 04/18/2016 - 20:52 नवीन
अर्थात ! मी माझा अनुभव शेअर करतो. तस्मात, प्रश्नांची उत्तरं अनुभवातून येतात, कल्पनेतून नाही. आणि त्यामुळेच प्रश्नांची फिकीर नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

प्रश्नांची उत्तरं अनुभवातून

मोदक
Tue, 04/19/2016 - 11:44 नवीन
प्रश्नांची उत्तरं अनुभवातून येतात, कल्पनेतून नाही नक्की का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

कालच एक २०-२२ वर्षांचा उमदा

तर्राट जोकर
Sun, 04/17/2016 - 16:31 नवीन
कालच एक २०-२२ वर्षांचा उमदा तरुण भेटला. आपली ओळख देतांना बोलला मी ड्रायवर आहे आणि मला माझ्या कामाची कसलीही लाज वाटत नाही. त्याच्या बॉसनेही अपरोक्ष त्याचे अनेक गुण सांगितले, उदा. सीटबेल्ट लावणे, गाडी सोडून कुठेही न जाणे, थोडक्यात इतर ड्रायवर जे अवगुण करतात त्यापेक्षा वेगळा आहे म्हणून. त्याचे काम हेच त्याची मजा आहे आणी ते तो पुरेपुर उपभोगतो.
  • Log in or register to post comments

येस !

विवेक ठाकूर
Sun, 04/17/2016 - 17:08 नवीन
कामाची दर्जेवार विभागणी मनात दुभंग निर्माण करते आणि मग कामातून मिळणारा आनंद नाहीसा होतो . एकदा प्रत्येक काम हे स्वभावतःच न्यूट्रल आहे हे लक्षात आलं की काम करणाऱ्याचा दृष्टीकोन महत्वाचा होतो, मग कोणत्याही कामात तुम्ही रंग भरु शकता .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

याचा अर्थ आपण कामच करणार नाही

भीमाईचा पिपळ्या.
Sun, 04/17/2016 - 18:25 नवीन
याचा अर्थ आपण कामच करणार नाही असा होत नाही. आपण आपल्या मर्जीनं काम करु. आणि जेंव्हा करु तेंव्हा इतकं समरसून करु की फलाकांक्षा आणि वेळ यांचा काही रिलेवंसच राहाणार नाही.
मग कर्मन्यवाधिकारस्ते.....च झाले कि.....
  • Log in or register to post comments

ऑप्शन नॉट टू वर्क आणि

विवेक ठाकूर
Sun, 04/17/2016 - 20:35 नवीन
कर्मण्येवाधिकारस्ते या दोन अप्रोचेसमधे कमालीचा फरक आहे. पण तुमचा पहिला प्रतिसाद असा आहे : मी हे वाचलं का भास होत आहे. घंटा काय कळलं नाही. त्यामुळे तुम्हाला कळेल की नाही याबद्दल साशंकता आहे. तस्मात, वेळ घालवू इच्छित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमाईचा पिपळ्या.

बरररररअरररर

भीमाईचा पिपळ्या.
Sun, 04/17/2016 - 21:04 नवीन
बरररररअरररर
  • Log in or register to post comments

मी नोकरी सोडली आणि व्यवसाय सुरु केला

गॅरी शोमन
Mon, 04/18/2016 - 11:00 नवीन
या सर्व चक्रातुन मी गेलॉ आहे. नोकरी सोडण्यापुर्वी अनेक वर्षे इच्छा नसताना कामावर गेलो आहे मग केवळ जबाबदारीचा पगार मिळतो म्हणुन शिव्या खाल्या आहेत. हाताखालच्या माणसाने चुक केली पण तो साहेबांचा माणुस किंवा केवळ ज्युनीयर म्हणुन त्याला सोडुन मला " फायर करतो " अश्या धमक्या मिळाल्या आहेत. शेवटी जेव्हा जबाबदार्‍या संपल्या तेव्हा मी स्वतःशीच झगडा करुन एक निर्णय घेतला की नोकरी करणार नाही आणि ज्यात आनंद आहे तेच काम करेन. नाही मिळाले तर ते गप्प बसीन. परीणाम असा आहे की नोकरी इतके पैसे मी व्यवसायात मिळवतो आणि आनंदी सुध्दा आहे.
  • Log in or register to post comments

चला दोन तीन पुढच्या

कंजूस
Mon, 04/18/2016 - 15:20 नवीन
चला दोन तीन पुढच्या रांगेतल्या चेल्यांना कळलंय.शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचवाहो दोन टिंब आणि शोमनसाहेब.
  • Log in or register to post comments

वरील प्रतिसादांवरुन मला

राजाभाउ
Mon, 04/18/2016 - 16:39 नवीन
वरील प्रतिसादांवरुन मला समजलेला अर्थ असा कि तुम्ही करत असलेले काम पुर्ण निष्ठेने, मनापासुन करा मग तुम्हाला त्यातुन आनंद मिळेल आणि तो इतका उच्चः दर्जाचा असेल कि इतर पैसा वगैरे गोष्टी तेव्हड्या महत्वाच्या राहणार नाहीत. अर्थात याच्याशी सहमत आहे. पण मग हे `गेटींग अॅडजेस्टेड टू द सिच्युएशन ' यापेक्षा वेगळे कसे ?
  • Log in or register to post comments

जुळवून घेणे आणि समरस होणे

तर्राट जोकर
Mon, 04/18/2016 - 16:43 नवीन
जुळवून घेणे आणि समरस होणे ह्यात फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

तजो सर दोन्हीतही जुळवून घेणे

राजाभाउ
Mon, 04/18/2016 - 17:00 नवीन
तजो सर दोन्हीतही जुळवून घेणे आलच की हो. म्हणजे मला आवडणारी गोष्ट मला काम म्हणुन मिळाले तर समरसता आपोआपच येणार. पण मला न आवडणारी गोष्ट मला काम म्हणुन मिळाले तर प्रथम जुळवून घेतल पाहीजे मग एकतर मी ते काम करताना सतत तक्रार करत राहिन आणि स्वताला त्रास करुन घेइन किंवा त्या कामात आनंद शोधुन समरस होइन, पण हे सुद्दा एक प्रकारच जुळवून घेणेच झाल नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा