Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विवेक ठाकूर on Sat, 04/16/2016 - 14:53
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
पैसा , वेळ आणि काम ही दैनंदिन टेंशनची तीन प्रमुख कारणं आहेत . काहीही आणि कितीही साधना केली तरी हे तीन प्रश्न सोडवल्याशिवाय जीवनात स्वास्थ येणं असंभव . आपल्या प्रत्येक दिवसाचा सगळा प्राईम टाईम याच तीन गोष्टींवर व्यतीत होत असतो . तस्मात , या तीन आयामात मजा आली तर जगण्यात आपसूक मजा येते . या तीन डायमेंन्शसपैकी काम सेंट्रल आहे कारण वेळ आणि पैसा त्याच्याशी निगडित आहेत . थोडक्यात काम नसेल ( उदा . रविवार ) तर वेळ आणि पैसा दुय्यम ठरतात . आणि त्याही पुढे जाऊन काम आनंदाचं झालं तर वेळ आणि पैसा बहुतांशी परिणाम शून्य होतात . कामाच्या बाबतीत एक सार्वत्रिक गैरसमज असाये की मनाजोगतं काम नाही त्यामुळे मजा येत नाही . या गैरसमजामुळे फार मोठा अनर्थ ओढवला आहे. कारण हे म्हणजे, पत्नी मनासारखी नाही त्यामुळे वैवाहिक जीवनात सुख नाही म्हणण्यासारखं आहे . त्यात पत्नी निदान व्यक्ती तरी आहे त्यामुळे तिच्याबाबतीत काही प्रमाणात कलह संभव आणि स्वाभाविक आहे . पण काम तर सर्वस्वी न्यूट्रल आहे. ते पूर्णपणे व्यक्ती निरपेक्ष आहे. त्यामुळे कामाच्याबाबतीत, ते करणार्‍याचा दृष्टीकोनच कायम निर्णायक आहे . थोडक्यात , एकदा का मनानं ठरवलंकी आपण करत असलेल्या कामात काही मजा नाही की जीवनाचा बाजा वाजलाच म्हणून समजा . मग त्या कामात व्यतीत केलेला वेळ आणि त्यातून मिळणारा पैसा, फारसा आनंद देऊ शकत नाहीत . तर सांगायची गोष्ट अशी की मनाजोगतं काम ही आयुष्यात मनासारखी पत्नी मिळण्यासारखी दुर्लभ घटना आहे . बर्‍याच सायकॅट्रीस्टसनी यावर `गेटींग अॅडजेस्टेड टू द सिच्युएशन '( किंवा वेल अॅडजस्टेड पर्सनॅलिटी ) हा एकमेव नामी पर्याय शोधला आहे . थोडक्यात , ` आहे त्याच्याशी विनातक्रार जुळवून घ्या , सुखी व्हाल', असा मनाला गप्प करण्याचा उपाय सुचवला आहे. आणि जगातल्या बहुतेक सर्व सो कॉल्ड हॅपी दिसणार्‍यांनी तोच आचरणात आणलेला दिसतो . असे लोक मग ` रिटायरमंट नंतर मजा करू ' अशी मनाची समजूत काढून, स्वतःला नेटानं कामाला जुंपून घेतात . सुट्टीच्या दिवशी जमेल आणि झेपेल तेवढी मजा करतात . सोमवारची नकोनकोशी आठवण मनाला पुढची काही तरी स्वप्न दाखवत सुसह्य करतात. ही झाली कर्मयोगाची सायकिक ट्रिटमेंट . आध्यात्मिक ट्रिटमेंट तर त्याहून भारी आहे आणि अर्थात असायलाच हवी ! आध्यात्मात `निष्काम कर्मयोग' किंवा ` फलापेक्षारहित कर्मयोग ' सांगितला जातो . थोडक्यात , पैशाकडे न बघता निव्वळ कामाचा आनंद घ्या हा तो राजमार्ग ! पण हा प्रकार जितका जोरात राबवाल तितका मानसिक दुफळी निर्माण करतो . कारण एकतर काम आवडत नसलं तरी पगाराच्या आशेनं, वेतन आयोगाकडे नजर लावून , प्रमोशनची स्वप्न पाहात ; पब्लिक सकाळी उठल्यापासून कामाचा गाडा ओढत असतं. त्यात आता ` कोणतीही अपेक्षा न करता' ही सगळी झकमारी करायची म्हणजे अवघड होऊन बसतं . या कर्मयोगी विचारसरणीमुळे कामाला गौरव प्राप्त होणं तर दूरच, पैशाला अवाजवी महत्व मिळालंय. म्हणजे सरकारी कामात बेतहाशा भ्रष्टाचार आणि प्रायवेट सेक्टरमधे जीवघेणी स्पर्धा . सरकारी कार्यालयातला माणूस निब्बर झालायं आणि खाजगी क्षेत्रातला निव्वळ यंत्रवत काम करतोयं. कामाची मजा म्हणावी तर इकडेही नाही आणि तिकडेही नाही . तर काय असेल कामाच्या आनंदाचं रहस्य ? पहिली गोष्ट, काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असतांना सुरु केलेलं काम कायम सृजनात्मक असतं. हा विकल्प म्हणजे मनाची समजूत असेल तर उपयोग नाही. वास्तविकात तुम्हाला केंव्हाही काम बंद करता यायला हवं . दुसरी गोष्ट, या `ऑप्शन नॉट टू वर्क' मधे कामाची कंटीन्यूटी आणि सृजनात्मकता दोन्हीही अंतर्निहित आहेत . असा विकल्प असेल तर काम किती आनंदाचं होईल याची तुम्ही कल्पना करू शकता. आणि तिसरी गोष्ट, अशा कामात मग वेळ आणि पैसा दोन्ही दुय्यम होतात . कामाची ऐच्छिकताच, कामाचा इतका आनंद देऊन जाते की फलप्राप्ती बोनस ठरते. आणि जिथे आनंद आहे तिथे तणाव अशक्य आहे. काय आधार आहे या विचारामागे ? तर मुळात कार्य हा अस्तित्वाचा छंद आहे , कंपलशन नाही. ज्या वेळी काम कंपलशन म्हणून केलं जातं त्यावेळी आपण अस्तित्वापासून वेगळे झाल्यासारखे वाटतो. आपली समग्रता हरवते. आपली सृजनात्मकता लयाला जाते. केवळ फलप्राप्तीच्या आशेनं आपण कामाचं ओझं वाहातो आणि त्यातून कालनिर्मिती होते. हा काल दुहेरी असतो, एकीकडे तो कालावधी संपण्याची इच्छा निर्माण करतो आणि दुसरीकडे काम वेळेत संपवण्याचं टेंशन तयार करतो . या विकल्पाचा दुसरा पैलू तर त्याहूनही थोर आहे . अशा चित्तदशेत काम करणार्‍या व्यक्तीला एका क्षणी अचानक उलगडा होतो की काम केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर चालू आहे, आपल्याला त्याची फक्त जाणीव होतेयं. आपण सदैव अकर्ता आहोत. कामाच्या यशापयशाचा आपल्याशी काही संबंध नाही. आपण परिणामापासून मुक्त आहोत ..... आणि हा `ऑप्शन नॉट टू वर्क' आपल्याला कायमच उपलब्ध होता! तुमचं कामच तुमचा छंद होतं, मग ते कुठलही काम असो. कामाच्या आनंदामुळे फलाशा दुय्यम होते आणि वेळेचं मनानं निर्माण केलेलं ओझं दूर होतं.
  • Log in or register to post comments
  • 24694 views

प्रतिक्रिया

Submitted by विवेक ठाकूर on Mon, 04/18/2016 - 22:43

In reply to तजो सर दोन्हीतही जुळवून घेणे by राजाभाउ

Permalink

मूळ मुद्दा हरवतोयं !

१. पहिली गोष्ट, काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असतांना सुरु केलेलं काम कायम सृजनात्मक असतं. हा विकल्प म्हणजे मनाची समजूत असेल तर उपयोग नाही. वास्तविकात तुम्हाला केंव्हाही काम बंद करता यायला हवं . तस्मात, काम काय आहे हा मुद्दा गौण आहे. ते `न करण्याचा पर्याय' तुम्हाला उपलब्ध आहे का ? हा मुख्य मुद्दा आहे. आवडीचं काम निवडा, आवडेल तेच करा हे सल्ले फोल आहेत कारण ती ड्रीम सिचुएशन आहे. आणि त्यामुळे ती प्रत्येकाला उपलब्ध होईल असं नाही. आपण एका सर्वोपयोगी तत्त्वाबद्दल बोलतोयं, मुद्दा नीट बघा, `काम न करण्याचा विकल्प'! फोकस काम न करण्याच्या विकल्पावर आहे, आवडीच्या किंवा न आवडीच्या कामावर नाही. तुम्ही चुकीच्या पद्धतीनं अर्थ काढलात तर फोकस बदलेल. तो स्वतःवर राहाणार नाही, कामावर शिफ्ट होईल. मग तुमचा कोअर पॉइंटच हुकेल. काम कायम न्यूट्रल आहे. तुम्ही तुमची आवड-निवडमधे आणली तर पुन्हा मनाच्या चकव्यात सापडाल. मनाची एकसंधता हरवेल. तस्मात, आहे त्या कामाशी जुळवा ही तडजोड व्यर्थ आहे. काम कोणतंही असो, त्यानं काहीएक फरक पडत नाही. ते सुरु करण्यापूर्वी तुमच्याकडे `न करण्याचा पर्याय' प्रामाणिकपणे उपलब्ध हवा. आणि हा पर्यायच लाजवाब आहे, तो मनाला पराभूत करतो. तुम्ही प्राथमिक आणि काम दुय्यम होतं. आणि त्या पर्याचा परिणाम म्हणजे जे आहे ते काम स्वच्छंद होतं. तुम्ही जेंव्हा ते करता तेंव्हा त्यात समरस होता. तुमची सर्जनशीलता जागरुत होते. त्या कामत तुम्हाला आनंद मिळतो. ते काम उत्तम होतं !
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 04/19/2016 - 00:05

In reply to मूळ मुद्दा हरवतोयं ! by विवेक ठाकूर

Permalink

`न करण्याचा पर्याय' प्रामाणिकपणे उपलब्ध हवा.

काम न करण्याचा पर्याय प्रामाणीकपणे उपलब्ध असणे हा नशीबाचा भाग म्हणावा काय ? आज माझी सेल्स ऑर्डर पूर्ण झाली नाहि तर एकदम रात्रीचं जेवण मिळणार नाहि असं होणार नाहि (काहि लोकांसाठी खरच अशी परिस्थिती येऊ शकते), पण कुटुंबाच्या आवष्यक खर्चाल कात्री लागेल मात्र (मुलांची फी वगैरे). आता हा आवष्यक खर्चच अनाठायी आहे असं पटवुन घ्यायचं असेल तर प्रश्न वेगळा. पण काम न करण्याचा ऑप्शन असणं हे नशीब म्हणावं लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 04/19/2016 - 22:52

In reply to `न करण्याचा पर्याय' प्रामाणिकपणे उपलब्ध हवा. by अर्धवटराव

Permalink

काम न करण्याचा पर्याय

काम न करण्याचा पर्याय प्रामाणीकपणे उपलब्ध असणे हा नशीबाचा भाग म्हणावा काय ?
काम न करण्याचा पर्याय प्रामाणीकपणे उपलब्ध असण्यासाठी एकतर गडगंज श्रीमंत असलेल्या घरात जन्म व्हायला हवा किंवा निवृत्ती नियोजन करून वयाच्या चाळीशीत वगैरे निवृत्त व्हायला हवे. हे दोन्ही पर्याय सर्वसामांन्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 04/19/2016 - 22:56

In reply to काम न करण्याचा पर्याय by सतिश गावडे

Permalink

वेलकम टु अनाडी क्लब :)

तुम्हाला सुद्धा "मुद्दा कळलाच नाहि" त्यामुळे जास्त काहि प्रतिसाद द्यायची गरज नाहि :)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 04/19/2016 - 22:59

In reply to वेलकम टु अनाडी क्लब :) by अर्धवटराव

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 04/19/2016 - 23:04

In reply to काम न करण्याचा पर्याय by सतिश गावडे

Permalink

तरी काम संपत नाही

नियोजन करून नोकरीतून किंवा व्यवसायातून निवृत्त होता येईल. पण घरच्या कामातून निवृत्त होता येत नाही. त्या कामासाठी पैसे तर मिळत नाहीतच. म्हणजे तो प्रश्न निकालात निघाला. मला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. पण मुलाला आठ वाजता डबा द्यायलाच पाहिजे. स्वयंपाक न करण्याचा काही ऑप्शन माझ्याकडे नाही. कारण तेवढ्यासाठी कोणी स्वयंपाकीण घरात ठेवणे मला अनेक कारणांनी आवडत नाही. मग आहे ते काम आवडीने करायचे, निदान त्यातला वैताग बाजूला काढायचा हा पर्याय आधीच जुन्या लोकांनी शिकवून ठेवलाय. निव्वळ पैसे मिळतात म्हणून निर्विकारपणे चाळीस चाळीस वर्षे बंकेची नोकरी सुखदु:ख समे कृत्वा केलेले अनेक महाभाग पाहिलेत. त्यांना काम आवडत नाही म्हणून ते करत नाहीत. पण नोकरीतून त्याना कोणी काढू शकत नाही. अशा नोकर्‍यांमधे तुम्ही फक्त दहा ते पाच फिजिकली प्रेझेंट असले की झाले. या अवस्थेला काय म्हणावे? त्याना काम आवडत नाही पण काम न करण्याचा ऑप्शन ते लोक आधीच वापरत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 04/19/2016 - 23:12

In reply to तरी काम संपत नाही by पैसा

Permalink

निव्वळ पैसे मिळतात म्हणून

निव्वळ पैसे मिळतात म्हणून निर्विकारपणे चाळीस चाळीस वर्षे बंकेची नोकरी सुखदु:ख समे कृत्वा केलेले अनेक महाभाग पाहिलेत.
आमच्या लाईनची वेगळीच तर्हा आहे. आयटी हमाल स्वतःला एक विशिष्ट उपमा देऊन अंगावर पडेल तितके आणि पडेल ते काम करतात. महिनाअखेरीस पगार मिळाल्याशी मतलब. भारतीय आयटी कामगार जर काम आणि आनंद यांची सांगड घालू लागले तर अमेरीकेचे वांदे होतील. त्यांना आउटसोर्सिंगसाठी दुसरा देश शोधावा लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 04/21/2016 - 11:06

In reply to तरी काम संपत नाही by पैसा

Permalink

हा... हा... हा... !

हा... हा... हा... ! हा पर्याय भलताच आवडला. कर्मयोग : ऑप्शन नॉट टू वर्क एण्ड गेटींग सॅलरी ! पैसातै, होवुन जाव दे या वर शेपरेट धागा ! हो ऊ द्या दंगा !
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 04/21/2016 - 11:15

In reply to हा... हा... हा... ! by चौथा कोनाडा

Permalink

=))

=)) खरंच एक धागा काय, पुस्तक लिहू शकेन! कर्मफलाची अपेक्षा नको. कारण पगार मिळणार हे माहीत आहे. कामही करायला नको. मज्जानु लाईफ! सरकारी बँकामधले काही लोक असतात तसे काही सरकारी बाबू लोक पण असे महान योगी बनलेले असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 04/21/2016 - 12:08

In reply to =)) by पैसा

Permalink

:-)))

:-))) ते खरेच महान "कर्म"योगी आहेत. अश्या घाउक कर्मयोगान्मुळे कित्येक सरकारी संस्था / खासगी कारखाने मोडुन गेले. गलथान पणा मुळे कार्यक्षमतेची वाट लागली. अन या उलट जागतिकीकरणा नंतर तरुण पिढीच्या समोर कॉंट्रॅक्ट रुपी राक्षस उभा राहिला. तासा वर मोजुन काम करावे लागते. ही विषमता पाहण्याचा असला "कर्म"योग आपल्या नशिबी आलाय. विठासाहेबानी हेच प्रबोधन आधी केले असते तर आपला भारत देश 2020 ऐवजी 2002 मध्येचमहासत्ता झाला असता.
  • Log in or register to post comments

Submitted by राजाभाउ on Tue, 04/19/2016 - 10:59

In reply to मूळ मुद्दा हरवतोयं ! by विवेक ठाकूर

Permalink

काम करण्याचे कंप्लशन नसुन ते

काम करण्याचे कंप्लशन नसुन ते ऐछिक असेल तर ते सृजनात्मक होइल आणि तुम्ही म्हणता तसे ते लाजवाब असेल हे तर मान्य पण असे काम न करण्याचा विकल्प उपलब्ध प्रामाणिक पणे उपलब्ध असणे ही सुद्धा 'ड्रीम सिचुएशन' नाही का ? ती प्रत्येकाला उपलब्ध कशी उपलब्ध होईल ? तसेच मी काम न करण्याचा विकल्प वापरणे म्हणजे माझ्या कामावर अवलंबुन असणार्या बरोबर कुठलीही कमीटमेंट नसण असे नाही का ? हे फार तर एखाद्या कलाकाराला लागु पडेल कारण कला निर्मीती हि नेहमीच सृजनात्मक असती आणि ती ऐछिक असेल तरच ती चांगली होइल पण सामान्य माणसांनी हे रोजच्या कामात कसे अवलंबायचे ह्यावर जरा प्रकाश टाकालात तर बरे होइल
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Tue, 04/19/2016 - 15:02

In reply to काम करण्याचे कंप्लशन नसुन ते by राजाभाउ

Permalink

समझ आचरणमे बदल जाती है : ओशो

पण सामान्य माणसांनी हे रोजच्या कामात कसे अवलंबायचे ह्यावर जरा प्रकाश टाकालात तर बरे होइल सामान्य आणि विशेष ही काल्पनिक विभागणी प्रथम मनातून काढून टाकायला हवी. काम न करण्याचा विकल्प म्हणजे काम न करणं असा अर्थ घेतला जातोयं त्यामुळे गैरसमज होतोयं. तो विकल्प म्हणजे आपण प्राथमिक आहोत आणि काम दुय्यम आहे ही वस्तुस्थिती स्वीकारण्याचा आवकाश आहे. त्या वस्तुस्थितीचं विस्मरण कामाला अवाजवी महत्त्व निर्माण करतं. रोजच्या आणि प्रत्येक कामाला हेच तत्त्व लागू आहे. एकदा ही खूणगाठ बांधली की पुढचं सगळं सोपं आहे. मग ओशो म्हणतात तसं समझ आचरणमे बदल जाती है !
  • Log in or register to post comments

Submitted by राजाभाउ on Wed, 04/20/2016 - 10:27

In reply to समझ आचरणमे बदल जाती है : ओशो by विवेक ठाकूर

Permalink

ओके. थोडं थोडं समजतय. "आपण

ओके. थोडं थोडं समजतय. "आपण प्राथमिक आहोत आणि काम दुय्यम आहे" म्हणजे मी जे काम करतोय ते माझी इच्छा आहे म्हणुन करतोय, उद्या वाटले तर थांबवु शकेतो किंवा वेगळे काम करु शकतो असा ठाम विश्वास वाटणे. पण असा केवळ पोकळ विश्वास वाटुन उपयोग नाही तर प्रयत्नांनी असा पर्याय निर्माण केला पाहीजे. अर्थात हे सर्व करताना इतर काही गोष्टींवर परिणाम होउ शकतो म्हणजे पैसे कमी मिळणे, कुटुंबात अडचणी वगैरे होतीलही कदाचीत पण याची तयारी असेल तर आज काम करताना आनंद मिळेल. अर्थात छोट्या छोट्या गोष्टी /कामां बाबत ती थांबवली तर काय आणिबाणीची परिस्थिती निर्माण होणार नसते, तेंव्हा या तत्वाप्रमाणे त्या कामातील आनंद मिळवणे तुलनेने सोपे असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Mon, 04/18/2016 - 17:12

Permalink

लेखातील विचार चांगले आहेत, फक्त थोडा क्लिष्ट आहे

'If you love what you do, you won't have to work for a day in your life.' तुम्ही जे काम करता त्यात तुम्हाला आनंद असेल, तर तुम्ही त्या कामाकडे कम्पलशन म्हणून नाही तर आनंदाचे साधन म्हणून पाहू शकता आणि ते मनापासून एन्जॉय करत पूर्ण करू शकता. अर्थात बरेचदा असं असू शकतं की तुम्ही जिथे काम करता, तेथील तुमचे काम ही तुम्हाला आनंद देणारी एकमेव गोष्ट असते, बाकी सगळा उजेड असतो. अशावेळेस परिस्थिती कॉम्प्लीकेटेड होऊ शकते आणि तुम्ही त्या कामाविषयी, ऑफिसविषयी आणि इन जनरलही डीमॉरलाईझ होऊ शकता. कामातील समाधान, आनंद आणि इतर बाह्य गोष्टीही जेव्हा एखाद्याला सर्वार्थाने अनुरूप अशा मिळतील तेव्हा तो माणूस खर्‍या अर्थाने सुदैवी म्हणावा लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Mon, 04/18/2016 - 23:18

In reply to लेखातील विचार चांगले आहेत, फक्त थोडा क्लिष्ट आहे by नीलमोहर

Permalink

लेखातला मूळ मुद्दा हुकल्यानं क्लिष्टता वाटते आहे

कामातील समाधान, आनंद आणि इतर बाह्य गोष्टीही जेव्हा एखाद्याला सर्वार्थाने अनुरूप अशा मिळतील तेव्हा तो माणूस खर्‍या अर्थाने सुदैवी म्हणावा लागेल. ही ड्रीम सिच्युएशन आहे आणि खरं तर समोर आहे ते काम नाकारण्यासाठी मनानं केलेली ती चलाखी आहे. लेखाचा आशय या प्रतिसादात पुन्हा विस्तारनं उधृत केला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Tue, 04/19/2016 - 11:47

In reply to लेखातला मूळ मुद्दा हुकल्यानं क्लिष्टता वाटते आहे by विवेक ठाकूर

Permalink

इथे प्रश्न कामाचा नाहीये,

काम नाकारायचे नाहीच आहे, उलट एखाद्या कंपनीत वाईट बॉस, ढिसाळ कारभार, नकोसे सहकारी इ.गोष्टींकडे दुर्लक्ष करून टिकून राहण्यामागे काम हा एकमेव प्लस पॉइंट आहे, असेही होऊ शकते. तुम्ही लेखात म्हणताय ती 'ऑप्शन नॉट टू वर्क' ही खरे तर ड्रीम सिच्युएशन आहे जी आयडियल आहे परंतु प्रत्येकास अवलंबिणे शक्य होईलच असे नाही. मग त्यात पुढचे प्लॅनिंग, स्वतः+फॅमिलीसाठी आर्थिक स्थैर्य कायम राहिल याची सोय करून ठेवणे इ. अनेक प्रश्न येतील.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Tue, 04/19/2016 - 15:19

In reply to इथे प्रश्न कामाचा नाहीये, by नीलमोहर

Permalink

मुद्दा नीट लक्षात आला तर तुम्हाला नक्की मजा येईल

तुम्ही लेखात म्हणताय ती 'ऑप्शन नॉट टू वर्क' ही खरे तर ड्रीम सिच्युएशन आहे हा प्रतिसाद पाहा काम नाकारायचे नाहीच आहे, उलट एखाद्या कंपनीत वाईट बॉस, ढिसाळ कारभार, नकोसे सहकारी इ.गोष्टींकडे दुर्लक्ष करून टिकून राहण्यामागे काम हा एकमेव प्लस पॉइंट आहे, असेही होऊ शकते. काम टिकवण्याचा प्रश्न नाही, `ऑप्शन नॉट टू वर्क' जीवनात आणण्याचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Mon, 04/18/2016 - 17:26

Permalink

एकुणात काय ,

एकुणात काय , काम नसलं कि असलं काही सुचायला लागतं , आनंद है , आनंद हि आनंद है
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Mon, 04/18/2016 - 18:13

In reply to एकुणात काय , by अद्द्या

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Mon, 04/18/2016 - 21:22

Permalink

लेख आवडला

लेख आवडला. गेली अनेक वर्षे काहीही न करण्याचा पर्याय उपलब्ध असूनही मी नाना उद्योग करत आलेलो आहे, त्यामुळे लेख भावला. अर्थात अश्या प्रकारे काम करण्यात नेहमीच निखळ आनंद असत नाही. मनासारखे काम न जमणे, करताना काहीही सुचेनासे होणे यातून तात्कालीन अस्वस्थता उद्भवते, परंतु सरतेशेवटी सर्व सुरळीत झाले, की मग मात्र त्या अडचणीही आवश्यकच होत्या, याची प्रचिती येते, कारण अश्या अडचणीतूनच नवीन दिशा सापडत असते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 04/19/2016 - 11:26

In reply to लेख आवडला by चित्रगुप्त

Permalink

कर्मयोग वगैरे काही कळत नाही.

कर्मयोग वगैरे काही कळत नाही. परंतु मी जेंव्हा कॉर्पोरेट रुग्णालयातील मोठी नोकरी सोडून माझा स्वतःचा व्यवसाय सुरु केला त्याला एक वर्ष झाल्यावर मितरणे विचारले कि त्यात आणि यात फरक काय? त्यावर मी त्याला म्हणालो कि काम मी तेच करतो आहे पण आता मला MONDAY MORNING BLUE नाहीये. किंवा रविवारी संध्याकाळी येणारी उदासीनता अजिबात नाही. कुणीही माझ्या डोक्यावर बसलेला नाही कि एवढे काम केलेच पाहिजे. जेवढे रुग्ण येतील तितके चांगले तेवढे पैसे मिळतात. आणी नसले तर शेजारीच बायकोचा दवाखाना आहे तेथे तिच्याबरोबर गप्पा मारा कॉफी प्या किंवा स्वतःच्या दवाखान्यात बसून मिपावर प्रतिसाद लिहा. जे मी आताही करतो आहे. शिवाय कॉम्पुटर माझाच,विजेचे आणी जालाचे बिल मीच भरतो त्यामुळे कार्यालयीन काळात जालावर आलो हि टोचणी( जी काही जणांना आहे) तीही नाही. शिवाय अमुक वयाला निवृत्त असेही नाही. जोवर हातपाय चालत आहेत तोवर काम करता येईल. नको तेंव्हा बंद हि करता येईल. याला दि ऑप्शन नॉट टू वर्क म्हणता येईल का?
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Tue, 04/19/2016 - 12:28

In reply to कर्मयोग वगैरे काही कळत नाही. by सुबोध खरे

Permalink

एक्झॅक्टली !

त्यावर मी त्याला म्हणालो कि काम मी तेच करतो आहे पण आता मला MONDAY MORNING BLUE नाहीये. किंवा रविवारी संध्याकाळी येणारी उदासीनता अजिबात नाही. करेक्ट ! हाच ऑप्शन कोणत्याही कामात आणता येतो. मग ती नोकरी असो की स्वतःचा व्यावसाय. कारण स्वतःचा व्यावसाय सुद्धा बहुतेक सर्वजण बळजबरी म्हणून करतांना दिसतात. थोडक्यात, आधी एक बॉस होता, आता क्लायंटच्या रुपात अनेक बॉस निर्माण होतात. मग ऑप्शन नॉट टू वर्क हरवून जातो. काम आणि पैसा प्राथमिक होऊन आपण दुय्यम होतो. कुणीही माझ्या डोक्यावर बसलेला नाही कि एवढे काम केलेच पाहिजे. जेवढे रुग्ण येतील तितके चांगले तेवढे पैसे मिळतात. आणी नसले तर शेजारीच बायकोचा दवाखाना आहे तेथे तिच्याबरोबर गप्पा मारा कॉफी प्या किंवा स्वतःच्या दवाखान्यात बसून मिपावर प्रतिसाद लिहा. जे मी आताही करतो आहे. हेच मी लेखात सांगतोयं ! शिवाय अमुक वयाला निवृत्त असेही नाही. जोवर हातपाय चालत आहेत तोवर काम करता येईल. नको तेंव्हा बंद हि करता येईल. परफेक्ट ! काम बंद करण्याचा प्रश्नच नाही. कारण जोपर्यंत होईल तोपर्यंत आपण काम करुच, पण त्याचं कोणतंही दडपण नाही. याला दि ऑप्शन नॉट टू वर्क म्हणता येईल का? मी लेख अनुभवातून शब्दबद्ध केलायं. तुम्ही अनुभव प्रतिसादातून शब्दबद्ध केलायं.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Tue, 04/19/2016 - 13:32

In reply to एक्झॅक्टली ! by विवेक ठाकूर

Permalink

कारण स्वतःचा व्यावसाय सुद्धा

कारण स्वतःचा व्यावसाय सुद्धा बहुतेक सर्वजण बळजबरी म्हणून करतांना दिसतात. थोडक्यात, आधी एक बॉस होता, आता क्लायंटच्या रुपात अनेक बॉस निर्माण होतात. मग ऑप्शन नॉट टू वर्क हरवून जातो. काम आणि पैसा प्राथमिक होऊन आपण दुय्यम होतो. साहेब. हे जनरलायझेशन सोडून द्या. बहुतेक सर्व जण म्हणजे किती टक्के ? याचा काही विदा आहे का ? इतर लोक बळजबरीने काम करतात, इतरांना रविवारी संध्याकाळी उदासीनता येते हे तुम्ही कसे ठरवले ? संपूर्ण लिखाणात आणि प्रतिसादांमधे पब्लिक अमुक ढमुक आहे, ते यंव पद्धतीने काम करतात, त्यांना कामातून आनंद मिळत नाही असा तुच्छतावादी सूर आहे. लखू रिसबूड सारखा. मी लेख अनुभवातून शब्दबद्ध केलायं. दारु पिउन शब्दबद्ध केल्यासारखा वाटत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Tue, 04/19/2016 - 14:47

In reply to कारण स्वतःचा व्यावसाय सुद्धा by अप्पा जोगळेकर

Permalink

व्यक्तिगत प्रतिसाद देऊ नये

असं नीलकांतनी सांगितलंय !
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Mon, 04/18/2016 - 21:22

Permalink

कारण एकतर काम आवडत नसलं तरी

कारण एकतर काम आवडत नसलं तरी पगाराच्या आशेनं, वेतन आयोगाकडे नजर लावून , प्रमोशनची स्वप्न पाहात ; वेतन आयोग म्हणजे काय, माझ्या चार ओळी चातक को मेघों की आस बाबू को पे कमीशन की बाट गरजा मेघ न बरसा पानी आई रिपोर्ट न मिली चवन्नी तरीही निष्काम भावनेने काम करतोच बाबू
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 04/19/2016 - 11:30

Permalink

लेख झेपला नाही. पुर्वी

लेख झेपला नाही. पुर्वी संक्षींचे लेख झेपायचे नाहित आता विठांचे झेपत नाहित. वैचारिक बैठक वाढवायची गरज आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 04/19/2016 - 11:34

In reply to लेख झेपला नाही. पुर्वी by मृत्युन्जय

Permalink

असे आडवे करणारे लेख असल्यावर

असे आडवे करणारे लेख असल्यावर बैठक कशी काय जमणार बुवा ;) =))
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 04/19/2016 - 11:58

In reply to असे आडवे करणारे लेख असल्यावर by तर्राट जोकर

Permalink

:-))) तजो, भारी सिक्सर !

:-))) तजो, भारी सिक्सर !
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 04/19/2016 - 12:18

In reply to असे आडवे करणारे लेख असल्यावर by तर्राट जोकर

Permalink

हाहाहा, खरे आह्हे

हाहाहा, खरे आह्हे
  • Log in or register to post comments

Submitted by देशपांडे विनायक on Tue, 04/19/2016 - 12:41

Permalink

फक्त इतकेच असते तर ----गोंधळ

फक्त इतकेच असते तर ----गोंधळ /समजणे वाढेल का कमी होईल !! कामाच्या बाबतीत एक सार्वत्रिक गैरसमज असाये की मनाजोगतं काम नाही त्यामुळे मजा येत नाही . या गैरसमजामुळे फार मोठा अनर्थ ओढवला आहे. पण काम तर सर्वस्वी न्यूट्रल आहे. ते पूर्णपणे व्यक्ती निरपेक्ष आहे. त्यामुळे कामाच्याबाबतीत, ते करणार्‍याचा दृष्टीकोनच कायम निर्णायक आहे . थोडक्यात , एकदा का मनानं ठरवलंकी आपण करत असलेल्या कामात काही मजा नाही की जीवनाचा बाजा वाजलाच म्हणून समजा . मग त्या कामात व्यतीत केलेला वेळ आणि त्यातून मिळणारा पैसा, फारसा आनंद देऊ शकत नाहीत . बर्‍याच सायकॅट्रीस्टसनी यावर `गेटींग अॅडजेस्टेड टू द सिच्युएशन '( किंवा वेल अॅडजस्टेड पर्सनॅलिटी ) हा एकमेव नामी पर्याय शोधला आहे . थोडक्यात , ` आहे त्याच्याशी विनातक्रार जुळवून घ्या , सुखी व्हाल', असा मनाला गप्प करण्याचा उपाय सुचवला आहे लोक मग ` रिटायरमंट नंतर मजा करू ' अशी मनाची समजूत काढून, स्वतःला नेटानं कामाला जुंपून घेतात . सुट्टीच्या दिवशी जमेल आणि झेपेल तेवढी मजा करतात . सोमवारची नकोनकोशी आठवण मनाला पुढची काही तरी स्वप्न दाखवत सुसह्य करतात. या विचारसरणीमुळे कामाला गौरव प्राप्त होणं तर दूरच, पैशाला अवाजवी महत्व मिळालंय. तर काय असेल कामाच्या आनंदाचं रहस्य ? मुळात कार्य हा अस्तित्वाचा छंद आहे , कंपलशन नाही. ज्या वेळी काम कंपलशन म्हणून केलं जातं त्यावेळी आपण अस्तित्वापासून वेगळे झाल्यासारखे वाटतो. आपली समग्रता हरवते. आपली सृजनात्मकता लयाला जाते. केवळ फलप्राप्तीच्या आशेनं आपण कामाचं ओझं वाहातो आणि त्यातून कालनिर्मिती होते. हा काल दुहेरी असतो, एकीकडे तो कालावधी संपण्याची इच्छा निर्माण करतो आणि दुसरीकडे काम वेळेत संपवण्याचं टेंशन तयार करतो . कार्य म्हणजे छंद समजणारी चित्तदशा असलेल्या काम करणार्‍या व्यक्तीला एका क्षणी अचानक उलगडा होतो की काम केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर चालू आहे, आपल्याला त्याची फक्त जाणीव होतेयं.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Tue, 04/19/2016 - 12:52

In reply to फक्त इतकेच असते तर ----गोंधळ by देशपांडे विनायक

Permalink

फक्त इतकेच म्हणत तुम्ही जवळजवळ निम्मा लेख छापलायं !

मग एकूण लेख पुन्हा शांतपणे वाचला तर समजणार नाही का? कारण सर्व अनुषंगिक विचारांची लेखात एक सुसंगत आणि सविस्तर मांडणी केली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Tue, 04/19/2016 - 21:07

Permalink

चांगला विचार.

तुम्ही म्हणता आहात त्यात तथ्य आहे. अगदीच पैशाची निकड नसली तर असा प्रयोग करून बघायला हरकत नाही म्हणा. काही अनुभवांनी आलेलं शहाणपणः - जे [काही] काम आपण पोटापाण्यासाठी करतोय ते आवडो वा न आवडो, ते सोडून दुसरं काही करायला खरोखर कधी कुणी आपल्याला रोखू शकतं, स्वतःशिवाय? नाही. मग असा पर्याय असतांना आपण हेच काम जर करत असू तर आपल्याला काही तक्रार करायची जागा उरते? नाही. नवरा-बायकोच्या भांडणांसारखा हा प्रकार आहे. गुंता जास्त सोडवण्याचा प्रयत्न करत बसण्यात अर्थ नसतो, तो अधिक गुंतत जातो. पुरेसा वेळ दिला की बर्‍याचवेळा मुळात गुंता नव्हताच असं समजून येतं. याला मी अ‍ॅडजस्टमेंट म्हणत नाही. न मजबूरी. कारण त्यातून आपल्याला शेवटी दृष्यरूपानं काही न काही फायदा होतोच. हा सरळ सरळ देवाण-घेवाणीचा मामला आहे. - जे काही काम आपल्याला मनापासून आवडतं, आनंद देतं, ते करायला खरोखर कधी कुणी आपल्याला रोखू शकतं, स्वतःशिवाय? नाही. मग त्यासाठी जर आपण पुरेसा वेळ काढू शकत नसू तर तो मूळ अडचणीचा मुद्दा झाला, पोटापाण्याचा उद्योग हा मूळ अडचणीचा मुद्दा नाही. तेवढं सोडवलं की काम फत्ते. - अडचणींवर विचार करत बसलो तर फक्त अडचणीच दिसत राहतात. त्यांना सोडवण्याच्या पर्यायांवर विचार केला तर जगणं बरंच सुखकर होत जातं. - जसं केवळ एकाच गोष्टीनं दु:ख होत नाही, अनेक गोष्टींनी होऊ शकतं.. तसंच सुखाचंही आहे. मुळात आपण नक्की काय शोधतोय ते महत्त्वाचं - सुख, प्रेम की आनंद. एकात दुसरं गुंतलंय असं वाटेल वरवर.. पण थोडा विचार केला तर गहन होत जातं. असो. बरंच पाल्हाळ लागलं. राघव
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Tue, 04/19/2016 - 22:38

In reply to चांगला विचार. by राघव

Permalink

धन्यवाद !

प्रश्न वरकरणी पैशाशी निगडीत वाटला तरी तो तसा नाही कारण नक्की किती पैसा पुरेसा आहे हे ठरवणं मुश्कील आहे . तस्मात , आहे त्या कामात आणि सांप्रत आर्थिक स्थितीत कुणीही जर सांगितलेला विकल्प उपलब्ध करू शकला तर त्याला कामाची मजा हमखास येईल हे नक्की !
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Wed, 04/20/2016 - 02:00

In reply to धन्यवाद ! by विवेक ठाकूर

Permalink

प्रश्न पैशाशी निगडीत आहे असं

प्रश्न पैशाशी निगडीत आहे असं मी म्हणत नाहीये. एखाद्याची प्रासंगिक प्राथमिकता आनंद नसून पैसा असेल तर त्या व्यक्तीसाठी हा विचार तात्पुरता बाजूला ठेवल्याबद्दल मी म्हणत होतो. आधी पोटोबा मग विठोबा.. तसं.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 04/19/2016 - 23:27

Permalink

लोकांना खरंच मुद्दा कळलेला

लोकांना खरंच मुद्दा कळलेला नाही. घोर निराशा. सोपंय हो. संभाजी विडीला क्युबन सिगार समजून प्यायचंय. ;-) फुंकणे शाश्वत. धूराचा अवकाश. फिर विडी क्या सिगार क्या. लोकांना वाटतंय ते विडीच पिऊ नये असं म्हणतायत.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 04/20/2016 - 10:18

In reply to लोकांना खरंच मुद्दा कळलेला by तर्राट जोकर

Permalink

ये लगा और एक सिक्सर ...... ..

ये लगा और एक सिक्सर ...... .... .... तजो क ! तजो, लैच फॉरमात हायसा ! :-)))))
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 04/20/2016 - 10:37

In reply to लोकांना खरंच मुद्दा कळलेला by तर्राट जोकर

Permalink

@संभाजी विडीला क्युबन सिगार

@
संभाजी विडीला क्युबन सिगार समजून प्यायचंय. ;-) फुंकणे शाश्वत. धूराचा अवकाश. फिर विडी क्या सिगार क्या.
>> Image removed. बाजार उठला! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 04/20/2016 - 12:07

In reply to @संभाजी विडीला क्युबन सिगार by अत्रुप्त आत्मा

Permalink

=))))

=))))
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Wed, 04/20/2016 - 12:21

In reply to लोकांना खरंच मुद्दा कळलेला by तर्राट जोकर

Permalink

तजो, नांवाप्रमाणेच विदुषकी म्हणून प्रतिसाद ठीक आहे

पण तो पहिल्या प्रतिसादातल्या, तुमच्या स्वतःच्याच अनुभवाशी विसंगत आहे. कालच एक २०-२२ वर्षांचा उमदा तरुण भेटला. आपली ओळख देतांना बोलला मी ड्रायवर आहे आणि मला माझ्या कामाची कसलीही लाज वाटत नाही. त्याच्या बॉसनेही अपरोक्ष त्याचे अनेक गुण सांगितले, उदा. सीटबेल्ट लावणे, गाडी सोडून कुठेही न जाणे, थोडक्यात इतर ड्रायवर जे अवगुण करतात त्यापेक्षा वेगळा आहे म्हणून. त्याचे काम हेच त्याची मजा आहे आणी ते तो पुरेपुर उपभोगतो. हे इतकं सही लिहीलंय की मुद्दा तुम्हाला नक्कीच कळला आहे. पण तो आयुष्यात उतरवता येत नाही या उद्विग्नतेतून, आता चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न होतोयं.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 04/20/2016 - 12:33

In reply to तजो, नांवाप्रमाणेच विदुषकी म्हणून प्रतिसाद ठीक आहे by विवेक ठाकूर

Permalink

ओ सर, तुमचा मुद्दा मला

ओ सर, तुमचा मुद्दा मला पुरेपुर कळलाय हो, ते माझ्या पहिल्याच प्रतिसादात टंकलंय. हा प्रतिसाद फक्त ज्यांना अजुनही समजलं नाय त्यांच्यासाठी विनोदनिर्मितीचा प्रयत्न होता. चर्चा भरकटवण्यात माझा नक्कीच सहभाग नाही. टेक इट लाइटली. प्लीज.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Wed, 04/20/2016 - 14:01

In reply to ओ सर, तुमचा मुद्दा मला by तर्राट जोकर

Permalink

ओके !

तुमचा मुद्दा मला पुरेपुर कळलाय हो. ते माझ्या पहिल्याच प्रतिसादात टंकलंय. म्हणून तर माझा गैरसमज झाला. हा प्रतिसाद फक्त ज्यांना अजुनही समजलं नाय त्यांच्यासाठी विनोदनिर्मितीचा प्रयत्न होता. पण अशा `न समजलेल्यांना' बाजार ऊठला वगैरे भ्रम व्हायला लागले ना! चर्चा भरकटवण्यात माझा नक्कीच सहभाग नाही. टेक इट लाइटली. प्लीज. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 04/20/2016 - 16:52

In reply to ओके ! by विवेक ठाकूर

Permalink

काही जणांना लोक आपल्याला

काही जणांना लोक आपल्याला 'सिरियसली-घेतात!' ,असा भ्रम का होतो कोण जाणे!?
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 04/20/2016 - 10:01

Permalink

मा ते सङ्गोस्त्वकर्मणि|

मा ते सङ्गोस्त्वकर्मणि| काम न करायचा ऑप्शन आहे. फक्त तो आवडून घेउ नकोस असं भगवंत सांगत असावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Wed, 04/20/2016 - 10:40

In reply to मा ते सङ्गोस्त्वकर्मणि| by असंका

Permalink

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि |

काम न करायचा ऑप्शन आहे. फक्त तो आवडून घेउ नकोस असं भगवंत सांगत असावेत. काम न करण्याच्या विकल्पाबद्दल श्लोकात काहीएक म्हटलेलं नाही. तस्मात, काम न करण्याचा ऑप्शन आहे असं म्हणता येत नाही. कृष्ण कर्म पराङमुखतेबद्दल सांगतोयं. थोडक्यात, कर्मनिवृत्तीची आसक्ती नको असं श्लोकात म्हटलंय. आणि ते उघड आहे. एकतर कर्म न करण्याची वृत्ती व्यक्तीला आळशी बनवते आणि दुसरी गोष्ट तितकीच ऑबवियस आहे, काम केलंच नाही तर कामाची मजा कशी येणार ?
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 04/20/2016 - 10:48

In reply to मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि | by विवेक ठाकूर

Permalink

एखाद्या गोष्टीबद्दल आवड नावड

एखाद्या गोष्टीबद्दल आवड नावड असण्यासाठी मुळात तिचं अस्तित्व मान्य करावं लागतं. काम न करणं ही शक्यता (ऑप्शन) असल्याशिवाय ती गोष्ट आवडून घेउ नकोस असं म्हणताच येणार नाही. मा- नको ते- तुझी सङ्गो: - प्रिती (मा)अस्तु- - (न) होवो अकर्मणि- कर्म न करण्यात
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Wed, 04/20/2016 - 12:03

In reply to एखाद्या गोष्टीबद्दल आवड नावड by असंका

Permalink

त्या श्लोकाचा सगळा फोकस कामावर आहे

आणि कृष्ण फलाकांक्षा, फलाकांक्षेच्या हेतूनं प्रेरित कर्म किंवा कर्म पराङमुखता नको असं सांगतोयं. अगदी साधा सरळ अर्थ आहे : Your right is to work only, But never to its fruits; Let not the fruits of action be thy motive, Nor let thy attachment be to inaction. काम सुरु करण्यापूर्वी ते न करण्याचा विकल्प असणं याबद्दल तो बोलत नाही. शिवाय तुम्ही प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, कामाच्या आवडी-निवडीबद्दलचा श्लोकात काहीच उल्लेख नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 04/20/2016 - 13:02

In reply to त्या श्लोकाचा सगळा फोकस कामावर आहे by विवेक ठाकूर

Permalink

सर,

सर,
फलाकांक्षेच्या हेतूनं कर्म पराङमुखता नको असं सांगतोयं
फलाकांक्षेच्या हेतूने कर्म पराङ्गमुखता!! ही कल्पना मुळ श्लोकात मला दिसत नाही. माझ्या दृष्टीने श्लोकाच्या दुसर्‍या ओळीत येणारी दोन्ही वाक्य वेगवेगळी आहेत. फलाकांक्षा नको हे वेगळं वाक्य आहे, आणि अकर्मणि बद्दल आवड बाळगू नकोस हे वेगळं वाक्य आहे. काम न करण्यात फलाकांक्षा असेल, तर तेव्हा काम न करणे म्हणजेच काम करणे होइल. मुद्दाम वेगळं सांगितलंय कारण, कामावर अधिकार आहे, फळावर नाही तर काम करूच कशाला असं वाटू नये म्हणून.
काम सुरु करण्यापूर्वी ते न करण्याचा विकल्प असणं याबद्दल तो बोलत नाही
"काम सुरु करण्यापूर्वी" हे शब्द आपण काही विशेष अर्थाने वापरत आहात असं वाटतंय. कारण असे शब्द श्लोकात नाहीतच. त्यामुळे ही चर्चा कुठे चालली आहे हे मला कळत नाहि आहे.
शिवाय तुम्ही प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, कामाच्या आवडी-निवडीबद्दलचा श्लोकात काहीच उल्लेख नाही.
हे वाक्य थोडें गुंतागुंतीचं झालंय...आपल्याला असं म्हणायचंय का मी प्रतिसादात कामाच्या आवडी निवडीबद्दल जे बोललो ते श्लोकात नाहीये? कारण मुळात श्लोकात काय किंवा भाषांतर करताना मी काय कामाच्या आवडी निवडीबद्दल काहीच बोललेलो नाही. काम न करण्याच्या शक्यतेच्या आवडून न घेण्याबद्दल श्लोकात मुळातच उल्लेख आहेत, एवढेच मी म्हणलो.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Wed, 04/20/2016 - 13:50

In reply to सर, by असंका

Permalink

@ असंका

काम न करण्याच्या शक्यतेच्या आवडून न घेण्याबद्दल श्लोकात मुळातच उल्लेख आहेत, एवढेच मी म्हणलो. `काम न करण्याची शक्यता आवडून न घेणं' असा श्लोकाचा कोणत्याही प्रकारे अर्थ होत नाही. श्लोकाचा अर्थ अकर्माप्रती प्रिती, थोडक्यात `काम न करण्यात रस घेऊ नकोस' असा अर्थ आहे. मा- नको ते- तुझी सङ्गो: - प्रिती (मा)अस्तु- - (न) होवो अकर्मणि- कर्म न करण्यात. सरळ अर्थ : तुझी प्रिती कर्म न करण्यात (न) होवो. अकर्मण्यता किंवा कामचुकारपणा आणि ऑप्शन नॉट टू वर्क यात तुमची गल्लत होतेयं. काम न करण्याप्रती प्रिती आणि स्वतःच्या मर्जीनुसार काम करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 04/20/2016 - 13:58

In reply to @ असंका by विवेक ठाकूर

Permalink

क्लोज लूप...

क्लोज लूप... माझा दुसराच प्रतिसाद याचं उत्तर असेल. शब्द थोडे इकडे तिकडे झाले असतील, अभिप्रेत अर्थ बदलत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Wed, 04/20/2016 - 14:11

In reply to क्लोज लूप... by असंका

Permalink

येस ! फरक फार नाजूक आहे

काम न करण्याप्रती प्रिती आणि स्वतःच्या मर्जीनुसार काम करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. कृष्णाला पहिला अर्थ अभिप्रेत आहे आणि मला दुसरा. त्याचा फोकस अर्जुनाला युद्धप्रवण करण्यावर आहे, माझा कामातून आनंद मिळवण्यावर. हे अँगल्स लक्षात घेतले तर `कर्मण्येवाधीकारस्ते मां फलेषु कदाचन्‌' आणि दि ऑप्शन नॉट टू वर्क यातला फरक स्पष्ट होईल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com