✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ४

ज
जेपी यांनी
Tue, 03/15/2016 - 10:23  ·  लेख
लेख
http://www.misalpav.com/node/32572 भाग २ http://www.misalpav.com/node/34076 भाग ३ **************************************************** मागील भागात १०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यामुळे हा नवा धागा काढत आहे. **************************************************** प्रश्न - आपल्याकडे जलव्यवस्थापना बद्दल शिक्षण / प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम उपल्ब्ध आहेत आहेत का ? असे अभ्यासक्रम कुठल्या संस्थेत उपल्ब्ध आहेत त्याची थोडक्यात महिती मिळेल का ? (उदा.संस्थेचे नाव,ठिकाण्,अभ्यासक्रम) ======================================================================= प्रतिसादासाठी धन्यवाद.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
40895 वाचन

💬 प्रतिसाद (206)

प्रतिक्रिया

.

आबा
Tue, 04/12/2016 - 23:17 नवीन
शंकराचार्य पदासाठीच्या पात्रतेचे निकष काय आहेत ?
  • Log in or register to post comments

अगोदरचा आचार्य दुसरा नेमून

कंजूस
Wed, 04/13/2016 - 07:32 नवीन
अगोदरचा आचार्य दुसरा नेमून निवृत्त होतो.निवडणूक नसते.
  • Log in or register to post comments

किंचीत दुरुस्ती

नाखु
Wed, 04/13/2016 - 08:41 नवीन
खेळकर प्रतिसाद : अगोदरचा आचरट दुसरा नेमून प्रवृत्त होतो.अडवणूक असते का नाही ते माहीत नाही शात्रात बघावे लागेल पण शास्त्रच माहीत नाही. करमणूकी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

बुवा सांगू शकतील.

प्रचेतस
Wed, 04/13/2016 - 08:44 नवीन
बुवा सांगू शकतील. ते धर्मसुधारक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

ती एक खासगी संस्था आहे आणि

कंजूस
Fri, 04/15/2016 - 05:57 नवीन
ती एक खासगी संस्था आहे आणि त्यांचे निर्णय नाही पाळले म्हणून काही अडणार नाही समाजाचे.समाजही त्यांच्या आत्रगत व्यवहारात लक्ष घालू शकत नाही.आद्य शंकराचार्यांनी आठव्या शतकात ही चळवळ सुरू केली आणि बुद्ध धर्माची उसळती लाट थोपवली.भारतातले सर्वच जण एकाच धर्मात येतील हे मानणे अतिशयोक्ती आहे.त्यांच्या मठाधिपतीलाही परंपरा,वेद वगैरे,अद्वैत मानावेच लागेल जरी आता काही पीठाधिपती वेगळी वैयक्तिक मते मांडताना दिसतात.हिंदूधर्म फारच लवचिक आहे तसा कर्मठही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्यवाद

आबा
Wed, 04/13/2016 - 09:26 नवीन
आणि आधीचा आचार्य, पुढच्याची निवड कोणामधून करतो?! काहीतरी निकष असतीलच ना??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ती एक पूर्ण स्वतंत्र व्यवस्था

तर्राट जोकर
Wed, 04/13/2016 - 09:53 नवीन
ती एक पूर्ण स्वतंत्र व्यवस्था आहे. महंत, महामंडलेश्वर, आणि काय काय उपाध्या विकत मिळतात. त्यांची स्वतःची राजकारणं असतात. खेचाखेची असते. आखाडा संस्कृतीबद्दल शोध घेतला तर शंकाराचार्य कुठून येतात हे कळेल. आता वेळ नाही म्ह्णून टंकत नाही. शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा संबंध नाही हे हिंदूंना कळेल तो सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा

शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा संबंध नाही हे हिंदूंना कळेल तो सुदि

तुषार काळभोर
Wed, 04/13/2016 - 16:17 नवीन
+१ सहमत! 'इतरां'कडे पाहून 'आपल्यालाही' कोणीतरी सर्वोच्च 'अधिकारी पुरुष*' असावा या 'हव्यासा'तून हे घडवले गेले असावे. *: इतर धर्मात जर स्त्रिया सर्वोच्च धर्मगुरू पदावर असत्या, तर कदाचित हिंदूंनीही एखादी स्त्री शंकराचार्यपदी स्वीकारली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

फक्त बाटलीबंद पाणी (मिनरल

जेपी
गुरुवार, 04/14/2016 - 10:08 नवीन
फक्त बाटलीबंद पाणी (मिनरल वॉटर ) जर पिण्यासाठी रोज वापरावे लागत असेल्,तर ते आरोग्यासाठी कसे असते.? चांगले..वाईट की काहि फरक नाही..
  • Log in or register to post comments

माझ्या मते काही विशेष फरक पडत

उगा काहितरीच
गुरुवार, 04/14/2016 - 10:45 नवीन
माझ्या मते काही विशेष फरक पडत नसावा, पण एकदा शुद्ध पाण्याची सवय लागली तर चुकून/नाइलाजने अशुद्ध पाणी पिण्यात आले तर जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असावी. अर्थात हा माझा समज जाणकारांच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

पण एकदा शुद्ध पाण्याची सवय

मार्मिक गोडसे
गुरुवार, 04/14/2016 - 11:10 नवीन
पण एकदा शुद्ध पाण्याची सवय लागली तर चुकून/नाइलाजने अशुद्ध पाणी पिण्यात आले तर जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असावी
जंतुसंसर्गाला निदान उपाय तरी आहे, परंतू पाण्यात विरघळलेल्या विषारी घटकांमूळे किड्नीसारखे अवयव कायमचे निकामी होऊ शकतात. बाटलीबंद पाण्याचा TDS १५० पेक्षा कमी नसावा व ३०० पेक्ष अधिक नसावा.
  • Log in or register to post comments

बरोबर.

तर्राट जोकर
गुरुवार, 04/14/2016 - 12:12 नवीन
बरोबर. सामान्यपणे विहिरी, नद्या, धरणे, कालवे इत्यादी नैसर्गिक स्रोतांमधून थेट कुठलेही शुद्धीकरण न करता येणार्‍या पाण्याचा टीडीएस सुमारे ६०० ते ९०० असतो. गेल्या अनेक दशकांपासून होत असलेल्या बेसुमार रासायनिक खतांच्या वापरामुळे हा टिडीएस वाढत जात आहे. असे पाणी पिणे पार्किन्सन्स सारख्या अनेक रोगांना आमंत्रण देणारे ठरत आहे. बिसलेरीच्या पाण्याचा टिडीएस ३० असतो तर घरातल्या आरओ चा १०० च्या आत. सतत फिरत्या नोकरीवर असणार्‍यांनी कमी टिडीएस असणारे पाणी प्यायले पाहिजे. शुद्धीकरण न केलेल्या पाण्याचे सतत सेवन टाळले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

बिसलेरीच्या पाण्याचा टिडीएस

मार्मिक गोडसे
गुरुवार, 04/14/2016 - 12:17 नवीन
बिसलेरीच्या पाण्याचा टिडीएस ३० असतो
The composition of Bisleri Water in milligrams per litre (mg/l): 80-150ppm TDS 6.5-7.5-ph factor 75ppm-Calcium 200ppm-Chlorides 30ppm-Magnesium
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

सर, बिसलेरीचा ३० हा टीडीएस

तर्राट जोकर
गुरुवार, 04/14/2016 - 12:28 नवीन
सर, बिसलेरीचा ३० हा टीडीएस स्वतः मोजलेला आहे टीडीएस मीटरने. अधिकृत माहिती वेगळी असु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

अधिकृत माहिती वेगळी असु शकते.

मार्मिक गोडसे
गुरुवार, 04/14/2016 - 12:42 नवीन
अधिकृत माहिती वेगळी असु शकते.
असू शकेल. टेक्निशनकडून खात्री करुन घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

20 पेक्षा कमी टीडीएस असलेले

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 04/14/2016 - 13:02 नवीन
20 पेक्षा कमी टीडीएस असलेले पाणी प्यायल्याने काय होऊ शकते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

२० पेक्षा कमी टिडीएस प्रकृतीस

संदीप डांगे
Tue, 05/03/2016 - 15:44 नवीन
२० पेक्षा कमी टिडीएस प्रकृतीस योग्य नाही. पिण्यायोग्य पाण्याचा टीडीएस हा ६० ते ३०० च्या रेंजमधे असावा. मुतखड्याचा त्रास टीडीएस जास्त असल्याने होतो हा गैरसमज आहे. तो काढून टाकावा. पिकांसाठी मात्र टीडीएस १०० च्या आसपास लागतो. पिकांचे पाणी आणि पिण्याचे पाणी वेगवेगळे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

'बळी' देणे हा शब्दप्रयोग कसा

मितभाषी
गुरुवार, 04/14/2016 - 12:07 नवीन
'बळी' देणे हा शब्दप्रयोग कसा रूढ झाला असावा.
  • Log in or register to post comments

I had home loan with HDFC for

NiluMP
गुरुवार, 04/14/2016 - 21:20 नवीन
I had home loan with HDFC for 18 year, with "HOME Suraksha Plus" Home loan protection policy. I have closed the said loan within 5 years. My questions are : 1. What will happen to that Policy? 2. Will I get any refund? Sorry for typing in English.
  • Log in or register to post comments

You can surrender the policy

रुस्तम
Fri, 04/15/2016 - 10:48 नवीन
You can surrender the policy and get remaining money back. Contact HDFC Ergo and surrender policy ASAP.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP

Thanks for your reply.

NiluMP
Fri, 04/15/2016 - 13:29 नवीन
Thanks for your reply.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम

तुम्हाला मिळालेले policy

palambar
Mon, 04/18/2016 - 00:11 नवीन
तुम्हाला मिळालेले policy document वाचुन बघा. त्यात अटि दिल्या असतिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP

जागेची वाटणी करताना

उगा काहितरीच
गुरुवार, 04/14/2016 - 22:37 नवीन
जागेची वाटणी करताना (वडिलोपार्जीत घर) काही भागाची किंमत इतर जागेच्या तुलनेत जास्त असेल (मेन रोड वगैरे कारणांमुळे )आणी एका भावाला जास्त किंमत असलेली जागा हवी असेल तर दुसऱ्या भावांना क्षेत्रफळाच्या दृष्टीने जास्त जागा घेण्याचा अधिकार आहे का ?
  • Log in or register to post comments

वडिलोपार्जित मालमत्ता हि सरस

mahayog
Fri, 04/22/2016 - 23:03 नवीन
वडिलोपार्जित मालमत्ता हि सरस निरस मानाने वाटणी केली जाते. म्हणजे, मालमत्तेचे मूल्य, स्वरूप इ. लक्षात घेऊन हिस्से वाटणी केली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

अँड्रॉईड ओ.एस. ऑटो अपडेट होत

नाव आडनाव
Sat, 04/16/2016 - 09:02 नवीन
अँड्रॉईड ओ.एस. ऑटो अपडेट होत नसेल तर दुसरा काही ऑप्शन आहे का अपडेट करण्यासाठी? माझा टॅब मायक्रोमॅक्स पी ६०० आहे. कंपनी ओ.एस. वर्जन आहे अँड्रॉईड ४.०.४. "सिस्टिम अपडेट" -> "रिमोट अपडेट" मधे गेलो तर "Your system is currently up to date" असा मेसेज येतोय. सेटिंग्स मधे रिमोट अ‍ॅड्रेस यू.आर.एल. देऊन अपडेट होइल का? तसं असेल तर यू.आर.एल. काय द्यायची?
  • Log in or register to post comments

महत्वाचे -

प्रसाद भागवत
Sun, 04/17/2016 - 19:53 नवीन
महत्वाचे - आजकाल पुणे शहराजवळ 5 लाखात घर..अशी मोठी जाहिरात केली जात आहे, मला या जाहिरातीतील घर घेण्यांत रस आहे. या आधीही 'भारतीय जनघर योजना' नावाने स्वस्त घर योजनेच्या जाहिराती पाहिल्या. जाहिरातीतील भाषा छायाचित्रे , रंगसंगती व योजनांची नावे ई. पहाता ह्या योजनांना सरकारी पाठबळ असावे असे वाटते.. वस्तुस्थिती काय आहे ?? कोणी जाणकार माहिती देवु शकेल काय??
  • Log in or register to post comments

जाहिरातीत दिलेल्या पत्ता

सस्नेह
Mon, 04/18/2016 - 12:13 नवीन
जाहिरातीत दिलेल्या पत्ता किंवा फोन नंबरवर चौकशी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत

प्रधान मंत्री आवास

भीमाईचा पिपळ्या.
Mon, 04/18/2016 - 21:32 नवीन
प्रधान मंत्री आवास योजना व ह्या स्किमचा काहीही संबंध नाही. सबब वेट अ‍ॅण्ड वाॅच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत

जाहिरातीतील भाषा छायाचित्रे ,

रॉजरमूर
Tue, 04/19/2016 - 22:30 नवीन
जाहिरातीतील भाषा छायाचित्रे , रंगसंगती व योजनांची नावे ई. पहाता ह्या योजनांना सरकारी पाठबळ असावे असे वाटते..
फुटलाय फुगा आता .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत

माझा ही एक प्रश्न...!

प्रसाद_१९८२
Sun, 04/17/2016 - 20:11 नवीन
दरवेळी कोकणात जाताना घाटात सुचना लिहिलेल्या असतात. त्यामध्ये प्रामुख्याने दिसणारी आणि लक्ष वेधून घेणारी सुचना म्हणजे

>>वेडी वाकडी वळणे वाहने हळू चालवा<<

ही असते. आता वळणे वाकडी असू शकतात पण वळणे "वेडी" असणे कसे शक्य आहे?
  • Log in or register to post comments

'वेडं' करणारी काही 'वळणे'

तर्राट जोकर
Sun, 04/17/2016 - 20:24 नवीन
'वेडं' करणारी काही 'वळणे' पाऊल 'वाकडं' पडण्यास कारणीभूत ठरतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

पहिला शब्द हा

नाखु
Mon, 04/18/2016 - 15:00 नवीन
रस्त्यातील अनोळखी परंतु लक्ष्यवेधी "वळणदार" प्रलोभनांकडे वेडी वाट करू नये म्हणून असेल. कोकणात भुते आहे असे म्हणतात. खखो भुते आणि कोकण जाणे (आणि आता मुवीही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

वेडी वाकडी वळणे

भीमाईचा पिपळ्या.
Wed, 04/20/2016 - 21:05 नवीन
वेडी वाकडी वळणे यावरून सकाळ मुपिची "घाटात फूटला घाम" नामक कथा आठवली. प्रतिक्रिया भन्नाट आहेत. फुल्टू टाइमपास. =)) मोबाईलवरून लिंक देता येत नाही. स्वारी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

वासाचे गुलाब

मराठी कथालेखक
Mon, 04/18/2016 - 11:32 नवीन
आजकाल गुलाबाची वासाची फुले मिळेनाशी झालीत. वासाची फुले कुठे मिळू शकतील (पिंपरी-चिंचवड /पुण्यात) वासाच्या गुलाबाचे रोप कुठे मिळू शकेल ?
  • Log in or register to post comments

देहूतून तळेगाव चाकण

चांदणे संदीप
Mon, 04/18/2016 - 11:55 नवीन
देहूतून तळेगाव चाकण रस्त्याकडे म्हणजेच भंडारा डोंगराकडे जाताना नदीपुलापासून अर्धा-एक किमीवर डाव्या बाजूला छानशी छोटीशी नर्सरी आहे. गुलाबाची रोपे'च' तिथे प्रामुख्याने मिळतात. तिथे हमखास वासाची फुलाबाची रोपे मिळतील. Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

धन्यवाद

मराठी कथालेखक
Mon, 04/18/2016 - 12:35 नवीन
नर्सरीच नाव सांगू शकाल काय ? जमल्यास google map वर location देवू शकता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

नाव लक्षात नाही....

चांदणे संदीप
Mon, 04/18/2016 - 13:14 नवीन
ही घ्या गुगल भाऊने दिलेली लिंक... https://www.google.co.in/maps/@18.7323466,73.7579163,143m/data=!3m1!1e3?hl=en इतक काय अवघड नाहीये खर... तुम्ही, सांगितलेल्या रस्त्यावरून सावकाश गेलात की डाव्या बाजूला दिसेलच. रस्त्याला लागूनच आहे. आणि बहुधा त्या रस्त्यावर तेवढी एकच आहे. Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

धन्यवाद

मराठी कथालेखक
Mon, 04/18/2016 - 15:42 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

माझ्याकडे सुगंधी, गुलाबी

कंजूस
Mon, 04/18/2016 - 15:02 नवीन
माझ्याकडे सुगंधी, गुलाबी रंगाच्या गुलााचा वेल होता आठ दहा वर्षांपुर्वी तो नंतर जगला नाही.त्याच्या पानांना हात लावला तरी सुगंध येत असे.नंतर त्याच नर्सरीत तो गुलाब मिळेना.
  • Log in or register to post comments

आता वासाचा गुलाब मिळणे का बंद

मराठी कथालेखक
Mon, 04/18/2016 - 15:42 नवीन
आता वासाचा गुलाब मिळणे का बंद झाले असावे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अजूनही मिळतो

सुनील
Mon, 04/18/2016 - 15:53 नवीन
बंद बिंद नाही झाला हो. माझ्याकडे आहे. कल्याणच्या पाठारे नर्सरीतून आणला होता गेल्या वर्षी. २०-२५ फुले दिली आत्तापर्यंत. गेल्या दोन महिन्यांपासून मात्र फूल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

१००% बंद नसेलहि पण रस्त्यावर

मराठी कथालेखक
Mon, 04/18/2016 - 16:07 नवीन
१००% बंद नसेलहि पण रस्त्यावर जे फुलविक्रेते असतात त्यांच्याकडे वासाचे गुलाब अजिबात मिळत नाहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

साबुदाणा खिचडी रामबाण पाककृती हवीये

गोंडस बाळ
Mon, 04/18/2016 - 15:22 नवीन
साबुदाणा खिचडी रामबाण पाककृती हवीये. होना, माझी साबुदाणा खिचडी नेहमी चुकते. कधी कोरडी तर कधी लिग्दा होतो. काहीतरी सोपा उपाय सांगा. मला आता जास्त खटपट करण्यात रस राहिला नाही. खूप वेळा चुकलो आहे.
  • Log in or register to post comments

एक सल्ला

मराठी कथालेखक
Mon, 04/18/2016 - 16:09 नवीन
साबुदाणा हा एक अत्यंत निकृष्ट, खाण्याच्या लायकीचा नसलेला पदार्थ आहे. तो खावू नये हेच चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंडस बाळ

गोंडस बाळ, मुळात शाबुदाणा

विजय पुरोहित
Mon, 04/18/2016 - 16:14 नवीन
गोंडस बाळ, मुळात शाबुदाणा चांगल्या क्वालिटीचा मिळाला तर खिचडी खराब होत नाही. याबाबत एखाद्या सुपर मार्केटमध्ये घेतलेला, चांगल्या पॅकिंगचा, महाग किंमतीचा शाबुदाणा देखील चांगलाच असेल याची खात्री नाही. असा शाबुदाणा देखील बाद निघतो याचा मला अनुभव आहे. साबुदाणा आपल्या खात्रीच्या दुकानदाराकडून कायम विकत घ्यावा. मी साता-याला कधी गेलो की मग एकदमच दोन तीन किलो घेऊन ठेवतो. सुट्टा पण अतिशय चांगल्या क्वालिटीचा मिळतो. अर्थात मी उपास बिलकुल करत नाही की साबुदाणा अगदी प्रत्येक आठवड्यात खात नाही. वर म.क. यांनी म्हटल्याप्रमाणे तो आरोग्याला चांगला नाहीयेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंडस बाळ

साबुदाणा या पाककृतीचे सर्व यश

सस्नेह
Mon, 04/18/2016 - 16:32 नवीन
साबुदाणा या पाककृतीचे सर्व यश तो भिजवण्यात सामावलेले आहे. साबुदाणा भिजवताना पाण्याचे कर्रेक्ट प्रमाण तुम्हाला जमले तर तुम्ही पाकृ आयपीएलच्या सेमिफायनलीत गेलात असे समजायला हरकत नाही. हा (साबुदाणा) साधारण आठ तास भिजला की उपसून मोकळा करून अर्धा तास ठेवायचा आणि मग त्याला मीठ साखर लावून ठेवायचे. मग छानपैकी कढईत मस्तपैकी भरपूर तूप घालावे आणि हिरव्यागार मिरच्यांची जिऱ्यासहित फोडणी करावी. (गॅस पेटता असावा याची खबरदारी घेणे ) मग त्यात अघळपघळ बचकभर शेंगदाण्याचा कूट घालावा आणि मग भिजवलेल्या साबुदाण्याला त्यात लोळवावे. इथे मावेओ असेल तर साबुदाणे कढईशी चिकटपणा न करता मऊसूत सळसळीतपणा धारण करतात. आणि मग काय, वर खोबरे कोथिंबीर पेरा आणि हाणा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंडस बाळ

तांदूळ

रुस्तम
Tue, 04/19/2016 - 23:22 नवीन
तांदूळ भिजवतो तस भिजवायच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

नाही.

सस्नेह
गुरुवार, 04/21/2016 - 10:54 नवीन
पसरट भांड्यात साबुदाणे घालून एकदा धुवून पूर्ण पाणी काढावे. मग साबुदाण्याच्या वर न येईल इतपत पाणी घालून चार ते सहा तास झाकून ठेवावे. हे झाले जनरल. पण प्रत्येक साबुदाण्यात पाण्याचे प्रमाण हे त्याच्या क्वालिटीवर अवलंबून असते. भिजल्यावर मोकळा झाला पाहिजे इतपतच पाणी घालावे. साबुदाणा नवीन आणला की एकदा ट्रायल घेतल्याशिवाय अंदाज येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम

धन्यवाद

रुस्तम
गुरुवार, 04/21/2016 - 11:02 नवीन
धन्यवाद ताई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

private company मध्ये मेडिकल

लालगरूड
Wed, 04/20/2016 - 18:00 नवीन
private company मध्ये मेडिकल टेस्ट मध्ये काय काय तपासले जाते ....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा