Skip to main content

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ४

लेखक जेपी यांनी मंगळवार, 15/03/2016 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/32572 भाग २ http://www.misalpav.com/node/34076 भाग ३ **************************************************** मागील भागात १०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यामुळे हा नवा धागा काढत आहे. **************************************************** प्रश्न - आपल्याकडे जलव्यवस्थापना बद्दल शिक्षण / प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम उपल्ब्ध आहेत आहेत का ? असे अभ्यासक्रम कुठल्या संस्थेत उपल्ब्ध आहेत त्याची थोडक्यात महिती मिळेल का ? (उदा.संस्थेचे नाव,ठिकाण्,अभ्यासक्रम) ======================================================================= प्रतिसादासाठी धन्यवाद.

वाचने 41117
प्रतिक्रिया 206

प्रतिक्रिया

धागा क्र ३ वर विचारलेला (आणि अनुत्तरित राहिलेला) प्रश्न पुन्हा इथे विचारतो. आस्थापनांनी (दुकान, हॉटेल ई) स्थानिक भाषेत नामफलक लावणे बंधनकारक आहे (म्हणजे महाराष्ट्रात मराठीतून सोबत इतर भाषेतून लावू शकतातच पण मराठी सक्तीचे) आता या नियमाची /कायद्याची अंमलबजावणी करणे हे कोणाचे कर्तव्य आहे ? मागे मी PCMC च्या संकेतस्थळावर दोन हॉटेल्सची तक्रार छायाचित्रांसकट टाकली होती मात्र ही गोष्ट PCMC च्या अखत्यारीत येत नाही असा शेरा देत ही तक्रार बंद करण्यात आली. या संदर्भात कुणाकडे (मनसे सोडून) तक्रार करावी याचे कृपया नेमके मार्गदर्शन करावे

In reply to by मराठी कथालेखक

राजकीय पक्ष किंवा सरकारी खात्यांकडे अधिकृत तक्रार करण्यापेक्षा मिडिया / सोशल मिडिया चा आधार घ्या. कदाचित काम होईल. महाराष्ट्र टाइम्सचे मटा रिपोर्टर वापरून तुम्ही तक्रार करू शकता. निखिल वागळेच्या महाराष्ट्र१ वाहिनीवर कायअप्पा मार्फत तक्रार करता येते. तक्रार योग्य वाटल्यास आणि त्याला प्रसिध्दी मिळाल्यास संबंधित यंत्रणा त्यावर कदाचित कारवाई करतील. बातमी प्रसिध्द झाल्यावर कदाचित लाजेखातर हॉटेल्सवाले आपणहुन नामफलक बदलतील.

In reply to by भाते

धन्यवाद
निखिल वागळेच्या महाराष्ट्र१ वाहिनीवर कायअप्पा मार्फत तक्रार करता येते.
क्रमांक मिळू शकेल काय ?

जिज्ञासा-------- ----- ------- ---------झी मराठीला कलर्स मराठी आवरटेक करेल का???

स्लाऊ (Slough) मध्ये कोणी मिपाकर राहतं का? लँग्ली, मेडनहेड, विंडसर वगैरे आजूबाजूच्या भागातलंही चालेल.

पिंक टाकणे* या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती काय असावी? * प्रत्यक्षात पिंक टाकणे अभिप्रेत आहे, मताची पिंक नव्हे.

वर्तमान पत्रात बऱ्याचदा चंदनाची झाडे सराईत चोरट्यांनी चोरल्याचे आपण वाचतो, मला हे समजत नाही की आपल्याकडे सागाप्रमाणे किंवा इतर पिकांप्रमाने चंदनाची शेती करणे का अधिकृत नाही आणि हा कुठला न्याय तूमच्या जागेत तूम्ही चंदन वाढवा पण मालकी सरकारची

In reply to by झेन

हा प्रश्न मलाही कधीकाळी पडला होता. पण तुमची शंका वाचेपर्यंत पाठपुरावा केला नव्हता. मुळात चंदनाची शेती करणे का अधिकृत नाही आणि तूमच्या जागेत तूम्ही चंदन वाढवा पण मालकी सरकारचीहे गृहीतक खरं आहे का? या दुव्यानुसार नसावं. त्या संस्थळातील जाहिरातीचा भाग सोडला आणि इतर माहिती खरी आहे असं मानलं तर निदान गुजरात राज्यात तरी चंदनाच्या लागवडीची मालकी शेतमालकाकडे असते, सरकारकडे नाही. बिझिनेस स्टँडर्ड मधील या अन्य वृत्तानुसारही अशी चंदन लागवड करणं आता शक्य आहे.Till recently, there were severe restrictions on cultivation of sandalwood. If it happened to come up, the plant became the property of the state. The restrictions have been relaxed; cultivation is now allowed and one may apply for a government subsidy for doing so. बर्‍याच मोठ्या खाजगी कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत असं या लेखानुसार दिसतं. लागवडीची मालकी सरकारची नसली तरी the sector was under strict government control; the wood can still be sold only through government auctions anywhere असा उल्लेख लेखात आहे.

In reply to by बहुगुणी

चंदनाची लागवड बेकायदेशीर नाही.सात बारा वर नोंद करावी लागते.मालकी शेतकर्याची असते सरकारची नाही. पण योग्य भावा(जो फक्त गाभ्याला मिळतो) बरीच वर्ष लागतात.यास्तव लागवड कमी असते. त्याचा फायदा चोर घे.

In reply to by झेन

एका माजी शेजारच्या घरी होतं एक चंदनाचं झाड . साधारणपणे १०-१५ फूट उंच होतं आणी एक दोन वीत असेल खोडाची जाडी. पण सुगंध वगैरे काही येत नसे. एके रात्री चोरट्यांनी अगदी जमिनीपासून कापून नेले. आता हे झाड लावणे इनलिगल असते का नाही माहीत नाही. अवांतराबद्दल क्षमस्व!

In reply to by उगा काहितरीच

पण सुगंध वगैरे काही येत नसे. झाडाचा नाही, खोड कापल्या नंतर त्याच्या गाभ्याचा येतो वास. ते पण जर झाड मोठं आणि जुनं असेल तरंच. चोरी शक्यतो रात्री होते. झाड लावणं इल्लिगल असं काही नसतं. काही लोक लावतही असतील पण बर्‍याचदा झाड उगवलेलं असतं. आमचं पण एक झाड गेलं होतं चोरीला.

In reply to by झेन

मी एकदा Ebay वरुन चंदनाच्या सुमारे १०-१५ (नक्की आकडा आठवत नाही) बिया मागवल्या (खर्‍या होत्या की नाही माहित नाही) , वेगवेगळ्या ठिकाणी लागवड करुन पाहिली पण एकही बीज रुजले नाही. सहज म्हणून मी हे आमच्या एका नातेवाईकांना सांगितले. हे नातेवाईक खेड्यात राहतात, त्यांची शेती आहे (चंदनाची लागवड मात्र करीत नाहित). पण त्यांनी सांगितले की चंदनाचे बी असे रुजत नाही. त्यांच्या ते बी पक्ष्याने खाल्ले आणि त्याच्या विष्ठेतून सांडून जमिनीवर पडले तर रुजते. यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. १) हा समज खरा आहे कि खोटा माहित नाही २) पण खरा असेल तर पक्ष्याच्या (यात कोणते पक्षी सामाविष्ट आहेत ते आधी बघायला हवे) विष्ठेत मिसळू पर्यंत वा मिसळल्यावर बिजावर काय परिणाम होतो , तसाच परिणाम इतर काही प्रकारे (कृत्रिमरित्या) साधता येईल का ? ३) तसा परिणाम कृत्रिमरित्या साधता येत नसल्यास पक्ष्या ऐवजी प्राण्यांच्या विष्ठेतून हा परिणाम साधता येईल का ?(पक्ष्यांपेक्षा पाळीव कुत्रा, मांजर, गुरे यांच्या विष्ठेच्या जागेबद्दल जास्त खात्री असल्याने आणि या प्राण्यांना मुद्दाम बिया खाऊ घालणे सहज शक्य असल्याने पक्ष्यांपेक्षा त्यांचा अधिक चांगला उपयोग होवू शकतो) पण अगदी किंमत पडून चोरी थांबली जाईल इतक्या मोठ्या प्रमाणावर चंदनाची झाडे लागवड होईपर्यंत चंदनाच्या शेतीत कुणी गुंतवणूक करणार नाही (चोरीच्या भितीमुळे). आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर चंदनाची शेती होईपर्यत चोरी थांबणार नाही. थोडक्यात हे दुष्टचक्र भेदणे कठीण आहे.

In reply to by मराठी कथालेखक

त्यांच्या मते बी पक्ष्याने खाल्ले आणि त्याच्या विष्ठेतून सांडून जमिनीवर पडले तर रुजते.
असे वाचावे

In reply to by मराठी कथालेखक

(पक्ष्यांपेक्षा पाळीव कुत्रा, मांजर, गुरे यांच्या विष्ठेच्या जागेबद्दल जास्त खात्री असल्याने आणि या प्राण्यांना मुद्दाम बिया खाऊ घालणे सहज शक्य असल्याने पक्ष्यांपेक्षा त्यांचा अधिक चांगला उपयोग होवू शकतो)
पक्षी बी गिळतात , प्राणी चावतात त्यामुळे प्राण्याच्या विष्ठेतुन आलेल्या बी पासून झाड निघणे अवघड आहे.पण मला वाटते की असेल दुसरी पण काही तरी पद्धत .

In reply to by मराठी कथालेखक

भागवतात वरणन आहे की राम वनवासी असताना भरत त्याच्या जेवणासाठीचे धान्य गाइला खायला घालत असे व तिच्या विष्ठेतुन ते बाहेर आल्यावर त्यावर प्रोसेस करुन त्याचे सेवन करत असे.. धन्य तो बंधु... असो रामायणात त्याच्यावर अन्याव झालेला नसल्याने मुद्दा इतकाच चर्चेत ठेउया की शक्य आहे विष्ठेतुन बाहेर येणारे पचलेले बी रुजणे नक्किच शक्य असावे.

In reply to by भाऊंचे भाऊ

भागवतातल्या वरणात भरताचं वांगं ?

In reply to by मराठी कथालेखक

मॉरिशस बेटावर बाहेरच्या जगापेक्षा वेगळे आणि एकमेव असे जैववैविध्य होते. दोदो पक्षी हादेखील मॉरिशसच्या जैववैविध्यातला एक प्रकार. मॉरिशसमध्ये एक प्रकारचे वृक्ष (Tambalacoque) असेच दोदो पक्ष्याच्या साहाय्याने रुजत असत. दोदो पक्षी या झाडाची फळे खात. त्यांच्या पचनसंस्थेत ह्या फळांच्या बिया रुजण्यायोग्य होत आणि दोदो पक्ष्याच्या विष्ठेतून बाहेर पडल्यावर जमिनीत रुजत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला मानवाचा पहिला स्पर्श पोर्ट्युगीज़ांच्या रूपाने मॉरिशसला झाला. पोर्ट्युगीज़ांची जहाजे दक्षिण आशियापर्यंतच्या प्रवासात मधला थांबा म्हणून या अनाघ्रात बेटावर थांबू लागली. पन्नास किलो वजनाचा फारसा उडू न शकणारा मांसल दोदो आयता खलाशांच्या जेवणाच्या टेबलावर आला. दोदोची बेसुमार शिकार झाली. बिचारा दोदो. माणसांचा धोका त्याला समजला नाही कारण माणूस हा आपला शत्रू आहे, त्याच्यापासून सावध राहावे हा इन्स्टिंक्ट त्याच्या जीन्समध्ये नोंदलेला नव्हता. नंतर डच लोकांनी इथे गुन्हेगार वसाहत वसवली. त्यांच्याबरोबर खाद्य म्हणून डुक्कर आणि माकडें इथे अवतरली. माकडे कशी आली माहीत नाही, पण आली खरी. जहाजांच्या अन्नसाठ्यात वावरणारे उंदिरही बेटावर उतरले. डुक्कर आणि उंदिरांनी जमीन उकरून उकरून दोदो पक्ष्यांची अंडी शोधून खाल्ली. माकडांनी झाडावर किंवा जमिनीवर स्तब्ध बसणार्‍या उरल्यासुरल्या दोदोंची मारामारी करून त्यांना मारून टाकले. केवळ शंभर वर्षांत दोदो पक्ष्याचे अस्तित्व मॉरिशसमधून आणि जगातून कायमचे पुसले गेले. पण ही कहाणी इथेच संपली नाही. काही वर्षांपूर्वी एका वनस्पतिशास्त्रज्ञाला आढळले की एका विशिष्ट प्रजातीचे (Tambalacoque) वृक्ष फार कमी संख्येत मॉरिशसमध्ये आढळतात. त्यांचे जतन करण्याचे हर प्रयत्न असफल ठरले. त्या वृक्षाच्या फळांच्या बिया काही केल्या रुजेनातच. मग संशोधन करता असे आढळले की ही सर्व झाडे सुमारे तीनशे वर्षे इतकी जुनी आहेत. म्हणजे गेल्या तीनशे वर्षांत या झाडांपासून नवीन झाडे तयार झाली नव्हती. दोदोच्या अस्तकाळाशी हा काल जुळतो. मग अधिक अभ्यासावरून दोदो पक्ष्याचे आणि या वृक्षाच्या प्रजननाचे नाते स्पष्ट झाले. नंतर आता संशोधनान्ती एक दोदोसमान पक्षी प्रजाति आढळली जिच्या पचनसंस्थेत या झाडाच्या बियांवर दोदो पक्ष्यासारख्याच रासायनिक प्रक्रिया होऊ शकतात. या प्रजातीपासून या झाडाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न यशस्वी होऊ लागले आहेत.

माझ्या फ्लॅटच्या बाल्कनीत फक्त उन्हाळ्यात आणि ते ही दुपारनंतर उन येते. आम्ही कुंडीत रातराणी, जुई , गुलाब ई फुलझाडे लावून बघितली. पैकी रातराणी अजिबात जगत नाही (सतत रोग पडत राहतो, कीटकनाशक फवारुनही फायदा होत नाही). जुई काही काळ बहरली पण त्यानंतर नाही, गुलाबाचेहि तेच. युरिया वा इतर रासायनिक खत वापरुन पाहिले मला कुणी कमी उजेडात, कुंडीत वाढू शकाणार्‍या आणि बहरणार्‍या फुलझाडांबद्दल (शक्यतो सुगंधी आणि बारमाही बहरणारी फुले) माहिती देवू शकेल काय ? केवडा /निशिगंध अशा परिस्थितीत बहरेल काय ?

In reply to by मराठी कथालेखक

अशीच परिस्थिती माझ्या बाल्कनीची आहे. उन येत नाही.. त्यामुळे कितीही फुलझाडे लावली तरी फ़ारतर सहा महिने जगातील. त्यातल्यातात भारतीय मुळ असणारी तर कठिनच. मी प्रयत्न केला, शेवटी थकुन आता फक्त शोभिवंत झाडे लावतोय.. कमी उजेडात वाढणारी उरोपियन झाडे एक वेळ येतील तरी.. उद्या ट्युलिप. ..

तुमची बाल्कनि वायव्येकडे ( north west ) आहे.सोनटक्का लावून पाहा.कितीही कोणतेही खत सूर्यप्रकाशाची वानवा कमतरता भरून काढू शकत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

मधुमालतीची कुंडीत उगवणारी जात छान बहरते वसंत ऋतूत आणि वासही छान येतो. बोगनवेलीची कुंडीतली बरीच व्हरायटी मिळेल.वास नाही.पण बाग छान दिसते रंगीबेरंगी. मोगरा उगवेल कुंडीत.पण फुलांची संख्या कमी आणि उन्हाळ्यात फुलं येतील. गावठी गुलाबाला बारा महिने भरपूर फुलं येतात आणि सुगंधी असतात. रातराणीला ऊन आणि पाणी भरपूर लागते.पसरायला जागा पण हवी.नाहीतर छाटत रहावे लागते. तगरीची छोट्या फुलांची जात येते एक.दिसतेही छान आणि कायम फुलं. गुलबक्षी,काटेकोरांटी, सदाफुली ,अबोली पण कुंडीत लावता येतात.कायम फुलं मिळतात.

प्लास्टिकच्या बाटलीत मनपाने सोडलेले नळाचे पाणी कुठलीच प्रक्रिया न करता किती दिवसापर्यंत पिण्यायोग्य राहते ?

In reply to by उगा काहितरीच

मनपाच्या पाण्याचं माहीत नाही, आणि मुळात प्लास्टिकची बाटली किती स्वच्छ आणि नवी आहे यावर पाण्याचं 'आयुष्य' ठरावं, पण साधारणत: दोन आठवड्यांत बाटली उघडून पाणी संपवावं असं या दुव्यावर दिसतं. चांगल्या खात्रीशीर कंपनीचं विकत घेतलेलं आणि न उघडलेलं प्लास्टिक बाटलीतील पाणी सहा महिन्यांपर्यंत चांगलं राहू शकतं असं या आणि या दुव्यांवरून दिसतं. (किंचित अवांतरः प्लास्टिकच्या वापराविषयी हेही वाचनीय आहे.)

In reply to by बहुगुणी

आपण स्वतः पाणी भरलं असल्यास त्या बाटलीवर जिथे बराच वेळ ठेवणार आहोत तिथे सुर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी. बाटली अपारदर्शक असल्यास सूर्यप्रकाश व हवेच्या संपर्कामुळे निर्माण होऊ शकणार्‍या बुरशीची शक्यता बरीच कमी होते. टीप - मी वर लिहिलेलं शास्त्रियदृष्ट्या १००% अचुक असेल याची खात्री मी देऊ शकत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पिण्याच्या पाण्याच्या साठवणीसाठी सूर्यप्रकाशापासून दूर आणि थंड अशा जागेचा वापरच योग्य आहे. विशेषतः पारदर्शक बाटल्या वापरल्यास. याच्या समर्थनार्थ बरेच दुवे शास्त्रीय लिखाणात मिळतील. सध्या हे दोन दुवे: 1. City of Berkeley Water Storage Guide 2. Bottled Water Storage, यात दिल्याप्रमाणे: When water (bottled water or tap water) is exposed to extended periods of direct sunlight or heat sources, algae or mold may infrequently develop. ..... plastic containers – whether used for bottled water or other beverages – are slightly permeable, which may allow ambient air gases such as vapors from household solvents, petroleum-based fuels and other chemicals, to affect the taste and odor of your beverage.

co op housing society मध्ये किती रकमे पर्यंत खर्च करताना निविदा (Quotation) मागवावी लागतात. ३०,००० (तीस हजार) रुपयाचे एक काम आहे, तर त्यासाठी निवीदा मागवाव्यात का? कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by रुस्तम

कामाचा अपेक्षित खर्च जर रू.10,000 च्या वर असेल तर कमीत कमी 3 निविदा मागवाव्यात. Google : MODEL BYE – LAWS OF COOPERATIVE HOUSING SOCIETY Maharashtra

नाखु सलाम तूमच्या अभ्यासाला, चिकाटीला आणि सकारात्मकतेला

तावातावाने सगळे राजकाराणावर अन समाजावर काथ्या कूटत बसतात आज "शहीद दिवस आहे" सगळेच विसरले??? अरेरे असो!, माझ्यातर्फे तरी मी शहीद भगतसिंह , शहीद सुखदेव थापर अन शहीद शिवराम हरी राजगुरु ह्या तीन शहीदांना आदरांजली वाहतो ____/\____ .

नेत्रदान केल्यावर तेच डोळे परत दान करता येतात का ? जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत डोळे टिकू शकतात? (समजा अबक व्यक्ती ६० वर्षे जगली. मरणोपरांत नेत्रदान केले . ते कखग या अंध व्यक्तीला बसविण्यात आले , ज्याचे वय २० वर्षे आहे. कखग व्यक्ती ६० वर्षे जगली तर कखग ला पण मरणोपरांत नेत्रदान करता येऊ शकते का ? कारण डोळ्यांचे एकूण वय १०० वर्षे झालं असेल ना. जर असे करता येत असेल तर अबक व्यक्तीचे डोळे जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत वापरता येतील?) मिपावरील डॉक्टरांकडून उत्तर अपेक्षित ...

१. वडिलोपार्जित घर आई-वडीलांच्या पश्चात वारसाच्या नावावर करायचे असेल तर कायदेशीर पद्धत काय? (आई वडील हयात नाहीत. मृत्युपत्र केलेले नाही. वारसाचे वय ५५ आहे आणि त्यांना एक बहीण आहे जिचा ह्या घरावर काहीही दावा नाही.) २. ह्यात पुन्हा एकदा स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची फीस भरावी लागते का? ३. अजुन पुढच्या पिढीला हाच त्रास होऊ नये म्हणुन आत्ताच वारसा सोबत त्याच्या मुलांचीही नावे लागु शकतात का? ४. ह्या संदर्भात महाराष्ट्र सरकारचे जे नियम असतील ते कुठे वाचायला मिळतील का?

In reply to by पिलीयन रायडर

आणि एकंदरीतच आपली स्थावर जंगम मालमत्ता जास्त त्रास न होता आपल्या पश्चात आपल्या मुलांना मिळावी म्हणुन काय करायला हवे? (म्हणजे माझा फ्लॅट हा माझ्यानंतर आपसुकच माझ्या मुलाला मिळत असतो की त्यासाठी मला तसे काही लिहुन ठेवावे लागते?)

In reply to by पिलीयन रायडर

सहकारी सोसायटीत फ्लॅटकरिता समभाग प्रमाणपत्र (शेअर सर्टिफिकेट) मिळते , त्या समभागासाठी नॉमिनेशन (एक वा अधिक वारसांच्या नावे) सोसायटीत द्यायचे असते, पण त्याखेरीज अजून काही करावे लागत असेल तर माहित नाही.

In reply to by पिलीयन रायडर

तुमच्या स्वकष्टार्जित/वडिलोपार्जित मालमत्तेचा वारस हा तुमचा जोडीदार असतो, मुलं नाहीत. मुलांना मालमत्ता मिळावी असं वाटत असेल तर मृत्यूपत्र करणे हाच उपाय आहे. जर मृत्युपत्र केलेलं नसेल आणि मृत्यू झाला तर मालमत्ता जोडीदाराकडे by default जाते. रिलायन्सच्या अंबानी बंधूंमध्ये तोच तर वाद होता. धीरूभाई अंबानी मृत्यूपत्र न करता गेल्यामुळे सगळी मालमत्ता कोकिलाबेन अंबानींना मिळाली, जी त्यांनी आपल्या चार मुलांमध्ये वाटली, आणि तीही त्यांना हवी तशी.

In reply to by पिलीयन रायडर

ही मालमत्ता कोणत्या स्वराज्यसंस्थेत येते? म्हणजे नगरपालिका, ग्रामपंचायत इत्यादी. त्यानुसार पुढचं सांगता येईल.

In reply to by पिलीयन रायडर

१. बहिणीचे संमतीपत्र लागेल . १०० रु च्या स्टँम्पवर करता येते. २. घर स्वतंत्र आहे की सहकारी सो. मध्ये यावर बरेच बदल होतील ३.पुन्हा ड्यूटी / रजिस्टेशन भरावे लागत नाही ३. स्वतंत्र घर असेल तर हो . ४ माहीत नाही

In reply to by कपिलमुनी

घर स्वतंत्र आहे. सहकारी सोसायटी वगैरे नाही. बहीण सही देऊ शकेल. त्यांची हरकत नाही. कुणाला ह्या संदर्भातले नियम कुठे ऑनलाईन माहिती असतील तर कृपया दाखवावे. ज्या वकीलाला हे प्रश्न विचारले तो तर घराच्या सध्याच्या किंमतीनुसार स्टॅम्प ड्युटी / रजिस्ट्रेशन भरावे लागेल आणि त्याच्या % मध्ये वकीलाला फीस द्यावी लागेल असे म्हणत आहे.

In reply to by पिलीयन रायडर

कपिल मुनि म्हणतात ते लिहायला आलो होतो. अधिक माहितीसाठी ही बातमी: http://consumerresources.in/2015/05/21/no-stamp-duty-required-for-trans… रक्ताच्या नात्यातल्या नातेवाईकांकडे मालमत्तेचे हस्तांतरण करतांना कोणती ही स्टँप ड्युटीची गरज नाही. महाराष्ट्र शासनाचा जी आर २०१५ मधे काढलेला.

In reply to by तर्राट जोकर

http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-waives-stamp… ह्यात हे वाक्य पहा... Immovable property — land, house or flat — can now be transferred to one's children or blood relatives without paying stamp duty for registration....... ....... In other decisions announced in the House on Wednesday, those with 500sq ft or smaller homes do not have to pay the increased property tax and the government will allow twice the transfer of development rights to a landowner in lieu of land surrendered for a public amenity. म्हणजे ५००स्क्वे.फु पेक्षा मोठं घर असेल तर फिस लागु आहे का? की माझा काही घोळ होत आहे?

In reply to by पिलीयन रायडर

तसेच या प्रकरणात कोणी प्रतिवादी (मालमत्तेवर हक्क सांगनारा) नसेल तर वकिलाची काही गरज आहे असे वाटत नाही.

In reply to by तर्राट जोकर

पण मुळात ज्यांच्या नावावर घर आहे, ते हयात नाहीत. त्यांनी कुठे मृत्युपत्र वगैरे केलेले नाही. म्हणजे आधी हे कसे दाखवायचे की आम्हीच बाबा वारस ह्यांचे? आणि दुसर प्रश्न.. ह्यात आता पुढच्या पिढीचीही नावे लावुन टाकता येतील का म्हणजे परत पुन्हा हीच भानगड नको..

In reply to by पिलीयन रायडर

मॄत्यूपत्र नसेल व कोणी दावा सांगणारा नसेल तर काही फरक पडत नाही. बरेच लोक मृत्युपत्र न करताच मरण पावतात. वारस सिद्ध करण्याचे कागदपत्र राशनकार्ड व इतर ओळखपत्रे, वारस सिद्ध करणारे जुने दस्तावेज, प्रमाणपत्रे, तलाठ्याची प्रमाणपत्रे, रहिवासी दाखला, वैगरे पुरतील. (माझे ज्ञान ह्याबाबतीत तोकडे आहे. ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येणारी वारसा प्रकरणे बघितली आहेत. तेवढा अनुभव. पक्की कायदेशीर माहिती तज्ञ देऊ शकतील.) माझ्यामते तरी ही एकदम नॉर्मल केस आहे. तुमचा वकिल फी काढण्यासाठी गोंधळात तर टाकत नाही ना अशी शंका आली? तुम्ही सविस्तर धागा काढलात तर जास्त चांगली मदत होईल व इतरांनाही वारसाहक्क हस्तांतरनाच्या सर्व बाजूंचा उहापोह करणारा एखादा धागा संग्रही ठेवता येईल.

In reply to by तर्राट जोकर

मृत्युपत्र नसेल आणि कुणी वारस नसेल तर फ्लॅट सोसायटी ताब्यात घेऊ शकते. आणि तुम्ही जे पुरावे सांगितलेत ते बरोबर आहेत पण त्याला कोर्टात आव्हान देता येऊ शकतं. अगदी टोकाच्या केसेसमध्ये कोर्ट डीएनए तपासणी करुन वारसाहक्क सिद्ध करायला सांगू शकतं. म्हणूनच मृत्यूपत्र करुन सर्व गोष्टी clear करणं महत्वाचं.

In reply to by बोका-ए-आझम

ह्या प्रस्तुत केसमधे थेट वारस जीवंत आहे व त्यावर प्रतिदावा करणारं कुणी नाही. ह्या स्थितीत फ्लॅट ताब्यात घेण्याचा अधिकार सोसायटीला कसा आहे?

In reply to by तर्राट जोकर

वारस नसेल तर असं म्हटलंय ना मी. वारसांना वारस आहोत हे सिद्ध करण्यासाठी एक अॅफिडेव्हिट करावं लागतं बहुतेक. चडकवून सांगतो.

In reply to by बोका-ए-आझम

ओके. धन्यवाद. प्रश्नकर्त्याने प्रस्तुत केलेली परिस्थिती बघुन माझे उत्तर होते. ते तेवढ्यापुरते मर्यादित असले व जास्त गोंधळ निर्माण करणारे नसले तर बरे असे वाटले होते. मृत्युपत्र आवश्यक आहेच ह्यावर दुमत नाही. पण बरेच लोक ध्यानीमनी नसतांना मरण पावतात. मृत्यूपत्राबद्दल काही गैरसमज व अंधश्रद्धाही जुन्या लोकांमधे आहेत. अशा परिस्थितीत वारसाचे सर्व पुरावे असतील आणि मृत्यूपत्र नसेल तर बहुतेक) हिंदू कोडबिलाप्रमाणे सर्वात जवळच्या व थेट वारसाकडे मालमत्ता हस्तांतरण होते. ह्यास प्रतिदावा करणारे उद्भवले तर मात्र केस कोडतात जाते. कोर्टाच्या पायरीपाशी माझे ज्ञान संपते. इथून पुढे त्या क्षेत्रातले अनुभवी जास्त उपयुक्त माहिती देऊ शकतात.

In reply to by तर्राट जोकर

हिंदू वारसा कायद्याप्रमाणे एखादा माणूस जर मृत्युपत्र न करता गेला तर त्याची संपत्ती बायकोला ५० % आणि इतर ५०% त्याच्या मुलांना विभागून जाते. पत्नी पण हयात नसेल तर ती मालमत्ता सर्व मुलांमध्ये( मुलगा किंवा मुलगी) समान वाटणीने जाते. बहुसंख्य लोक मृत्युपत्र न करता मरतात तेंव्हा वारसांना कोर्टात जाऊन वारस खत करून घ्यावे लागते. वारसांचे कागदपत्र( शाळेचे लिव्हिंग सर्टिफिकेट, दहावी बारावीचे सर्टिफिकेट, रेशन कार्ड ई.) तपासून कोर्ट तसे वारस खत देते यानंतर ती मालमत्ता वारसांना मिळू शकते http://www.holisticinvestment.in/without-will-hindu-succession-act/

In reply to by पिलीयन रायडर

वारस लावण्याकरिता संबंधित तलाठी किंवा प्रोपर्टी कार्ड असेल तर उपाधीक्षक भूमिअभिलेख यांच्याकडे अर्ज करावा. अर्जात मयताचे सर्व वारसांची नावे असणे आवश्यक आहे. यापैकी ज्यांना त्या मिळकतीवर हक्क नको आहे अशा वारसांनी सोबत हक्कासोड पत्र करून द्यावे. वारसांची नावे लावण्याकरिता कोणत्याही स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची फीस भरण्याची आवश्यकता नाही. आत्ताच वारासांसोबत त्यांच्या मुलांची नावे लावण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कधीही तुमच्या मुलाना मालमत्ता हस्तांतरण करू शकतात.