Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user सुधीरन
Submitted by सुधीरन on Sat, 04/09/2016 - 00:05
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे. अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत. हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही. स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही. स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले. शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments
  • 37109 views

प्रतिक्रिया

Submitted by नुस्त्या उचापती on Sat, 04/09/2016 - 00:12

Permalink

नाईलाजाने का होईना पण

नाईलाजाने का होईना पण ट्रस्टला हा निर्णय घ्यावा लागला याचा आनंद झाला . पण मोठ्या मनाने न्यायालयाच्या निकालानंतरच निर्णय झाला असता तर अधिक आनंद झाला असता . असो .
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sat, 04/09/2016 - 00:38

Permalink

चांगली बातमी.

चांगली बातमी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 04/11/2016 - 18:49

In reply to चांगली बातमी. by एस

Permalink

+१

चांगली बातमी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by lgodbole on Sat, 04/09/2016 - 05:59

Permalink

..

आंदोलन सुरु असताना हे काँग्रेसचे षडयंत्र म्हणुन हिंदुत्ववादी ओरडत होते. त्यामुळे आता या समानतेच्या निर्णयाचे श्रेयही काँग्रेसलाच द्यावे लागेल. अभिनंदन
  • Log in or register to post comments

Submitted by नुस्त्या उचापती on Sat, 04/09/2016 - 06:17

Permalink

प्रत्येक धाग्यावर कॉग्रेस,

प्रत्येक धाग्यावर कॉग्रेस, भाजप यांच्या विषयी बोललेच पाहिजे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Sat, 04/09/2016 - 06:50

In reply to प्रत्येक धाग्यावर कॉग्रेस, by नुस्त्या उचापती

Permalink

होय त्याशिवाय त्यांना जेवण

होय त्याशिवाय त्यांना जेवण पचत नाही बहुदा!
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sat, 04/09/2016 - 07:04

Permalink

फालतु प्रकरण

अर्थहीन डोकेफोडी करायला काय पुरोगामी मजा येते कळत नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 04/09/2016 - 07:16

Permalink

प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड

प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड लावा.आपोआपच शिंगणापुरचे महत्त्व कमी होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 04/09/2016 - 08:32

In reply to प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड by कंजूस

Permalink

इतर चराचरांप्रमाणे शनी महाराज

इतर चराचरांप्रमाणे शनी महाराज त्यांच्या आवडी निवडी सवडीनुसार सर्व दगडांमध्ये संचार करु शकतात हे खरे, पण काही म्हणा मस्जिदी सर्वत्र बांधल्या तरी लोक मक्केला जायचे थांबत नाहीत असे म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by सतीश कुडतरकर on Sat, 04/09/2016 - 15:36

In reply to प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड by कंजूस

Permalink

उलट पालखी-दिंडी सोहळे चालू

उलट पालखी-दिंडी सोहळे चालू होतील. ठिकठिकाणच्या साई मंदिरांचे शिर्डीपर्यंत पायी दिंडी सोहळे काढण्याची सध्याची रीत आहे. नाशिक हायवेला वर्षभर चालू असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by 'पिंक' पॅंथर्न on Sat, 04/09/2016 - 22:14

In reply to प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड by कंजूस

Permalink

+१११११

+१११११
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 04/11/2016 - 18:51

In reply to प्रत्येक चौकाचौकात शनिचे दगड by कंजूस

Permalink

हो असंही चालेल.

अगदी खरं. शनिचा तोच दगड सॉरी देव पावतो आणि बाकीचे शनि पावत नाही, असं कुठे असतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 04/09/2016 - 08:13

Permalink

शिंगणापूर ही एक फालतूगिरी आहे.

लाखो मैलांवर असलेला शनि दगडाच्या स्वरूपात एखाद्या गावात अाहे असं मानणं आणि त्याच्याभोवती मंदीर बनून लोकांनी त्याची पूजा करुन त्याला तेल वाहून तेलाची नासाडी करणं हा मूर्खपणा आहे. या मंदिरात प्रवेश हवा म्हणून आंदोलन करण्याऐवजी मंदीर कायमचं बंद पडावं म्हणून आंदोलन करायला हवं होतं. असो. आता गावाची अर्थव्यवस्था सुधरायला हरकत नाही. शेवटी जगात काय आणि मिपावर काय, पैसा हेच सत्य. (पैतै ह.घ्या.)
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 04/09/2016 - 08:47

In reply to शिंगणापूर ही एक फालतूगिरी आहे. by बोका-ए-आझम

Permalink

असहिष्णूतेचा त्याग केला पाहीजे

एका धाग्यावर आस्तीकजन नास्तीक मनोविकारी कसे याचे धागे काढतात, दुसर्‍या बाजूला नास्तीक मंडळींना आस्तीकांबद्दल बोलताना आपण दुसर्‍यांच्या व्यक्ति स्वातंत्र्याचा अनमान करतो आहोत याचे भान रहात नाही काय म्हणावे याला ? जो पर्यंत दुसर्‍यांच्या स्वातंत्र्या आड येत नाहीत तो पर्यंत काय मुर्खपणा म्हणा शहाणपणा म्हणा जे काय असेल ते करण्याचे ज्याचे त्याला स्वातंत्र्य आहे. 'मंदीर कायमचं बंद पडावं म्हणून आंदोलन करायला हवं होतं' हे म्हणण्या एवढे जघन्य अपराध तेथे होत नसावेत उलटपक्षी तेल हे मानवी आरोग्यासाठी टाळणे उपयूक्त असते तेल जेवढे नाश होईल, तेवढे महाग होईल तेवढ्या तब्येती सुधारतील त्यामुळे शनी देवाला तेल वाहणे तेल खाऊ भारतीयांच्या तब्येतीच्या दृष्टीने हित कारकच. सांस्कृतिक स्वातंत्र्याचे दमन करण्यात कै पॉईंट ? हां मिथकीय अंधश्रद्धा प्रबोधनातून दूर करता येऊ शकतात त्यासाठी संकृतीवर गदा आणलीच पाहीजे असे नाही. आस्तीक आणि नास्तीक दोन्हींनी आपापल्या भूमिका तपासून असहिष्णूतेचा त्याग केला पाहीजे किंवा कसे.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sat, 04/09/2016 - 08:55

In reply to असहिष्णूतेचा त्याग केला पाहीजे by माहितगार

Permalink

'मंदीर कायमचं बंद पडावं

'मंदीर कायमचं बंद पडावं म्हणून आंदोलन करायला हवं होतं' हे म्हणण्या एवढे जघन्य अपराध तेथे होत नसावेत उलटपक्षी तेल हे मानवी आरोग्यासाठी टाळणे उपयूक्त असते तेल जेवढे नाश होईल, तेवढे महाग होईल तेवढ्या तब्येती सुधारतील त्यामुळे शनी देवाला तेल वाहणे तेल खाऊ भारतीयांच्या तब्येतीच्या दृष्टीने हित कारकच.
यात जर उपहास नसेल तर तुम्ही माझा दिवस बनवला आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 04/09/2016 - 09:00

In reply to 'मंदीर कायमचं बंद पडावं by सतिश गावडे

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 04/09/2016 - 12:17

In reply to 'मंदीर कायमचं बंद पडावं by सतिश गावडे

Permalink

अग्दी अग्दी...त्यांच्या

अग्दी अग्दी...त्यांच्या माहितीने गार केले =))
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 04/09/2016 - 10:43

In reply to असहिष्णूतेचा त्याग केला पाहीजे by माहितगार

Permalink

फालतूपणाला फालतूपणा म्हणणं ही असहिष्णुता असेल

तर मी अगदी डंकेकी चोटपर असहिष्णू आहे. सहिष्णुतेच्या नावाखाली श्रद्धेचा बाजार चालत असेल तर माझं त्यालाही काही म्हणणं नाही. पण मग त्याला सरळ बाजार असं म्हणावं. देवस्थान आणि शनिचा प्रकोप वगैरे नाटकं करु नयेत. माझं सिद्धीविनायक आणि लालबागचा राजा यांच्या बाबतीतही तेच म्हणणं आहे. आणि अंधश्रद्धा जर संस्कृतीचा भाग बनू पाहात असतील तर अशा संस्कृतीचाही त्याग करायला पाहिजे. मी शंभर टक्के आस्तिक आहे, फक्त असला फालतूपणा चालत नाही. मग असहिष्णुता म्हणालात तरी चालेल. (Proud to be असहिष्णु) बोका-ए-आझम
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Sat, 04/09/2016 - 11:27

In reply to फालतूपणाला फालतूपणा म्हणणं ही असहिष्णुता असेल by बोका-ए-आझम

Permalink

+१००

(केवळ या) प्रतिसादाशी १००% सहमत, आणि, जोरदार टाळ्या. मंदिरे बंद करण्याच्या मुद्द्याला सध्या काळ अनुकूल नाही. मंदिरे बंद करण्याऐवजी उपासनेचे स्वरूप बदलण्याचे प्रयत्न कालानुरूप ठरतील.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 04/09/2016 - 12:20

In reply to +१०० by राही

Permalink

साशंकता

मंदिरे बंद करण्याच्या मुद्द्याला
सध्या
काळ अनुकूल नाही.
अंधश्रद्धा विरोधी प्रबोधनाचे समर्थन वेगळे. सध्या म्हणजे काय ? तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही म्हणून त्या गोष्टींचे सांस्कृतीक दमनाचे समर्थन समर्थनीक कसे ठरते या बद्दल साशंकता आहे
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Sat, 04/09/2016 - 12:33

In reply to साशंकता by माहितगार

Permalink

सध्या

सध्या म्हणजे सांप्रत. अर्थात चळवळी करणार्‍यांनी चळवळी कराव्यातच. त्यांना अडवण्याचे प्रयोजन नाही. पण सांप्रत काळ अनुकूल नसल्याने प्रयत्नांच्या मानाने यश येणे कठिण. (म्हणजे खूप अधिक प्रयत्न करावे लागणार.) तेव्हा एकदम अशा ड्रास्टिक मुद्द्यावर आक्रमक आंदोलन उभारण्यापेक्षा परिघावरच्या मुद्द्यांना आधी हात घालून परिघाचा संकोच करीत न्यावा आणि मग कोअरला हात लावावा असे वाटते. भात गरम असला की मध्ये हात घालण्याऐवजी आपण बाजूबाजूने उचलतो, तसेच काहीसे. पण माझ्यामते मंदिरबंदीपेक्षा उपासनेची पद्धत बदलण्यासाठी प्रयत्न करणे हे अधिक व्यवहार्य ठरेल.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 04/09/2016 - 16:22

In reply to सध्या by राही

Permalink

साशंकता

राही आपणास तसे कदाचित म्हणावयाचे नसेल पण, मंदिरे बंद पाडण्यासाठी सांप्रत काळ अनुकुल नाही म्हणणे म्हणजे काळ अनुकुल असेल तर आम्ही इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात हस्तक्षेपकरुन मंदिरे बंद पाडली असती, आम्ही मोगल बादशहा अथवा अफगाणि सुल्तान असतो तर मंदिरांवर अवश्य घाव घातला असता असे अप्रत्यक्ष म्हणणाण्यासारखे नाही का, अशी साशंकता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजय पुरोहित on Sat, 04/09/2016 - 16:29

In reply to साशंकता by माहितगार

Permalink

मा.गा.साहेब...

मा.गा.साहेब... साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद मिळालाय की काय तुम्हाला? बाकी प्रतिवाद खणखणीत...
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Sat, 04/09/2016 - 16:47

In reply to साशंकता by माहितगार

Permalink

राहींचे आतापर्यंतचे प्रतिसाद

राहींचे आतापर्यंतचे प्रतिसाद बघता तुम्ही जो म्हणताय तो अर्थ तर त्यांच्या बोलण्यात नक्कीच नाही. अनुकूल काळ म्हणजे काय याचे त्यांचे उत्तर त्या देतील. पण मला जो वाटतो तो अर्थ म्हणजे अंधश्रद्धेबद्दल प्रबोधन हळू हळु करणे आवश्यक. आताचा काळ मंदिर थेट बंद करा ह्या टोकाची भूमिका घेण्याचा नाही. भाविकांना मंदिरात जाण्याचा फोलपणा जसजसा लक्षात येईल तसतसा मंदिरांचा बाजार बंद होईल असे त्यांना म्हणायचे असेल. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Sat, 04/09/2016 - 18:03

In reply to राहींचे आतापर्यंतचे प्रतिसाद by तर्राट जोकर

Permalink

साधारण सहमत.

"भाविकांना मंदिरात जाण्याचा फोलपणा जसजसा लक्षात येईल तसतसा मंदिरांचा बाजार बंद होईल असे त्यांना म्हणायचे असेल. " हेच म्हणायचे होते. आणि जसजसे जास्तीत जास्त लोक मु़ख्य प्रवाहात येतील, जसजसा त्यांचा भाबडेपणा जाऊन त्याची जागा विवेक घेईल तसतसा या बाजाराला काळ प्रतिकूल होत जाईल. आपोआपच. शिक्षण, ज्ञान हे एक अमोघ शस्त्र आहे. ते आपोआपच प्रबोधन करते. सांप्रत आपल्याकडे शिक्षणाचा/लोकशिक्षणाचा पहिला टप्पा चालू आहे. थोडीशीच सजगता आल्यावर कुतूहल अधिक वाढते, यानुसार सध्या भोळ्या भाविकतेकडे समाजमन झुकलेले जाणवते. भविष्यात तसे ते राहाणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Sat, 04/09/2016 - 17:52

In reply to साशंकता by माहितगार

Permalink

छे छे

खाली त.जो. यांनी बरोबर अर्थ पकडला आहे. घावबिव घालण्याची काहीच आवश्यकता नाही. एखादा जीर्ण वाडा आपोआप कोसळावा तशा ह्या जीर्ण प्रथा आपोआप गळून पडतात. त्या जागी नव्या प्रथा येतात. किंवा प्रथांमधला फोलपणा लक्ष्यात आला की लोकच हळूहळू त्यांच्याकडे पाठ फिरवतात. आपला धर्म (किंवा आपला लोकसमुदाय/समाज म्हणा हवे तर.) प्रचंड चैतन्यशील आहे. परिवर्तनशीलही आहे. पण एका हयात पिढीत हे परिवर्तन दिसत नाही त्यामुळे आपल्या डोळ्यांदेखत ते घडत नाहीय असा भास होतो इतकेच. जी प्रथा सोयीस्कर नाही, त्याला लोक प्रतिकूल होत जातात आणि तिच्या सब्स्टिट्यूशनसाठी काळ अनुकूल होत जातो; इतके सोपे लॉजिक आहे हे.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 04/09/2016 - 12:08

In reply to फालतूपणाला फालतूपणा म्हणणं ही असहिष्णुता असेल by बोका-ए-आझम

Permalink

एका असहिष्णुतेला दुसर्‍या

एका असहिष्णुतेला दुसर्‍या असहिष्णुतेकडून असहीष्णु उत्तर येते तेव्हा एका चुकीने दुसर्‍या चुकीचे परिमार्जन होते असे नव्हे, पण दुसर्‍याबाजुच्या असहिष्णुते विरुद्ध तक्रार करण्याचा नैतीक अधिकार संपतो. मुख्य म्हणजे असहीष्णूतेने तर्क जिंकत नसतो तो हरत असण्याची शक्यता अधिक असते का हे कदाचित रिव्हीजीट करुन पहाणे गरजेचे असावे.
श्रद्धेचा बाजार चालत असेल तर माझं त्यालाही काही म्हणणं नाही. पण मग त्याला सरळ बाजार असं म्हणावं. देवस्थान आणि शनिचा प्रकोप वगैरे नाटकं करु नयेत.
१) बाजार श्रद्धेचे असोत अथवा अश्रद्धेचे ते सहिष्णू असलेले चांगले पण असतातच असे नाही हे दुर्दैवाने वास्तव असावे. ज्यांना या बाजुने अथवा त्या बाजुने हाणामारीतच रस आहे त्यांचा विश्वास तत्वावर नव्हे हाणामारीवर आहे असे म्हणावे लागते. २) कुणि कशाला काय म्हणाव आणि कशाच नाटंक कराव हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा मुख्य म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 04/09/2016 - 15:32

In reply to एका असहिष्णुतेला दुसर्‍या by माहितगार

Permalink

कुणि कशाला काय म्हणाव आणि

कुणि कशाला काय म्हणाव आणि कशाच नाटंक कराव हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा मुख्य म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न असावा.
बरोबर. मग अशा गोष्टींना फालतूपणा म्हणण्याचं इतरांना स्वातंत्र्य आहेच. शिवाय तुमच्या म्हणण्यानुसार - उद्या कुणीही स्वतःला देव/संत म्हणवून घेऊ लागला तर त्याचं स्वातंत्र्य त्या माणसाला आहेच, बरोबर? मग अशा प्रवृत्तीवर टीका करण्याचं स्वातंत्र्यही आम्हाला आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 04/09/2016 - 16:28

In reply to कुणि कशाला काय म्हणाव आणि by बोका-ए-आझम

Permalink

नेमकी साशंकता

फालतू या शब्दाचा निरुपयोगी उपयोग करण्याचे स्वातंत्र्य आपणास आहेच, मुख्य आक्षेप 'मंदीर कायमचं बंद पडावं म्हणून आंदोलन करायला हवं होतं.' + 'तर मी अगदी डंकेकी चोटपर असहिष्णू आहे.' यांची बेरीज होऊन सांस्कृतीक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दमनाचे जे समर्थन होते आहे त्याला आहे म्हणुन आपल्या भूमिके बद्दल साशंकता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 04/09/2016 - 22:04

In reply to नेमकी साशंकता by माहितगार

Permalink

तसं समजा हवं तर.

एका समुहाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अंधश्रद्धा किंवा तत्सम समाजविघातक रुढी पसरवत असेल तर त्या स्वातंत्र्याला आवर घालावा लागतो. साधं उदाहरण आहे. इथे मिपावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तरीही त्याचा गैरवापर करणारे बॅन होतातच. असल्या रूढी पसरवणा-यांवरही तत्सम कारवाई झाली पाहिजे. मग त्याला असहिष्णुता म्हणालात तर so be it. -(Proud to be असहिष्णु about all sorts of फालतूगिरी) बोका-ए-अाझम
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 04/09/2016 - 23:04

In reply to तसं समजा हवं तर. by बोका-ए-आझम

Permalink

याच फिरुन उत्तर खालील

याच फिरुन उत्तर खालील प्रमाणेच रहाते.
एका असहिष्णुतेला दुसर्‍या असहिष्णुतेकडून असहीष्णु उत्तर येते तेव्हा एका चुकीने दुसर्‍या चुकीचे परिमार्जन होते असे नव्हे, पण दुसर्‍याबाजुच्या असहिष्णुते विरुद्ध तक्रार करण्याचा 'आपला' नैतीक अधिकार संपतो. मुख्य म्हणजे असहीष्णूतेने तर्क जिंकत नसतो तो हरत असण्याची शक्यता अधिक असते का हे कदाचित रिव्हीजीट करुन पहाणे गरजेचे असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 04/09/2016 - 23:23

In reply to तसं समजा हवं तर. by बोका-ए-आझम

Permalink

विश्वास तत्वावर नव्हे हाणामारीवर ?

आणि हे पहा या सदस्य प्रतिसादात तुमच्या एक्झॅक्टली आपोझीटसाईडच तुमच्याच स्टाईलच उत्तर आधी पासून तयार आहे. बाजार श्रद्धेचे असोत अथवा अश्रद्धेचे ते सहिष्णू असलेले चांगले पण असतातच असे नाही हे दुर्दैवाने वास्तव असावे. ज्यांना या बाजुने अथवा त्या बाजुने हाणामारीतच रस आहे त्यांचा विश्वास तत्वावर नव्हे हाणामारीवर आहे असे म्हणावे लागते हे खरे नाही का ?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 04/09/2016 - 12:16

In reply to फालतूपणाला फालतूपणा म्हणणं ही असहिष्णुता असेल by बोका-ए-आझम

Permalink

साशंकता

फालतूपणाला फालतूपणा म्हणणं ...
मी आपल्या ज्या प्रतिसादाला उत्तर दिलं तिथे आपण 'फालतू' या तुच्छतादर्शक विशेषणाचा उपयोग केला नव्हता, आपण इतरांच्या अभिव्यक्ती स्वांतत्र्यावर गदा आणू इच्छित "..मंदीर कायमचं बंद पडावं म्हणून आंदोलन करायला हवं होतं." असहीष्णूतेचे प्रदर्शन करनार्‍या भावना व्यक्त केल्या, मध्यपुर्वेत नास्तीकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाकारुन फासावर चढवले जाते आणि विरुद्ध दिशेला नास्तिक आस्तीकांचे मंदिरे तोडण्याची भाषा करतात ह्या वरकरणी भिन्न दिसणार्‍या कृतीं मागील दुसर्‍याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारण्याची वृत्ती समानच असते किंवा कसे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजय पुरोहित on Sat, 04/09/2016 - 11:53

In reply to असहिष्णूतेचा त्याग केला पाहीजे by माहितगार

Permalink

@ माहितगार साहेब,

@ माहितगार साहेब, +१११ प्रतिसाद आवडला...
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 04/09/2016 - 12:09

In reply to @ माहितगार साहेब, by विजय पुरोहित

Permalink

आभार

आभार
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 04/09/2016 - 08:47

In reply to शिंगणापूर ही एक फालतूगिरी आहे. by बोका-ए-आझम

Permalink

@या मंदिरात प्रवेश हवा म्हणून

@या मंदिरात प्रवेश हवा म्हणून आंदोलन करण्याऐवजी मंदीर कायमचं बंद पडावं म्हणून आंदोलन करायला हवं होतं. >> चुकीच्या भुकेच प्रबोधनानी निर्दालन, आणि योग्य पर्यायी मार्ग तयार केल्याशिवाय हे कालत्रयीही शक्य होणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 04/09/2016 - 09:26

In reply to @या मंदिरात प्रवेश हवा म्हणून by अत्रुप्त आत्मा

Permalink

प्रबोधनाने म्हणजे इतरांना

प्रबोधनाने म्हणजे इतरांना टनाटनी म्हणून का?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 04/09/2016 - 10:02

In reply to प्रबोधनाने म्हणजे इतरांना by प्रचेतस

Permalink

@इतरांना टनाटनी म्हणून का?>>

@इतरांना टनाटनी म्हणून का?>> नाही. जे आहेत,त्यांनाच म्हणून.. ! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 04/09/2016 - 10:04

In reply to @इतरांना टनाटनी म्हणून का?>> by अत्रुप्त आत्मा

Permalink

म्हणजे कोण?

म्हणजे कोण? टनाटनी शब्दाची नेमकी व्याख्या काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 04/09/2016 - 10:26

In reply to म्हणजे कोण? by प्रचेतस

Permalink

हे सर्व तुम्हाला नीट माहित

हे सर्व तुम्हाला नीट माहित आहे.. बसा अता... =))
  • Log in or register to post comments

Submitted by भिकापाटील on Sat, 04/09/2016 - 10:50

In reply to हे सर्व तुम्हाला नीट माहित by अत्रुप्त आत्मा

Permalink

बसा अता..

बसा अता..
बुवा " तांब्या घेवून" हे लिहायचे राहीले का.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 04/09/2016 - 10:57

In reply to बसा अता.. by भिकापाटील

Permalink

त्यांना हल्लीच चटके

त्यांना हल्लीच चटके बसल्यामुळे असं ग्राम्य लिहिणे त्यांनी सोडून दिले असावे बहुधा.
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Sat, 04/09/2016 - 11:24

In reply to त्यांना हल्लीच चटके by प्रचेतस

Permalink

:)

गुरूजींनी त्या बद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे तो विषय तिथेच संपलेला आहे. असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 04/09/2016 - 20:04

In reply to :) by मितभाषी

Permalink

@त्यामुळे तो विषय तिथेच

@त्यामुळे तो विषय तिथेच संपलेला आहे. असे मला वाटते. >> धन्यवाद. पण ते आगो बा असल्यानी त्यांनि लावली नाही काडी,तर पेटत नाही (त्यांचीच!) Image removed. विडी! Image removed. अशी त्यांची कडी लागल्यासारखी अवस्था होते! Image removed. ----------------------- आगोबा-करंटआत्मा Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 04/09/2016 - 12:18

In reply to त्यांना हल्लीच चटके by प्रचेतस

Permalink

गुर्जींची अशी कुचंबणा???

गुर्जींची अशी कुचंबणा??? मिपावर असहिष्णुता वाढलीये
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sat, 04/09/2016 - 08:53

In reply to शिंगणापूर ही एक फालतूगिरी आहे. by बोका-ए-आझम

Permalink

मंदीर बंदीचा टोकाचा विचार

मंदीर बंदीचा टोकाचा विचार करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. मात्र तेलाच्या नासाडीविरोधात आणि शनीच्या हॉरर स्टोरींच्या विरोधात समाज प्रबोधन करण्याऐवजी चक्क त्यात सहभागी होता यावे म्हणून स्त्रीयांनी आंदोलन करणे म्हणजे प्रबोधनाची दिशा बदलून टाकण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 04/09/2016 - 09:11

In reply to मंदीर बंदीचा टोकाचा विचार by सतिश गावडे

Permalink

(मिपाकर पुरुषांनो ह. घ्या.)

...प्रबोधनाची दिशा बदलून टाकण्यासारखे आहे.
गावडेसाहेब प्रबोधनाची दिशा विश्वशांतीची असावी म्हणून स्त्रीयांनी सैन्यात समान संधी मागू नयेत म्हणण्यासारखे होत नाहीए ना ? केवळ समतेची संस्कृती म्हणून बघा समतेची संक्सृती राबवण्यासाठी शक्यत्या प्रत्येक सांस्कृतीक गोष्टीत समान संधी द्यावी, या प्रित्यर्थ आम्ही आपणा सहीत सर्व मिपाकर पुरुषांना स्त्रीयांप्रमाणे केशरचना, वेशभूषा, रांगोळी काढणे ते हातावर मेंडी रंगवणे यात समानसंधी द्यावी असे समस्त अनाहीतांना आवाहन करतो ;) (मिपाकर पुरुषांनो ह. घ्या.)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sat, 04/09/2016 - 09:18

In reply to (मिपाकर पुरुषांनो ह. घ्या.) by माहितगार

Permalink

गावडेसाहेब प्रबोधनाची दिशा

गावडेसाहेब प्रबोधनाची दिशा विश्वशांतीची असावी म्हणून स्त्रीयांनी सैन्यात समान संधी मागू नयेत म्हणण्यासारखे होत नाहीए ना ?
"सैन्य नको" हा विचार कितीही आदर्श असला तरीही सैन्य ही काळाची गरज आहे. त्यामुळे सैन्याकडे जर सेवेची संधी म्हणून पाहीले जात असेल तर तिथे स्त्रीयांनी समान संधी मागण्यात काहीइ गैर नाही. दगडाच्या मूर्तीवर तेल ओतणे ही काळाची गरज नाही असे मला तरी वाटते. :)
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Mon, 04/11/2016 - 12:13

In reply to गावडेसाहेब प्रबोधनाची दिशा by सतिश गावडे

Permalink

माहीतगारसाहेबांचा मुद्दा

माहीतगारसाहेबांचा मुद्दा बहुधा केवळ "व्यक्तीस्वातंत्र्य" एव्हढाच मर्यादित आहे. व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच करून अस्तित्वात आलेली कोणतीही व्यवस्था/ परिवर्तन काळाच्या कसोटीवर टिकणे कठीण आहे हे खरेच. त्यामुळे जे काही करायचे ते त्याच परिघात राहून केले पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Sat, 04/09/2016 - 10:12

In reply to मंदीर बंदीचा टोकाचा विचार by सतिश गावडे

Permalink

नाही सगाभाऊ,

शनीच्या हॉररस्टोरीविरोधात आंदोलन चालू होईलच. (ते तुरळक प्रमाणात कुठे कुठे वैचारिक पातळीवर चालू आहेच.) पण आता ते स्त्री-पुरुष दोघांचेही प्रबोधन म्हणजे पूर्ण समाजाचे प्रबोधन या स्वरूपात असेल. शिवाय तैलार्पणाशिवायही दर्शन घेता येऊ शकेल की. तसे ते अनेकजण (स्त्रिया वगळून) आधीही घेत होतेच. शनिमंगळाची दहशत समाजमनातून काढून टाकणे ही गोष्ट स्त्रीसंघटना, अंनिस, काही समाजसुधारासाठी झटणार्‍या संघटना यांच्या अजेंड्यावर आधीपासून आहेच. आत्ताचे यश ही एक छोटी पायरी आहे. अशा छोट्या छोट्या पावलांतूनच मोठी झेप घेण्याचे बळ येते. मंदिरबंदी हा टोकाचा विचार वाटतो. आता पहिली काही वर्षे उलट या मंदिरातली गर्दी वाढल्याचेच दिसेल. दर्शन हिरावले गेलेला महिलावर्ग हिरीरीने दर्शनासाठी रांगा लावेल. काही काळ या यशात त्यांना न्हाऊन घेऊ दे. आपोआपच ही हिरीरी कमी होऊन यातल्या अंधश्रद्धेकडे किंवा श्रद्धेच्या बाजाराकडे त्यांचे लक्ष्य वळेल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com