Skip to main content

शब्द

लेखक अभिषेक पांचाळ यांनी शनिवार, 09/04/2016 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द , नीट वापरले तर सुख नाहीतर दुःखाचे मूळ नीट वापरले तर शहाणपण नाहीतर नुसतेच खुळ शब्द , नीट वापरले तर आनंद अन् चेहऱ्यावर येणारे हसू नाहीतर सारी दारं बंद अन् नुसतेच वाहणारे आसू शब्द , नीट वापरले तर दोन मनातील दुवा नाहीतर तोंडातून वाहणारी नुसतीच कोरडी हवा शब्द , एक असे औषध जे जोडतं मन नाहीतर तेच तोडण्याचं एकमेव साधन - अभिषेक पांचाळ
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 902
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया