Skip to main content

झेंडूची फुले

लेखक सुधीरन यांनी शुक्रवार, 08/04/2016 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
"दाखिव सखया मजला तू काय ठेविलास लपवुनी? आणिलास गेंद गुलाबाचे बागेतुनी कुठल्या (चोरुनी?) गजरा किंवा आणिलास तू (दहा रुपये खर्चूनी?) आणिलास नभिचे तारे वा तव हस्ताने याच तोडूनी?" "काय करायचे त्या गुलाबांचे सजावटी? काय करावे की गजरा अन तो माळुनी? काय करतेस ते नभीचे तारेच आणि? प्रिये तुजसाठीच 'झेंडूची फुले' आणिली वाचू आस्वादू चल तो काव्य रस चाखू न विसरु ते खाण्या आतिल खोबरे परंतु!"
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2354
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

ह्म्म्म.. तुमच्या हाती झेंडूची फुले म्हणजे सेहवागच्या हाती तेंडल्याची ब्याट असा प्रकार झाला तर...

झेंडूची फुले हे माझे अतिप्रिय पुस्तक! त्या पुस्तकाच्या प्रेमापोटिच हे काव्य लिहिले.

In reply to by सुधीरन

आमच्या एका मित्रांचेही हे अवडते पुस्तक. ह्याच पुस्तकावरुन प्रेरित होऊन त्यांनी 'मी माझा मग माझा कुणाचा' ह्या नावाने एक विडंबित चारोळ्यांचे पुस्तक काढले जे आख्ख्या व्होल महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झाले. कवीची स्वाक्षरी असलेली एक दुर्मिळ प्रत मजकडे आहे.

In reply to by सुधीरन

सध्या ही प्रत दुर्मिळ आहे. मात्र घरकुल प्रकाशनाच्या श्री व सौ पटवर्धन यांजकडे चौकशी केल्यास कदाचित एखादी प्रत तुम्हास मिळू शकेल.