Skip to main content

सूक्ष्मकथा : जंगल

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 07/04/2016 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
वाघाने डरकाळी फोडली. माकड झाडावर चढले. शेंड्यावर लपून अद्भुत हसले. अन तिथूनच घेतली उडी. खालच्या फांदीवर. वाघ झाडाखाली आला. जिभल्या चाटत पाणी पिला. अन घेतला एक सूर. पाणवठ्यात. ऊन तापले. पाणवठ्याच्या अवतीभवती गिधाडे. सूक्ष्मजंतूंचा नायनाट.अन पाण्यातला वाघ गारगार. कुठून आलं एक हरिण. बिथरुन बसलं काठावर. अन सुसाट पळालं माघारी. सैरावैरा. वाघाने जलक्रिडा केली. मग आला काठावर. अन झाडून अंग फोडली एक डरकाळी. भयचकीत. माकड पुन्हा शेंड्यावर. गिधाडे उडाली आकाशी. अन जंगलातली हरणे हिरव्या कुरणावर. सुसाट पळाली. वाघ जंगलात निघून गेला. पाणवठ्यावर गर्दी. वन्यजिवांची. त्यात होते हरिण, माकड अन गिधाडांची टोळी. मग पुन्हा दुसरा वाघ आला अन त्याने फोडली डरकाळी...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3167
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

खलील जिब्रानला फाईट?? ;) Sandy

रोज धागा काढलाच पाहिजे असं काही नाहीये अहो.. पुर्वी इथे चांगल्या पद्धती होत्या राव.. लोक लगेच अडल्या नडलेल्याला डायरी द्यायचे... श्या.. पुर्वीचे मिपा राहिले नाही ;)