Skip to main content

तू

लेखक आनंदमयी यांनी रविवार, 28/02/2016 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू मेघ सावळासा घनदाट गर्द ओला तू चांदवा निशेच्या केसात माळलेला तू सूर बासरीचा दूरात गुंजणारा पहिल्याच पावसाच्या तू स्वैर धुंद धारा तू साद अंतरीची देहा सुखावणारी तू शीत शांत छाया ह्या पेटत्या दुपारी तू गंध रंगलेला दारातल्या कळीचा तू नाद गुंजणाऱ्या ह्या सोनसाखळीचा रे मी समूर्त आज सजले तुझ्याचसठी हळुवार लाघवी हे हासू तुझेच ओठी हा गंध चंदनाचा पुरता तुझ्या हवाली विरहार्त आसवेही सगळी तुझीच झाली मी एकली धरेशी तू स्तब्ध ध्रूव दूर तुजवीण मी तुझ्यात विणते सशब्द सूर जग हे जरी न माने असणे तुझे सख्या रे देहात ह्या वसे जो, तो प्राणही तुझा रे © अदिती जोशी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2605
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

वाह

भारीच्च! खूप आवडली! अवांतर: मिपावर कवितांना हवी तितकी वाहवा का मिळत नाही?

In reply to by अमृता_जोशी

अवांतर: मिपावर कवितांना हवी तितकी वाहवा का मिळत नाही?
आपण विषय काढला आहेत तर आम्ही आमची धागा जाहीरात करुन घेतो. :) "मराठीमधील आणि मिपावरील सर्वोत्कृष्ट कविता कोणत्या"

अप्रतिम!!!!

नेहमीप्रमाणेच नादमय.