Skip to main content

मंदिरे व आक्रमणे

लेखक रमेश भिडे यांनी मंगळवार, 05/04/2016 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
भारतावर मुस्लिमांचे आक्रमण झाले व मंदिरावर हल्ले होऊन मंदिर पाड़ण्याल्या सुरुवात झाली . मंदिर हे भारतीय श्रद्धा स्थानाचे केंद्र बिंदुच आहे. त्या मागे शास्त्रिय कारण ही आहे मात्र अशा आपल्या श्रद्धा स्थानांवर मुस्लिम टोळक्यानि नेहमीच हल्ले केले आता ही असे अतिरेकी करतच आहेत. यात आपल्या काही महत्वाच्या मंदिराना कायमच नुकसान सहन कराव लागल. सध्या जे काही मंदिर प्रवेशा बाबत सुरु आहे तेहि काही असच आहे मंदिरात प्रवेशा च्या नावाखाली जो गोंधळ घातला जात आहे तो चिड निर्माण करणारा आहे. याला कारण हे असले आंदोलन करणारे पुरोगामी. आंदोलन करणाऱ्या महिला या नेहमी मंदिरात जाणाऱ्या व खरोखर देवभक्ति असणाऱ्या अथवा संत मीरा सारख्या कृष्ण वेड्या किंवा पांडुरंग प्रेमी जनाबाई सारख्या असत्या तर त्याचा हट्ट प्रत्यक्ष देवाला ही पुरवावा लागला असता मात्र आंदोलन कोणत्या महिला करत आहेत ज्यांचा व देव धर्माचा काडिमात्र ही संबंध नाही ज्या समलैंगिगतेच्या समर्थनासाठी भर रसत्यात एकमेकिना चुम्बन करतात अशा महिलांना मंदिर प्रवेश हवा आहे हेतु यांचा हेतु स्पष्टच आहे प्रसिद्धि आणि भक्तिच वातावरण गढुळ करणे याला मंदिर प्रशासन आपल्या पद्धतीने विरोध करत ही आहे पन काही गोष्टींचा विचार मात्र गम्भीरतेने होणे अनिवार्य आहे मंदिर समित्यानि मंदिरा मधे काही नियम कड़क करण्याची गरज आहे. आज किती मंदिर समिति मधे धर्मशास्त्र जाननारे सभासद आहेत त्यांची संख्या अजिबात नाही असेच म्हणावे लागेल समिति मधे धर्मशास्त्राच् अध्ययन केलेले विद्वान असतील तर देवतेला अनुकूल असे नियम बनवता येतील तिथे असणाऱ्या पूजकांची शुद्धता देखील पाहणे अनिवार्य आहे , मूर्ति शास्त्रातील माहिती किती जनाना असते हे सगळ लक्षात घेण्याची वेळ आली आहे या साठी दक्षिण भारतातील मंदिरांचा आदर्श घ्यायला हवा . आपण जर देवकलेची शुद्धता ठेवली तर लाखो आक्रमण सहन करण्याची व परतून लावण्याची ताकद तो ईश्वर आपणास देईल या साठी आपण ही शुद्धता व पवित्रता याचं पालन करायला हव देव मूर्तिला स्पर्श करण्या आधी आपण खरोखर किती शुद्ध अवस्थेत आहोत याचा विचार प्रत्येकाने करावा मंदिर हे ऊर्जा स्थान आहे तिथे प्रवेश केला की आपोआप च ती ऊर्जा तुम्हाला भेटनार आहे त्या गाभार्यात प्रवेश पहिंजे हा हट्ट का ? आणि खर तर जे मनापासून देवाला मानतात ते असल्या मुर्ख पणाच्या मागण्या करणार ही नाहीत या मागण्या करणारे कोण आहेत हे सामान्य लोक ओळखून आहेत मात्र आता सर्वानी जागे होण्याची वेळ मात्र नक्कीच आली आहे साभार-© तीर्थराज पैठणकर गुरुजी .

वाचने 19970
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

क्या बात है..!!! खरं आहे तीर्थराज पैठणकर गुरुजींचे म्हणणे. आमचे एक मित्र त्यांना टनाटनी म्हणतील ही गोष्ट वेगळी. ह्या धाग्याने खूपच विचारप्रवृत्त केलंय.

In reply to by प्रचेतस

क्या बात है..!!! खरं आहे अग्नीराज आगलावेकर आगोबाजींचे म्हणणे.त्यांचे एक मित्र त्यांना सनसनीखेज म्हणतील ही गोष्ट वेगळी. ह्या प्रति'सादा ने खूपच विचारप्रवृत्त केलंय.

In reply to by DEADPOOL

लोकाच्या घरी जावून पूजा सांगून घालतात. स्वतःच्या घरी बोलावून घालून्/घालवून घेतात. नक्की काय करायचंय तुम्हाला?

In reply to by प्रचेतस

इथे समताधिष्ठीत मंदिर प्रवेश विरोधात कुणी मांडणी करत असेल आणि ती अबेटमेंट ऑफ ऑफेन्स कुप्रोत्साहक/कुप्रेरक ठरलीतर दि बॉम्बे हिंदू प्लेसेस ऑफ पब्लिक वरशीप (एंट्री ऑथोरायझेशन अ‍ॅक्ट), १९५६ च्या कलम ५ मध्ये अबेटमेंट ऑफ ऑफेन्स (कुप्रोत्साहक/कुप्रेरकास) मुळ गुन्ह्या एवढेच शिक्षेचे बहुधा प्रावधान आहे. तेव्हा लेखन करताना सुयोग्य काळजी घ्यावी वाटल्यास पहावे. *संदर्भ : http://bombayhighcourt.nic.in/libweb/acts/1956.31.html संबंधीत संस्थळ दुवा पान दिनांक ६ एप्रिल २०१६ रोजी दुपारी १३ वाजुन ४५ मिनीटांनी जसे दिसले ** उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) लागू ** हा प्रतिसाद प्रचेतस यांच्या प्रतोसादस उपप्रतिसाद नाही केवळ धागा प्रतिसादांमध्ये वरच्या बाजूस दिसावा म्हणून दिला आहे.

In reply to by माहितगार

साली फुकट प्रसिद्धीसाठी हपापलेली काँग्रेसी मेंटॅलिटीवाली पाल! ता.क. हे काही विशिष्ट मनोवृत्तीच्या आंदोलनकर्‍त्यांना म्हटलंय, तुम्हाला किंवा कोर्टाला नव्हे. तेव्हा हे 'कुप्रोत्साहक/कुप्रेरकास' वगैरे भानगडीत येत नाही). ता.ता.क.आलं तर उपडून घ्या. बांधावरचं गवत. आणि गुरांना घाला. है कै नै कै.

In reply to by काळा पहाड

असे निंदाव्यंजक शब्द कुणाच्याही बाबतीत वापरू नयेत असे मत 'महत्त्वाची सूचना' धाग्यावर प्रकट झाले आहे.

मंदिर समित्यानि मंदिरा मधे काही नियम कड़क करण्याची गरज आहे कोण करणार? देवतेला अनुकूल असे नियम बनवता येतील कोण बनवणार? तिथे असणाऱ्या पूजकांची शुद्धता देखील पाहणे अनिवार्य आहे कोण पाहणार? मूर्ति शास्त्रातील माहिती किती जनाना असते हे शास्त्र कुणी तयार केले? सगळ्या प्रश्नांची उत्तर एकच आहे - "माणूस". देवाचा संबंध कुठे आला? देव/धर्म याची खरंच गरज आहे का? आता गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सर्वानी जागे होण्याची वेळ नक्कीच आली आहे

In reply to by रामपुरी

सध्या बिजी आहे नंतर आपल्याला काशी करण्याचे महत्व सांगेल! (टिप- येथे काशी करण्याचा अर्थ काशीयात्रा करणे असा घ्यावा. फुकाचा प्रतिसाद व आयडी उडायचा)

भारतीय मंदिरांवर झालेले मुस्लिम आक्रमण आणि महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सध्या चालू असलेले आंदोलन याची तुलना योग्य नाही असे मला वाटते. त्याशिवाय हा हिंदू धर्मियांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यामुळे मुस्लिमांना यात ओढणेही बरोबर नाही. हिंदू धर्मातील अनेक वाईट परंपरा आणि चाली-रीतींविरोधात वेळोवेळी आंदोलने होऊन त्या बंद पाडण्यात आपण यशस्वी झालो आहोत आणि ते हिंदू धर्मियांचे फार मोठे यश आहे. बदलत्या काळानुसार आपल्या परंपरा आणि चाली-रीतींमध्ये सुधारणा केल्या जातात आणि त्याकरता हिंदूधर्मीय लोक प्रयत्न करतात हेच हिंदू धर्माचे मोठे वैशिष्ठ्य आहे आणि आपल्याला त्याचा अभिमान वाटायला हवा.
ज्या समलैंगिगतेच्या समर्थनासाठी भर रसत्यात एकमेकिना चुम्बन करतात अशा महिलांना मंदिर प्रवेश हवा आहे
मग समलैंगिक लोकांना मंदिर प्रवेश नाकारायचा असे आपले म्हणणे आहे का? तसे असेल तर आपण कित्येक दशकांपूर्वी प्रचलित असणाऱ्या समाजव्यवस्थेकडे परत जाऊ, कारण समाजातील काही घटकांना मंदिरात प्रवेश नाकारणे हे बहुतेक काही दशकांपूर्वी होत असे. देवाच्या दारात सगळे समान असतात त्यामुळे मंदिर प्रवेशाकरता नियम असण्याची / करण्याची गरजच नाही. राजकारण सोडले तर सध्या मंदिर प्रवेशासाठी चाललेल्या आंदोलनाचे आपण स्वागतच करायला हवे.

देवळांत उर्जा बिर्जा काही नसते. देवळांत पावित्र्य, उर्जा इत्यादी सगळ्या कायदेशीर दृष्टीने भाकड कथा आहेत. असल्या argument करून कोणीही जिंकत नाही पण मूर्खपणाचा शिक्का मात्र पडतो. गाभार्यांत प्रवेश वगैरे ज्या चळवळी सुरु आहेत त्यांचा विरोध केला पाहिजे पण असली फालतू कारणे दिल्याने नुकसान जास्त आहे. महिला किंवा समलिंगी लोक पवित्र नाही आहेत असे म्हणायचे आहे का ? रस्त्यांत चुंबन घेणाऱ्या व्यक्ती पवित्र नाहीत म्हणायचे आहे का ? इंटरनेट वर पोर्न पाहणार्या व्यक्ती पवित्र नाही आहेत का ? रास्त argument : देवूळ ही कुणाची तर मालमत्ता आहे. माझ्या घरांत कुणाला प्रवेश आहे नाही हे ठरविण्याचा अधिकार मला आहे त्याच प्रमाणे देवूळ ज्या लोकांची मालमत्ता आहे त्यांना देवळांत कुणाला किती अधिकार द्यावा हे ठरविण्याचा अधिकार आहे. ज्या शनि-भक्तांना शनि शिंगणापूर चे नियम पसंद नाहीत त्यांनी आपले वेगळे शनि मंदिर बांधून तेथे आपल्याला पाहिजे तसले नियम काढावेत. इतर लोकांच्या मालमत्तेवर अतिक्रमण करू नये. ह्या प्रकारचा युक्तिवाद कदाचित कोर्ट मध्ये आणि पब्लिक मध्ये सुद्धा चालू शकतो. हे उर्जा, पावित्र्य वगैरेच्या गोष्टी चालणार नाहीत. मुळांत स्वतःला निधर्मी मानणारे सरकार हिंदू लोकांच्या देवळांवर अतिक्रमण करणार तेंव्हा ह्या असल्या समस्या उत्पन्न होणारच. देवूळ सरकारी मालमत्ता असेल तर कुणालाही प्रवेश नाकारणे कायदेशीर दृष्ट्या अशक्य वाटते. सरकारी मालमत्तेच्या दृष्टीकोनाने देवूळ आणि सार्वजनिक शौचालय ह्यांत फरक नाही. ह्या प्रकारचे विधान काही हिंदुना भावना दुखावणारे वाटेल पण ज्या क्षणी हिंदूनी सरकारला आपली देवळे ताब्यांत घ्यायला दिली त्या क्षणी देवळांचे पावित्र्य वगैरे सगळे खड्ड्यांत गेले. सम-लैगिक लोकांना विरोध हे ख्रिस्ती, इस्लाम मध्ये समजते. हिंदू लोकांनी हा विरोध कुठून उत्पन्न केला ते समजत नाही. आणि भर रस्त्यांत चुंबन देणे आणि देवूळ प्रवेश ह्यांचा संबंध काय? माझ्या मते सम लैगिकनी आपले चुंबन देवीचे देवूळ काढावे आणि खुशाल वाट्टेल तेव्हडी चुंबने द्यावी. वर्गणी मी द्यायला तयार आहे.

In reply to by साहना

रास्त युक्तिवाद म्हणुन जे लिहिले आhe ते कोर्टात टिकणार नाही. स्त्री पुरुष असमानता कोर्ट मान्य करत नाही. मुसलमानांनी देवळं पाडली वगैरे या लेखात्का लिहिलेय समजले नाही. .... लंगड्या शनिदेवाला रामराम ठोकून लंगड्या तैमुरलंगाचा प्रेरणादायी इतिहास वाचणारा . आ. न. ?

In reply to by lgodbole

गोडबोले तुम्हाला तैमूरलंग लंगड़ा होता ह्याव्यतिरिक्त अजुन काही माहीत आहे का?

In reply to by lgodbole

स्त्री पुरुष असमनतेचा प्रश्नच नाही. प्रश्न "खाजगी मालमत्तेचा" आहे. कोर्ट जात सुद्धा मनात नाही म्हणून "मराठा वधू पाहिजे" जाहिरात बेकायदेशीर ठरते काय ? समानतेचा फक्त सर्वानाजिक गोष्टींत असतो, खाजगी बाबतीत लागू होत नाही.

In reply to by साहना

१९४७च्या आधी जी काँग्रेस जिवंत होती तिने सामाजिक समतेच्या आश्वासनावरच जनतेचा पाठींबा मिळवला होता आणि भारतीय राज्यघटना त्या आश्वासनांचे देणे लागते. भारतीय राज्यघटना जन्माधारीत विषमतेस नाकारते. खाजगी वगैरे गोष्टी नंतर, "अबकड जाती धर्माची/वर्ण वधू/वर पाहीजे" ह्या बद्दल मी कदाचित कायद्याचा बडगा घेऊन शिक्षा देणार नाही पण आदर्श नागरीकत्वही नव्हे असेच सांगेन.

In reply to by साहना

सर्वसामान्यपणे माझ्यामते ट्रस्ट ही सार्वजनिक मालमत्ता मानली जाते. वर्तमानपत्रीय वाचनावर आधारित. चुकीचे असल्यास थांबा.

In reply to by साहना

निदान त्या गावापुरती मालमत्ता तरी मानली पाहिजे. जर त्या गावातील स्त्रियांचा गाभाराप्रवेशाकरिता ह्ट्ट्/आग्रह नाही तर इतरांना काय पडली. इतरांनी आपल्याला आवडेल तशी मंदिरे खुशाल बनवावीत..हिंदू धर्मात इश्वराचे साकर रुप कसे असावे यावर काही बंधन नाही. प्रत्येकजण आपापल्या कल्पनेप्रमाणे साकारु शकतो.

In reply to by साहना

"देवळांत उर्जा बिर्जा काही नसते. देवळांत पावित्र्य, उर्जा इत्यादी सगळ्या कायदेशीर दृष्टीने भाकड कथा आहेत." हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय साहना मॅडम ? जे आध्यात्मिक साधना करणारे व धर्मनियम पाळून उपासना करणारे लोक आहेत ,त्यांनाच अशा गोष्टी समजू शकतात . तुमची आध्यात्मिक योग्यता अथवा पातळी किती ? असा प्रश्न मी येथे विचारला तर चालेल का?

In reply to by उडन खटोला

अध्यात्मिक पातळी वगैरे सगळे थोतांड आहे. ज्याला विश्वास ठेवायचा आहे त्याने ठेवावा. असल्या भाकडकथा सांगून नियम बनवता येत नाहीत.

In reply to by साहना

तुमचे बरेचसे विचार पटले. फक्त एव्हढे सान्गावेसे वाटते कि सर्व देवळात कोणालाहि प्रवेश नाकारता येउ नये. जर देऊळ खाजगी माल़कीचे असेल तर तसे जाहीर करावे व दरवाजा बन्द ठेऊन आत येणार्या व्यक्तीला नियम सान्गावे व त्याप्रमाणे वागायची तयारी असेल तरच प्रवेश द्यावा.

कड़क व् पटेल असा युक्तिवाद! ह्या मंदिरप्रवेश महिलाबद्दल एक प्रश्न पडतो. आपल्या देशात इतर अनेक समस्या असताना ह्या पेज3 महिला तिथे का लक्ष घालत नाही?

In reply to by भंकस बाबा

विषय अगदी सोपा आहे. ह्या प्रकारच्या गदारोळात खूप पैसा आहे. त्या प्रकारचा पैसा आमटे परिवार जे करतो त्यांत नाही. कान्हया ला पहा ना, काही तरी फालतू आंदोलन करून आज तो अनेक लोकांच्या गळ्यांतील ताईत झाला आहे आणि देश भर फिरत आहे.

उंपकराव:नको पुन्हा हे तंपकराव:बरोबर आहे उंपकराव:बघा ना रोज रोज तेच वाद तंपकराव:ह्या लोकांकडे दुसरे मुद्दे नसल्याने ते असे लिहितात आणि चर्चा भरकटवली म्हणून आपल्या नावाने शिमगा करतात उंपकराव:आता आपण आपले प्रतिसाद एकमेकांना द्यायचे नाही,त्यांना डू आयडी चा संशय येतोय। तंपकराव:येऊ दे ब्लॉक केला कि आपण आपला रिसर्व आयडी काढायचा बाहेर दंगा करायला, हाय काय नाय काय।

आंदोलन करणाऱ्या महिला या नेहमी मंदिरात जाणाऱ्या व खरोखर देवभक्ति असणाऱ्या अथवा संत मीरा सारख्या कृष्ण वेड्या किंवा पांडुरंग प्रेमी जनाबाई सारख्या असत्या तर त्याचा हट्ट प्रत्यक्ष देवाला ही पुरवावा लागला असता मात्र आंदोलन कोणत्या महिला करत आहेत ज्यांचा व देव धर्माचा काडिमात्र ही संबंध नाही
http://scroll.in/article/802721/meet-trupti-desai-the-woman-who-wanted-… हा लेख वाचावा, म्हणजे असा गैरसमज होणार नाही. कोणी सांगितले तुम्हाला की या महिलांचा आणि देवधर्माचा काही संबंध नाही?

In reply to by माहितगार

समर्थन नाही करत !! .. फक्त विषमता दुर करण्याची एवढीच हौस आहे तर ती सगळीकडचीच दुर करावी, एवढचं म्हणनं आहे... बाकी काही नाही.

In reply to by 'पिंक' पॅंथर्न

तेच तर भारतीय मुस्लीम महिला आंदोलंन या विषयावर त्यांच्या धर्मातील समतेसाठी समांतर आंदोलन करते आहे. बाकी तुम्ही तुमच्या प्रार्थनास्थळात/मंदीरात तुमच्याच महीलांना समान वागणूक समान अधिकार देण्याचा प्रश्न आहे. दुसर्‍या धर्मातील लोक मागास विचाराचे आहेत तो पर्यंत आपल्याही धार्मीक विचार मागास ठेऊया हा तर्क तुमच्याच धर्मातील तुमच्याच आया, बहीणी, मुलींवर अन्याय करत असतो किंवा कसे.

In reply to by माहितगार

नाही, माझा पाठिंबाच आहे स्त्रियांच्या मंदीर प्रवेश आंदोलनाला. तुमच्या म्हणन्याप्रमाणे विषमता वाईटचं. मग आपला धर्म- दुस-याचा धर्म ही विषमता नाही का ???

In reply to by 'पिंक' पॅंथर्न

तुमचं म्हणण बरोबर आहे. बेसिकली सर्वच धर्मात धर्मगुरु/पुजारी या लेव्हललाच स्त्रीयांना कायद्याने समान संधी मिळवून दिली की पुढचा प्रश्न अलगद सोपा व्हावा. एका धर्मातील स्त्रीयांनी दुसर्‍या धर्मातील स्त्रीयांना पाठींबा द्यावयास हवा. अर्थात स्त्रीयांचे स्वतःच माघार घेणे मोठी समस्या आहे नाही तर लोकशाही मतदानात समान संधी, कायद्याचे पाठबळ गेल्या ६० वर्षापासून, ३३ टक्के स्थानिक स्वराज्य संस्थातील जागा एवढे करुन तृप्ती देसाई असो अथवा भारतीय मुस्लिम महिला आंदोलन एकही स्त्री नगरसेविका/आमदार पुढाकार घेऊन त्यांच्या आंदोलनांच्या मागे उभी रहाताना अथवा स्वतंत्रपणे आंदोलन चालवताना दिसत नाही. एवढ सगळ होऊन मिपावर एखादी अनाहिता निषेधाचा धागाही काढताना दिसत नाही. उलटे आम्रेकेत बसून काही मंडळी काळाची पावले मागे टाकणार्‍या गोष्टींचे समर्थन करत आहेत सगळेच अजब आहे.

In reply to by माहितगार

@'पिंक' पॅंथर्न बघितलं? किती सोपंय ते! ह्यांनी हे करायला हवं, त्यांनी ते करायला हवं. टीका मात्र आम्ही फक्त हिंदू धर्मावरच करणार.

In reply to by काळा पहाड

...टीका मात्र आम्ही फक्त हिंदू धर्मावरच करणार.
काळा पहाड, असा समज बाळगण्याचा तुमचा हट्ट असेल तर कुणि काही करु शकेल का ? पण तुमच्या दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती नसावी, माझे हिंदू धर्माची, हिंदू संस्कृतीची बाजू घेणारे धागे आहेत प्रतिसाद आहेत तसेच उणीवांबद्दल टिकाही आहेत. हिंद्वेतर धर्मांच्याबाबतही असेच बाजूने आणि टिकात्मक लेखन मिपावर बरेच केले आहे. माझा चष्मा विशीष्ट नक्कीच नाही हे निश्चित. आपल्याच माता भगिनींना अधिकार देण्याचा प्रश्न आहे. आपल्या लोकांना आपण अधिकार देणार नाही तर कोण देणार ? तरीही या पुर्वी विषय चघळून झाला असल्याने मेगा बायटी प्रतिसाद देण्याचेही टाळले आहे. जेवढे लिहिले तेवढेही खुपते आहे !

In reply to by माहितगार

अधिकार मिळाला पाहिजे हे माझंही (आणी बाकी बर्‍याच जणांचं) मत आहे. प्रश्न आहे की एका काँग्रेस च्या बाईला पब्लिसिटी कमवायचीय म्हणून तिनं जिथं तिथं तमाशा करावा का हा. आणि तो हिंदूंच्याच देवळाबद्दल का करावा हा. हिंदूंच्या देवळाबद्दल हिंदू बघून घेतील. एका इटालियन बार डान्सर च्या (मुसलमान, पक्षी, अतिरेक्यांबद्दल सहानुभूती दाखवणार्‍या) ख्रिश्चन पक्षानं ते हिंदूंना सांगू नये. मुद्द्या ला पाठिंबा आहे. प्रश्न उचलणार्‍या लोकांबद्दल जळजळीत द्वेष आहे. हो. आहेच.

In reply to by माहितगार

माहितगार, तुमच्या या विधानास माझा कडाडून आक्षेप आहे :
>> आपल्याच माता भगिनींना अधिकार देण्याचा प्रश्न आहे.
भारतीय संस्कृतीत अधिकारापेक्षा कर्तव्यांना जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे स्त्रियांची (आणि पुरुषांचीही) कर्तव्ये काय आहेत त्यानुसार कामाची वाटणी झाली पाहिजे. आ.न., -गा.पै.

In reply to by माहितगार

धर्मसंस्था आणि राजसंस्था यांनी एकमेकांत ढवळाढवळ करू नये. कायद्याच्या बडग्याने धर्मसुधारणा हा काहीसा विचित्र प्रकार वाटतो. किमान अशा वेळी कि जेव्हा धर्मसंस्थेचे नियम व्यक्तीच्या मुलभूत गरजा व हक्कांच्या आड येत नाहीत तोवर.

In reply to by 'पिंक' पॅंथर्न

मुस्लिम धर्मतील असमानता दूर करायला त्यान्च्या धर्मातील लोकानी व महिलानी प्रयत्न केले पाहिजेत ट्यान्च्या धर्माची वागणुक अशी आहे कि त्यान्च्या धर्मात जर इतर धर्मीयानी धवळाधवळ करायच प्रयत्न केल तर ते सर्वे त्यान्च्यावर तुटुन पडतील. तेम्व्हा हिन्दूनी आपल्या धर्मतील असमानता कशी दूर करता येइल तेच पहावे.

तीर्थराज पैठणकर गुरुजी अगदी योग्य म्हणत आहेत. मात्र देवाच्या तथाकथित भक्तांना अक्कल येईल असे वाटत नाही. धर्माला ग्लानी आल्याने आता देवानेच अवतार घेऊन काहीतरी केले पाहीजे. आपण सार्‍यांनी त्यासाठी अनन्यभावाने प्रभूची प्रार्थना करूया. रच्याकने, मला एक प्रश्न आहे. धर्मशास्त्र म्हणजे नेमका कोणता ग्रंथ?

देवस्थान समितीला स्वतः ला मंदिर संस्थान परिसरात स्वतःचे कायदे आणि नियम लागू करण्याचे अधिकार आहेत. त्या नियमांचा भंग हा कायदेशीर अपराध असू शकतो. महिलांना चौथर्यावर प्रवेश हवा असेल तर धर्मादाय आयुक्तांना देवस्थान समिती बरखास्त करून नवीन नियम आणावे लागतील , हि कायदेशीर procedure आहे बाकी पैठणकर गुरुजी सनातनी आहेत आणि तृप्ती देसाई यांनी महिलांच्या इतर गंभीर समस्यांकडे लक्ष द्यावे.

ह्या हिंदुंशी संबंधित धाग्यांवर मुस्लिमांबद्दल मुद्दा मांडून विषय भरकटवला जातोय. सहज आपलं नोंद करावी म्ह णून प्रतिसाद दिलाय. बाकी चलुद्या.

आज मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून राडा करतात आहेत .. उद्या मंदिर समिती , तसेच इतर मंदिरातील पदे यासाठी राडा करतील ..यांचा हेतू ...देव भक्ती नसून पैसा भक्ती आहे ..

In reply to by अमित_निंबाळकर

पुरुष बायकाना विरोध करताहेत म्हणजे पुरुषानाही त्या जागा बळकवायच्या आहेत. असे म्हणायचे का?

In reply to by lgodbole

पुरुष पूर्वीपासून त्या पदांवर आहेत ते का विरोध करतील ?? महिलांना प्रवेश हवा आहे पण का ?? याने काय सध्या होणार आहे ??

In reply to by अमित_निंबाळकर

मंदिरातल्या प्रवेशाच मागाहून बघू; मंदिर समिती, तसेच इतर मंदिरातील पदे आणि तेथील स्वच्छ अथवा भ्रष्ट जो काही कारभार असेल त्यात महिलांना वाटा का नको ? ते तर आधी सांगा !

In reply to by माहितगार

पुरुष आणि स्त्री यात काही भिन्नता आहेत ... समानता कोणत्या पातळीवर हवी आहे स्त्रियांना हे अगोदर स्त्रियांनी ठरवायला हवे आहे ...उद्या पुरुष देखील त्यांच्या समानतेसाठी स्त्रियानकडे मागण्या करतील .. पण काही गोष्टी विज्ञानाला धरून तसेच भावनिक पातली समजून केल्या पाहिजेत. मंदिराची रचना त्याचा प्राचीन काल त्यावेळेची परिस्थिती हि काय होती हे तपासाव लागेल ..महिलांना प्रवेश का नको हे तेव्हाच समजेल .. पण एखादी पद्धत बदलायची असेल तर ती आंदोलनच्या मार्गातून बदलाने हे चुकीचे ...विषय चव्हाट्यावर आला कि शेंबड पोरगपण त्यावर बोलू लागत ..त्याचे परिणाम चागले होतात असे नाही ??

In reply to by अमित_निंबाळकर

मंदिर समिती, तसेच इतर मंदिरातील पदे आणि तेथील स्वच्छ अथवा भ्रष्ट जो काही कारभार असेल त्यात महिलांना वाटा का नको ? याचे उत्तर बाकी आहे अमितजी, . . . . बाकी कायदा त्याची त्याची वळणे घेतो त्यामुळे मंदिर प्रवेशाचे कायद्याने काय ते होईल. * कायदे विषयक एक सर्वसाधारण लक्षवेध ** समताधिष्ठीत मंदिर प्रवेश विरोधात कुणी मांडणी करत असेल आणि ती अबेटमेंट ऑफ ऑफेन्स कुप्रोत्साहक/कुप्रेरक ठरलीतर दि बॉम्बे हिंदू प्लेसेस ऑफ पब्लिक वरशीप (एंट्री ऑथोरायझेशन अ‍ॅक्ट), १९५६ च्या कलम ५ मध्ये अबेटमेंट ऑफ ऑफेन्स (कुप्रोत्साहक/कुप्रेरकास) मुळ गुन्ह्या एवढेच शिक्षेचे बहुधा प्रावधान आहे. तेव्हा लेखन करताना सुयोग्य काळजी घ्यावी वाटल्यास पहावे. *संदर्भ : http://bombayhighcourt.nic.in/libweb/acts/1956.31.html संबंधीत संस्थळ दुवा पान दिनांक ६ एप्रिल २०१६ रोजी दुपारी १३ वाजुन ४५ मिनीटांनी जसे दिसले ** उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) लागू

In reply to by माहितगार

मंदिर शेकडो वर्षापूर्वी बनले कायदा आजच्या युगातला ?? मग कसा apply होणार ?? समंजस पणा आणायला हवा .. काही विशिष्ट मंदिरातच स्त्रियांना प्रवेश नाकारण्यात येतो .. स्त्री आणि पुरुष यात भिन्नता आहे ..म्हणून काहीतरी करणे असावीत जेणेकरून प्रवेश निषिद्ध ठरवण्यात येतो .. आपल्या देशात अनेक संप्रदाय आहेत .. प्रत्येकाची वेगवेगळी विचारधारा आहे .. अनेक साम्प्रयानी वेगवेगळे प्रयोग त्यांच्या संप्रदायात केले आहेत ..व ते त्या वेळेस ते यशश्वी हि झाले आहेत .. पण बदल अश्या मार्गाने अनुचित आहे .. याने भारतीय संकृतीचीच बदनामी होते .. विचार परिवर्तन करायला हवे अगोदर .. मग आपले घर हि मंदिरच आहे हे कळेल ..आपले शरीर हि मंदिरच आहे ..

In reply to by अमित_निंबाळकर

मंदिर समिती, तसेच इतर मंदिरातील पदे आणि तेथील स्वच्छ अथवा भ्रष्ट जो काही कारभार असेल त्यात महिलांना वाटा का नको ? याचे उत्तर अद्यापही बाकी आहे अमितजी,

तीर्थराज पैठणकर गुरुजींनी श्री रमेश भिडे यांना हा लेख मिपावर प्रकाशित करायला परवानगी दिलीय का ?

अजुन ५० वर्षांनी... देवळात शिरा, लाडु, खोबरे प्रसाद म्हणुन तेच तेच का खायचे? आम्हा मांसाहारी प्रेमींना प्रसाद म्हणुन चिकन नगेट्स, चमचाभर खिमा मिळाले पाहिजेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मांसाहारामुळे माणूस अपवित्र होतो काय? आणि देव तर बिचारा काहीच खात नाही. त्याला सगळे समान. गाभार्‍यात उंदिर झुरळे पाल असली काय आणि माणसे असली काय. त्याच्या लेखी हे सगळे जीवच. इतकेच नव्हे, तर जडचेतनामध्येसुद्धा फरक ईश्वर का करेल?

In reply to by राही

तेच तर मी म्हणतोय तुम्ही व्हा नगेट्स तळायला पुढे मी येतोच मागुन (खायला)

In reply to by राही

मग बसा एखाद्या मंदिराबाहेर मांसाहारी पदार्थ घेऊन, हाय नाय ती सहिष्णुता फटक्यात रंग बदलते की नाही ते बघा! असा कोणता क्रांतिकारी बदल घडून येणार आहे चौथर्यावर गेल्यावर? हे लोक असे दाखवत आहे की आम्हीच सुधारणा घडवून आणत आहोत. जरा तो मुम्बईतला स्त्रीपुरुष रेशो बघा, मुलींचे प्रमाण अजुन कमी आहे. त्यासाठी काहीतरी कराना.

In reply to by भंकस बाबा

मी काय करावं हे मला ठाऊक आहे असं मला वाटतं. मी इथे कोणताही अजेंडा मांडलेला नाही. म्हणजे कोणी मंदिराबाहेर काही तळत बसावं वगैरे. इथे सहिष्णुतेचा वादही मी आणलेला नाही किंवा स्त्रीपुरुष रेशिओही. त्याही आघाडीवर अनेकांचे काम सशक्तपणे चालू आहेच. आणि केवळ मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातही रेशिओ कमीच आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्याला इच्छा आहे तो प्रत्येकजण आपापलं लहानमोठं वर्तुळ निवडून काही ना काही करत असतोच. सगळ्यांनी एकाच विषयावर (तेही दुसर्‍याने सुचवलेल्या) काम करावं असं घडत नसतं. परंपरा सतत बदलत असतात हे सांगायचं होतं. आणि बदलास प्रतिकार जितका जास्त तितका तो बदल झपाट्याने घडतो हेही अनेक वेळा दिसून आलेले आहे. 'केला जरी पोत बळेंच खालें, ज्वाळा तरी ते वरती उफाळे', हे स्वयंसिद्ध आहे.

In reply to by राही

काडीचीही किमंत कट्टर हिंदुत्ववादी देणार नाही. सहिष्णुता तुमची नाही तर हिंदुत्ववादयाची बिथरेल. प्रतिसादातला विनोद लक्षात घ्या. थंड डोक्याने विचार करा. अनेक समाज उपयोगी कामे असताना मंदिरप्रवेश सारख्या क्षुल्लक गोष्टीवर रान माजवु नका. माझे म्हणने असे आहे की या महिलांनी गर्भलिंग परीक्षा, मुलींचे शाळेतील ड्रॉपआउट, त्यांचे कुपोषण, त्यांची परवड यासारख्या ज्वलन्त मुद्द्यावर काम करावे. त्यांच्या कामाने एकदा काय या महिलेंचि ओळख झाली तर कोणीही माईचा लाल त्यांना मंदिर प्रवेशापासून रोखु शकणार नाही. उदाहरण पाहिजे तर अण्णा हजारेकडे पहा. त्यांनी फक्त वाचाळविराचे काम केले नाही तर राळेगणसिद्धिसारख्या गावाचा कायापालट केला. आता हजारेना शिंक जरी आली तरी सरकारला त्याची दखल घ्यावी लागते. ह्या महिला महाराष्ट्रमधील गड़ किल्ले सोडून डायरेक्ट एवरेस्टवर चढ़ाई करायला बघत आहेत. दमाने घ्या एवरेस्टपण दूर नाही.

In reply to by भंकस बाबा

प्रतिसाद मला उद्देशून आहे म्हणून उत्तर देणे भाग आहे. प्रतिसादातला 'विनोद' आणि त्याची गर्भित धार लक्ष्यात आली. एक तर कोणी काही किंमत द्यावी म्हणून मी लिहीत नाही. दुसरे म्हणजे अनेक क्षेत्रात महिलांचे अनेक समाजोपयोगी विषयांवर हिरिरीने काम चालू आहे याची माहिती आपणास नसेल तर त्याची जंत्री इथे देण्यात मला स्वारस्य नाही. केवळ हिंदूच नव्हे तर इतर धर्मांतल्या सुधारणावाद्यांना बळ देण्याचे काम गाजावाजा न करता सुरू असते हे मला माहीत आहे. आपण उल्लेख केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर समविचारी महिलांकडून काम होत आहे. त्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात इतक्या मग्न आहेत की कदाचित हे अनाहूत सल्ले विचारात घेण्याइतका वेळही त्यांच्यापाशी नसेल. आणि अण्णा हजारेंचे गैरलागू उदाहरण हेच दाखवून देते की महिला किती वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करीत आहेत याची माहिती एकतर आपल्याला नाही किंवा माहीत असूनही आपण दुर्लक्ष्य करीत आहात. आणि शिवाय, मंदिरप्रवेशाच्या आंदोलनाची दखल सरकारला, न्यायसंस्थेला घ्यावी लागली आहे. असो. आता नेहमीप्रमाणेच, अधिक काही लिहिण्याची इच्छा नाही. प्रतिसाद देण्या न देण्याचा हक्क राखून ठेवीत आहे.