Skip to main content

महत्वाची सूचना

लेखक सरपंच यांनी सोमवार, 04/04/2016 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व सदस्यांना सूचना. मिसळपावचे धोरण सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा नजरेखालून घालावे ही विनंती. यात उल्लेख केलेल्या बाबींव्यतिरिक्त आणखी एक बाब स्पष्टपणे सांगू इच्छितो, की गेल्या काही दिवसांत सदस्यांनी एकमेकांना असांसदीय भाषेचा वापर करून त्रास देण्याचे प्रकार वाढलेले नजरेस आले आहेत. मिसळपाव हे आपले सर्वांचे आणि सर्वांसाठी असले तरी वादाच्या भरात किंवा केवळ भडकवण्याची हेतूने असे वैयक्तिक अपमानास्पद लिखाण करणारे सदस्य संस्थळाचे वातावरण बिघडवतात तसेच अन्य वाचकांमधे संस्थळाची वाईट प्रतिमा उभी करतात. कृपया हे प्रकार टाळावेत आणि संस्थळावरील आपला वावर सभ्यतेच्या मर्यादांमधे बसतो आहे ना हे प्रत्येकाने पहावे. तसेच आपला तोल किंवा भान सुटते आहे का याकडे लक्ष द्यावे. असे घडत असल्यास त्याला दुसरा कोणी जबाबदार आहे वगैरे सबबी न देता प्रगल्भतेने वागून आपला संस्थळावरील वावर सर्वांनाच किमान सुसह्य होईल हे प्रत्येकाने पहावे. कोणत्याही कारणाने वैयक्तिक मतभेद झाल्यास तक्रार करण्यासाठी संपादक मंडळ आणि सरपंच हे दोन आयडी उपलब्ध आहेत त्यांना संपर्क करावा. धाग्यावर स्कोर सेटलिंग करण्याचा प्रयत्न करू नये. जे सदस्य याचा विचार न करता दुसर्‍या कोणाला अपमानास्पद अशा प्रकारचे धागे, प्रतिसाद यांचे लिखाण करतील, किंवा संपादकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून दंगा माजवतील/अन्य सदस्यांना किंवा व्यक्तींना उद्देशून असांसदीय भाषा वापरतील अशांचे सदस्यत्व आणखी कोणत्याही सूचनेशिवाय त्वरित स्थगित केले जाऊ शकते याची नोंद सर्वांनी कृपया घ्यावी. अशी अप्रिय वेळ येऊ न देण्याची जबाबदारी प्रत्येक सद्स्यावर राहील. कृपया सहकार्य करावे. धन्यवाद.

वाचने 46823
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

In reply to by माहितगार

मला वाटते २ प्रकारचे व्यक्तिगत हल्ले आहेत. १. एखद्याला समोरासमोर शिव्या देणे - उदा. तू मूर्ख आहेस. २. एखाद्याला (चुकिच्या गृहीतिकाच्या आधारावर) स्टीरीओटाइप करणं - उदा. तुम्ही क्षयज्ञ समर्थक, तुम्ही असेच म्हणणार दोघांची पेनाल्टी सारखीच असायला हवी का?

In reply to by अत्रे

१) मी सदस्यांच्या आपापसातील संवादातील सभ्यतेस अधीक महत्व देईन, २) मी मिपा बाह्य गोष्टीवर कॉमेंट करताना कायद्याच्या कक्षेत बसणारे अधिकतम व्यक्ती स्वातंत्र्य देईन आणि ते व्यक्ती स्वातंत्र्य कसेही वापरले तरीही त्याच्या अगेन्स्ट मध्ये मिपासदस्याच्या अगेन्स्ट व्यक्तीगत टिकेने स्कोर सेटल करण्याचे समर्थन करणार नाही. ३) जिथ पर्यंत तर्कदोष आणि विरुद्ध संदर्भ दाखवून प्रसंगी विरुद्ध कठोर टिका करुन काम भागते तेथ पर्यंत मी पेनल्टी सहसा लावणार नाही. पण आपण संयम बाळगूनही सदस्यांच्या आपाप्सातील संवादासाठी अभिप्रेत किमान स्वरुपाच्या सभ्यतेस सातत्याने अडकाठी येत असेल तर मी पेनल्टी लावेन मी म्हणजे माझे व्व्यक्तीगत मत, माझा मिपा प्रशासनात सहभाग नाही हे जाणत्यांन माहित आहेच. अत्रेजी मी आपण विचारल्या पेक्षा अधिक लिहिले त्या बद्दल क्षमस्व आणि आपल्या प्रतिसादांसाठी खूप धन्यवाद.

सरपंच, खोटे सदस्यखाते घेवून ग्रामपंचायत मधे गोंधळ घालणार्या शिखंडींना कोंडवाड्यात घालून खोडव्यात घ्या.

मायला या धाग्याचं पन काश्मीर हिनर की काय? बाकी तजोंची लय आठवन येउन र्‍हायली.. अजून आले न्हाइत ते? उडाले बिडाले की काय?

In reply to by आनन्दा

आनंदा, कधी कधी आपणही पॉपकॉर्नचा डबा घेऊन शांतपणे बाल्कनीत बसलं पाहिजे. दांभिकतेचे खेळ बघायला फार मजा येते. और का कही. आप खुद समझदार हो. बाकी, आम्ही ह्या धाग्याच्या तिसर्‍या परिच्छेदानुसार आजच निघालेल्या एका धाग्यावर कारवाईची वाट बघतोय.

In reply to by तर्राट जोकर

वाट बघा!!! वाटच बघा!! नाही बघतच रहा आता!! वाट म्हणे तुम्ही !! (तुम हम है हम तुम है इसका वो उसका ये लाहौल विलाकुवत )

In reply to by तर्राट जोकर

डोंबलाचं गांभीर्य! (यु रेड इट राईट) चार दिवस वय असलेले आयडी , "गुरुजींचे आत्मविश्व"कार लोकांना येऊन भोंदू पुजारी वगैरे म्हणून जातात इथे कसले गांभीर्य असणार! असल्या आयडीच्या अस्तित्वाचे कारण फ़क्त द्वेष् असतो! बाकी काही नाही! असो!

धन्यवाद मिपावर नाव बदलण्याची सोय आहे का?

सहकार्य होते, राहीलही. सर्वांना समान न्याय असावा असे राहून राहून वाटते. अखिल मिपा नववाचक, नव मिपासाक्षर , मिपासाक्षर ते सभासद, मिपासभासद ते प्रतीसादक,मिपाप्रतीसादक ते लेखक, मिपालेखक ते आस्वादक,मिपाआस्वादक ते प्रतीसादक चळवळ संघाचा फुटकळ सभासद नाखु.

मिपा संस्थळ सदस्य चालवतात मालक संपादक न्हवे त्यामुळे एकदा ध्येय धोरणे(एकतर्फी) स्पष्ट केल्यावर पुन्हा या धाग्याची गरज काय ? एकदा का पक्षपातीपणा अधिकारी लोकांना टाळ्ता आला तरी मिपाचे कल्याण आहे अन ते होत नसेल तर हे मोरल पोलिसिंग फुकट आहे हे अजुनही धागाकर्ते समजू शकले नाहित हे दुर्दैव आहे 2013 ते 2016 मिपाव्र सॉलिड इण्टोलरन्स वाढला होता आशा आहे आता तरी असे होणार नाही संस्थळ मालकसल्लागारांबद्दल आदर आहेच पण झेपत नसेल तर त्यांनी ताण घेतलाच पाहिजे अशी अजिबात अपेक्षा नाही अन वातावरण निट ठेवायला शॉर्टकट मारावेत हे तर अजिबात पसंत नाही

सरपंचांच्या दंगा घालु नका धाग्यावर दंगा झालेला पहिल्यांदाच पाहिला. इथेच चार दोन नमुने आहेत भाषेसंदर्भात..

यानिमित्ताने अन्य एका संस्थळासारखी प्रतिसादाला श्रेणी देण्याची व्यवस्था करता येईल का याचा देखील विचार व्हावा.. यातही कंपूबाजी होईलच यात शंका नाही, पण तरी देखील प्रत्येकालाच आपण किती पाण्यात आहोत हे देखील कळेल असे वाटते.

In reply to by आनन्दा

पण अन्य एका संस्थळाची एखादी गोष्ट ढापन्यापेक्षा हे च संस्थळ त्यात विलीन कारणे जास्त योग्य आहे असे मी म्हनेन

आता इथली कुठलीही गोष्ट मनाला लावून न घेण्याइतपत निर्ढावलेपण आलेय असे वाटते. स्वेअरिंग प्रकाराचा अनुभव मीही पहिल्यांदा इथेच घेतला.. अर्थात तिथे चिखलात दगड मारण्याची चूक केल्यामुळे अंगावर चिखल उडाल्याची तक्रार मी करू शकत नव्हते, एकतर आपण त्या लेव्हलला जाऊ शकत नाही आणि अशा फुटकळ वादांतून मनस्तापाशिवाय इतर काही हाती लागत नसल्यामुळे दुर्लक्ष करणे श्रेयस्कर असते, कोणाची एखादी गोष्ट खटकली तरी योग्य शब्दांत सांगण्याचाच प्रयत्न असतो मात्र समोरची व्यक्ति आक्रस्ताळेपणा करू लागली तर पुढे उत्तर देणे जमत नाही आणि इच्छा त्याहून होत नाही. आपण शांतपणे प्रतिवाद करत असतो, मात्र समोरची व्यक्ति स्वतःचे फ्रस्टेशन काढ्तांना आपला मुखवटा उतरतोय याचीही पर्वा करत नाही, हुच्चभ्रूपणाचा आव आणून लेखन करणार्‍यांचा मुखवटा निघत असतांना रंग कसा बदलतो आणि खरे रूप कसे समोर येते हे बघतांना गंमत वाटते. सर्वांनीच थोडा समजूतदारपणा आणि मॅच्युरिटी दाखवली तर अशा सूचनांची आणि कारवाईची गरज उरणार नाही.

'महत्वाची सूचना' असे लिहिलेले असताना देखील इतका दंगा कसा काय होतो याचे आश्चर्य वाटते. गेले काही महिने मिसळपावच्या संचालकांनी फारच नेमस्त भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे एकंदरीतच बरीच मंडळी सोकावली आहेत. 'एक दोनदा तर माझा अमुकाढमुक प्रतिसाद का उडवला' वगैरे प्रश्नांची उत्तरे आणि स्पष्टीकरण संपादक देत होते हे पाहून फारच वाइट वाटले. पूर्वी 'उडवलेले प्रतिसाद अथवा धागे अथवा सदस्यत्व' यांबद्दलच्या तक्रारीची दखलही घेतली जात नसे आणि तेच योग्य होते असे वैयक्तिक मत आहे. फार तर 'चपला अडकवा आणि चालू पडा' असे लिहिले जायचे. ज्याप्रमाणे एखादे चांगले वृत्तपत्र मनाचा ठाव घेते त्याप्रमाणे मिसळपाव.कोम ने अनेक जणांच्या मनात कायमचे स्थान मिळवले आहे. ते स्थान तसेच राहायला हवे असेल तर संचालकांनी चाबूक उगारायला पुन्हा सुरुवात करावी असे मनापासून वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

यातून तुम्ही जास्त ट्रोल जन्माला घातले अन बायकि संस्थळ असा लौकिक निर्माण केला... मिपावाराच्या विश्वासाला फार मोठा तडा यामुळे गेला बाकी आम्ही पैसा फेकत नाही म्हणून चपला दाखवण्यापेक्षा सरळ होटल बंद करा अन अतिविशिष्ट लोकांना च प्रवेश देणारा आश्रम सुरु करा हे जास्त योग्य

In reply to by भाऊंचे भाऊ

"बायकी" संस्थळ? (बाकी तुमची प्रोफाईल पाहुन आले.. मला उत्तर नाही दिलं तरी चालेल. पण सार्वजनिकरित्या काही तरी लिहीत आहात तर उगाच चालवुन घेतोय अशी प्रतिमा नको व्हायला म्हणुन आक्षेप नोंदवत आहे. ह्या धाग्यावरचा माझा मुद्दा पटवायला फारच उपयोगी प्रतिक्रिया (ही आणि जी उडवली गेली ती तर अजुनच!))

In reply to by टवाळ कार्टा

वरचा प्रतिसाद द्यायच्या आधी तेच चेकवुन आले होते.. तर चक्क दिसली प्रोफाईल.. त्यांचे प्रतिसाद बघता त्यांना उडवुन घ्यायचीच इच्छा असावी. नेक्श्ट डु आयडी अ‍ॅक्टीव्हेट करतील आता..

तुम्हाला मिसळ्पाव ऐवजी मिपक्रम कराय्चेय कॉय्य.

क्या बात है! मस्त चालू आहे धुळवड. कोणाकोणाला बॅन करायचे शोधायला प्रशांतला दुसर्‍या कोणत्याच धाग्यावर जायला नको! असे समजदार सदस्य पाहिजेत!

In reply to by पैसा

कोणाकोणाला बॅन करायचे
हा हा हा ! ह्यावरुन एक किसा आठवला : एकदा कॅप्टन सौरव गांगुली ने कोच ग्रेग चॅपेल ला विचारले "टिम पर्फॉर्म करत नाहीये , टीम मधुन कोणाला काढुन टाकावे ?" ग्रेग चॅपेल म्हणाले - " सर्वात आधी तुलाच काढुन टाकले पाहिजे टीम मधुन " =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्ही मिपाचे ग्रेग चॅपेल आणि मी गांगुली असे समजताय का? छानच्च हो!

In reply to by टवाळ कार्टा

एक ना एक दिन सबको जाना है बेटा.. मला हा विचार पडलाय कि सगळे आयडी उडाल्यावर आणि उडवल्यावर सर्वात शेवटी मिपावर कोण उरणार आहे :)

In reply to by टवाळ कार्टा

एवढ्या एका कोमेंट साठी उडवला आयडी ? आणि बाकीचे दरिद्री आयडी काय मिपाचे रत्न म्हणून ठेवलेत का ?

बाकी धाग्यावर नेहमीच्या डु आयडी दंगा करतातच, "लक्ष नका देऊ " इत्यादी सूचना हि पाळल्या, या धाग्यावर हि तेच चाललंय . मज्जाय सगळीच

एखादा आयडी जो पर्यंत त्रास देत नाही तो पर्यंत तो डू असूनही काढू नये, हे धोरण आहे इथलं, पण एखादा आयडी आधी काढला गेलाय , आणि तोच माणूस पुन्हा नवीन आयडी घेऊन येतो आणि स्वतः ओळख सांगतो किंवा लिखाणावरून समजतं, तरीही त्या आयडीचा हिशोब square one पासून मोजला जातो का ? आणि असले तर ते चूक नाही का ? आणि जर तसं नसेल तर ते का होतं ? सर्व संपादक आणि मालक लोक आपली कामं सांभाळून हे संस्थळ सांभाळतात, हे कारण मान्य च आहे , आणि त्याबद्दल त्यांच्याबद्दल आदर आहेच. पण हे कामं हाती घेतलाय तर जिथे कडक व्हायला हवं तिथे का होत नाहीये ? मला नाही वाटत या संस्थळाला लेखकांची कधी कमी भासली आहे, पण तरी "जाऊदे रे " हि मानसिकता का ठेवली जाते हे समजलं नाही

Mr. Modi to Obama : How do you manage to grow your country so nicely . . ???? Obama : It's because of Indians . . . Mr. Modi shocked : How because of Indians . . ? Obama : You give jobs to Reserved Indians and we give the jobs to the Deserved Indians.

In reply to by बॅटमॅन

नक्की का कारवाई झाली ते कळणे आवश्यक आहे असे वाटते ( जर धोरण पारदर्शक आहे असा सतत वाचकांवर बिंबवले जाते) आणि त्या तथाकथीत प्रमादाची श्रेणी जर इतरे(प्रिय) जनांपेक्षा सामन्य असेल तर हेतुबद्दल नक्कीच शंका येते. मिपा वाचकाम्तून सभासद आणि सभसदांतून लेखक यावेत हे मनोमन वाटणारा मिपावारकरी नाखु

कडक कारवाई करावी यावर सगळ्यांचेच एकमत आहे तर!

या निमित्ताने दोन शब्द माझेही. खरेतर मित्रामुळे हे सन्केतस्थळ कळाले. सह्याद्रीतले ट्रेक हीच एकमेव पॅशन असनार्या मला मिसळपाव खुप आवड्ले. रोज न चुकता मिसळपाव एक फेरी ठरलेली. इथके अनेक लेख नुसते वाचले नाहीत तर डि.व्ही.डि. वर सेव्ह करून इतराना वाचन्यास दिले. राजकारणामध्ये मला काडीचाही रस नव्हता आणि समजही नव्हती. मात्र आज राजकारणावर जे काही बोलू शकतो आणि आमच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रूप वर लिहू शकतो, त्याचे १००% श्रेय मिपाला. माझ्या गड्किल्ल्याविषयी माहितीचा इतराना उपयोग व्हावा, या साठी मिपावर आयडि काढला. माझा एक मित्र नविन हॉटेल काढणार आहे, त्याला पेठकरकाकाच्या प्रतिसादाची लिन्क दिली. मात्र नवख्या लेखकाने लिहीलेल्या लेखावरती ज्या पद्धतीने प्रतिक्रीया येतात, त्या बघता इथे लिहावे की नाही हि शन्का मनामध्ये निर्माण झाली आहे. मला विषेश करुन खटकतो तो पॉपकॉर्न नामक प्रकार. माझ्या माहितीत तरी प्रत्येक धाग्यावरती प्रतिक्रीया देणे हे बन्धकारक नाही, असे असताना, उगाच मी वरच्या फान्दीवर बसते, तिकडे सरकून मला जागा दे, चखणा आण, पहील्या सिटवर बसलोय या सर्व प्रतिक्रीया कशासाठी ? जर काथ्थाकूट करायचा नसेल, तर त्या धाग्यावर फिरकू नका किन्वा या विषयावर पूर्वी चर्चा झाली असल्यास, त्याची लिन्क तिथे द्या, धाग्यात नविन मान्ड्णी असल्यास नव्याने चर्चा सुरु करता येइल. पण हे टोमणे का ? प्रत्येकजण इथे केन्व्हा ना केन्व्हा तरी नवीन होतेच ना? अशाने बरेच वाचनमात्र असलेले वाचक की ज्यान्च्या कडे कदाचित खुप चान्गली माहिती किन्वा प्रतिभा असेल ते मिपावर लेखन करायचे की नाही याचा दहादा विचार करतील. मलाही इथे लिहावे की नाही याची शन्का वाटु लागली आहे. बर्याच नवीन आयडिच्या मिपा सदस्यत्वाच्या कालावधीवरून बोलले जाते. सदस्यत्व किती काळाचे आहे हे महत्वाचे की त्याने मान्ड्लेले विचार ? असो. जर माझ्या लेखनामुळे कोणी सदस्य दुखावले गेले असतील तर क्षमस्व. माझी टिका गैरलागू आहे असे वाटले, तर जरूर हा प्रतिसाद उडवावा. मात्र मिपासारख्या चान्गल्या सन्स्थळाविषयी आतून वाटणार्या कळकळीतुन हा प्रतिसाद आला आहे याची नोद व्हावी. इति लेखनसीमा

कमेंट्स पाहून... हा धागा कशा संबंधी आहे असा प्रश्न पडतो. लोक्सनी नेहमीच्याच गप्पा सुरु केल्या आहेत

कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. याबाबत आपले काही मार्गदर्शन मिळेल का? मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.