Skip to main content

इवल्या त्या डोळ्यांमध्ये

लेखक अभिषेक पांचाळ यांनी बुधवार, 30/03/2016 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
इवल्या इवल्या डोळ्यांना , आस किती मोठी आहे निडर होऊन लढते वेडे , काळ त्याच्या पाठी आहे वादळाची फिकीर मनी , थोडीसुद्धा उरली नाही स्वप्न अधुरे राही , अशी रात कधी सरली नाही जिद्द तरी येते कशी , विचार करी दाही दिशा शंका करती फितूर सारे , केली याने दारू नशा पहाडही ते धस्की घेऊन , जागेवरती टिकून राहते अंगावरती बागडताना , लाटही त्याला दुरून पहाते दिली जरी हि कठोर शिक्षा , जमीन कशी याचा पायाखाली त्रास देऊन तऱ्हेतऱ्हेचा , नियातीही मग बेजार झाली उरले सुरले बळ लावूनि , सारे येती अंगावरती प्रहार करता पूर्ण शक्तीने , नाईलाजाने मागे फिरती गूढ जणू ते लपून बसले , हरेकाच्या कोड्यांमध्ये आसमंतही शांत निजले , इवल्याश्या त्या डोळ्यांमध्ये - अभिषेक पांचाळ
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1237
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

ही पण भारीच! :)

Thanx all