✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सायकलीशी जडले नाते २४: "चांदण्यात फिरताना" एप्रिलच्या ऊन्हात परभणी- जालना

म
मार्गी यांनी
Mon, 03/28/2016 - 18:02  ·  लेख
लेख
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद. सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . . सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . . सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . . सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . . सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २! सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . . सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी! सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड! सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद सायकलीशी जडले नाते २२: सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते! सायकलीशी जडले नाते २३: नई हैं मन्जिलें नए हैं रास्ते. . नया नया सफर है तेरे वास्ते. . "चांदण्यात फिरताना" एप्रिलच्या ऊन्हात परभणी- जालना मार्च २०१५ मध्ये मस्त सायकलिंग झालं. आता लदाख़ सायकल राईडसाठी ट्रेनचं बूकिंगही केलं आहे. तयारीसाठी अजून दोन महिने आहेत. राईडस सुरू राहिल्या. एक मोठी सेंच्युरी- डबल सेंच्युरी करण्याच्या उद्देशाने ११ एप्रिलला सकाळी निघालो. परभणी- जिंतूर- जालना- औरंगाबाद असं जाणार आहे. साईयल चालवताना मनात एकच विचार आहे- तयारी अजून कशी वाढवली पाहिजे? लदाख़च्या प्रवासासाठी तयारीचे अनेक घटक आहेत. पहिली बाब म्हणजे सायकलिंगचा सराव आणि फिटनेस- स्टॅमिना. त्यासाठीसुद्धा अनेक गोष्टी आहेत जसं सायकलिंगसोबत जंपिंग, पूरक योगा, प्राणायाम आणि स्ट्रेचिंग. मी सायकलिंग व योगा नियमित करतोय, पण स्ट्रेचिंग व वार्म अपसारखे व्यायाम अजून केले नाहीत. आणि काही अनुभवातून कळालेल्या गोष्टी करतोय- जसं संध्याकाळी राईड झाल्यानंतर पाय भिंतीवर टेकवून पडणे, पायांना सायकलिंगच्या विरुद्ध दिशेमध्ये हालचाल होण्यासाठी पाद संचालनासारखे योगासन आणि महत्त्वाची बाब म्हणजे प्राणायाम- श्वासावर काम. पण ह्या दिशेने अजूनही खूप काही करणं बाकी आहे. दुसरी बाब म्हणजे सायकलचं रिपेअरिंग शिकणं. तिथेही खूप तयारी करायची गरज आहे. अर्थात् मनामध्ये सगळ्यात जास्त भिती घाट रस्त्यावर सायकल चालवता येईल ना ही होती आणि त्या दिशेने मी एका टप्प्यापर्यंत पोहचलो आहे. असो.   हळु हळु ऊन वाढत चाललं आहे. पण सूर्योदयापासून बाहेरच असल्यामुळे शरीराला इतकं ऊन जाणवत नाहीय. जर कोणी अचानक एसीमधून ४४ अंश तपमानात बाहेर आला, तर त्याला चटकाच बसेल! निवांत रस्ता आणि सायकलच्या टायर्सचा आवाज! पहिले साडेपाच तास अतिशय सुखद गेले. सुमारे ८० किलोमीटर पूर्ण झाले. आता सकाळचे साडे अकरा वाजत आहेत. थोड्याच वेळात हायवे म्हणजे दोन लेनचा रोड लागेल. पण एक अडचण अशी आहे की, चांगला नाश्ता मिळत नाहीय. ओआरएस व ज्युस घेतोय, पण चांगलं काही खायला मिळत नाहीय. ह्याही गोष्टीवर विचार करावा लागेल. सहा तास पूर्ण झाल्यानंतर हळु हळु पाय बोलायला लागले. सारखं थांबावसं वाटत आहे. वेगही कमी होतोय. हा रस्ता मस्त आहे. टू बाय टू असल्यामुळे वाहनांची अजिबात भिती नाही. तसंच वाहतुकही कमीच आहे. अशा रस्त्यावर ड्राईव्ह करण्याची मजा वेगळी! हळु हळु जालना शहर जवळ येतं आहे. पण वेग फारच कमी आहे. टायर चेक केल्यावर लक्षात आलं की, पंक्चर आहे! मी खरं तर ह्याचीच वाट बघत होतो. कारण मला ख-याखु-या परिस्थितीत पंक्चर काढण्याचा अनुभव घ्यायचा आहे. सोबत पूर्ण सामान आहे- पंक्चर किट, पंप आणि एक दोन इंच खोलीचं पसरट भांडं. शिवाय पंक्चरसाठी वेगळी पाण्याची बाटलीसुद्धा आहे. पहिल्यांदाच पंक्चर काढेन! एक चूक लगेचच कळाली. पंक्चर काढण्यासाठी आधी ट्युब बाहेर काढावी लागते व त्यावेळेस दोन स्क्रू ड्रायव्हर लागतात. एक स्क्रू‌ ड्रायव्हरने टायरचं टोक थोडं बाहेर काढून ठेवावं लागतं आणि दुस-या स्क्रू ड्रायव्हरने टायर मोकळं करावं लागतं. पण कमी वजन ठेवण्याच्या नादात मी एकच स्क्रू‌ ड्राय्व्हर आणलाय! "ओढून ताणून" कशीबशी ट्युब बाहेर काढली. मग असंच धडपडत पंक्चर काढलं. पहिल्यांदा झालं नाही. मग परत बनवलं. आणि त्याच प्रकारे ट्युब परत टायरमध्ये फिट केली. आता बघूया काय होतं!   थोड्या वेळ सायकल बरी चालली. पण आता पाय बरेच दुखत आहेत. आता कडक ऊन म्हणजे काय हे कळतंय. वेग कमी होत जातोय व ९० किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर येणारा थकवा!. अशा वेळेस गाणी फार उपयोगी पडतात. गाणी अगदी ऐकलीच पाहिजेत असं नाही. मनातल्या मनात आठवलं तरीही ऊर्जा मिळते. अशा कडक ऊन्हामध्ये मनात आठवण्यासाठी साजेसं गाणं म्हणजे "चांदण्यात फिरताना" किंवा "ठण्डी हवाएँ. . " मन लगेच रिफ्रेश होतं! पण शरीर जर तक्रार करत असेल तर हा ताजेपणा टिकत नाही. आणि झालं, परत पंक्चर झालं! कदाचित असं तर नाही, की मी पंक्चर तर बरोबर काढलं असेल, पण ट्युब टायरमध्ये फिट करताना स्क्रू ड्रायव्हरमुळेच नवीन पंक्चर झालं असेल! परत एकदा पंक्चर काढलं. ट्युब आतमध्ये बसवली. पहिल्यांदाच करत असल्यामुळे पाऊण तास एक पंक्चर काढायला लागतोय. थोडं पुढे गेलो. शतक पूर्ण झालं, पण ते लक्षातही आलं नाही. उलट आता मन म्हणतंय पुरे झाला वेडेपणा! लदाख़ झालं इथेच! आता हा नाद सोड! पण मनात हसूही येतं आहे की, वा, खरी मजा आता येते आहे! हेही पंक्चर फार वेळ टिकलं नाही आणि परत हवा गेली. आता मी पूर्ण वैतागलो आहे. पंक्चर काढण्याऐवजी हवा भरली आणि थोडं पुढे गेलो. एका जागी एक मॅकेनिक मिळाला. त्याने दहा मिनिटात पंक्चर काढून दिलं. एक पंक्चर स्क्रू ड्रायव्हरमुळे झालेलं मिळालं! माझी अवस्था वाईट आहे! पुढे जाणं अवघड होतं आहे. पंक्चर तर ठीक झालं, पण पायांचं काय! आता जालना जेमतेम पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे!‌ ते मला विचारतंय जणू जाल- ना? एका जागी लिफ्ट घेण्याचाही विचार केला, पण इथे बस स्टॉप नव्हता त्यामुळे पुढे गेलो. इंचा इंचाने जालना जवळ येतंय. अजून हातात वेळ खूप आहे, पण ऊर्जा क्षीण होतेय. दुपारी तीन वाजता जालना शहराजवळ आलो. सुमारे १३७ किलोमीटर झाले. इथून औरंगाबादसाठी लिफ्टनेच जाईन. आणि एक टेंपोवाला मिळाला. पण तो मला औरंगाबादला अशा जागी सोडेल जिथून मला माझ्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी अजून दहा किलोमीटर सायकल चालवावी लागेल! असो  आजचा १३७ किलोमीटरचा मॅप. ११ किलोमीटर औरंगाबादमध्ये. आज फार फोटो घ्यायची इच्छा झाली नाही. पन्नास किलोमीटर टेंपोमधून गेलो. संध्याकाळ होता होता औरंगाबादच्या चिकलठाण्यामध्ये परत सायकल सुरू केली. शहराच्या वस्तीत व दहाच किलोमीटर जायचं असल्यामुळे बरं आहे. इतकी अडचण आली नाही. पाय बोलत आहेत, पण चालूही आहेत. सायकल थांबवली तेव्हा एकूण १४८ किलोमीटर झाले आणि बॅटरी अगदी थोडी शिल्लक आहे. डोळे आणि चेहरा लाल झालाय. अशा वेळेस लवकर आरामही करता येत नाही. त्यामुळे रात्री उशीराच झोप लागली. नंतर जाणवलं की, चला २०० किलोमीटर नाही, पण १४८ किलोमीटर तर झाले! पंक्चर शिकण्याची पहिली इयत्ता सुरू झाली आणि लॅपटॉपसह सामान घेऊन ही राईड केल्यामुळे चांगला सरावही मिळाला. . पुढील भाग २५: आठवे शतक अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

Book traversal links for सायकलीशी जडले नाते २४: "चांदण्यात फिरताना" एप्रिलच्या ऊन्हात परभणी- जालना

  • ‹ सायकलीशी जडले नाते २३: नई हैं मन्जिलें नए हैं रास्ते. . नया नया सफर है तेरे वास्ते. .
  • Up
  • सायकलीशी जडले नाते २५: आठवे शतक ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
8013 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

वाचतोय.

एस
Mon, 03/28/2016 - 18:10 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments

४४ डिग्रीतलं चांदणं.त्यात

अजया
Mon, 03/28/2016 - 18:11 नवीन
४४ डिग्रीतलं चांदणं.त्यात एवढा पल्ला गाठलात.ग्रेट. पुभाप्र
  • Log in or register to post comments

एप्रिलच्या उन्हात

मित्रहो
Mon, 03/28/2016 - 18:37 नवीन
सायकल चालवण्यासारखी कसरत दुसरी नाहीच. सलाम.
  • Log in or register to post comments

कहर

टवाळ कार्टा
Mon, 03/28/2016 - 18:52 नवीन
कहर
  • Log in or register to post comments

बाबो सलाम तुम्हाला

स्पा
Mon, 03/28/2016 - 19:24 नवीन
बाबो सलाम तुम्हाला भ ई किस चक्की का आटा खाते हो?
  • Log in or register to post comments

_/\_

पैसा
Mon, 03/28/2016 - 19:51 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

तुमचे गुरु नीरजजी अफाट आहेत

बोका-ए-आझम
Mon, 03/28/2016 - 23:30 नवीन
पण तुम्हीही काही कमी नाही आहात! पुभाप्र!
  • Log in or register to post comments

बाब्बो

बाबा योगिराज
Tue, 03/29/2016 - 12:55 नवीन
वो मामा, ____/\____
  • Log in or register to post comments

मस्त लेखमाला.

विशाल चंदाले
Tue, 03/29/2016 - 19:03 नवीन
खरच कमाल आहे राव तुमची. मस्त लेखमाला. रच्याकने, तुम्ही परभणीचे का हो?
  • Log in or register to post comments

एक फक्त कडक सलाम तुम्हांला. _

बॅटमॅन
Tue, 03/29/2016 - 20:08 नवीन
एक फक्त कडक सलाम तुम्हांला. _/\_
  • Log in or register to post comments

पहिल्यांदा पंक्चर काढल तेव्हा

sagarpdy
Wed, 03/30/2016 - 10:08 नवीन
पहिल्यांदा पंक्चर काढल तेव्हा भारी बावळटपणा केलेला. पंक्चर झालेलं लक्षात आल्यावर थांबलो, रस्त्याला थोडी रहदारी असल्याने रस्त्याबाहेर मातीत बसून पंक्चर काढल. दुपारची वेळ आणि भूक लागलेली असल्याने घाईघाईने टायर लाऊन पुढे निघालो. नंतर ३०-४० किमी झाल्यावर परत तोच टायर पंक्चर. मग टायर उघडून पाहतो तर आत २-३ चिमुट माती-कचरा. त्याच्या ट्यूब बरोबरील घर्षणाने पंक्चर. धडा : कच्च्या रस्त्यात पंक्चर काढताना विशेष लक्ष देऊन टायर लावावे. पुभाप्र (लडाख भटकंतीच्या विशेष प्रतीक्षेत)
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद!

मार्गी
Wed, 03/30/2016 - 12:10 नवीन
सर्वांना मनापासून धन्यवाद!!‌:) @ विशाल चंदाले- हो, तुम्ही? @ sagarpdy :) मला किमान ५-६ वेळेस चुकीचे काढावे लागले, तेव्हा हळु हळु पंक्चर जमलं! मागच्या वर्षी लदाख़ सायकलवर केलं होतं. ह्या लेखमालेतलं वर्णन त्याच्या आधीच्या राईडसचं आहे.
  • Log in or register to post comments

ओहो, मस्त, वाचतो.

sagarpdy
Wed, 03/30/2016 - 12:27 नवीन
ओहो, मस्त, वाचतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्गी

आम्ही पण परभणीचेच कि हो.

विशाल चंदाले
गुरुवार, 03/31/2016 - 16:16 नवीन
आम्ही पण परभणीचेच कि हो. म्हणून तर विचारलं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्गी

भारी भारी.

अभ्या..
Wed, 03/30/2016 - 12:26 नवीन
भारी भारी. मराठवाड्यातलं कुणी असलं की मला लैच आनंद होतो. चांगलय चांगलय.
  • Log in or register to post comments

नमस्कार, majaa yetiye

शैलेन्द्र
गुरुवार, 03/31/2016 - 22:33 नवीन
नमस्कार, majaa yetiye vachataana, Jar ladakh karayach asel tar yaa flat rastyanchaa upayog nahi.. ladakhchaa game purn vegala aahe, tithe tumhi divasala jastit jast 50-60 KM chalavu shakata pan prachand chadh utaar.. Ladakhchi purvatayari mhanaje amachyakadache matheran.. jyala matheran chadhavata yeta tyala ladakh sahaj jamat..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा