✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संक्रांत!

च
चतुरंग यांनी
Tue, 01/13/2009 - 22:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3700 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

आ
आजानुकर्ण Wed, 01/14/2009 - 00:28 नवीन

मस्त चतुरंग

चतुरंग झकास लेख. आमच्याही संक्रांती अशाच हलव्यासारख्या काटेरी आणि तीळगुळासारख्या स्निग्ध आहेत. वर्गातील मुलींशी तीळगूळ देताना बोलायला मिळायचे त्यामुळे संक्रांत फार आवडत होती. Image removed. एकदा एक आखडू मुलगी प्रेमाने तीळगुळ देत नव्हती Image removed. तिला तीळगुळाच्या नावाखाली खड्याचे मीठ दिले होते. बघण्यासारखा चेहरा झाला होता Image removed. आपला (संक्रांत) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 01/14/2009 - 00:32 नवीन

क्या बात है....

एकदम खूप सार्‍या आठवणींना उजाळा दिलास रे मित्रा... काटलेल्या पतंगांमागे पळताना वाटेतले काटेकुटे, दगड टोचले तरी जाणवायचे नाहीत !! आजच एका सहकारणीची बोलत होतो की आपली मुलं इथे भारतातल्या किती आणि कोणत्या गोष्टींना मुकतायत. हे मांजा तयार करणं, वेगवेगळे खेळ, पत्ते ह्या सगळ्यातून किती प्रकारचं ज्ञान नकळत (आणि आनंदात) गोळा केलं त्याला सीमा नाही ! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/14/2009 - 00:55 नवीन

एकदम खूप

एकदम खूप सार्‍या आठवणींना उजाळा दिलास रे मित्रा... सहमत आहे! रंगा, सुरेख लेखन रे! जियो..! आपला, (पतंगाच्या आठवणीने हळवा!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
म
मुक्तसुनीत Wed, 01/14/2009 - 00:33 नवीन

+१

उत्तम लेख. पतंगांचे , लहानपणीच्या नगर गावचे एकेक डीटेल वाचताना त्याची गोडी पुरेपूर अनुभवली. यंदाच्या "मौज" दिवाळी अंकात दिलीप चित्रे यांचा लेख आलाय ( हे चित्रे म्हणजे दिलीप पुरुषोत्तम चित्रे नव्हेत.) त्याचे नाव आहे "बिनपैशाचे खेळ". त्यांनीसुद्द्धा त्यांच्या दिवसातले पतंगांची सगळी "प्रोसेस" कशी होती ते इत्थंभूत लिहिले आहे. गुणवत्तेच्या बाबतीत चतुरंग यांचा लेख अगदी त्याच तोडीचा आहे !
  • Log in or register to post comments
द
दिपक Wed, 01/14/2009 - 12:41 नवीन

:)

'बिनपैशाचे खेळ' वाचला त्यावेळी पंतगांची आणि लहानपणीच्या केलेल्या उद्दोगांची आठवण झाली होती आज परत झाली.. एकदम खूप सार्‍या आठवणींना उजाळा दिलास रे मित्रा... सहमत :) --दिपक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
क
कोलबेर Wed, 01/14/2009 - 00:38 नवीन

लेख आवडला

मस्त! कितीतरी जुन्या आठवणी आठवल्या. आमच्याकडे पतंग आणि संक्रांत हे समीकरण नसले तरी हिवाळ्यात साधारण दिवाळी नंतर पतंग उडवणे भरपूर व्हायचे. मांजा बनवताना एकदा बाटल्या कुटण्यासाठी घरातला खलबत्ता हळूच नेला होता, खलबत्याचा हा वापर कळल्यावर घरी जो गहजब झाला होता तोही आठवला. :) छान नॉस्टॅलजीक लेख. -कोलबेर
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 01/14/2009 - 00:43 नवीन

हेच

हेच म्हणतो! आमच्याकडेही पतंग आणि संक्रांत हे समीकरण नव्हतं, आणि मी पण माझ्या मामेभावा बरोबर मांजा करायला घरातला खलबत्ता वापरला होता. खलबत्त्याचा असा वापर घरी कळला तेव्हा आमच्याकडेही गजहब झालेला. चतुरंग, तुमचा लेख खुप आवडला! अनामिक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
प
प्राजु Wed, 01/14/2009 - 00:39 नवीन

सुरेख आठवणी.

पतंगाचा मांजा तयार करण्याचं वर्णन खास. मला हे माहिती नव्हतं. माझ्या ज्ञानातही भर पडली. :) मस्त आठवणी.. :) माझ्याही काही अशाच आठवणी आहेत संक्रांतीच्या. लिहिन कधीतरी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Wed, 01/14/2009 - 00:40 नवीन

वा वा!

आम्हाला पतंग उडवायला (कुठलेच!) कधीच जमले नाही, पण तुम्ही त्याचा फील दिलात!!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/14/2009 - 09:57 नवीन

+१

मस्त -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
म
मैत्र Wed, 01/14/2009 - 11:35 नवीन

मस्त!!

"हेऽऽ काऽऽप्पे"! सुरुवात पाहून वाटलं की नगर असेल.. चक्री, सरस वाचून वाटायला लागलं की नक्की नगर आणि पुढे ती सगळी धमाल उभी केलीत.. नगरच्या मध्य वस्तीतल्या गल्ल्यांबमधल्या सगळ्या जोडलेल्या गच्च्या आणि पत्रे यांच्या चक्रव्युहात आपली शक्य तितकी उंचावरची जागा धरणे आणि मग अंदाज घ्यायचा. माझे मामेभाऊ पतंगाची दिशा पाहून ओळखायचे कोणाचा पतंग आहे आणि त्याप्रमाणे डावपेच ठरायचे. क्रिकेट प्रमाणे जुन्या टीम्स ची तयारी माहिती असायची. मातब्बर लोकांना मान मिळायचा. मग त्याप्रमाणे तयारीचे गडी पतंग हातात घ्यायचे. "गोत" घ्यायची असेल तर आणि जवळचा पतंग असेल तर ओरडून विचारायचं " घेतोस का गोत"... मग जे सुरुवात ते पार पतंग संपेपर्यंत किंवा अंधारात दिसेनासं होइपर्यंत चालायचं. पतंग डुगडुगत असेल तर लांब "लेपटी" लावायची आणि ती चिकटवायची भाताने... मांजा बनवण्याचं वर्णन तर एकदम पर्फेक्ट..सही लिहिलंय. कित्येक वर्षात ते पाहिलं नाही परत. गंज बाजारात पतंगांबरोबर आता तयार मांजासह चक्री मिळते. नगरचे सगळे शब्द - टर्म्स एकदम वेगळ्या होत्या.. कन्नी, लेपटी, गोत, मांजा सुतवणे पतंगांचे प्रकार आणि नावंही मजेशीर होती... काही आठवत नाहीत आता. कधी आपला कटला तर मांजा हापसण्याची लढाई ही गोत घेण्याइतकीच तयारीची असायची. कारण कटलेल्या पतंगापासून आपल्यापर्यंत वाटेतल्या सर्व गच्च्या मिळणारा नवा मांजा ढापायला टपलेल्या असायच्या. कारण तशी संधी मिळाल्यावर आपलाही तोच उद्योग चालायचा. माझ्या भावाला एकदा असा मांजा धरताना कापायला काही मिळालं नाही. मजबूत नवा मांजा तुटेना. तो दातात धरून तोडताना तिकडे चक्री वाल्याने हिसका मारला आणि याचा गाल सर्रकन कापला. आता पंधरा वर्ष झाली पण वण टिकून आहे! आणि आपला पतंग जवळपास कटला असेल तर तो परत मिळवायला काय सॉलिड फाइट व्हायची.. काही पोरं फक्त या कटणार्‍या पतंगांवर लक्ष ठेवून असायची. कोणी जवळपास आपला पतंग किंवा मांजा धरला तर चक्क दगड विटा फेकायचे!! नगरला खुप उंच आणि मोठ्या(लांबीला) अँटेना असायच्या. त्याशिवाय मोठ्या मोठ्या पिंपळा सारख्या झाडांमध्येही किती तरी पतंग अडकायचे... खूप छान लिहिलं आहे.. धन्यवाद. संक्रांतीच्या शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Wed, 01/14/2009 - 12:28 नवीन

'पतंग'

'पतंग' जोरदार उडवलात..! आकाशाशी नातं जोडणारा 'रंगी'त पतंग... -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 01/14/2009 - 12:56 नवीन

अच्छा

कन्नी, सूत्र, गोत वगैरे शब्द सगळीकडेच आहेत की काय? बेळगावातही हेच शब्द होते. लेखाने जुन्या आठवणी जागवल्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा