प्रास्ताविकः
मराठी विकिपीडियावर एखादा लेख टिकुन राहण्यासाठी ज्ञानकोश म्हणून उल्लेखनीयतेचे निकष महत्वाचे ठरतात. कोणत्याही व्यक्ती बद्दल काही विशेषत्व दाखवल्या शिवाय ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्य ठरत नाही. हनुमाना सारखे भक्त स्वतःच देवता म्हणून स्वतंत्रपणे पुजले जातात, तर मंदिराच्या स्थापना/जिर्णोद्धार/दान-धर्म/देवालयातील पायरी इत्यादीवर नाव लिहून घेणार्या भक्तगणांची संख्य अगणीत असते काही जणांची एखाद ओळीतच मावेल एवढाच विश्वकोशिय मजकुर उपलब्ध होणार असतो. हनुमानाकरीता स्वतंत्र लेख बनवणे समजण्या सारखे आहे. हनुमानाच्या मंदीरांची शृंखला बांधवून घेणार्या समर्थ रामदास इत्यादी भक्तगणाकरिता स्वतंत्र लेख होऊ शकतील एवढा मजकुर असतो. पण अशा देवतांच्या पायरीवर नाव कोरुन घेणार्या व्यक्तींची भक्तीही विशेष असू शकेल परंतु १) इतर चारचौघांपेक्षा काही वेगळी नोंद होणे २) सहसा इतर माध्यमातून त्याची दखल घेतलेली असून तसा संदर्भ उपलब्ध असणे या निकषांना सर्वच भक्त पार करून ज्ञानकोशात स्थान मिळवू शकतील असे नाही.
काही वेळा काही व्यक्ती विशेषही असू शकतात की ज्याची ज्ञानकोशीय लेखक संपादकांना कल्पना असेलच असे नाही. पण अशी उल्लेखनीयता सिद्ध करण्याचा जिम्मा सर्वसाधारणपणे असे लेख तयार करणार्या व्यक्तीवरच सोडून अनुल्लेखनीय वाटणारे लेख सहसा वगळले जातात. श्री. भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख यांच्या बद्दल असाच एक लेख मराठी विकिपीडियावर आला इतर राजकारणी मंडळींपेक्षा काही विशेष उल्लेखनीयतेची नोंद उपलब्ध झाली तर कदाचित पुन्हाही मराठी विकिपीडियावर येऊ शकेल परंतु सद्य खाली दिलेल्या माहितीच्या आधारावरतरी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्य ठरत नाही आहे म्हणून सदर लेख मराठी विकिपीडियातून वगळून त्यांचे बद्दल मराठी विकिपीडियावर प्रकाशित माहिती येथे स्थानांतरीत करीत आहे. ती मी स्वतः लिहिलेली नसल्या मुळे चु.भू.दे.घे.
स्थानांतरीत लेख: भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख
भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख Bhagwantrao Vamanrao Khopade-Deshmukh उर्फ नानासाहेब यांचा जन्म तत्कालिन(ब्रिटिश कालिन) मुंबई प्रांतातिल भोर तहसिलातील गांव नाझरे येथील वामनराव खोपडे-देशमुख यांच्या कुळामध्ये झाला.
कार्य
गावाकडे उपजिवीकेची साधने उपलब्ध नसल्याने ते त्यांचे वडील वामनकाका आणी लहान बंधु विठ्ठ्ल यांच्या बरोबर पुणे येथील खडक माळ आळी येथे स्थायिक झाले. पुणे येथे लाकुड वखार व्यवसाय ते करु लागले. भगवंतराव मुळचे देशमुख कुळातील असल्यामुळे राजकारणी गुणधर्म त्यांच्यामधे उपजतचं होते. आणी म्हणुन साधारण ६०-७० च्या दशकात त्यांनी पुणे येथुन तत्कालिन शेतकरी-कामगार पक्षातर्फेआमदारकी लढविली. तत्कालिन राजकारण्यांनी जातीपातिच राजकारण करत आणी मराठा समाजातील ९६ कुळी आणी ९२ कुळी या समाजरचनेचा आधार घेत भगवंतराव यांना पराभुत केल.जरी भगवंतराव पराभुत झाले होते तरी सामान्य जनमानसात त्यांचा आदरयुक्त दरारा कायम होता. आणी नंतर भगवंतरावांनी वयोमानानुसार राजकारणातुन निवृत्ती घेतली
उत्तरार्ध
भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख यांचे वृद्धापकाळाने सन १९७९ रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्यामागे 3 मुले, सुना, 5 मुली, जावई व नातवंडे असा परीवार आहे.
संदर्भःश्री.भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख. (२०१५, डिसेंबर २२). विकिपीडिया, एक मुक्त ज्ञानकोश. Retrieved १६:४१, डिसेंबर २२, २०१५ from https://mr.wikipedia.org/w/index.php?title=श्री.भगवंतराव_वामनराव_खोपडे-देशमुख (तुर्तास हा लेख मराठी विकिपीडियावरून वगळला जाईल)
वाचने
4266
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणखी एक
तातडीने माहिती देण्या बद्दल
In reply to आणखी एक by गॅरी ट्रुमन
लेख वाचला !
भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख यांच्याबद्द्ल काही
होय अगदी धीर आहे म्हणूनच !
मराठी विकिपीडियावरील चर्चा
In reply to होय अगदी धीर आहे म्हणूनच ! by माहितगार