Skip to main content

कवी नडू पाही...

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 13/01/2009 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
'हंस उडू पाही...' हे काव्य वाचून आमच्या कल्पनेचा हंस विडंबनप्रांती उडू लागला! ;) 'रंग्या'चा पहारा विडंबनी कायदे कवी नडू पाही अवघड इरादे! असे कसे शब्द? अर्थ कुणीकडे? कल्पनेपल्याड झेपावती वेडे ओळी सैरभैर, बाभळीचे काटे धिटाईने लिही कुणी एकटे एकटे लावले कुलुप, बंद केली दारे असल्या कविता कशाला करा रे! चतुरंग
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3027
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

लावले कुलुप, बंद केली दारे असल्या कविता कशाला करा रे! हा हा हा ... सह्हीच! अनामिक

अस्वल गुदगुल्या करून हसवून हसवून मारतं, असं ऐकलं होतं. त्यानंतर बहुतेक तुमचाच नंबर लागेल, हसवून मारण्यात. ;) =)) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

जाता जाता अस्वल म्हणून घ्या! :B मला तर चिमणरावाचे ते वाक्यच आठवले "मार बये मार, पिंजर्‍यामधे व्याघ्र सापडे, बायका मुले मारिती खडे!" त्याच चालीवर मी म्हणेन "मार बाबा मार, विडंबनात रंगा सापडे 'कार्यकर्ते' मारिती जोडे!" ;) चतुरंग

असे कसे शब्द? अर्थ कुणीकडे? कल्पनेपल्याड झेपावती वेडे मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

रंगाशेठ, 'रंग्या'चा पहारा विडंबनी कायदे कवी नडू पाही अवघड इरादे! हा हा हा हा.. चलू दे.. केशवसुमार

लयं भारी... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

असल्या कविता कशाला करा रे!
हाहाहाहाहा. भारीच. पण अशा कविता होऊ द्या, त्यानिमित्ताने थोडे हसण्याची संधी मिळते तुम्ही विडंबन केल्याने. :) :) :)

दादा, लय भारी.. हे फक्त तुमचेच डोके असे चालू शकते!! मुमुक्षु

मस्तच हो रंगाशेठ......... :) (एखाद्या सोवळ्या संपादकाला आवडला नसल्यास हा प्रतिसाद उडवला तरी चालेल) -- अवलिया अवलियाची अनुदिनी