Skip to main content

पाणी बचत काळाची गरज

लेखक वैभव दर्शनराव देसाई यांनी सोमवार, 21/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी बचत हा कळीचा मुद्दा बनलाय.सर्वत्र पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे खेड्यातील असो वा शहरातील प्रत्येक बायकांना या समस्येला सामोरे जाव लागत आहे.तास् न तास् टँकरची वाट पाहत लांबलचक रांगेत तीव्र उन्हात उभ टाकाव लागत आहे.या सर्व परीस्थीतीने सामान्य माणुस हातबल झालाय. त्या मुळे या परीस्थीतिशी सामना करण्यासाठी पाण्याचे कटाक्षाने नियोजन करणे अत्यंत गरजेते आहे.''पाण्याची बचत करा''.हे एेकुन किंवा बोलुन चालत नाही तर ते प्रत्यक्षात आनाव लागेल.प्रत्येकाला पाणी बचत ही सवय बनवावी लागेल तरच हे शक्य आहेे. गावा गावात महिला पाण्यासाठी वणवण भटकतांना दिसून येत आहेत . एका Tanker चे पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते आहे . शेतकरी उजाड झालेल्या शेताकडे पाहून खिन्न झाल्याचे चित्र दिसते . असंख्य पक्षी व प्राण्यांची पाण्यावाचून तडफड सुरु झाली आहे . अशा वातावरणात जेथे पाण्याची परिस्थिती बरी आहे , तेथील नागरिकांनी पाण्याची बचत करणे गरजेचे आहे . या परिस्थितीत धुलीवंदन आणि रंगपंचमीला लाखो लिटर पाणी वाया घालवू नये . रंग खेळणे आपली संस्कृती आहे . परंतु आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे . पाण्याचा अपव्यय न करता यंदा धुलीवंदन , रंगपंचमीला फक्त रंगाचा टिळा लावून होळीचा आनंद घ्यावा . अपायकारक , रासायनिक रंगापासूनही कटाक्षाने दूर राहिले पाहिजे .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 28883
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

होळी आणि रंग पंचमी हे दोन्ही सण साजरे करणार नाही आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे . पण रेन वॉटर हार्वेस्टिंग क्षेत्रात काम करणारया संस्थांची फारशी नावे , माहिती उपलब्ध नाही .

याच विषयावर यवतमाळ च्या स स्थेने बनवली शॉर्ट फिल्म https://m.youtube.com/watch?v=a9VtrCS4WoQ पोट तिडिकी ने लिहिलेला प्रामाणिक लेख आवडला. परिस्थितीच्व भान बाळगुन आपण शक्य तेवढी मदत केली तर पाणी संकट नक्कीच सुसह्य होइल.

मुबईत उंच इमारतीत राहणारे लोक, होळी खेळत नाही. पण दररोज २००-३०० लिटर पाणी प.थाटाच्या संडासात खर्च करतात. प्रत्येक वेळा फ्लश करताना १० लिटर पाणी जाते. दुसरीकडे झुग्गी वाला एका लोट्यात काम भागवितो. वर्षातून एकदा तो होळी खेळतो. ते या महाभागांना खटकते. स्वत: २० पट जास्त पाणी वापरून गरिबांना होळी न खेळण्याचा आदेश दिला जातो. काय म्हणावे. खरंच पाण्याची बरबादी थांबवायची असेल तर प. थाटाच्या संडास खुर्ची वर प्रतिबंध लावा. बाथरूम मध्ये फव्वारा वर हि प्रतिबंध लावा. कोट्यावधी लिटर पाणी रोज वाचेल.