Skip to main content

माझं काय चुकलं..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 13/01/2009 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
एका छोटीचे मनोगत.. कशाला गं आईनं असं मला माललं.. ललून ललून नाक माझं लाल लाल झालं.. खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं??? अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात.. टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात.. माझ्यातलं थोलं बिश्किट मी त्याला शुद्धा दिलं.. त्याच्या भांड्यातलं थोलं मी ही खाल्लं.. सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं.. खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं?? बाबांचा पांधला पांधला रूमाल मला मिलाला त्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला.. त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं.. सांग आता यात माझं असं काय चुकलं..?? रूमाल सगळा लाल लाल ,होता घाण झाला.. दूध ओतून त्याला मी गोला गोला केला.. कलतंच नाही मला नेमकं काय झालं. खलं खलं सांग आजी माझं काय चुकलं?? - प्राजु
लेखनविषय:

वाचने 18795
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

हाहाहा! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

बाबांचा पांधला पांधला रूमाल मला मिलाला त्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला.. त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं. =)) =)) ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

आजीची प्रतिक्रिया: राणी मा़झी छोटुली तू, आहेस उचापती हसू येते मला, पाहून तुझ्या करामती ललू नको बघ तुझे नाक झाले लाल हस बघू, फुगवू नको गोबले गोबले गाल हसलीस की तुला देईन गोड गोड खाऊ संध्याकाळी फिरायला आपण दोघीच जाऊ फुगे घेऊ, बाग पाहू, करू मस्तं धमाल बाबांसाठी घेऊन येऊ एक पांधला रुमाल माललं त मालू दे, आई आहेच वेडी हसण्या रुसण्यातही अगं गंमत असते थोडी ************************* (खोडकर) अनामिक

In reply to by चतुरंग

खरंच मजा आली दोन्ही कविता वाचून. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

>> सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं.. एकदम सही >> केचपचा सूर्य कल्पना सुरेख आहे सूर्याची :) अवांतरः गझल आणि एकदम बालगीत... एकाच वेळी डोक्यात,,, आहे...जबरी रेंज आहे कल्पनाशक्तीला :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

हा हा हा...फारच छान :) लहानपणीची एक गंमत आठवली. माझ्या बहिणीने रस्त्यावर पडलेला शेंगदाणा पटकन उचलून तोंडात टाकला, आईने धपाटा घातल्यावर म्हणाली- उगाच का गं मारतेस? तूच तर म्हणतेस की अन्न वाया नाही घालवायचं

आजी शांगशील का ग देवाला नको कलू मला मोथाला ठेव अशाच मला बोबलं बोलायला www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

किती गोड कविता आहे. मुलं असच काहीतरी करतात आणि आपण रागावलो की त्यांना कळत नाही एकदम काय झालं? फारच छान कविता! रेवती

छोतीची छोतीशी कविता छान छान...! रड'कविता' आवडली.. आणि आजीची प्रतिक्रिया देखील...! छोटं होऊन छोट्यांसाठी छोट्यांसारखं छोटसं लिहिणं म्हणजे काही 'छोटी' गोष्ट नाही...त्यासठी मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठी कल्पनाशक्ती लागते..! - (छोतासा) झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

प्राजु, थोडा उशिराच प्रतिसाद देत आहे. कविता फारच मस्त आहे. एकदम सुंदर. लहान मुले कधी काय करतील काही सांगता येत नाही. कालच माझ्या पुतणीने कुणाचे लक्ष नसताना रवा, अंगणातली माती आणि चक्क २-३ चिमटी केशर असे पाण्यात कालवून एक नवीन रेसिपी म्हणून एकत्र करून फ्रिज मध्ये सेट करायला ठेवले होते. :O नशीब त्यानंतर ती रेसिपी तिने फस्त केली नाही! --शाल्मली.

छान मनोगत व्यक्त झाले आहे कवितेतून....मस्त बालगीत. अनामिक, यांचीही कविता मस्त आहे....

In reply to by स्वाती राजेश

सहमत! प्रतिसाद अंमळ उशिराच दिल्या गेला त्याबद्दल क्षमस्व!! प्राजु अन् अनामिक दोघांच्याही कविता खूप सुंदर :) मुमुक्षु

कविता आवडलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि अनामिकचे खास धन्यवाद आणि अभिनंदन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्राजु, बाल कविता सुंदर केली आहेस.:) कालच माझ्या लेकाने स्कुल मध्ये त्याला पक्षाच्या खाद्याची माळ करायची होती, केली आणि घरी घेऊन आला आणि मला म्हणाला आई त्यातील एक खाऊन बघ, मी एक खाल्ली आहे. :(