Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चाणक्य on Mon, 03/14/2016 - 23:46
मला ना काही कळतच नाहीये काय करू त्या अर्धवट राहिलेल्या कवितांचं . . . आता हेच बघ ना त्या दिवशी माझ्या जवळून जाताना तुझ्या अोढणीचा झालेला तो निसटता स्पर्श.... कागदावर उतरवून तर घेतलाय पण पुढे काय करू त्याचं ?? काही कळतच नाहीये मला . . . आणि नविन कानातलं घालून एकदा मान किंचीत तिरपी करून आरश्यात पाहत होतीस तेव्हा, ते तुझं तसं बघणंही लिहून ठेवलंय मी माझ्या कवितेच्या वहीत... अगदी आरश्यातल्या तुझ्या सकट पण मग त्या मीटरमधे बसणारं काही सुचलंच नाहीये अजून पुढे त्यामुळे ती पण एक अपूर्ण राहिलीये सुचेल कधीतरी... कारण, तुझ्या पर्स मधे एक छोटासा आरसा असतो ना नेहमी ठाउक आहे मला! . . . आपलं भांडण झाल्यावर हक्काने आपल्या घरात राहणारा तुझा अबोला, तोही आहे माझ्या वहीत काफिया म्हणून घेतलाय एका गझलेत पण पुढचे शेर काही केल्या सुचत नाहीयेत अवघड आहे काफिया जरा त्याचंही काय करावं कळत नाहीये एकदा वाचशील का तो शेर ? म्हणजे निदान ती गझल तरी पूर्ण होईल. . . . कुठे बाहेर जायचं असलं की सगळं आवरून झाल्यावर तू जो मानेला एक हलकासा झटका देउन केस मागे घेतेस ते एक, आणि सुसाट वारा सुटलेला असताना अस्ताव्यस्त होत असलेले केस नीट करत असतेस ते एक अशी दोन कडवी लिहून झालीयेत एका कवितेची बरेच दिवस झाले... त्याच्यापुढे काही जाऊ शकलो नाहीये कदाचित यंदा वळवात होईल ती पूर्ण . . . अजून एक कविता आहे मुक्तछंदातली.........

Submitted by बहुगुणी on Tue, 03/15/2016 - 02:21

Permalink

क्या बात है, चाणक्य!

सुरेख! असे निसटते क्षण गोळा करून महाकाव्य होईल! किंचित अवांतरः या मुक्तकाव्यातील वर्णनं इतकी चित्रदर्शी आहेत की प्रत्येक कडव्याला वेगवेगळ्या कलाकारांनी चित्ररूप दिलं तर काय बहार येईल असं वाटलं. मिपा रंगभूषा मंडळातील व मिपावरील इतर कलासक्त लोक, म्हणजे अभ्या, जयंतराव, चित्रगुप्त, संदीप डांगे, स्पा, नीलमोहर, चौकट राजेसाहेब, एस, बबनराव, सूड, पिवशी, आनंदिता वगैरे मंडळी हे मनावर घेतील का? अशी इतरही मुक्तके/ अशा कविता इथे आहेत; मिसळलेला काव्यप्रेमी, आनंदमयी, सांजसंध्या, विशाल कुलकर्णी ही काही चटकन आठवणारी उदाहरणे....
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 03/18/2016 - 11:58

In reply to क्या बात है, चाणक्य! by बहुगुणी

Permalink

@सुरेख! असे निसटते क्षण गोळा

@सुरेख! असे निसटते क्षण गोळा करून महाकाव्य होईल! >> +++१११
  • Log in or register to post comments

Submitted by सटक on Tue, 03/15/2016 - 03:34

Permalink

सुंदर!

कवितेची कल्पनाच काय सुंदर आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 03/15/2016 - 17:27

Permalink

क्या बात है चाणक्या....!!!

क्या बात है चाणक्या....!!! निव्वळ अप्रतिम.
  • Log in or register to post comments

Submitted by भाऊंचे भाऊ on Tue, 03/15/2016 - 17:36

Permalink

मोहक

.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 03/16/2016 - 05:38

Permalink

सुर्रेख!

सुर्रेख!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Wed, 03/16/2016 - 08:42

Permalink

सुंदर!!!

सुंदर!!!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 03/16/2016 - 09:29

Permalink

चाण्यका

काय मस्त झुळुक आणली या वैशाख वणव्यात. झक्कास मनमौजी नाखु
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 03/16/2016 - 10:07

Permalink

झकास... :)

झकास... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-विकिपिडीया पे चेक कर ले, गुगल तू सर्च कर ले, बेबी जरा लुक अराउंड कर ले...नैयो मिलेगा ऐसा यार सोणिये...इक नंबर. इक नंबर. इक नंबर... :- Sanam Teri Kasam
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Wed, 03/16/2016 - 10:25

Permalink

सही

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Wed, 03/16/2016 - 10:48

Permalink

मस्त रे

फारच सुंदर झालीये.. आवडली. अवांतरः माझी आठवण काढल्याबद्दल धन्यवाद हो बहुगुणी..
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Wed, 03/16/2016 - 20:18

Permalink

सु्ंदर कविता

कवितेची कल्पना आवडली
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 03/16/2016 - 20:26

Permalink

सुंदर!!

सुंदर!!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Wed, 03/16/2016 - 21:17

Permalink

मस्तच खूप आवडली. हि अजून एक...

ह्या खिडकीच्या काचा थोड्या भिजलेल्या हा आडोसा शोधत पाऊस आलेला हे तेव्हाचे वर्णन , हा तेव्हाचा तो क्षण ही तेव्हाची कविता .. कोरी अजूनही ना सुचलेली अजूनही नाही प्रिये -वैभव जोशी
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 03/16/2016 - 21:30

Permalink

अहाहाहाहाहा, अप्रतिम.

अहाहाहाहाहा, अप्रतिम. बहुगुणीसाह्यबांचेच मत परत. मिक्याची आठवण झालीच. ओय मिक्का तुस्सी कित्थे?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 03/16/2016 - 21:31

Permalink

सुंदर !

सुंदर ! काही गोष्टी अपूर्ण राहिल्या तरच त्यातला रस, अर्थ आणि आनंद कायम राहतो !
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 03/16/2016 - 21:41

Permalink

आणि बघ ना,

आणि बघ ना, तू बसतेस समोर, मला लिहिताना पाहायला आवडते म्हणून. टक लावलेले डोळे, कधी माझ्याकडे, कधी कोर्‍या वहीकडे. काय लिहू आता तुला पाहायचे सोडून. बर्‍याच भेटी झाल्या अशा, तू असलीस की शब्द पळून जातात, नसलीस की ते पण गोंधळून जातात.
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on गुरुवार, 03/17/2016 - 22:56

In reply to आणि बघ ना, by अभ्या..

Permalink

वाह

वाह
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on गुरुवार, 03/17/2016 - 11:36

Permalink

सुरेख!

सुरेख!
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on गुरुवार, 03/17/2016 - 22:55

Permalink

मस्तय

मस्तय
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Fri, 03/18/2016 - 10:39

Permalink

मस्त मस्त आणि मस्तच

मस्त मस्त आणि मस्तच इतक्या संदर कवितेला नक्की कशी दादा द्यावी ते समजत नाहीये. अप्रतिम केवळ अप्रतिम..... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Fri, 03/18/2016 - 22:15

Permalink

धन्यवाद

धन्यवाद सर्वांना. @जव्हेरभाऊ, वैभव जोशी माझ्याही आवडत्या कवींपैकी आहे. @अभ्या, लय भारी ओळी रे @बहुगुणी, कल्पना छान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Tue, 03/22/2016 - 19:36

Permalink

खूपच मस्त..एक नंबर..

खूपच मस्त..एक नंबर..
  • Log in or register to post comments

Submitted by धनावडे on Mon, 02/11/2019 - 23:06

Permalink

फारच सुंदर कल्पना..

फारच सुंदर कल्पना..
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 6345 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com