Skip to main content

ओवेसिंचा गळा

लेखक साहना यांनी गुरुवार, 17/03/2016 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही. जेव्हा नक्षलवादी हल्ला करतांत तेंव्हा सगळे म्हणतात कि "we must encoruage naxalites to join mainstream and solve problem democratically ". माझ्या मते ओवेसी सारखा कट्टर मुसलमान संसदेत असणे हि चांगली गोष्ट असून त्याला योग्य तो मान इतरांनी दिला पाहिजे, मन व्यक्तीला असून त्याच्या विचारणा किमत देण्याची गरज नाही. जर संसदेत त्याला बोलायला दिले नाही किंवा जेल मध्ये डांबले तर त्याच्या सारख्या कट्टर लोकांपुढे कायद्याच्या बाहेर जावून आपल्या भावना लोकंवर लादणे हा एकाच पर्याय बाकी राहतो. माझ्या मते ओवेसी म्हणजे एक नक्सल type माणूस आहे ह्याने शस्त्र घेण्याच्या नादात न पडता लोकशाही मार्गाने आपले विचार आणि धोरण प्रकट करण्याचा मार्ग अवलंबला आहे. आणि तो स्तुत्य आहे. कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे. त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच. माझ्या मते कट्टरपंथी लोकांनी निवडून येवून संसदेत, वर्तमान पत्रांत इत्यादी आपले कट्टर विचार प्रकट करणे हि चांगली गोष्ट असून त्यात वायीत काहीच नाही उलट संसंद हि त्याच साठी बनवली गेली आहे. उद्धव ठाकरे ह्यांचे "गळा कापावा" वगैरे बोल केवळ अलंकारिक स्वरूपाचे असावेत असे मला वाटते.

वाचने 43366
प्रतिक्रिया 251

प्रतिक्रिया

तुम्हीच लिहीला होता ना तो RTE वरचा लेख? एक लेख इतका मुद्देसुद.. आणि एक हा असा? एका वाक्याचा दुसर्‍याला अर्थ लागेना..

कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती >> ह्या विधानाला काही आधार आहे का?

In reply to by तर्राट जोकर

विधानाला आधार !!! काहीही हं तजो भाऊ ! मी तर लेखाला काही आधार आहे का हे शोधतोय ! मलाच आधाराची गरज वाटते आहे हा लेख वाचून...

मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करुन घेतले पाहिजे या मताशी अनेक सहमत होतील. फक्त कसे? हा वादाचा विषय आहे. या धर्मात कट्टरता गरीबी गुन्हेगारी बेरोजगारी असे घटक तळाशी मोठे आहेत. जे सुसंस्कृत सुजाण मुस्लिम आहेत त्यांना आपण भारताशी एकनिष्ठ आहोत हे पदोपदी सिद्ध करावे लागते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

हे जे २५ % आरक्षण गरिबांना द्या म्हणते ना सरकार, त्यापेक्षा ह्या १३ टक्क्यांच्या मुलांना इतर मुलांसोबत जबरदस्तीने शिकायला पाठवा. सर्व धर्माचे विद्यार्थी एकमेकांसोबत लहानपणापासून शिकतील तर धार्मिक तेढ राहणार नाही. संघ, एम आय एम, भाजपा, काँग्रेस सारख्यांची दुकाने बंद होतील हे वेगळे.

In reply to by तर्राट जोकर

१३ टक्क्यांच्या मुलांना इतर मुलांसोबत जबरदस्तीने शिकायला पाठवा. सर्व धर्माचे विद्यार्थी एकमेकांसोबत लहानपणापासून शिकतील तर धार्मिक तेढ राहणार नाही.
बाप्पा असं केलं तर मुस्लिम समाजाला जबरदस्तीने भगवाकरण केल्याचा आरोप होईन ना ..तुमचा विचार स्तुत्य आहे पण करायचं कसं ? इथं दहशतवाद्याला फाशी द्यायची चोरी अन तुम्ही राजेहो कैच्याकै बोलता...

In reply to by चिनार

मेमन च्या फाशी नंतर गर्दी करणारे मुसलमान आपल्याला अस्वस्थ करतात पण कसाब ला गाडायला एक इंच जमीन देणार नाही म्हणाणारे दिसत नाहीत , का आपल्याला ते दाखवले जात नाहियेत?? काय वाटते???

In reply to by नाना स्कॉच

नाना स्कॉच भाऊ, मी मुस्लिम विरोधी नाही. सविस्तर उत्तर देण्याची तीव्र इच्छा आहे. पण जाउद्या..नको ! राम राम घ्यावा ..

In reply to by तर्राट जोकर

अल्पसंख्यांक असोत अथवा गरीब सर्वच मुलांना इतर मुलांसोबत एकत्र शिक्षण दिले गेले पाहीजे, -आपापले धार्मीक शिक्षण सुट्टीच्या दिवशी वेगळे क्लास लावून देता येऊ शकते-. विशेषतः किमान भाषांच्या स्तरावर संबंधित राज्याची भाषा संवादासाठी तीन वर्षात शिकणे तसेच स्थानिक भाषेतील लिपीत लिखीत संवाद साधता येणे गरजेचे असावे. संवाद नसेल तर अविश्वास वाढतात आणि लिपी साधर्म्य विश्वास निर्मितीस पोषक असते म्हणून उर्दू असो का तमिळ देवनागरी लिपीस प्राधान्य द्यावयास हवे असे वाटते.

In reply to by माहितगार

दोन्ही धर्माच्या लोकांमधे साहचर्य, सहवास नसल्यामुळे निर्माण होणारी अढी काढण्यासाठी एकत्र शिक्षणपद्धती आवश्यक आहे. भाषेचा मुद्दा योग्य असला तरी अप्रस्तुत वाटतो. नगर, पुणे, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या एखाद्या मोहल्ल्यात चार घरं मुस्लिम आणि पन्नास घरं हिंदु असतील तरी सर्वांची भाषा मराठीच असते. आता आपआपल्या मातृभाषेप्रमाणे घरात प्रत्येक जण वेगवेगळी भाषा बोलतो, पण समाजात वावरतांना मात्र तिथली लोकल भाषा सर्वांकडून वापरली जाते. दोन्ही समाजातील विसंवादाचे कारण भाषेचा फरक नाही हे नमूद करावे वाटते.

In reply to by तर्राट जोकर

स्थानिक माती आणि भाषेशी जोडलेले असले की एपिजे अब्दुल कलाम मिळतात ना. त्याच वेळी फकस्त मराठी बोलून काय उपयोग, तुमच्या आमच्या सोबत मराठी संस्थळांवर सहभागाच्या अभावामागचे कारण मग ती आपली इंग्लिश मिडीयमची मुले असोत का उर्दू माध्यमातली लिपी हे कारण नाही का ? किती मराठी साहित्यिकांचे लेखन उर्दूत अनुवादीत करुन उर्दू वर्तमान पत्रातून दिले जाते ? खास करुन त्यांच्या मुल्ला मौलवींनासुद्धा इतर स्थानिक संत साहित्याची माहिती असते का ? साहित्य दिले तर वाचता येते का ? सर्वच मराठी संत मुर्ती पुजक नाहीत हे त्यांना मराठी संतसाहीत्याचा अभ्यास केल्या शिवाय, अथवा मुर्ती पुजकांचीही काही एक बाजू आहे हे खुल्या संवादा शिवाय कसे काय समजू शकेल, अविश्वास आणि वैचारीक दरीस भाषा एकमेव कारण नाही पण अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण असावे किंवा कसे. भारत माता म्हणजे केवळ देश एवढाही विचार करता येतो, भारत माता की जय म्हणणारा प्रत्येक जण मुर्ती पुजा करत नसतो. भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टी हिंदू करतात म्हणून आम्ही करणार नाही या मानसिकतेतील संकुचितता त्यांना कुणी दाखवून देणार आहे की नाही- हिंदू कराग्रेवसते लक्ष्मी म्हणतात तीन देवांची नावे घेऊन कराग्रेवसते केवळ हाताने मेहनत करण्याचा संदेश देतो हिंदू हाताची प्रार्थना करतात म्हणून हिंदूंशिवाय इतर लोक त्यांचे हात वापरणे थांबवणार आहेत का ? - जशी मेंदीचा मुर्ती पुजेशी संबंध नाही तसा रांगोळीचाही संबंध नाही. नुसता दिवा लावला म्हणजे मुर्ती पुजाच होते असेही नसावे. संस्कृती आणि धर्म यांची गल्लत हिंदूत्व वादी करतात म्हणून इतर धर्मीयांनी केलीच पाहीजे असे नसावे पण अशाच छोट्या छोट्या मुद्यांचे भांडवल वाढवत नेऊन सांस्कृतिक साम्या पेक्षा संस्कृती विलग कशा आहेत हे दाखवण्यावर भर दिला जातो आणि मग परस्पर अविश्वासाचा खेळ रंगवला जातो.

पहिल्या परीच्छेदात अत्यंत शुद्धलेखन आणि नंतरच्या बाकी संपूर्ण लेखात किती त्या चुका पहिला परीच्छेद कुठून चोप्यपेस्त केला काय वायीत -संसंद शब्दाच्या शोधात असलेला :)

हे ओवेसी बरे आहेत,कायदा-संविधान याचं नाॅलेज तरी आहे यांना.पण ते धाकटे बंधू नकोत रे बाबा!!!

In reply to by सामान्य वाचक

अरे काय हे? बाकी लिहिलेले आलेच नाही.प्रकाशित करताना एरर दाखवत होते.

बॅरिस्टर आहेत, त्यांना कायद्याचं ज्ञान आहे. त्यांच्या AIMIM या पक्षाला हैदराबाद मुक्ती संग्रामातल्या रझाकारांची परंपरा आहे, जे तेव्हा लोकांवरच्या अत्याचारांमध्ये सहभागी होते. मुंबईत AIMIM कडे विधानसभेची भायखळ्याची जागा आहे. काल सर्वपक्षीय एकमताने निलंबित करण्यात आलेले वारिस पठाण हे AIMIM चेच आहेत. मला असं वाटतं की साहनाजींना असं म्हणायचंय - कट्टरवादी लोक जर मुख्यधारेच्या राजकारणात आले आणि हिंसाचाराऐवजी आपला काही अजेंडा घेऊन लोकांसमोर गेले तर ती चांगली गोष्ट आहे, कारण असं जर आपण होऊ दिलं नाही तर अशा माणसापुढे system शी चार हात करण्याशिवाय पर्याय राहात नाही आणि system त्याच्याशी लढण्यात गुंतते. नक्कीच वेगळा विचार आहे.

In reply to by बोका-ए-आझम

मास्तर जवा भेट्सान तवा कोपरापासून दंडवत घालीन तुम्हाले मूळ धागालेखकापेक्षा जास्त चांगल्या आणि थोडक्यात समजावलेला इषय

संघ आणि ओवेसी यांच्या आयडॉलॉजी बघितल्या तर वाद कुठे आहे ते ध्यानात येईल. संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत, दिला ना त्यांना पाकिस्तान मग इथं का राहून घाण करतात. बरं राहयचं असलं तर आमची हरकत नाही पण दुय्यम नागरिक, आश्रित म्हणून राहा. आम्ही म्हणू ते करा. आम्ही म्हणू ते करणार नाही तर तुमचे देशावर प्रेम नाही. ओवेसी आधी भारतीय मुस्लिम फार पेचात पडले होते. त्यांना कळत नव्हतं काय कराव. कारण इथले हिंदू असे बघतात म्हणून पाकिस्तान प्यारा म्हणावा तर ते पाकडे साले मुहाजिर का काय म्हणून हिणवतात. भंजाळलं होतं मुस्लिम पब्लिक, बाकी यांचे सर्व नेते या ना त्या पक्षाच्या दावणीला बांधलेले. मतपेट्यांपेक्षा जास्त किंमत नाही. त्यासाठी मुस्लिमांना सतत भीतीच्या सावटाखाली ठेवणे, त्यांचा विकास होऊ न देणे ही षडयंत्र काँग्रेसने खेळली, देशांतर्गत मुस्लिमांमधून देशविरोधी कारवाया करणारे सहज मिळून जातात त्याचे कारण हेच. ते खुश नाही त्यांना जसे वागवले जाते ते बघून. मग लगेच मुल्ला सांगतो तसे नाचतात. हे चक्र चालूच राहतं. मुस्लिम हे देशाचे हिंदूंइतकेच स्वतंत्र, जबाबदार नागरिक व तेवढेच अधिकारी आहेत हे बहुतेक पहिल्यांदा ओवेसीनेच राज्यघटनेचा आधार घेउन पुढे येऊन स्पष्ट सांगितले असावे. हा देश हिंदूंसारखा आपलाही आहे हे त्याने मुस्लिमांच्या मनात बिंबवणे सुरु केले. आपण का मागे राहिलो ह्याची मुस्लिमांसमोर त्याने कारणे मांडायला सुरुवात केली. त्याला उगाच पाठिंबा मिळत नाही आहे. त्याला पाठिंबा मिळतोय यात मुस्लिमांचा दोष नाही तर काँग्रेस चा आहे. ह्याचा लहान भाऊ येडा आहे. पण दोघांकडे मौलवी स्टाइलच्या ओरॅटरी स्किल्स जबरदस्त आहेत. असदची अभ्यासू वृत्ती आणि टु द प्वाइंट राहण्याचा स्वभाव बघता, मुस्लिम त्याच्या झेंड्याखाली एकवटतील त्यात नवल नाही. ओवेसीकडे दुर्लक्ष करणे, त्यला गद्दार ठरवणे घातक ठरेल. त्याच्या माध्यमातून मुस्लिमांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. फालतू जिंगोइ़जम भडकवून दोन धर्मातली तेढ वाढते, बाकी काय होतं? - आमची धाव हिथवरच. ह्याबद्दल दिग्गज लोक जास्त अभ्यासू माहीती सांगतील. बारमधे बसल्यावर जेवढं कानावर येतं तेवढं इथं लिहिलंय.

In reply to by तर्राट जोकर

बाकी ओके
संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत, दिला ना त्यांना पाकिस्तान मग इथं का राहून घाण करतात. बरं राहयचं असलं तर आमची हरकत नाही पण दुय्यम नागरिक, आश्रित म्हणून राहा. आम्ही म्हणू ते करा.
विदा ?

In reply to by sagarpdy

या बाबतीत विदा मागितला की अलविदाच मिळतो... :( ;)

In reply to by तर्राट जोकर

संघाला सुर्य म्हणत आहात का? ;) बाकी असली शायरी ही बदनामी सिद्ध करताना चालत नाही. सिद्ध करा नाही तर संघाची बदनामी करत आहात असे म्हणा..

In reply to by विकास

बदनामी? हा हा हा. सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. शब्दांचे खेळ करण्यात संघ पटाईत आहे. प्रत्येक गोष्टीपुढे राष्ट्र जोडून दिले की झाले. सध्या मुद्दा ओवेसीचा आहे. संघाबद्दल नंतर कधीतरी.

In reply to by तर्राट जोकर

जो पर्यंत तुमच्या, "संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत, दिला ना त्यांना पाकिस्तान...." या वाक्याला संदर्भ देणारे तुम्ही काही पुरावे दाखवू शकत नाही तो पर्यंत तुम्ही बदनामीच करत आहात असे मी म्हणेन. आणि या पुढे सतत तसे लिहून आठवणही करून देईन. :)

In reply to by विकास

असे बोलणारे अनेक संघी मला भेटलेत, अशा अर्थाची अनेक संभाषणे-चर्चा ऐकल्या आहेत. स्पष्ट शब्द हेच नसले तरी आशय आणि आविर्भाव हाच असतो. तुम्ही अधिकृतच पाहिजे म्हणून अडून बसाल तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुमची मते बनतात पण तुम्ही बोट ठेवून पॉईंट आउट करु शकत नाही. संघांच्या अधिकृत वेबसाईटवर तर शब्दांचे खेळ आहेत. बाकी गोळवलकरांची ही काही विधाने बोलकी आहेत. http://www.countercurrents.org/comm-guha281106.htm तुम्ही निश्चितच हे मान्य करणार नाही. तेवढं स्वातंत्र्य तुम्हाला आहेच.

In reply to by तर्राट जोकर

जेंव्हा बदनामी केली जाते तेंव्हा त्याचे पुरावे दिलेले बरे.... संघाने नक्की कुठे "संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत,..." असे म्हणले आहे? कोण कुठले संघी काय बोलतात याला महत्व नाही तर संघाची अधिकृत भुमिका काय आहे याला महत्व आहे. म्हणून तुम्ही बदनामी करत आहात असे माझे म्हणणे आहे. संघांच्या अधिकृत वेबसाईटवर तर शब्दांचे खेळ आहेत. खेळ आहेत का प्रामाणिक विचार आहेत हे कसे ठरवले? कदाचीत रामचंद्र गुहांना माहीत असावे...

In reply to by तर्राट जोकर

त्यांची पुस्तकं अप्रतिम आहेत. भारतीय इतिहास संशोधनात ज्याला Subaltern Studies म्हणतात ती विद्याशाखा सुरु करण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. पण त्यांच्या डाव्या विचारांमुळे संघाबद्दलची त्यांची मतं मी ग्राह्य धरु शकत नाही. उद्या कम्युनिस्टांबद्दल तुमचं काय मत आहे हे मोहन भागवतांना विचारण्यात जसा काही अर्थ नाही किंवा भारतातल्या गरिबीबद्दल मुकेश अंबानींना किंवा अल्कोहोलिक अॅनाॅनिमसबद्दल विजय मल्ल्यांना विचारण्यात जसा अर्थ नाही तसंच संघाबद्दल रामचंद्र गुहांना विचारण्यात काहीही अर्थ नाही. ते पुरेसे नि:पक्षपाती नाहीत.

In reply to by तर्राट जोकर

तुम्ही गोळवल करांच्या पुस्तकाच्या बाबतीत म्हणत असाल तर ते पुस्तक त्यांनी विद्यार्थी असताना लिहिले असून संघ कार्यात सहभागी होण्या आधीच आपले विचार बदलले म्हणून मागे घेतले होते. आस ते पुस्तक मिळणे सुद्धा मुश्किल आहे. मी अलाहबाद मधील एक संशोधका कडून पुस्तकाची xerox मिळवली होती. गुहा type लोक हे पुस्तक घेवून "हि संघाची अधिकृत भूमिका" असा दुष्प्रचार कधीपासून चालवत आहेत. सत्यापासून हे गृहीतक फार दूर असून आपली पोळी भजते म्हणून काहीही ह्या न्यायाने हे लोक अश्या खोट्या गोष्टीना पुढे पुढे नाचवत असतात.

In reply to by साहना

गुहा ह्यांच्याबद्दल तुम्ही म्हणता तसे असेलही, बोका ह्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांची मते ग्राह्य नसतीलही, गोळवलकरांचे पुस्तक (बंच ऑफ़ थॉट्स) हे त्यांनी विद्यार्थी दशेत लिहिले असेलही, पण, ते पुस्तक दुर्मिळ अजिबात नाही, तर हे पुस्तक संघाचे आधिकारिक संस्थळ म्हणजेच आरएसएस डॉट ऑर्ग इथे ई-बुक स्वरुपात विनाशुल्क डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे, त्याचा इंग्रजी मधे केलेला अनुवाद ह्या स्वरुपात पीडीएफ फॉरमॅट मधे हे पुस्तक डाउनलोड केले जाऊ शकते, (इच्छुकांनी वरती उल्लेखलेल्या संस्थळावर "ई बुक्स" विभागात शोध घ्यावा ही विनंती) काही प्रश्न उद्भवत आहेत ते खालील प्रमाणे 1. हे पुस्तक जर संघाच्या आधिकारिक संस्थळावर उपलब्ध आहे, तर ते संघाच्या आधिकारिक विचारांचा एक मोठा भाग का मानला जाऊ नये? 2. सदरहु पुस्तक संघाच्या आधिकारिक संस्थळावर उपलब्ध असण्यामागे तर गुहांचा टाइप लोकांचा हात नसेल न? का कसे? 3. तुमच्या म्हणण्याप्रमाणे , गुरुजींनी ते पुस्तक संघ कार्यात पडायच्या अगोदर विद्यार्थीदशेत लिहिले अन संघ कार्यात उडी घेताना ते त्यागले होते तर ते पुस्तक संघाच्या आधिकारिक संस्थळावर कसे काय उपलब्ध झाले? कोणी कुठले विचार त्यागले अन कोणी कुठले विचार आत्मसात केले असे समजायचे मग??? नोट :- माझे संघाशी काहीच वाकडे नाही, किंबहुना कुठल्याच विचाराशी माझे वाकडे नाही , फ़क्त एक पथ्य मी पाळतो ते म्हणजे उत्तम ते अन नेमके तितकेच घेणे, मला वाचन आवडते अन संघ साहित्य मला त्याज्य नाही, योगायोगाने पंधरवडा अगोदरच बंच ऑफ़ थॉट्स वाचायला घेतले आहे, त्यातुन जे चांगले मिळेल ते मी नमूद करेलच अन केलेच पाहिजे पण जे मला पटणार नाही किंवा जे चुक वाटते त्यावर मी टिका निश्चितच करेल , कारण आवडत्या विचारांचे कौतिक करणे जर माझे कर्तव्य असेल तर नावडत्याचा विरोध अन टिका करणे हा माझा हक्क आहेच. धन्यवाद

In reply to by साहना

तजो ह्यांनी दिलेल्या लिंक मधे (काउंटर करंट्स) तुम्ही उल्लेखलेल्या "we the nationhood" वर उहापोह कुठेच दिसुन आला नाही, त्यात रेपेटिटिवली "बंच ऑफ़ थॉट्स" चेच उल्लेख अन त्यातल्या विचारांची चर्चा आहे. मग मधेच "we the nationhood" चा विषय कुठून कसा अन का आला?? आपण लिंक वाचली नव्हती असे गृहीत धरावे काय?? इतकेच नाही तर आपण आपल्या मुद्द्यावरुन (बंच ऑफ़ थॉट्सच्या जागी वी द नेशनहुड) "गुहांसारखे" वगैरे एक ठोकळेबद्ध सरसकटीकरण सुद्धा केलेत , हे कसे काय???

In reply to by साहना

तुम्ही गोळवल करांच्या पुस्तकाच्या बाबतीत म्हणत असाल तर ते पुस्तक त्यांनी विद्यार्थी असताना लिहिले असून संघ कार्यात सहभागी होण्या आधीच आपले विचार बदलले म्हणून मागे घेतले होते. कदाचीत तुम्हाला, "We - Our Nationhood Defined" हे पुस्तक म्हणायचे असेल. ते त्यांनी विद्यार्थीदशेत नाही पण संघात येण्याआधी बाबाराव सावरकरांच्या पुस्तकाचा अनुवाद म्हणून केले होते. संघाने ते पुस्तक संघसाहीत्यात धरलेले नाही. तसेच त्याची शेवटची प्रत ही मला वाटते १९४७ साली निघाली. त्यानंतर म्हणजे गुरूजींच्या हयातीत देखील ते परत छापले नव्हते. अर्थात पुढे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गुहांचे माहीत नाही पण अनेक डाव्यांनी (उदा राम पुनियानी) अपप्रचारासाठी वापरले आहे. पण भारतीय डाव्यांचा तो (दुर्)गुणच आहे! असो.

In reply to by तर्राट जोकर

माझा गोळवलकर गुरुजींबद्दल काहीही अभ्यास नाही. गुहांबद्दल देखील नाही. सबब दिलेल्या विदा आणि खालील प्रतिसाद वाचून वरील आपले विधान मान्य करणे कठीण वाटते. परंतु आपण म्हणल्याप्रमाणे अनेक मुस्लिमद्वेष्टे संघी दिसतात हे सत्य. पण त्याचा अर्थ संघाची हि अधिकृत भूमिका आहे असा होत नाही. याखेरीज माणसे आणि संस्था यांच्या भूमिका कालानुरूप बदलतात असं माझं मत / अनुभव आहे. उदा. सावरकरांची जन्मठेपेच्या आधी आणि नंतरची भूमिका. त्यामुळे एखादवेळ संघाची स्वातंत्र्या नजीकच्या कालची भूमिका आपण म्हणता तशी होती असे मानले तरी मागील १०-२० वर्षात तशीच आहे का ? माझ्या मते "संघटन" यापलीकडे संघाची काहीच स्पष्ट भूमिका नाही.

In reply to by sagarpdy

मी कुठे हे म्हटलं की संघाची अमूक एक अधिकृत भुमिका अशी अशी आहे ते. मी बघितले ते संघी यांच्यात एक टिपिकल साम्य आहे. त्यांचे विचार छापखान्यातल्या खिळ्यांसारखे फिक्स आहेत. महाराष्ट्राच्या एका टोकापासून ते दुसर्‍या टोकापर्यंत अनेक संघी संपर्कात आले. अशा संघींच्या समावेशाने संघ बनतो की नाही? जे असे मुस्लिमद्वेष्टे संघी आहेत त्यांचा संघांशी संबंध नाही असे म्हणायला संघ नेहमीच तयार असतो. संघाच्या कुटुंबात अनेक हिंदुत्ववादी संघटना आहेत, त्यातल्या अनेक कट्टर मुस्लिमद्वेषी संघटनांच्या कृत्यांचा संघाने विरोध केलेला आढळला नाही. सबब मूक राहणे ही संघाची अधिकृत भूमिका असू शकते. त्याकडे बोट दाखवून विकासजींसारखे सदस्य म्हणू शकतात की संघाने तर काहीच म्हटले नाही. स्वयंसेवकांशिवाय संघ अशी काही कल्पना असेल किम्वा राष्ट्रीय आपत्तीत मदत कार्य करणारे तेच खरे संघी, संचलन कवायत करणारे तेच संघी, तीच संघाची अधिकृत भुमिका असे असेल तर असो बापडे. श्रीगुरुजींनी म्हटल्याप्रमाणे संघ वृक्ष आहे, अनेक संघटना त्याच्या फांद्या आहेत. गोड फळे आली ती संघाची असतात, कडु फळांचा वृक्षाशी संबंध नसतो. ती बाहेरच्या पक्षांनी कुठूनतरी आणून टाकलेली असतात.

In reply to by तर्राट जोकर

आपण असे म्हणले आहे: "संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत,..." अशी बदनामी दिसण्यासारखे संघाची कुठली भुमिका दिसली? तुम्हाला गुरूजींचे बंच ऑफ थॉट्स मधले म्हणणे खाली दाखवले आहे. त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे का अजूनही रामचंद्र गुहांचाच रामबाण वाटतो ते सांगितले तर बरे होईल. अर्थात जर बदनामीतच इंटरेस्ट असला तर इतर काही मान्य होणार नाही हे देखील लक्षात येईलच. असो.

In reply to by विकास

प्रस्तुत प्रतिसाद माझ्या संघी लोकांच्या अनुभव व निरिक्षणांवर आधारित आहे हे आपणास मान्य करायचे नाही ह्यात माझा दोष नाही. तुम्हाला एका वाक्यात उत्तर अपेक्षित आहे. मला गेगाबायटीचा कंटाळा आलाय. तेव्हा असो.

In reply to by तर्राट जोकर

गोळवलकरांच्या भूमिकेबद्दल काय मत आहे? का तीही रामचंद्र गुहांनी ठरवली आहे? असा प्रश्न विचारायचा आणि उत्तर मिळाले की दुर्लक्ष करायचे! चालायचच! कारण विद्वत्ता फक्त गुहांकडेच आहे - खोट कस बोलायच त्याची आणि पब्लीकला गंडवायची... अर्थात गंडवून घेयचेच असले तर ती तुमची आवड झाली! प्रस्तुत प्रतिसाद माझ्या संघी लोकांच्या अनुभव व निरिक्षणांवर आधारित आहे हे आपणास मान्य करायचे नाही संघी लोक म्हणजे कोण? त्यातले कोण नक्की संघाचे पदाधिकारी आहेत? नसले तर जे कोण गोमेसोमे असतील त्यांनी नक्की त्यांच्या "(दुष)कर्तुत्वाने" नक्की काय गुन्हे केले आहेत? हे सांगू शकाल का? कुठलाही पुरावा देयचा नाही आणि विश्वास ठेवायला सांगायचे म्हणजे अगदी ट्रंप सारखे झाले... तो नुसता सारखं पब्लीकला "believe me" इतकेच म्हणतो आणि पब्लीकला तितके चालते. पण आम्ही तसे नाही. तुम्ही एका संघटनेची बदनामीच करत आहात आणि ती देखील सार्वजनिक संस्थळावर आणि ती निषेधार्ह आहे.

In reply to by विकास

तुम्ही एका संघटनेची बदनामीच करत आहात आणि ती देखील सार्वजनिक संस्थळावर आणि ती निषेधार्ह आहे.
यात 'हेतुपुरस्सर' हा शब्द टाकायचा राहिला का? :ड

In reply to by तर्राट जोकर

अहो बदनामी करणारे जोकर ;) आधी गोळवलकरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले त्याबद्दल आपले मत सांगा. नुसते प्रश्न विचारू नका. मान्य करा काही मिळत नाही म्हणून.

In reply to by विकास

कसली घाई आहे तुम्हाला? दबाव आणण्याचा तर अजिबात प्रयत्न करु नका. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वेळेत द्यायला मी इथे येत नाही. इथे प्रतिसाद आल्या आल्या उत्तर नाही दिले तर कुणाचा तडफडून जीव जाणार नाही. तसेच गोळवलकरांच्या भूमिकेच्या प्रश्नावर तुम्हीच उलट प्रश्न विचारला. गुहांची लिंक दिली होती, त्यातल्या भूमिकेवर प्रश्न होता. तो चुकवून तुम्ही तुमच्या सोयिस्कर तुकडा आणून पिवळे करुन दाखवुन हेच का ते असे विचारले. त्यामुळे माझा मूळ प्रश्न तर बाकीच आहे. त्याचे आधी बघा कसे जमते ते? बाकी, निसर्गाची हाक दबावाच्या घाईस कारण असेल तर सावकाश जाऊन या. मला वेळ मिळाला की स्वतंत्र धागा टंकेन. भाजपबद्दल टंकायचाच आहे, संघाशिवाय कसा होइल? घाबरु नका, सगळं नीट होइल. देवाकडे प्रार्थना करा.

In reply to by तर्राट जोकर

ही तुमची नेहमीची style झालीय आता. सनसनाटी, वाट्टेल ती विधानं करायची; पुरावे मागितले की मागे सरायचं; विरोधासाठी विरोध करायचा आणि सगळी चर्चा गढूळ करुन टाकायची. मराठी आणि हिंदी सीरियल्समधल्या ज्या नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा असतात त्यांचं वागणं आणि तुमचं वागणं याच्यात मला तरी काहीच फरक दिसत नाहीये. खुसपटं काढणं आणि अंगाशी आलं की ' मला असं म्हणायचंच नव्हतं, मला वेळ नाही, तुम्हाला उत्तरं देण्याची मला काही गरज भासत नाही वगैरे थुकरट स्पष्टीकरणं द्यायची. आता यावर तुमचं उत्तर काय असणार आहे तेही सांगतो - मी आमंत्रण दिलं नव्हतं तुम्हाला वाद घालायला वगैरे वगैरे. एवढं मुद्दे सोडून वाद घालण्याचं तुमचं कौशल्य बघून माझी तर खात्री पटलेलीच आहे की....

In reply to by बोका-ए-आझम

असु देत. कधी कधी एका विधानामागे एक ग्रंथभर स्पष्टीकरण आवश्यक असतं. तुमची इच्छा असेल पण माझी ताकत नाही ग्रंथभर लिहित बसायची. हिंदु म्हणजे काय याची व्याख्या लोक एका वाक्यात करतात पण ती तशी नाही हे तुम्हाला माहित आहे. तसेच संघाचे वागने मी एका वाक्यात बसवले, त्याला पुरावे हवे असतील तर जरा धीर धरावा लागेल. बाकी इथे काहीही सांगितलं तरी उडवून लावण्याचे, मान्यच न करण्याचं स्वातंत्र्य उपभोगायचे, वरुन इतरांना दोष द्यायचे हेही कौशल्य परिचयाचे झाले आहे. बाबरी मस्जिद ही मस्जिदच नव्हती असे ठोकून देणारे सदस्यही इथे बघितलेत. त्यामुळे असो. तुमचे विचार तुमच्याजवळ, माझे माझ्याजवळ.

In reply to by तर्राट जोकर

कसली घाई आहे तुम्हाला? दबाव आणण्याचा तर अजिबात प्रयत्न करु नका. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वेळेत द्यायला मी इथे येत नाही. इथे प्रतिसाद आल्या आल्या उत्तर नाही दिले तर कुणाचा तडफडून जीव जाणार नाही.
बाकी, निसर्गाची हाक दबावाच्या घाईस कारण असेल तर सावकाश जाऊन या. मला वेळ मिळाला की स्वतंत्र धागा टंकेन.
भाषा अजिबात आवडली नाही. लोक राजकीय चर्चांना का कंटाळतात याचे उत्कृष्ट उदाहरण इथेच दिल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by तर्राट जोकर

इथे प्रतिसाद आल्या आल्या उत्तर नाही दिले तर कुणाचा तडफडून जीव जाणार नाही.>>>>>>>. हे टायपिंग करताना तुमची लईच तड्फड होत होती वाटत!

In reply to by DEADPOOL

इथली तडफड दिसली नाही वाटतं तुम्हाला अहो बदनामी करणारे जोकर ;) आधी गोळवलकरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले त्याबद्दल आपले मत सांगा. नुसते प्रश्न विचारू नका. मान्य करा काही मिळत नाही म्हणून.

In reply to by तर्राट जोकर

इथली तडफड दिसली नाही वाटतं तुम्हाला अहो बदनामी करणारे जोकर ;) आधी गोळवलकरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले त्याबद्दल आपले मत सांगा. नुसते प्रश्न विचारू नका. मान्य करा काही मिळत नाही म्हणून. मग बरोबर आहे ना,समोरचा उत्तर मागतोय आणि आपण नुसते प्रश्न विचारल्यावर तड्फड होईलच!

In reply to by तर्राट जोकर

तथाकथित विदा पोचला. आपण जी भूमिका मांडताय ते उघड सत्य आहे असे तरी नक्की वाटत नाही. सबब
सुर्याला सुर्य न म्हणणाराला काय द्यावा विदा?
हे वाक्य मागे घ्यावं हि अपेक्षा आहे. यापलीकडे, आपला दृष्टीकोन बाळगण्यास आपण स्वतंत्र आहात, धाग्यावर अती विषयांतर नको.

In reply to by तर्राट जोकर

मी बघितले ते संघी यांच्यात एक टिपिकल साम्य आहे. त्यांचे विचार छापखान्यातल्या खिळ्यांसारखे फिक्स आहेत. महाराष्ट्राच्या एका टोकापासून ते दुसर्‍या टोकापर्यंत अनेक संघी संपर्कात आले. अशा संघींच्या समावेशाने संघ बनतो की नाही? काय विधान आहे? जोकर बुवा मग मी चांद्या पासून बांद्यापर्यंत( इतकेच कशाला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत) बरेच मुसलमान पहिले त्यात बरेच पाकिस्तानचे समर्थक होते आणी त्यांच्या विचारसरणीचा इतर मुसलमान निषेध करत नाहीत म्हणजे आपल्याच विचारसरणी प्रमाणे "सगळेच" मुसलमान पाकिस्तानचे समर्थक आहेत असेच म्हणावे लागेल. आपल्या मुद्द्याचे समर्थन करण्यासाठी आपण कोणत्या थराला जाता ते स्वच्छ दिसते आहे. संघ (किंवा मोदी) द्वेष इतका पराकोटीचा? याला आपला परत मेगाबायती प्रतिसाद येईलच परंतु मला त्यात काडीचा रस नाही. असो.

In reply to by तर्राट जोकर

खालील भुमिकेबद्दल बोलत आहात का? नक्की काय वाटते आपल्याला? "... We are not so mean as to say that with a mere change in the method of worship, an individual ceases to be a son of the soil. We have no objection to God being called by any name whatever. We, in the Sangh, are Hindus to the core. That is why we have respect for all faiths and religious beliefs. He cannot be a Hindu at all who is intolerant of other faith..." (संदर्भः Bunch of Thoughts)

In reply to by sagarpdy

माझ्याकडे ज्येष्ठ संघ स्वयंसेवक दामूआण्णा दाते आणि वि.रा. करंदीकर यांची 'स्मरणशिल्पे' अ‍ाणि 'तीन सरसंघचालक' ही पुस्तके आहेत. त्यात संघाची किंवा सरसंघचालकांची विचारसरणी दाखवणारी खालील वाक्ये आहेत. १. गोळवलकर गुरुजी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्यातील संवादः "मुसलमान हे अराष्ट्रीय आहेत व अशा अराष्ट्रीय मुसलमानांना जे आपल्यात सामावून घेतात, ते राष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे एक आदेश काढा व अशा सर्वांनाच बाहेर घालवा" २. ज्यांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल शंका असेल त्यांचा मतदानाचा हक्क रद्द करा. ते जर या राष्ट्राचे नाहीत, तर या देशात त्यांना मत नाही, हे प्रस्थापित करा. ३. मुसलमान मनोवृत्ती नेहमी सत्कार्यात विघ्न आणणारी असते, हे आपण जाणताच आहात. असो हे नोट्स काढून ठेवलेले मुद्दे असल्याने चटकन आठवले. पुस्तके मुळातूनच वाचली तर आणखी विदा निश्चितच मिळेल.

In reply to by आजानुकर्ण

वरील मुद्दा १ मधील संवादातील वाक्य हे गोळवकर यांचे आहे. शास्त्री यांचे नाही. गैरसमज नसावा!

In reply to by आजानुकर्ण

आजानुकर्ण, मुस्लिम अराष्ट्रीय आहेत या विधानात काय चुकीचं आहे? इस्लाम मध्ये राष्ट्र ही संकल्पनाच नाही. मिल्लत नावाची एक संकल्पना आहे, पण तिचा राष्ट्राशी संबंध नाही. पाकिस्तानाकडे पाहून हे कळतं की. वेगळं उदाहरण कशाला पाहिजे? शिवाय जगभरच्या मुस्लिमांना सर्वात जास्त धोका आहे तो स्वत:ला मुस्लिम म्हणवून घेणाऱ्या दहशतवाद्यांचा. हिंदूंचा नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

'संघ मुस्लिम विरोधात आहे असं कुठं म्हटलंय' पासून आता 'मुस्लीम अराष्ट्रीय आहेत या विधानात चुकीचं काय आहे' इथपर्यंत स्वयंसेवकांची गाडी आली याचं समाधान वाटतंय. हळूहळू सगळंच मान्य कराल. मुसलमानांचं जाऊद्या. आधी हिंदूंकडं पाहू. हिंदूंमध्ये आहे का राष्ट्र ही संकल्पना? असल्यास ती कुठं धर्मग्रंथात, भगवद्गीतेत, पुराणात, उपनिषदात, वेदात लिहिली आहे ते सांगा. की हिंदुत्त्व म्हणजेच राष्ट्रीयत्व? म्हणजे आपोआप बाकीचे सगळे अराष्ट्रीय ठरतात? मुस्लीमांना कसला धोका आहे तो असेल पण त्यापेक्षा हिंदूंना कसला धोका आहे हे तुमचे प्रतिसाद पाहून स्पष्ट कळतंय.