Skip to main content

ओवेसिंचा गळा

लेखक साहना यांनी गुरुवार, 17/03/2016 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही. जेव्हा नक्षलवादी हल्ला करतांत तेंव्हा सगळे म्हणतात कि "we must encoruage naxalites to join mainstream and solve problem democratically ". माझ्या मते ओवेसी सारखा कट्टर मुसलमान संसदेत असणे हि चांगली गोष्ट असून त्याला योग्य तो मान इतरांनी दिला पाहिजे, मन व्यक्तीला असून त्याच्या विचारणा किमत देण्याची गरज नाही. जर संसदेत त्याला बोलायला दिले नाही किंवा जेल मध्ये डांबले तर त्याच्या सारख्या कट्टर लोकांपुढे कायद्याच्या बाहेर जावून आपल्या भावना लोकंवर लादणे हा एकाच पर्याय बाकी राहतो. माझ्या मते ओवेसी म्हणजे एक नक्सल type माणूस आहे ह्याने शस्त्र घेण्याच्या नादात न पडता लोकशाही मार्गाने आपले विचार आणि धोरण प्रकट करण्याचा मार्ग अवलंबला आहे. आणि तो स्तुत्य आहे. कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे. त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच. माझ्या मते कट्टरपंथी लोकांनी निवडून येवून संसदेत, वर्तमान पत्रांत इत्यादी आपले कट्टर विचार प्रकट करणे हि चांगली गोष्ट असून त्यात वायीत काहीच नाही उलट संसंद हि त्याच साठी बनवली गेली आहे. उद्धव ठाकरे ह्यांचे "गळा कापावा" वगैरे बोल केवळ अलंकारिक स्वरूपाचे असावेत असे मला वाटते.

वाचने 43365
प्रतिक्रिया 251

प्रतिक्रिया

In reply to by साहना

फ़क्त मार्ग खडतर असतो, स्वप्ने पुर्ण करायला पैसा पण लागतो अन ही बातमी काहीतरी वेगळेच सांगते. माझ्या आकलना प्रमाणे प्रॉब्लम खालील प्रमाणे असावे (मी फाइनेंस एक्सपर्ट नाही फ़क्त सामान्य निरिक्षण आधारित तर्क देतोय चुक असल्यास संबंधित तज्ञ लोकांनी मला दुरुस्त करावे बँक्सच्या बाजुने :- 1. ओवरऑल इस्लामोफोबियाचा असर असणे 2. मुस्लिमांस डिसबर्स केलेली सगळी लोन्स एनपीए होतीलच ही अनाठाई भीती मुस्लिमांच्या बाजुने 1. मुळात परिवार हे यूनिट मोठे असल्याकारणे मॉर्गेज करण्यालायक हिश्श्यात आलेले एसेट छोटे / अंडरवैल्यू असणे 2. नॉर्म्स कंप्लाय करण्यात अनकम्फ़र्टेबल असणे (उदा स्त्रियांच्या नावे लोन असता बुरका वर करून फ़ोटो काढणे वगैरे) एक सकारात्मक चित्र अन संभाव्य उपाय - मुद्रा लोन्स उपयोगी ठरू शकतात, ही लोन्स योजना हा एक अतिशय सकारात्मक भाग आहे. -बँक ला सरकारी स्तरावरुन प्रोत्साहन देणे तसेच हुशार मुस्लिम विद्यार्थी उद्योजक ह्यांचे सार्वजनिक कौतुक अन encouragement. - सेल्फ हेल्प गृप उर्फ़ स्वयं सहाय्यता गट हा माइक्रो फाइनेंस मधला एक उत्तम पर्याय आहे सुदैवाने मुस्लिम लोकांत त्याला चांगला प्रतिसाद आहे तो पुढे कंटिन्यू राहील अश्या स्टेप्स घेणे , त्याच्यासाठी गरजेचे वोकेशनल कोर्सेज उदा शिवण क्लास, शेळी पालन, पत्रावळी द्रोण तयार करणे, एमएमसीजी मधले डिप्लोमा वगैरे प्रोत्साहित करणे, एग्रो वन मार्केट किंवा खाद्य महोत्सव वगैरे आपण आयोजित करतो तसे त्यांना कस्टमर एक्सपोज़र देणारे मेळावे आयोजित करणे पण करता येईल, वरील सगळे वोकेशनल कोर्सेज स्किल इंडिया अंतर्गत सुरु करता येतील -नोबेल पारितोषिक विजेते बांग्लादेशचे महंमद युनुस अन त्यांच्या ग्रामीण बँक ह्या माइक्रोफाइनेंस मधल्या कार्याचा अभ्यास अन त्यात लोकल भारतीय कंडीशन नुसार मॉडिफिकेशन करून वापर करणे (हे आमचे स्वगत झाले सरकार ने असे काही केलेही असेल, असल्यास स्तुत्य आहे)

In reply to by नाना स्कॉच

यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी याबद्दल बोलणं करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. २००७ च्या मार्च महिन्यात मुंबई विद्यापीठात त्यांचं भाषण झालं होतं. तेव्हा त्यांनी आपल्या ग्रामीण बँकेची तत्वं ऐकवली होती. ग्रामीण बँक फक्त स्त्रियांना कर्ज देते आणि त्यासाठी त्या स्त्रीचं राहतं घर तिच्या नावे असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे पुरूषांनी दारु पिऊन बायकांना मारणं खूप कमी झालेलं आहे कारण घर हे आता त्या स्त्रीच्या नावाने असल्यामुळे ती नव-याला घराबाहेर काढू शकते. परतफेडीचा काळ एक महिन्याचा आहे आणि गावातलं पोस्ट आॅफिस किंवा पानवाला हे पैसे स्वीकारणारे बँकेचे एजंट्स आहेत. कर्जाची रक्कम जी वस्तू विकत घ्यायची आहे त्या वस्तूपेक्षा जास्त नसते, जेणेकरून कर्ज घेणाऱ्याला पैसे दुस-या एखाद्या गोष्टीवर उडवायचा मोह होऊ नये. आपल्याकडे जेव्हा ही पद्धत राबवली गेली तेव्हा यातली सगळी थ्वं पूर्णपणे अंमलात आणली गेली नाहीत. विशेषतः घर स्त्रीच्या नावे असणे. त्यामुळे त्याचा म्हणावा तेवढा प्रभाव दिसला नाही. हे स्वतः युनुस यांच्याकडून ऐकलेलं आहे.

In reply to by साहना

..नाही, उच्च शिक्षण घ्यायचे, चांगली नोकरी करायची, धंदा करायचा शक्य असेल तर विदेशांत जावून स्थायिक व्हायचे अशीच लिमिटेड स्वप्ने होती बोला, भारत माता की जय :)

In reply to by आबा

वंदे मातरम्!

हिंदूंच्या मानसिक असुरक्षिततेचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न काही धूर्त संघटनाही करत आहेत.

In reply to by तर्राट जोकर

चला हिंदू असुरक्षित आहेत हे तरी मान्य केलं, मग ते मानसिकरीत्या का होईना. बाकी मुसलमानांच्या तथाकथित असुरक्षिततेचा फायदा तर घेतला गेलाय बऱ्याच अतिधूर्त व्यक्ती, संघटना आणि राजकीय पक्षांकडून. अजूनही घेतला जातोय.

त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला.
काय सांगता! माती कधी चारली? १९६६ साली? १९७० साली? सेना अजूनही महाराष्ट् राज्यात स्वबळावर एकदाही सत्तेवर आलेली नाही. आपण महाराष्ट्र राज्याचे विधानसभा/ लोकसभा निकाल पाहा, अनेकदा कॉन्ग्रेसला आसराच मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत कॉन्ग्रेसला हाग्या मार खावा लागला तो मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा कडुन. सेनेने कधी कायद्याबाहेर जाऊन ठोकशाही केली नाही असे आपले मत आहे का? सेनेने स्विकारलेला खडतर मार्ग कोणता ते सांगा. सेनेने सुरुवातीच्या मराठी माणसांना नोकर्‍या मिळवुन देण्यात पुढाकार घेतला हे निश्चित पण मराठी प्रेमामुळे कुणी कॉन्ग्रेस सोडुन सेनेत गेल्याचे ऐकिवात नाही. हिंदू मुस्लिम दंगलीत मुंबईकर हिंदुंना सेनेचा खूप मोठा आधार वाटायचा हे निर्विवाद सत्य आहे. मात्र महापालिका ताब्यात असताना, भरपूर नगरसेवक असताना मुंबईत अमराठी लोकांच्या दाट वसाहती कशा काय उभ्या राहिल्या? मी सेना जवळपास स्थापनेपासून पाहत आहे आणि एकेकाळी सेनेचे समर्थनही करायचो. पण 'तारतम्य' वाली सेना कधीच संपली. प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी, दत्ता नलावडे, गजानन किर्तिकर, मनोहर जोशी, रमेश प्रभु, सुधीर जोशी, वामनराव महाडिक हे कधीच इतिहास जमा झाले.

In reply to by सर्वसाक्षी

+९९९९९९९९९९९.... सेनेने स्वतःच्या ताकदीबद्दल अनेक गैरसमज पसरविले होते/आहेत. भाजप म्हणे सेनेमुळे महाराष्ट्रात वाढला. वस्तुस्थिती याच्या बरोब्बर उलट आहे. एप्रिल १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यावर महाराष्ट्रात मे १९८० मध्ये पूर्णपणे स्वतंत्र लढून भाजपने महाराष्ट्राच्या जवळपास सर्व भागातून आपले १२ आमदार निवडून आणले होते. त्यावेळी शिवसेनेचे शून्य आमदार निवडून आले होते. १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात इंदिरा कॉंग्रेसची लाट होती. इंदिरा काँग्रेसला देशात ५४३ पैकी तब्बल ३५५ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात इंदिरा काँग्रेसने शिवसेनेबरोबर युती करून निवडणुक लढविली होती. त्यात शिवसेनेने मुंबईत २ जागांवर शिवसेनेचे उमेदवार उभे होते. उर्वरीत ४६ जागांवर इंदिरा काँग्रेसचे उमेदवार होते. इंदिरा काँग्रेसने ४६ पैकी तब्बल ३९ जागा जिंकल्या. परंतु आपला बालेकिल्ला समजला जाणार्‍या मुंबईत, प्रचंड लाट असलेल्या इंदिरा काँग्रेसबरोबर युती करूनसुद्धा शिवसेनेला एकही उमेदवार निवडून आणता आला नव्हता. आणि म्हणे मुंबई आमचा बालेकिल्ला आणि भाजप आमच्यामुळे वाढला! शिवसेना १९६६ साली स्थापन झाली. त्यानंतर १९६९ मध्ये एका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा १ आमदार निवडून आला आणि नंतर १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत १ आमदार निवडून आला. १९८५ च्या निवडणुकीत भाजपचे १६ आमदार निवडून आले होते. म्हणजे १९६६-१९८९ या २३ वर्षात शिवसेनेला फक्त २ आमदार निवडून आणता आले होते. १९९० साली भाजपबरोबर युती केल्यावर शिवसेनेने दांडगाई करून भाजपचा बालेकिल्ला असलेले अनेक मतदारसंघ (उदा. शिवाजीनगर) हिसकावून घेऊन स्वत:च्या घशात घातले आणि २८८ पैकी तब्बल १८३ जागा लढविल्या. तरी फक्त ५२ आमदार निवडून आले (म्हणजे ५१ आमदार वाढले). भाजपने फक्त १०५ जागा लढवून ४२ आमदार निवडून आणले (म्हणजे २६ आमदार वाढले). म्हणजे भाजपबरोबर युती करून भाजपला जेवढा फायदा झाला त्याच्या दुप्पट फायदा शिवसेनेला झाला. ठाणे व मुंबईतील काही ठराविक भाग सोडले तर सेनेला महाराष्ट्रात कोणीही ओळखत नव्हते. भाजपने मराठवाड्यातून गोपीनाथ मुंडे, मुंबईतून राम नाईक व हशू अडवाणी, ठाण्यातून राम कापसे, कोकणातून डॉ. नातू, पुण्यातून अरविंद लेले, अण्णा जोशी असे वेगवेगळ्या भागातून १-२ का होईना पण स्वबळावर आमदार निवडून आणले होते. भाजपमुळेच महाराष्ट्रात शिवसेनेची वाढ झाली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोण मोठा भाऊ याच स्पष्ट उत्तर जनेतेने दिले आहे. २००२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत सेना १०० + भाजप ३२ अशी स्थिती होती. २००७ मध्ये सेना ८४ + भाजप २८ व २०१२ मध्ये सेना ७५ + भाजप २९ अशी स्थिती होती. भाजपने आपल्या नगरसेवकांची संख्या फारशी कमी होऊन दिलेली नाही. परंतु सेनेची सातत्याने घसरण सुरू आहे. २०१७ मध्ये जर सेना स्वबळावर लढली तर सेनेचे ५० पेक्षा कमी नगरसेवक असतील. मराठी, मराठी गजर करताना शिवसेनेने अनेक अमराठी लोकांना राज्यसभेचे खासदार केले. सेनेने खडतर मार्ग वगैरे कधीही स्वीकारलेला नाही. वाटेल ते प्रक्षोभक बोलणे एवढेच सेनेचे व्यवच्छेदक लक्षण. तसं पाहिलं तर शिवसेनेत तारतम्य कधीच नव्हतं. १९९२ साली बाबरी मशीद प्रकरणानंतर बाळासाहेब कसे शूर होते असे चघळले जाते. त्यावेळचे त्यांचे उद्गार हे सावध व जरतर शब्द वापरून काढलेले आहेत हे सोयिस्कररित्या दुर्लक्षिले जाते. २०१४ मध्ये बाळासाहेब असते तर त्यांनी भाजपने युती तोडल्यावर अशी भाषा वापरली असती की त्यापुढे उद्धव, राऊत इ. ची भाषा सुसंस्कृत वाटली असती.

In reply to by श्रीगुरुजी

वाटेल ते प्रक्षोभक बोलणे एवढेच सेनेचे व्यवच्छेदक लक्षण.
+४२० श्रीगुरुजी आणि सर्वसाक्षी यांच्याशी एकाच वेळी सहमत होण्याची वेळ कधी येईल असे वाटले नव्हते. मात्र आमचा येथे अपेक्षाभंग झाला आहे हे या ठिकाणी या माध्यमातून जाहीर करत आहोत.

In reply to by श्रीगुरुजी

ठाणे व मुंबईतील काही ठराविक भाग सोडले तर सेनेला महाराष्ट्रात कोणीही ओळखत नव्हते. भाजपमुळेच महाराष्ट्रात शिवसेनेची वाढ झाली आहे.
चुकीची समजूत आहे. मुंबई पुण्यात बसून केलेला हा विचार आहे. मी तुम्हाइतकी डिटेल्ड आकडेवारी नाही देऊ शकणार, वादविवादही करु शकणार नाही पण मराठवाडा अन त्याला लगत असलेला प. महाराष्ट्र व इतर भागात लहानपणापासून गावोगावी शिवसेनचे बोर्ड पाहतोय. भाजपाचा एखाद दुक्का कार्यकर्ता असायचा. शिवसेनेच्या बर्‍याच कट्टर शिवसैनिकांमुळे काँन्ग्रेसला/राश्ट्रवादीला अरेला कारे करणारा पर्याय मिळाला. अशी साथ युतीला मिळाल्याने सर्व महाराष्ट्रात भाजप पाय रोवू शकला. नाहीतर नुसत्या तत्वांवर राष्ट्रवादी/काँ शी निवडणुकी लढत घेण्याची एकट्या भाजपाची ताकतच नव्हती.

In reply to by अभ्या..

सहमत. पुण्यामुंबईतली शिवसेना आणि गावाखेड्यातली शिवसेना ह्यात खूप फरक आहे. भाजप शिवसेनेच्या खांद्यावर बसून आयत्या बिळावर नागोबा झाला.

In reply to by तर्राट जोकर

वस्तुस्थिती बरोब्बर उलट आहे. भाजप हा जन्मापासूनच सेनेपेक्षा जास्त जनाधार असलेला पक्ष होता. २०१४ मध्ये हे पुन्हा एकदा सिद्ध झालं इतकंच.

In reply to by श्रीगुरुजी

दगडाचा जनाधार!! मधे ते खुळ काढले होते मिसकॉल द्या अन भाजप मेंबर व्हा! कश्यात काय नाय तर आमच्या नाक्यावर बसणाऱ्या राष्ट्रवादी अन काँग्रेस च्या टग्याना सुद्धा "congratulations" चे मॅसेज आले होते ऑटोमेटेड बीजेपी कडून मेंबर झाल्याबद्दल! अन जनाधार जनाधार कसला सांगताय, किती टक्के मते आली लोकसभेत, बरं ते ही सोडा, जितकी मते मिळाली आहेत ती फ़क्त अन फ़क्त नमो नामक एका सशक्त पर्यायाला मिळाली आहेत! जनाधार होता तर 13 दिवसात सरकार का पडले होते? अन 99 मधेही स्वबळावर का नाही येता आले!? पुर्ण बहुमत यायला 2014 का उजाडावे लागले?? शिवसेना वॉज सेना!! जोवर साहेब होते! नंतर असोच!!

In reply to by नाना स्कॉच

शिवसेना ही गुंडांनी, गुंडांची आणि गुंडांसाठी चालवलेली संघटना होती आणि आहे. तिला भाजपबरोबर आल्यावर जरा संभावित चेहरा मिळाला. बाकी युती तुटल्यावर शिवसेनेने रंग दाखवलेच की. एवढा जर जनाधार होता शिवसेनेचा तर जेमतेम ६० जण कसे काय निवडून आले? मुंबई महानगरपालिका या एका गोष्टीच्या जोरावर सेनेची मिजास आहे. एकही महत्त्वाचा portfolio नाही, ना राज्यात ना देशात. खिशात नाही आणा तरी बाबुराव म्हणा अशी सेनेची गत आहे. एकदा मुंबई महानगरपालिका हातून गेली की मग सेना किती पाण्यात आहे ते कळेलच.

In reply to by बोका-ए-आझम

+ १ मुंबई महापालिका देखील निव्वळ भाजपच्या मदतीने सेनेच्या ताब्यात आहे. महापालिकेच्या २२८ जागांपैकी २००२ मध्ये शिवसेनेने १००, २००७ मध्ये ८४ आणि २०१२ मध्ये ७५ जागा मिळविल्या. म्हणजे एकदाही पूर्ण बहुमत नाही. भाजपने अनुक्रमे ३२, २८ व २९ जागा मिळविल्याने सेनेचा महापौर होऊ शकला. भाजपने खांद्यावर घेतले नसते तर सेना मुंबईत सत्तेवर येऊ शकली नसती. अगदी १९८५ मध्ये सुद्धा सेनेला १७५ पैकी ७४ जागाच होत्या. २०१७ मध्ये भाजप व सेना एकमेकांविरूद्ध लढले तर सेना नक्कीच ५० च्या खाली उतरेल. कल्याण-डोंबिवली, ठाणे इ. महापालिकेत देखील सेनेला स्वतःला पूर्ण बहुमत नाही. सर्व ठिकाणी भाजपच्या मदतीने महापौर निवडून आणलेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सध्या राज्याला लागू होतो का ?
भाजपने खांद्यावर घेतले नसते तर सेना मुंबईत सत्तेवर येऊ शकली नसती
शिवसेनेने खांद्यावर घेतले नसते तर भाजप राज्यात सत्तेवर येऊ शकले नसता

In reply to by कपिलमुनी

भाजपने सरकार आधी स्थापन केलं. विश्वासदर्शक ठरावही सहमत झाला. तेव्हा सेना विरोधी पक्षात होती. राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा दिला होता. नंतर सेना अलगद सरकारमध्ये आली कारण ५ किंवा जी काही असतील तेवढी वर्षे विरोधात बसायची सेनेची तयारी नव्हती. त्यामुळेच सेना भले तडजोड करुन का होईना पण सरकारमध्ये आली. सरकारमध्ये राहण्याची गरज सेनेला जास्त आहे म्हणूनच तर केंद्रात फक्त एक मंत्रिपद आणि राज्यात बिनमहत्त्वाची मंत्रिपदं असूनसुद्धा सेना आज सरकारमध्ये का आहे? आणि तरी तुम्ही म्हणताय सेनेने खांद्यावर घेतलं नसतं तर भाजप सत्तेवर येऊ शकला नसता?

In reply to by बोका-ए-आझम

मुंबैत सेना-भाजपच्या जागा अशा १०० | ३२ ८४ | २८ ७५ | २९ असे असतांना भाजपाने सेनेला खांद्यावर घेतले अशी भाषा जर गुरुजी वापरतात तर तेव्हा तीच भाषा सेनेसाठी वापरली तर बिघडले कुठे. मुळात सेनेशिवाय भाजप सरकार आले असते काय हा प्रश्न आहे

In reply to by तर्राट जोकर

मुंबईत महापालिका निवडणुकीत भाजपचा पाठिंबा नसता तर शिवसेनेचा महापौर होऊच शकला नसता. याउलट २०१४ मध्ये शिवसेना विरोधात असूनही भाजपने सरकार स्थापन केले होते. सेनेशिवाय भाजपचे सरकार आलेलेच होते. सेनेतील अंतर्गत दबावामुळे व सत्तेसाठी अत्यंत कासावीस झाल्याने सेनेला शेवटी मिळेल ती बिनमहत्त्वाची मंत्रिपदे स्वीकारून सत्तेत यावे लागले.

In reply to by तर्राट जोकर

यावरून कळतंच ना की तयारी होती. कसं आहे - विरोधच करायचा आणि वस्तुस्थितीकडे पूर्ण दुर्लक्ष करणं हे आता तुमच्या अंगवळणी पडलेलं आहे. त्यामुळे असले प्रश्न अपेक्षित आहेत. त्याने वस्तुस्थिती बदलत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

इथे विरोध काय केलाय ते सांगाल काय जरा? ऐकुन घेतोय म्हणुन आता तुम्ही वाट्टेल ते बोलणार आहात काय?

In reply to by तर्राट जोकर

विश्वास प्रस्ताव जिंकलेला होता. याविषयी सविस्तर चर्चा एका धाग्यात झालेली आहे. त्यावेळी तुम्ही मिपावर नव्हता. समजा भाजपकडे बहुमत नाही/नव्हते असा शिवसेनेसकट सर्व विरोधी पक्षांचा विश्वास होता/आहे, तर आजतगायत अविश्वास ठराव का मांडलेला नाही? शिवसेना एक-दीड महिना विरोधी पक्षनेतेपद उपभोगत होती. त्या काळात तरी अविश्वास ठराव मांडता आला असता. त्या काळात जेव्हा सुरवातीच्या काळात सभापतींची निवड होणार होती, तेव्हा राणा भीमदेवी थाटात घोषणा करून शिवसेनेने सभापतीपदासाठी आपला उमेदवार दिला होता. जर भाजपकडे बहुमत नसते तर शिवसेनेचा उमेदवार सभापतीपदी निवडून आला असता. ते न करता शिवसेनेने आयत्यावेळी आपला उमेदवार मागे घेतला. त्यामागे सभापतींची निवड बिनविरोध करण्याचा उद्देश होता का सभापतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानात आपल्याच पक्षाची मते फुटतील याची भीति होती हे ज्याने त्याने शोधून काढावे.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, भाजपा सोडुन तुमच्या लेखी सगळ्या पार्ट्या कःपदार्थ, सत्तेला चटावलेले, सत्तेसाठी कासावीस होणारे, शय्यासोबत वैगरे करणारे असेच आहेत का?

In reply to by अभ्या..

हो राजकिय पक्षच. सरळ प्रश्नावर फाटे फोडणारा क्षुल्लक प्रश्न विचारुन गुरुजींनी उत्तर टाळले असं दिसतंय.

In reply to by तर्राट जोकर

फार व्यापक प्रश्न आहे. एकतर सगळ्या पक्षांचा विचार करायचा (भारतात ७०० हून अधिक नोंदणी झालेले राजकीय पक्ष आहेत) आणि तो पक्ष भाजपच्या तुलनेत कःपदार्थ आहे का, सत्तेला चटावलेला आहे का, सत्तेसाठी कासावीस झालेला आहे का, सत्तेसाठी कोणासोबतही शय्यासोबत करतो का ई. निकषांवर त्या पक्षाचा अभ्यास करून प्रतिसाद लिहायचा. फार मोठे काम आहे. जमलं तर लिहितो.

In reply to by श्रीगुरुजी

सगळ्या सोडा हो, ज्यांच्या बद्दल आजवर तुमच्या प्रतिसादांमधून लिहलंय त्यांच्याबद्दल अभ्यास करुनच असले शब्द वापरत असाल ना? तेवढ्यांचंच सांगितलं आता तरी चालेल.

In reply to by तर्राट जोकर

आधी म्हणालात सगळ्या पार्ट्या आणि आणि आता म्हणताहात सगळ्या सोडा हो. एकदा नक्की काय ते ठरवा.

In reply to by श्रीगुरुजी

गोल गोल फिरणे सोडा. विचारलेला प्रश्न काय आहे ते तुम्हाला कळलाय, उत्तर तर स्पष्ट आहे. कबूल करायला फक्त आढेवेढे घेणं चाललंय. ठिक आहे. तुम्हाला हौसच आहे तर घ्या हा सुधारित प्रश्न. तुमच्या प्रतिसादांतून भाजप सोडून दुसर्‍या राजकिय पक्षांच्या सत्ताकारणाबद्दल तुम्ही उल्लेख करता तेव्हा सत्तेसाठी कासावलेले, शय्यासोबत करणारे, उतावीळ झालेले, असले तुच्छतादर्शक शब्द वापरता, तेव्हा तुम्ही उल्लेख करता ते सर्व पक्ष सत्तेसाठी हपापलेले, कासावीस झालेले, शय्यासोबत करणारे आहेत पण भाजप तसा नाही असे तुम्हाला म्हणायचे असते का? तसे असेल तर मग केवळ भाजप जनतेवर उपकार केल्यासारखे राजकारण करतो, केवळ भाजपच जनतेच्या भल्यासाठी सत्ताकारण, सत्ता स्थापना करतो असे आहे काय? ह्या प्रश्नाचे उत्तरावर बरंच अवलंबून असणार आहे. त्यामुळे उत्तर द्याल अशी आशा करतो. अनावश्यक प्रतिप्रश्न टाळाल तर खरंच उपकार होतील.

In reply to by तर्राट जोकर

मूळ धाग्याचा आणि या प्रश्नाचा सुतराम संबंध नाही. इथे उत्तर देत बसलो तर मूळ विषय पूर्णपणे भलतीकडेच भरकटेल. तसे होऊ नये म्हणून या विशिष्ट विषयावर एक वेगळा धागा काढा. तिथे सविस्तर उत्तर देईन.

In reply to by श्रीगुरुजी

हो अथवा नाही एवढंच उत्तर अपेक्षित आहे. तेवढं द्या. त्यावर पुढे एकही प्रश्न या धाग्यावर यानंतर तुम्हाला विचारणार नाही. बाकी दिलेल्या उत्तराच्या स्पष्टीकर्णासाठी तुम्हाला धागा काढायचं स्वातंत्र्य आहे.

In reply to by तर्राट जोकर

उत्तर तयार आहे. पण ते याच धाग्यावर द्यावे का याविषयी साशंक आहे. कारण त्या उत्तरावरून पुढे अनेक प्रतिसादांची मालिका सुरू होईल व त्यामुळे मूळ विषय भरकटेल. आणि पुढील प्रतिसादांना उत्तर देण्याचे टाळले तर मला कसे गप्प केले किंवा मी या धाग्यावरून काढता पाय घेतला असे प्रतिसाद यायला लागतील. म्हणजे उत्तर दिले तर धागा भरकटतो आणि नाही दिले तर मी पळून गेलो असे गैरसमज होतील. त्यापेक्षा एक वेगळा धागा काढा. तिथे सविस्तर उत्तर देतो.

In reply to by श्रीगुरुजी

भरकटला तर काय फरक पडतो गुरुजी, तसेही ओवेसीच्या वक्तव्यावरच्या धाग्यावर शिवसेना-भाजपच्या ताकदीबद्दल बरेच भरकटणं झालंच आहे. त्यात अजुन थोडी भर. जर इथे नसेलच द्यायचे उत्तर तर, तुम्हाला कोणी उत्तर देण्यापासून पळाले, गप्प बसले असे म्हणू नये असे वाटत असेल तर, तुम्हीच हा प्रश्न आणि त्यावर तुमचे उत्तर असा धागा काढा, मिपाला काही नविन नाही हा प्रकार. उत्तर द्यावे की नको, कुठे द्यावे, कसे द्यावे ह्याचे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा नाही जितके उत्तर देणे न देणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी धागा काढण्यापेक्षा तुम्हीच काढलेला संयुक्तिक व उचित ठरेल. शेवटी उत्तर महत्त्वाचे, इथे काय अन् कुठे काय.

In reply to by तर्राट जोकर

मूळ लेखातच शिवसेनेचा उल्लेख होता. त्यावर एक प्रतिसाद आल्यावर प्रतिसादांची मालिका सुरू झाली. तुमच्या प्रश्नांचा आणि मूळ लेखाच्या विषयाचा संबंध नाही. त्यामुळे त्यावर इथे उत्तर देणे प्रशस्त वाटत नाही. अर्थात तुम्हाला माझ्या उत्तराची उत्सुकता आहे असं दिसतंय. माझ्याकडे उत्तर तयार आहे. त्यामुळे या धाग्याऐवजी वेगळ्या ठिकाणी उत्तर देईन.

In reply to by श्रीगुरुजी

उत्तर तयार आहे हे उत्तर नाही. त्यामुळे हा धागा काय किंवा न्वीन धागा काय, उत्तर द्यायची गरज तुम्हाला आहे. अन्य्था तुम्ही उत्तर देण्यापासून पळताय असाच अर्थ निघेल.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही उत्तर देत नाही आहात हे सत्य आहे. दिले तर ते (श्रीगुरुजींनी उत्तर दिले) सत्य असेल. नाही दिले तर ते (श्रीगुरुजींनी पलायन केले) सत्य असेल. तीनपैकी कोणते सत्य कायम ठेवायचे ह्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. मी काय अर्थ काढतो ह्याच्याशी काय घेणे-देणे मूळ प्रश्नाचे?

In reply to by तर्राट जोकर

मी उत्तर देणार आहे, पण ते या धाग्यावर नाही. मुळात मूळ प्रश्नाचाच धाग्याशी काहीही संबंध नाही, त्यामुळे तुम्ही काय अर्थ काढत आहात याने मला फरक पडत नाही.
उत्तर तयार आहे हे उत्तर नाही. त्यामुळे हा धागा काय किंवा न्वीन धागा काय, उत्तर द्यायची गरज तुम्हाला आहे. अन्य्था तुम्ही उत्तर देण्यापासून पळताय असाच अर्थ निघेल.
तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. धाग्याशी संबंध नसलेला प्रश्न तुम्ही मला विचारलात आणि वारंवार उत्तर द्या, उत्तर द्या असे मागे लागला आहात. उत्तर ऐकण्याची गरज तुम्हाला आहे, उत्तर देण्याची मला गरज नाही. काय उत्तर द्यायचे, कधी उत्तर द्यायचे, कोणत्या धाग्यावर उत्तर द्यायचे, उत्तर द्यायचे का नाही हे मी ठरविणार.

In reply to by श्रीगुरुजी

अग घे ना नाव नको बाई अग घे ना लाज वाटते बाई अग घे ना सगळ्या जणीत नको ना अग घे ना तू घे बाई आधी इश्श लाज वाटते बाई अग घे ना आता नको गं बाई मगाशी मला आग्रह करत होतीस की अग ते वेगळे ग बाई मग घे बरे आधी तू घे बघ हं हो हो बघ हं. परत म्हणायचं नाही अग घे गं नीट एकायचं हं हो ग बाई. घे तर. कसंय? काय? उखाणा? कधी घेतला? तू एकला नाही? नाही? शी बाई. परत परत नाही आता.

In reply to by श्रीगुरुजी

असं कसा संबंध नाही? मुळ धाग्यात तर भाजपचा भ सुद्धा नाही तरी आपण इथे भाजपची आरती वोवाळायला प्रतिसादामागे प्रतिसाद टंकत गेले. सेनेपेक्षा भाजप कसा भारी हेच ह्या धाग्यावर तुम्ही सांगत आहात. भाजप ह्या पक्षाची ह्या धाग्यावर भलामण करत आहात. कोणी भाजपविरूद्ध बोलले तर त्याला आकडेवारी निशी उत्तर देत आहात. तुमचे ह्या धाग्यावरचे सगळे प्रतिसाद फक्त भाजपशीच संबंधित आहेत, फक्त भाजपबद्दलच आहेत. मूळ धाग्यातल्या मूळ विषयाबद्दल एक अक्षरही आपण ह्या धाग्यावरच्या कुठल्याच प्रतिसादात टंकलेले नाही. परत एकदा आठवण करुन देतो, चेक करा. मूळ धाग्यात भाजपबद्दल काहीच नव्हते. तरी आपण इथल्या चर्चेत भाग घेऊन भाजपचे गुणगान केले. तुम्ही ह्या धाग्याचा वापर भाजपचा प्रचार करण्यासाठी करत आहात. भाजपला मोठं दाखवण्यासाठी तुम्ही शिवसेनेसाठी सत्तेसाठी कासावीस झाले असा तुच्छतादर्शक शब्दसमुच्चय वापरला. आता माझा प्रश्न त्या तुमच्या ह्याच धाग्यावरल्या प्रतिसादावर आहे. इतर अनेक ठिकाणी तुम्ही अशाच प्रकारची टिप्पणी करत आहात ह्याचा संदर्भ दिलाय.

In reply to by तर्राट जोकर

मुळ धाग्यात तर भाजपचा भ सुद्धा नाही तरी आपण इथे भाजपची आरती वोवाळायला प्रतिसादामागे प्रतिसाद टंकत गेले.
परत एकदा आठवण करुन देतो, चेक करा. मूळ धाग्यात भाजपबद्दल काहीच नव्हते.
तुम्ही मूळ लेख वाचलेला दिसत नाही म्हणूनच हे लिहिलेले दिसते. खालील परिच्छेद वाचा. या परिच्छेदात भाजपच्या पूर्वावताराचा म्हणजेच जनसंघाचा अप्रत्यक्ष उल्लेख आहे. कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे. हाही परिच्छेद वाचा. इथे तर शिवसेनेचा स्पष्ट उल्लेख आहे. त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच. नंतर या प्रतिसादात प्रथमच शिवसेनेच्या उल्लेखासंदर्भात सर्वसाक्षी यांनी उत्तर दिले व त्यानंतर शिवसेना-भाजपचा संदर्भ असलेल्या प्रतिसादांची मालिका सुरू झाली. शिवसेना-भाजप संबंधित प्रतिसादाची सुरूवात मी केलेली नाही. ज्यांनी केली त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागावे ही नम्र विनंती.
कोणी भाजपविरूद्ध बोलले तर त्याला आकडेवारी निशी उत्तर देत आहात.
मी आकडेवारी देऊनच बोलतो. दुसर्‍यांच्या नावाने खोटे खपवित नाही.
भाजपला मोठं दाखवण्यासाठी तुम्ही शिवसेनेसाठी सत्तेसाठी कासावीस झाले असा तुच्छतादर्शक शब्दसमुच्चय वापरला. आता माझा प्रश्न त्या तुमच्या ह्याच धाग्यावरल्या प्रतिसादावर आहे. इतर अनेक ठिकाणी तुम्ही अशाच प्रकारची टिप्पणी करत आहात ह्याचा संदर्भ दिलाय.
कासावीस होणे हा अत्यंत योग्य व संसदीय शब्द आहे. त्यात तुच्छतापूर्ण काहीही नाही. मराठी वृत्तपतातून, नियतकालिकातून, लेखनातून हा शब्द अगदी सहज वापरला जातो. त्याबद्दल कोणीही कधीही आक्षेप घेतलेला नाही. बादवे, शिवसेनेपेक्षा भाजप मोठा आहेच हे वेगळे सांगायला नकोच.

In reply to by तर्राट जोकर

जशी कुठलीही कंपनी ही फायद्याकरता काम करते तसंच कुठलाही राजकीय पक्ष हा सत्तेकरता काम करतो. लोकांची कामं निरपेक्ष हेतूने करणं हे समाजकारण आहे. राजकीय सत्तेसाठी ते करणं हे राजकारण आहे. सगळेच पक्ष ते करतात. याचा अर्थ सगळेच सत्तेसाठी हपापलेले (तुमचा शब्द) किंवा उत्सुक (माझा शब्द) असतात. तसे जर नसतील तर ते राजकीय पक्षच नव्हेत. त्यामुळे भाजप किंवा इतर कुठलाही पक्ष हा सत्तेसाठी हपापलेला असतोच. त्यात चुकीचं काहीही नाही. जसा देव भावाचा भुकेला तसा पक्ष सत्तेचा भुकेला. आता ही सत्ता कुठला पक्ष कशा पद्धतीने राबवतोय त्यात फरक असणारच. ती पद्धत आवडणारे आणि नावडणारेही असणारच. सत्तेसाठी राजकीय पक्ष कोलांट्याउड्या मारतात, कारण सत्तेमध्ये असल्यामुळे जे फायदे मिळतात त्याची भुरळ प्रत्येकाला पडते.

In reply to by बोका-ए-आझम

हा प्रश्नच काय हो, समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो. असो. सत्तेसाठी हपापलेले हा शब्द मी कुठेही वापरलेला नाही त्यामुळे तुमचा शब्द असे म्हणुन माझ्या तोंडी कोंबण्याची पत्रकारी कोलांटीउडीची गरज नाही. मी विचारलेल्या प्रश्नात गुरुजी इतर पक्षाम्साठी जे शब्द वापरतात ते आहेत. गुरुजींच्या प्रतिसादांमधे भाजप सोडुन दुसर्‍या पक्षांच्या सत्ताकारणासाठी असले शब्द वापरलेले बघितले आहेत. जर सगळे पक्ष सत्ताकारणासाठी झटतात तर सर्वांना समान न्याय व आदर दिला पाहिजे. शय्यासोबत, कासावीस होणे, इत्यादी शब्द इतर पक्षांबद्दल वापरतांना मात्र भाजप जणू जनतेवर उपकार केल्यासारखे सत्ताकारण करतोय असा आविर्भाव असणे दुटप्पीपणा आहे. गुरुजींना भाजप प्रिय असेल तो असो, पण असे तुच्छता दर्शवणारे शब्द इतर राजकिय पक्षांबद्दल वापरण्याबद्दल इथे फार विरोध होतांना दिसला नाही. ज्याने विरोध केला त्यालाच कॉर्नर करणे मात्र बघितले आहे.

In reply to by तर्राट जोकर

गुरुजी, भाजपा सोडुन तुमच्या तर्राट जोकर - Sat, 19/03/2016 - 19:51 गुरुजी, भाजपा सोडुन तुमच्या लेखी सगळ्या पार्ट्या कःपदार्थ, सत्तेला चटावलेले, सत्तेसाठी कासावीस होणारे, शय्यासोबत वैगरे करणारे असेच आहेत का?
तुमचे शब्द हे आहेत. मी तुमच्या तोंडी हपापलेला असा पुष्कळ चांगला शब्द टाकला होता. ज्याचा अर्थ साधारणपणे तुम्ही जे इथे म्हणाला आहात तोच होतो.

In reply to by बोका-ए-आझम

यातला कःपदार्थ शब्द मी एखाद्या पक्षाच्या बाबतीत वापरलेला नाही. सत्तेला चटावलेले असा शब्द देखील वापरल्याचे माझ्या स्मरणात नाही.

In reply to by श्रीगुरुजी

जे शब्द वापरले, वापरता त्याबद्दल बोला मग. रडीचे डाव बंद करा. वेड पांघरुन पेडगावला जाताय.

In reply to by बोका-ए-आझम

प्रश्नाचा मतितार्थ कळतोय ना? त्याबद्दल बोला. विचारलेल्या प्रश्नाचं गांभिर्य अनावश्यक फाटे फोडुन कमी होणार नाही हे लक्षात असु द्या. थेट प्रश्नाला थेट उत्तर द्यायचे सोडून असे रडीचे डाव खेळणे योग्य नाही.

In reply to by तर्राट जोकर

समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो
हे तुम्हीच कबूल केल्यामुळे आता तुम्हाला उत्तरं द्यायला कोणीही बांधील नाही.

In reply to by तर्राट जोकर

त्यामुळे लहान बाळांना आमचा प्रतिसाद बालिश वाटू शकतो. तो दोष त्यांच्या बालबुद्धीचा आहे, आमचा नाही.

In reply to by नाना स्कॉच

शिवसेना वॉज सेना!! जोवर साहेब होते! नंतर असोच!!
कमाल आहे. केंद्रात पूर्ण बहुमत यायला भाजपला २०१४ साल का उजाडले असे एकीकडे म्हणायचे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात शिवसेनेला २०% पेक्षा जास्त मते आणि ७३ पेक्षा जास्त जागा कधीच मिळाल्या नव्हत्या याकडे दुर्लक्ष करून परत शिवसेना वॉज सेना म्हणायचे.. कमाल आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी साहेब, आपणही सेलेक्टिव रीडिंग करू लागलात की काय! नसता आपणही

"जोवर साहेब होते"

हे वाक्य सोडले नसते!! बाकी असोच्!!! तांत्रिक डिटेल्स मान्य करायला आम्हालाही हरकत नाही! कारण आम्ही तर्ककर्कश्य नाही! नीट मांडल्यास मुद्दे आत्मसात करतो. :) फ़क्त ते सेलेक्टिव रीडिंग सोडा तुम्ही गुर्जी नाही गॅरी आहात! ;)

In reply to by नाना स्कॉच

दगडाचा जनाधार!! मधे ते खुळ काढले होते मिसकॉल द्या अन भाजप मेंबर व्हा! कश्यात काय नाय तर आमच्या नाक्यावर बसणाऱ्या राष्ट्रवादी अन काँग्रेस च्या टग्याना सुद्धा "congratulations" चे मॅसेज आले होते ऑटोमेटेड बीजेपी कडून मेंबर झाल्याबद्दल! अन जनाधार जनाधार कसला सांगताय, किती टक्के मते आली लोकसभेत, बरं ते ही सोडा, जितकी मते मिळाली आहेत ती फ़क्त अन फ़क्त नमो नामक एका सशक्त पर्यायाला मिळाली आहेत! जनाधार होता तर 13 दिवसात सरकार का पडले होते? अन 99 मधेही स्वबळावर का नाही येता आले!? पुर्ण बहुमत यायला 2014 का उजाडावे लागले?? शिवसेना वॉज सेना!! जोवर साहेब होते! नंतर असोच!!
तुम्ही बर्‍याच मुद्द्यांची सरमिसळ करीत आहात. मूळ मुद्दा असा होता की शिवसेनेमुळे महाराष्ट्रात भाजप वाढला असा एक समज आहे. मी आकडेवारी देऊन हे दाखवून दिले आहे की वस्तुस्थिती याच्या बरोब्बर उलट आहे. मिसकॉल देऊन मेंबरशिप, देशात किती मते मिळाली, पहिले सरकार १३ दिवसात का पडले, ९९ मध्ये स्वबळावर का नाही आले इ. गोष्टींचा मूळ मुद्द्याशी कणभरही संबंध नाही. शिवसेनेने स्वतःबद्दल हा गोड गैरसमज जाणीवपूर्वक/अजाणता जोपासलेला आहे की शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपला मोठे केले. काही माध्यमांनीही याच गैरसमजाला खतपाणी घातले आणि मिपावरील काही जणांचे तेच मत आहे. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. भाजपमुळे शिवसेना ठाणे/मुंबईच्या बाहेर पोहोचली ही वस्तुस्थिती आहे. गावोगाव बोर्ड लावले म्हणजे मते मिळतातच असे नाही किंवा पक्ष तळागाळात पोहोचला असेही नाही. महाराष्ट्रात कोणाचा जनाधार जास्त आहे (अगदी मुंबईत सुद्धा) हे ऑक्टोबर २०१४ मध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले इतकंच.

In reply to by अभ्या..

शिवसेनेचे तसे बोर्ड अनेक ठिकाणी होते. पण एक पक्ष म्हणून शिवसेनेला मुंबई/ठाण्यातील काही भाग सोडले तर उर्वरीत महाराष्ट्रात जनाधार नव्हता. शिवसेनेने काँग्रेसच्या अरेला कारे करायला सुरूवात केली ती भाजपने सेनेबरोबर १९८९ पासून युती केल्यानंतरच. त्यापूर्वी सेना काँग्रेसच्या फारशी विरोधात नव्हती. १९७९ च्या निवडणुकीत तर शिवसेनेने चक्क काँग्रेसशी युती करून निवडणुक लढविली होती. १९७९ च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी घोषणा केली होती, "इंदिराजींच्या हाताला साथ आणि इतर पक्षांना मारा सणसणीत लाथ". काँग्रेसची प्रचंड लाट असूनसुद्धा व काँग्रेसबरोबर युती असूनसुद्धा शिवसेनेला एकही खासदार निवडून आणला नव्हता. आधी लिहिल्याप्रमाणे सेनेला आपल्या स्थापनेपासून पहिल्या २३ वर्षात फक्त २ आमदार निवडून आणता आले होते व एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. याउलट एप्रिल १९८० मध्ये स्थापना झाल्यावर केवळ दीड महिन्यात स्वबळावर निवडणुक लढवून भाजपने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून १२ आमदार निवडून आणले होते. सेना फक्त मुंबई/ठाण्यात होती, भाजप थोड्या प्रमाणात का होईना पण महाराष्ट्राच्या जवळपास सर्व भागात होता. संघाच्या शाखा महाराष्ट्रात सर्वत्र होत्या व भाजप संघाचेच अपत्य असल्याने भाजपला आपले अस्तित्व दाखविण्याची वेगळी गरज पडली नाही. सेना मात्र मुंबई/ठाण्याबाहेर नव्हती. भाजपमुळेच मुंबईपुरत्या मर्यादीत असलेल्या सेनेची उर्वरीत महाराष्ट्राला ओळख झाली ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by श्रीगुरुजी

संघाच्या शाखा महाराष्ट्रात सर्वत्र होत्या व भाजप संघाचेच अपत्य असल्याने भाजपला आपले अस्तित्व दाखविण्याची वेगळी गरज पडली नाही.
छ्या.... संघ आणि भाजपाचा संबंध नाहि या माझ्या थेअरीची वाट लागली. =))

In reply to by कपिलमुनी

चुकीची माहिती. जून १९९९ मध्ये स्थापना झाल्यावर ऑक्टोबर १९९९ मधील निवडणुकीत राकाँचे ५८ आमदार निवडून आले होते. नंतर २००४ च्या निवडणुकीत ७१, २००९ च्या निवडणुकीत ६२ व २०१४ च्या निवडणुकीत ४१ आमदार निवडून आले होते.

In reply to by प्रदीप साळुंखे

मूळ लेखातच ओवेसीशी संबंध नसलेला खालील परिच्छेद होता.
त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच.
त्यावर एक प्रतिसाद आल्यावर मग नंतरच प्रतिसादांची मालिका सुरु झाली.

In reply to by श्रीगुरुजी

माहीती बद्दल खात्री नव्हती म्हणून ? टाकला होता. तर मुद्दा स्थापनेनंतर आमदार निवडुन यायचा आहे. भाजपा काही नवीन स्थापन झाला नव्हता . फक्त नाव बदलला होता. The BJP's origins lie in the Bharatiya Jana Sangh, formed in 1951 by Syama Prasad Mookerjee. After the State of Emergency in 1977, the Jana Sangh merged with several other parties to form the Janata Party; it defeated the incumbent Congress party in the 1977 general election. After three years in power, the Janata party dissolved in 1980 with the members of the erstwhile Jana Sangh reconvening to form the BJP. सेनेला आपल्या स्थापनेपासून पहिल्या २३ वर्षात फक्त २ आमदार निवडून आणता आले होते व एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. याउलट एप्रिल १९८० मध्ये स्थापना झाल्यावर केवळ दीड महिन्यात स्वबळावर निवडणुक लढवून भाजपने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून १२ आमदार निवडून आणले होते. हे कौतुक चुकीचा आहे. बाकी चालू द्या

In reply to by कपिलमुनी

तसं पाहिलं तर नवीन कोराकरकरीत पक्ष अपवादानेच सापडेल. १९८२ मध्ये स्थापन झालेला तेलगू देसम हा कोराकरकरीत पक्ष म्हणता येईल. बाकी महाराष्ट्रात मनसे, राष्ट्रवादी इ. पक्षातले नेते आधी दुसर्‍या पक्षात होतेच. जनसंघ १९७७ मध्ये जनता पक्षात विसर्जित झाला व त्याचे स्वतंत्र अस्तित्व संपले. त्यानंतर ३ वर्षांनी १९८० मध्ये पूर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी फुटलेल्या जनता पक्षातून बाहेर पडून भाजप हा नवीन पक्ष स्थापन केला. भाजप हा पक्ष जुना मानायचा असेल तर हरकत नाही, पण नवीन पक्ष (निदान महाराष्ट्रात तरी) कोणताही नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तेलगू देसम प्रमाणेच २०१२ मध्ये स्थापन झालेला आम आदमी पक्ष हा सुद्धा नवीन कोराकरीत पक्ष आहे.

In reply to by अभ्या..

पण मुंबईत आणि ठाण्यात जेवढी होती तेवढी बाहेर नव्हती. कोकणात ब-यापैकी होती. बाकी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सेना पायरोवा करु शकली नव्हती. सेनेची मुंबई - ठाण्यातली ताकद आणि भाजपचा विदर्भ - मराठवाड्यातला जोर हे एकमेकांना पूरक असल्याचं हेरून प्रमोद महाजनांनी युती घडवून आणली आणि शिवसेनेच्या, विशेषतः बाळासाहेबांच्या स्वभावाकडे बघून थोडी पडती बाजू स्वीकारली. पण भाजप शिवसेनेच्या जोरावर वाढला असं अजिबात नाही. संघ नागपुरात १९२५ पासून आहे, जेव्हा बाळासाहेबही शाळेत वगैरे होते. जनसंघाचा प्रभाव विदर्भात आणि मराठवाड्यात संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून आहे. शिवसेना १९६६ मध्ये स्थापन झाली, मुंबईतल्या कामगार चळवळींवरचा कम्युनिस्ट प्रभाव मोडून काढणं हा सेनेच्या स्थापनेमागचा एक प्रमुख हेतू होता. मराठी माणसाचे न्याय्य हक्क वगैरे गप्पा सेनेने लोकांची धूळफेक करण्यासाठी भरपूर मारल्या. त्याला तेव्हा लोक भुलले. आता भुलणार नाहीत अशी अपेक्षा आहे. ज्या मराठी माणसासाठी सेना उभी राहिली आहे असे सेनेचे लोक म्हणतात त्या सेनेने १९८२ चा मिल संप होऊ दिला, एवढंच नव्हे तर नंतरची मिल टू माॅल संस्कृतीही चालू दिली. व्हॅलेंटाईन डे ला मोठं marketing occasion बनवण्याचं श्रेय सेनेलाच जातं. असो.

In reply to by बोका-ए-आझम

कम्युनिस्ट आणि परप्रांतीय हे मुद्दे उर्वरीत महाराष्ट्रात त्यावेळी नव्हतेच. मराठवाड्यात जगन्नाथरावांनी केलेली भाजपाची पेरणी महाजन मुंडे स्वरुपाने उपयोगी ठरली असली तरी गावोगाव जो जनाधार लागतो तो मराठवाड्यात नव्हता. तरुण पिढीला फारसे तत्ववादी वाटणारे कार्यक्रमापेक्षा अ‍ॅ़टिव्ह ठेवणारे कार्यक्रम हवेसे असायचे. मराठवाड्यात संघाच्या शाखा गाओगावी चालत असेही चित्र नव्हते. बुध्दीपेक्षा आवेशाने राजकारण करणार्‍या बहुजन तरुण वर्गाला काँग्रेसपेक्षा चांगला पर्याय शिवसेनेने दिला. सामंतांंचे संप मोडून काढणे, मिलच्या जागा वगैरे इश्श्यु या भागाला माहीत नसायचेच. कारण कोकणासारखा इथला माणूस मुंबईत जास्त विस्थापित झालेला नसायचा. त्यांना बाळासाहेबांचा आवेश, आख्यायिका अन लोकल असणारे कट्टर शिवसैनिक नेते ह्यातच जास्त इंटरेस्ट. वलंटाइन दिनाचे कौतुक अन विरोध त्यावेळी सुध्दा पुण्या मुंबैतच. नंतर अनुकरणाने ही संस्कृती सगळीकडेच पसरली यात सेनेचा दोष नाही. त्तरीही आपण सारे जाणकार आहात. माझे आकलन कमी असेल. चर्चा करावी एवढे माझे ज्ञान नाही. धन्यवाद.

In reply to by अभ्या..

कोणी काहीही म्हणो रे भावा सेना काय होती हे सांगायला लाखो शब्दांपरी एक (व्यंग)चित्र पुरेसे आहे प्रख्यात "आर के लक्ष्मण" ह्यांचे !!  असो!! :D

In reply to by नाना स्कॉच

हे व्यंगचित्र सेना कशी होती हे सांगत नसून बाळासाहेब कसे होते व महाजन कसे होते हे सांगत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणजे आज बाळासाहेब, महाजन असते तर सेनेचाच मुख्यमंत्री झाला असता. फक्त आज बाळासाहेब नैत म्हणून...