मी लहानपणी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जात असे. मामाचे गाव आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथे आहे. मी, आई, ताई व लहान बहिण असे चाैघेजण प्रथम परभणीला मावशीकडे जात असू. तेथून मावशी व मावशीच्या ३ मुली, १ मुलगा असे ९ जण पुर्णा जंक्शनला रात्री मुक्कामाला जात. रात्री भुरटे चोर असल्यामुळे पाळीपाळीने एकेक जण जागत असू. पुर्णा येथून सकाळी ४ वाजता आदिलाबादला रेल्वे असे.
रेल्वे कोळशावर चालणारी होती. रेल्वे नांदेड, मुखेड, किनवट मार्गे दुपारी २ वाजता आदिलाबादला पोहचे. आदिलाबाद येथील भाषा जरी तेलगु असली तरी आमची आजी महाराष्ट्र आंध्र सीमे वरील भैंसा या गावची असल्यामुळे मराठी भाषा दोन्ही मामा, मामी, मामाच्या मुलांना समजते. परभणी येथील मावशीचा मुलगा माझ्याच वयाचा असल्यामुळे खुप मजा यायची.
सकाळी १० वाजता सर्वजण जेवायला बसायचे. जेवणात भात, सांबार, वांग्याची भाजी असायची. आम्ही मराठवाड्यातील असल्यामुळे आजी पोळ्या करी. कधी आजी कन्या (ज्वारीच्या जाड पिठाची खिचडी) सुद्धा करत असे. मला कन्या अजूनही आवडते. कन्या सांबार व तुप टाकुन खुप छान लागते. जेवण झाल्यावर मी, ताई, लहान बहिण, मावशीचा मुलगा, मावशीची मुलगी सर्वजण अंगणात खेळत असू. रात्री सर्वजण अंगणात कापडी बाज टाकूण झोपत असू. बाजेवर पडून गप्पा गोष्टी करताना झोप लागून जाई.
आदिलाबादला काही दिवस राहून आंध्रात बोथ येथे राहणार्या मावशीकडे जात असू. मावशीचा वाडा चौसोपी आहे. वाड्याच्या मागे मोठे परस आहे. सकाळचे जेवण झाले की आम्ही चिल्लर पार्टी मागच्या परसात खेळायला जात असू. मागील परसात केळी, पेरूची झाडे होती. परसात एक विहिर होती. दुपारच्या वेळी आंब्याच्या खोलीतील पिकलेले आंबे खाण्याचा कार्यक्रम चाले. मावशीच्या घरचे दुध छान घट्ट पिवळे असायचे. स्वयंपाक घरात एका भिंतीत असलेल्या कोनाड्यात कोळशाच्या निखार्यावर दुधाचे भांडे ठेवलेले असे.
एखाद्या दिवशी मी व मावसभाऊ काका (मावशीचा नवरा) बरोबर छकड्यात बसून ४-५ किमी असलेल्या शेतात जात असे. शेतात जाताना रस्त्यात नदी लागे. शेतात एक कौलारू घर बांधलेले होते. घराच्या मागे डोंगर व जंगल होते. कधी आई, मावशी, आम्ही मुले गावाजवळ असलेल्या बालाजी मंदीरात जात असू. एखादे वेळेस मी, मावसभाऊ, काकाची (वडिलाचे भाऊ) २ मुले गावाजवळ असलेला धबधबा पाहायला जात असू. उन्हाळा असल्यामुळे पाणी नसायचे पण खाली जमलेले पाणी असायचे.
अशा तर्हेने उन्हाळ्यात दोन महीने मजा करून वापस गावाला परतत असू. लहानपणीच्या रम्य आठवणी अाताही आजच घडल्याप्रमाणे आठवतात.
वाचने
8775
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख
हेच म्हणतो
In reply to लेख by नाखु
कन्या....
लोल
In reply to कन्या.... by संजय पाटिल
चांगलय..
लेखन शैली वाचनीय आहे
लाटकर काका लेख छान जमलाय.
लाटकर काका,
मलाही तेच वाटले
In reply to लाटकर काका, by अभ्या..
छानछान आठवणी लिहिल्याहेत
छान आठवणी काका.अजून लिहा.
आणखी वाचायला आवडेल
मुखेड च. मुदखेड नाही.
In reply to आणखी वाचायला आवडेल by मित्रहो
धन्यवाद
In reply to मुखेड च. मुदखेड नाही. by अभ्या..
सुंदर
छाना लेखा आहे काका. तुम्ही