✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझे आजोळ

ह
हेमंत लाटकर यांनी
Mon, 03/14/2016 - 14:08  ·  लेख
लेख
मी लहानपणी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जात असे. मामाचे गाव आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथे आहे. मी, आई, ताई व लहान बहिण असे चाैघेजण प्रथम परभणीला मावशीकडे जात असू. तेथून मावशी व मावशीच्या ३ मुली, १ मुलगा असे ९ जण पुर्णा जंक्शनला रात्री मुक्कामाला जात. रात्री भुरटे चोर असल्यामुळे पाळीपाळीने एकेक जण जागत असू. पुर्णा येथून सकाळी ४ वाजता आदिलाबादला रेल्वे असे. रेल्वे कोळशावर चालणारी होती. रेल्वे नांदेड, मुखेड, किनवट मार्गे दुपारी २ वाजता आदिलाबादला पोहचे. आदिलाबाद येथील भाषा जरी तेलगु असली तरी आमची आजी महाराष्ट्र आंध्र सीमे वरील भैंसा या गावची असल्यामुळे मराठी भाषा दोन्ही मामा, मामी, मामाच्या मुलांना समजते. परभणी येथील मावशीचा मुलगा माझ्याच वयाचा असल्यामुळे खुप मजा यायची. सकाळी १० वाजता सर्वजण जेवायला बसायचे. जेवणात भात, सांबार, वांग्याची भाजी असायची. आम्ही मराठवाड्यातील असल्यामुळे आजी पोळ्या करी. कधी आजी कन्या (ज्वारीच्या जाड पिठाची खिचडी) सुद्धा करत असे. मला कन्या अजूनही आवडते. कन्या सांबार व तुप टाकुन खुप छान लागते. जेवण झाल्यावर मी, ताई, लहान बहिण, मावशीचा मुलगा, मावशीची मुलगी सर्वजण अंगणात खेळत असू. रात्री सर्वजण अंगणात कापडी बाज टाकूण झोपत असू. बाजेवर पडून गप्पा गोष्टी करताना झोप लागून जाई. आदिलाबादला काही दिवस राहून आंध्रात बोथ येथे राहणार्या मावशीकडे जात असू. मावशीचा वाडा चौसोपी आहे. वाड्याच्या मागे मोठे परस आहे. सकाळचे जेवण झाले की आम्ही चिल्लर पार्टी मागच्या परसात खेळायला जात असू. मागील परसात केळी, पेरूची झाडे होती. परसात एक विहिर होती. दुपारच्या वेळी आंब्याच्या खोलीतील पिकलेले आंबे खाण्याचा कार्यक्रम चाले. मावशीच्या घरचे दुध छान घट्ट पिवळे असायचे. स्वयंपाक घरात एका भिंतीत असलेल्या कोनाड्यात कोळशाच्या निखार्यावर दुधाचे भांडे ठेवलेले असे. एखाद्या दिवशी मी व मावसभाऊ काका (मावशीचा नवरा) बरोबर छकड्यात बसून ४-५ किमी असलेल्या शेतात जात असे. शेतात जाताना रस्त्यात नदी लागे. शेतात एक कौलारू घर बांधलेले होते. घराच्या मागे डोंगर व जंगल होते. कधी आई, मावशी, आम्ही मुले गावाजवळ असलेल्या बालाजी मंदीरात जात असू. एखादे वेळेस मी, मावसभाऊ, काकाची (वडिलाचे भाऊ) २ मुले गावाजवळ असलेला धबधबा पाहायला जात असू. उन्हाळा असल्यामुळे पाणी नसायचे पण खाली जमलेले पाणी असायचे. अशा तर्हेने उन्हाळ्यात दोन महीने मजा करून वापस गावाला परतत असू. लहानपणीच्या रम्य आठवणी अाताही आजच घडल्याप्रमाणे आठवतात.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
8669 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

लेख

नाखु
Mon, 03/14/2016 - 14:12 नवीन
आवडला, पण आखडता घेतला आहे(असे जाणवते). आजोळ असल्याने नक्कीच आणखी आठवणी/किस्से असतील. स्मरणशील नाखु
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

श्रीरंग_जोशी
Mon, 03/14/2016 - 23:14 नवीन
खास करून तेलुगु अन मराठी संवादांच्या चुकीच्या भाषांतरामुळे कधी ना कधी गमतीशीर प्रसंग नक्कीच घडले असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

कन्या....

संजय पाटिल
Mon, 03/14/2016 - 14:28 नवीन
नव्हे, त्याला कण्या म्हण्तात. या ताकात कालवून लय भारी लागतात..
  • Log in or register to post comments

लोल

स्पा
Mon, 03/14/2016 - 14:51 नवीन
लोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

चांगलय..

जेपी
Mon, 03/14/2016 - 14:50 नवीन
चांगलय..
  • Log in or register to post comments

लेखन शैली वाचनीय आहे

निशांत_खाडे
Mon, 03/14/2016 - 19:57 नवीन
आणखीन वाचायला आवडेल!
  • Log in or register to post comments

लाटकर काका लेख छान जमलाय.

होबासराव
Mon, 03/14/2016 - 20:53 नवीन
लाटकर काका लेख छान जमलाय. छकडी म्हणजे एक छोटि बैलगाडी ना...त्याला विदर्भात डमनी सुद्धा म्हणतात.
  • Log in or register to post comments

लाटकर काका,

अभ्या..
Mon, 03/14/2016 - 23:07 नवीन
लाटकर काका, मिपाकर नाराज आहेत का ओ तुमच्यावर? एवढे भारी लिव्हलाय आन प्रतिसाद फकस्त ५. :( कुछ तो गडबड है.
  • Log in or register to post comments

मलाही तेच वाटले

निशांत_खाडे
Mon, 03/14/2016 - 23:19 नवीन
काय कारण असेल बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

छानछान आठवणी लिहिल्याहेत

कंजूस
Tue, 03/15/2016 - 07:51 नवीन
छानछान आठवणी लिहिल्याहेत लाटकरकाका.असेच लेख येऊ द्यात.मलाही कधीकधी सांगावेसे वाटते.
  • Log in or register to post comments

छान आठवणी काका.अजून लिहा.

अजया
Tue, 03/15/2016 - 08:16 नवीन
छान आठवणी काका.अजून लिहा.
  • Log in or register to post comments

आणखी वाचायला आवडेल

मित्रहो
Wed, 03/16/2016 - 23:39 नवीन
मला वाटते ते मुदखेड आहे, निदान स्पेलींग तरी तसे आहे. मुदखेड, किनवट, अदिलाबाद हा मार्ग आता ब्रॉड गेज झाला परंतु स्टेशन फार सुधारले नाहीत. अदिलाबादच नाही तर सीमेवरील भागातील लोकांना दोन भाषा येतात. झहीराबाद हे महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमेवरील गाव तिथे तिनही भाषा बोलल्या जातात.
  • Log in or register to post comments

मुखेड च. मुदखेड नाही.

अभ्या..
Wed, 03/16/2016 - 23:58 नवीन
मुखेड च. मुदखेड नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

धन्यवाद

मित्रहो
गुरुवार, 03/17/2016 - 08:50 नवीन
द सायलेंट आहे तर. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सुंदर

गौरी लेले
गुरुवार, 03/17/2016 - 09:52 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

छाना लेखा आहे काका. तुम्ही

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 03/17/2016 - 11:45 नवीन
छाना लेखा आहे काका. तुम्ही अजुन काही लेख लिहा. मस्त वाटतं वाचायला. प्रत्येकाला आजोळ असते, आठवणीत रमण्यासाठी, बालपणीचा काळ सुखाचा, एवढं तरी म्हणण्यासाठी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा