Skip to main content

कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

लेखक विवेक ठाकूर यांनी शनिवार, 05/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतिही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. यापूर्वी त्याचा जेएनयू कँपसमधे बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस नायप्रविष्ट असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 70150
प्रतिक्रिया 362

प्रतिक्रिया

In reply to by डँबिस००७

मग तो जर इतका बिनमहत्त्वाचा आहे तर मग त्याच्या वक्तव्याने इतके दुखी का व्हायला हवे? असे माथेफिरू भारतात खूप आहेत. प्रत्येकाला महत्त्व देऊन त्याने काय शी-शू केली हे बघत बसले तर झालेच मग. आता मोदींनी व्यापारी हे जवानांपेक्षा जास्त धोका पत्करणारे आहेत हे वक्तव्य केलंय. तुमच्या लॉजिकनुसार त्यांच्या पदानुसार ह्याला जास्त महत्त्व आहे. पण ह्यावर मोदीसमर्थक मूग गिळून बसलेत. तिकडे श्रीश्री लष्कराला घरगडी असल्यासारखे वागवत आहेत. सरकारी आस्थापनाविरुद्ध म्हणजे खुद्द देशाविरूद्ध दंड न भरणार नाही भले तुरुंगात पाठवा अशी चोर तो चोर वरुन शिर्जोर अशी वक्तव्ये करतायत. आता हे सगळं महत्त्वाचं सोडून कन्हयाने कुठे सू केली आणि काय वैगरे चर्चा करत बसणे म्हणजे...

In reply to by तर्राट जोकर

धागा कन्हैया च्या प्रांजळ वक्तव्यांबाबत असेल तर त्याबद्दलच चर्चा होणार ना! आता मोदींच्या चुका सांगायला वेगळा धागा आहे तर त्या विषयी तीथेच बोललेलं बर नाही का?

In reply to by तर्राट जोकर

कन्हैयाने लघुशंका कुठे केली यावर चर्चा नाहीच आहे. त्याने ती एका स्त्रीसमोर निर्लज्जपणे केली अाणि तिने तक्रार केल्यावर त्याने तिला उद्देशून psychopath वगैरे शब्द वापरले, जे अपमानकारक आहेत पण ते मोदींबद्दल केजरीवालांनी पण वापरल्यामुळे तुम्हाला फरक पडत नसेल हे समजू शकतो. असो. तर त्याबद्दल त्याला ३००० रूपयांचा दंड झाला. आता एका स्त्रीचा अपमान तुम्हाला मोदींच्या चुका दाखवण्यापुढे महत्वाचा वाटत नसेल. घटनेने तुम्हाला तसं वाटण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. बरं, श्री श्रींनी एकरकमी पाच कोटी रूपये दंड भरायला असमर्थता व्यक्त केल्यावर कोर्टाने त्यांना २५ लाख ताबडतोब आणि उरलेले ४.७५ कोटी पुढच्या चार आठवड्यांच्या आत भरायला सांगितले आहेत हे सोयीस्करपणे न लिहिणंही समजू शकतो. घटनेने ते न लिहिण्याचंही स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहेच.

In reply to by बोका-ए-आझम

psychopath ह्या शब्दाचं केजरीवालचे पेटंट आहे काय? ते कन्हयाने वापरले म्हणून केजरीवाल हा कन्हयाचा उत्तराधिकारी आहे हे सिद्ध करायचे आहे काय? किती ते पोकळ युक्तिवाद? काही तरी भरीव आणा राव. दिवसभर 'हाच शब्द केजरीने वापरला तोच कन्हयाने वापरला, बघा बघा कसं आहे' हेच सुरु आहे सगळीकडे. कुच्छ अलग सोचो. आता तुम्हीच ठरवा. एका कथित कॅम्पसफाईटमधे दोन व्यक्तिंदरम्यान झालेल्या बाचाबाचीला महत्त्व द्यायचे की तिकडे देशाच्या इमेज ह्या गोंडस नावाखाली लष्कराला घरगड्यासारखं वागवण्याला महत्त्व द्यायचं. लिस्ट युवर प्रायोरिटीज बाकी दंड भरण्याची समर्थतता असेल तर आणि सत्ताधारी सोबत असतील तर आपण कोणतेही कायदे बिनदिक्कत मोडू शकतो ह्याचा नविन धडा मिळाला. पुर्वीच्या सरकारात दंड भरत नव्हते, इथे दंड भरून करतायत हाच काय तो फरक. घटनेनेच तसे करायचे स्वातंत्र्य दिले आहे. आपण काय बोलणार? रच्याकने, उद्या मी खुदानाखास्ता फेमस झालो तर लहानपणी पटरीवर ***ला जात होता हा माणूस, आम्हाला काय शानपण शिकवतो अशीही टिका होईल की काय याची चिंता पडलीये मला.

In reply to by बोका-ए-आझम

फोटोशॉप करणारी बेस्ट टीम भाजपकडे आहे ना, म्हणून थांबलंय.

BJP Photoshop Politics .. Must Watch and Share..

Posted by Achhe Din Memes on Wednesday, March 9, 2016

In reply to by तर्राट जोकर

नेहमीप्रमाणे मुद्दा तुमच्या लक्षात नाही आला...असो ..आयडी चे नाव सार्थ करताय कन्हया (वयाच्या 28 साव्या वर्षी) कुठे **ला आणि कोणा समोर **ला हा मुद्दा नाही. त्याला त्या मुलीने जाब विचारल्यावर तो कसा रिऍक्ट झाला ह्याला आहे. म्हणे सिस्टिम बदलायचीय अजून भरपूर लिवायच होत पन लिवायचा कंटाळा.

In reply to by डँबिस००७

जवानांकडुंन तुरळक होणार्या बलात्कारांबद्दल कन्हैय्या ने का बोलायला पाहीजे ? त्याचा काय संबंध ? तो नाही सैन्यात ना त्याच्याकडे दोषी सैनिकांना शिक्षा देण्याचे वा अश्या केसेस मध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार आहेत ! + १ तसेच त्याच्याकडे अशा झालेल्या किती बलात्काराच्या घटनांची माहिती असावी हे देखील एक प्रश्नचिन्ह आहे.

कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!
देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतिही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
यापूर्वी त्याचा जेएनयू कँपसमधे बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस नायप्रविष्ट असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
भर विद्यापीठात चारचौघात रस्त्यावर उभे राहून लघुशंका करणे म्हणजे निर्भयता. ते करताना त्याला एका विद्यार्थिनीने हटकणे ही वास्तविकता. विद्यापीठाने ठोठावलेला ३ हजार रूपयांचा दंड त्याने विनातक्रार भरणे म्हणजे प्रांजळता व व्यवस्थेबद्दल कटुता न बाळगणे. अफझल गुरूचा हुतात्मादिन साजरा करणे ही सादगी. आणि ती विद्यार्थिनी व त्याचा सुसंवाद ही सरळ भेट. सगळीच समीकरणे जुळली.

विवेक ठाकूर, तुमचा इथला संदेश वाचला. काही विधानांवर मतप्रदर्शन करेन म्हणतो. १. >> मला वाटतं हे देशात बदल घडवून आणण्याची वैयक्तिक जवाबदारी घेण्याचं सर्वात योग्य असं पहिलं पाऊल आहे. एकदम मान्य. २. >> पण त्याच्या साम्यवादी विचारांनाच बाद ठरवणं म्हणजे समतेप्रती आपली वैयक्तिक जवाबदारी डावलणं आहे. समतेप्रती आपली जबाबदारी पूर्णत्वास नेण्यासाठी साम्यवादाचा अंगीकार कितपत योग्य? साम्यवाद काही जगात समता प्रस्थापित करण्यासाठी उत्पन्न झाला नाहीये. तो फक्त समतेच्या बाता मारतो. शिवाय कार्ल मार्क्सच्या मते भारत हे एक राष्ट्र नाहीच. मग भारताच्या एकात्मतेवर विश्वास नसलेल्या तत्त्वांचा अंगीकार करून भारताचं भलं होईल काय, असा प्रश्न आहे. लोकांना समता आचरणात आणून दाखवली ती ज्ञानोबामाऊली (प्राकृत चोरांनी निर्माण केली का?), संत तुकाराम (सोने मृत्तिकेसमान..., मेणाहुनी मऊ...), संत एकनाथ (गाढवांना गंगाजल पाजणारे) अशा संतांनी. मग आमची घरचं खाणं सोडून बाहेर तोंड मारीत का हिंडावं बरं? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

समतेप्रती आपली जबाबदारी पूर्णत्वास नेण्यासाठी साम्यवादाचा अंगीकार कितपत योग्य? साम्यवाद काही जगात समता प्रस्थापित करण्यासाठी उत्पन्न झाला नाहीये. तो फक्त समतेच्या बाता मारतो. शिवाय कार्ल मार्क्सच्या मते भारत हे एक राष्ट्र नाहीच. मग भारताच्या एकात्मतेवर विश्वास नसलेल्या तत्त्वांचा अंगीकार करून भारताचं भलं होईल काय, असा प्रश्न आहे. तुम्ही परत मुद्दा पक्षीय विचारसरणीकडे नेला. प्रश्न भारतात राजवट कुठली आहे तो नाही. आपण जगतांना समतेतून जगतो का, हा आहे. लोकांना समता आचरणात आणून दाखवली ती ज्ञानोबामाऊली ........ समता ही संतांनी सांगितली काय की इतरांनी, मुद्दा ती अंगी बाणण्याचा आहे. लेख टाकण्यामागे खरा उद्देश तो आहे. पब्लिकनं चर्चा भरकवटलीये.

In reply to by विवेक ठाकूर

लेख टाकण्यामागे खरा उद्देश तो आहे. पब्लिकनं चर्चा भरकवटलीये.
:) नेमकं कोण भरकटलय हे न समजण्यासाठी पब्लिक उल्लूच आहे. सर्व पब्लिकला सर्वकाळ उल्लू बनवता येत नाही अशी म्हण ऐकुन आहोत.

In reply to by विवेक ठाकूर

विवेक ठाकूर, >> आपण जगतांना समतेतून जगतो का, हा आहे. समतेतून जगणे म्हणजे काय? तसं जर जगायचं झालं तर साम्यवाद हा आदर्श होऊ शकतो का? की संतांचं चरित्र आदर्श मानावं? वारीच्या वेळेस वारकरी एकमेकांच्या पायी लागतात. हे समतेचं जिणं आहे का? आ.न., -गा.पै.

JNU row: Kanhaiya, 4 others should be rusticated, recommends top university panel कन्हैय्या कुमारच्या तमाशाचा हा तिसरा अंक चालू झाला आहे. झालेल्या प्रकरणाची चौकशी आणि चौकशीअंती शिफारस करण्यासाठी १० फेब्रुवारीस उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली होती. आता या समितीच्या शिफारसीनुसार त्यांना निलंबित करावे का नाही, निलंबनाची शिक्षा योग्य का अयोग्य वगैरे प्रश्न आहेतच. पण एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, या चौकशीसमितीने एकापेक्षा अधिक वेळेस बोलावल्यानंतर देखील या विद्यार्थ्यांनी तेथे जाऊन आपले मत मांडण्यास नकार दिला. नंतर हा रिपोर्ट एकांगी आहे असे म्हणू लागले. आता देखील प्रशासन त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाटी तीन दिवसांचा अवधी देणार आहे. जर तो त्यांनी घेतला नाही आणि आपली बाजू मांडली नाही, तर त्यातून त्यांचा उद्देश दिसतो - खरे बाहेर येऊन देयचे नाही आणि दंगा करायला मोकळे राहायचे! असो.

In reply to by विकास

काहीतरी गोंधळ आहे. खालील बातमीच्या यूआरएल मध्ये कन्हैय्यासहीत ५ विद्यार्थ्यांचा उल्लेख आहे. प्रत्यक्ष बातमीत फक्त २ विद्यार्थ्यांचाच उल्लेख आहे (खलिद आणि अनिर्बान) व कन्हैय्याला दंड ठोठावण्याचा उल्लेख आहे . http://www.thehindu.com/news/national/highlevel-jnu-panel-recommends-rustication-of-kanhaiya-kumar-and-four-others/article8353023.ece?homepage=true

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तीन वर्षात अभ्यासक्रम पुर्ण करायला लावणे - उत्तम झाले... जी काय नाटके करायची आहेत, ती तीन वर्षात जे काही शिकले असाल त्याचा वापर करून स्टेज वर करा. :)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

धन्यवाद! तोच तर त्यांचा प्रॉब्लेम आहे. सरकारने परदेशी निधीचा वापर योग्य होण्यासाठी म्हणून नाक दाबले... त्यामुळे यांची तोंडे उघडली आणि असहीष्णुता असहीष्णुता असा जप चालू झाला!

In reply to by श्री गावसेना प्रमुख

यथोचित दुवा, उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयातील वकींलांचे अधिकृत सवलतीची फिसचे दर पाहून आपल्यातील उच्चमध्यमवर्गीयाचेही डोळे पांढरे व्हावेत, हि वकील मंडळी लेखात म्हटल्या प्रमाणे इतर सर्वसामान्यांना लाभणे दूरची गोष्ट (अनुषंगिक अवांतर या वकिल मंडळीतील बर्‍याच जण राजकारणात असणे आणि मोठ मोठ्या कॉर्पोरेटचे त्यांचे संबंधही रोचक असावेत)

अजून सुरु आहे का हा धागा काय ठरले मग ?

In reply to by सामान्य वाचक

अहो ते तर शिर्षकातच ठरले आहे: कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट! ;) ते प्रश्नार्थी शिर्षक नव्हतेच! ;)

सत्य काय ते समोर आहेच,त्यामुळे निरर्थक काथ्या कुटत बसणे बौद्धिक दिवाळखोरी वाटते. "आले किती गेले किती संपले किती भरारा"

वल्ड ची झुंबड सुरु आहे राष्ट्रवादाचा महापूर देशात येणार आहेत त्यातच सरकारने ह्या विघ्न संतोषी मंडळींचे विसर्जन कायद्याच्या चौकटीत कायद्याने करावे सरकार त्याचीच वाट पाहत होती असे वाटते. आता निलंबित झाल्यावर नव्या राष्ट्रनायकाने प्राणदान केले नाही म्हणून मिळवले नाहीतर परत एकदा ते ओंगळवाणे राजकारण सुरु होईल कनैह्या ला कॉलेज मधून हाकलले कि तो रोडीज मध्ये जाऊन तेथे नौटंकी राजकारण करून विजेता बनला कि पुढील बीग बॉस च्या सिझन मध्ये जाऊन तेथे जिंकल्यावर मग आपल्या कॉम्रेड सहकारी स्वरा भास्कर सोबत बॉलीवूड मध्ये एखादा शिनेमा करू शकतो. भांडवलशाही अर्थव्यवस्था तेथील चंगळवाद आमच्या कॉम्रेड चा मोरू बनवतील काळी नसावी.

रोजच्या जगण्यातले एथिक्स पाळायला जर कन्हैय्याच्या प्रांजळपणाचा रेफ्रन्स घ्यायला लागत असेल तर अवघड आहे.

कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट! कन्हैया कुमार काल दिल्लीत युवराजांना जाऊन भेटला. हीच ती वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट! आज तो दिल्लीहून विमानाने हैद्राबादला आलेला आहे. रोहीत वेमुलाच्या कुटुंबाला भेटून हैद्राबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर भाषण ठोकणार आहे. हा पीएचडी करणारा स्कॉलर आहे म्हणे. पीएचडी करणारे संशोधनात व्यस्त असतात आणि लवकरात लवकर संशोधन व प्रबंध पूर्ण करून पदवी मिळवितात अशी एक चुकीची समजून अनेक वर्षे उराशी बाळगली होती. याचे घरचे मासिक उत्पन्न ३ हजार रूपये आहे म्हणे. याला दरमहा छात्रवृत्ती मिळते. विमानप्रवास परवडतोय आणि पीएचडी पूर्ण करण्याची अजिबात घाई दिसत नाही. म्हणजे छात्रवृत्तीत मिळणारी रक्कम बर्‍यापैकी मोठी असावी. विमानाचे तिकिट हा करदात्यांचा पैसा का याला कोणीतरी स्पॉन्सर भेटलाय याचे कुतुहल वाटते. पण कन्हैयाकुमारची हैद्राबाद विद्यापीठाला भेट म्हणजे वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

केजरीवालांच्या पावलांवर पाऊल टाकून याची नाटके सुरू आहेत. केजरीवालांना तोडीस तोड प्रतिस्पर्धी मिळाला आहे. त्याच्या टीआरपीत वाढ झाल्याने व स्वतःचा टीआरपी घटल्याने आता केजरीवाल देखील नजीकच्या काळात नवीन नौटकीचा प्रयोग करतील. http://indianexpress.com/article/india/india-news-india/kanhaiya-scuffl…

बरखा दत्त ने मुलाखत घेतली ना. मग बरोबर आहे . मी असे प्रश विचारणार . तू अशी उत्तर द्यायची हे आधीच ठरलेलं असणार . आधी अफझल गुरुचं समर्थन करणारा , काश्मीर मांगे आझादी , केरळ मांगे आझादी म्हणून घोषणा देणाऱ्या ह्या माणसाने न्यायालयाच्या आदेशानंतर आपले भाषणातील मुद्दे बदलले . JNU मध्ये विद्यार्थ्यांना कोन्ग्रेस प्रणीत विचारांनी प्रेरित केलं जातं. देशद्रोही विचारांनी प्रेरित केलं जातं असं त्या विद्यापीथात्ल्याच प्राध्यापकांनी सांगितलंय. माझे कन्हैय्या कुमारला काही प्रश्न आहेत . १. हा वयाच्या २९ व्या वर्षीसुद्धा फक्त विद्यार्थीच का आहे ? २९ व्या वर्षापर्यंत लोकांची शिक्षण संपवून ६-७ वर्षांची नोकरी झालेली असते . बर्यापेकी सेटल झालेले असतात . मग हा अजून कॉलेज मधेच कसा ? अश्या ढ मुलांना शिष्यवृत्ती द्यावी का ? जनतेच्या पैशाचा तो अपव्यय नाही का ? २. वडील आजारी . आई धुनी भांडी करून पैसे कामाव्तीये आणि हा इकडे तिकडे सभा घेत फिरतोय . आई वडिलांचे पांग कधी फेडणार ? ३. गेली ६० वर्षे कोन्ग्रेस ने दलितांना दलित , गरिबांना गरीब , उपेक्षितांना उपेक्षित , अन्यायग्रस्तांना अन्यायग्रस्तच राहून दिलं. बिली , सडक , पाणी मधून कधी बाहेरच नाही पडून दिलं. जनतेला ओरबाडून खाल्लं. भ्रष्टाचाराचे विक्रम रचले . ६० वर्षात गरिबी, बेरोजगारी , अन्याय हे सगळं होताच कि . मग गेल्या ६ महिण्यान्पासूनच हे दिसू लागलंय का? ४. भारताच्या झेंड्यावर बोलतो . मग काश्मीर मध्ये फडकवलेल्या इसीस आणि पाकिस्तानच्या झेंड्याबद्दल का बोलत नाही ? ५. भगवा रंग नको म्हणताना निळा रंग हवा हा आग्रह का ? ६. मनुस्मृती कधी वाच्लीये का ? मनु कोण होता मनुस्मृती का लिहिली गेली ? त्यातल्या नक्की कोणत्या गोष्टींवर आक्षेप आहे . आजच्या काळात मनुस्मृती बर्यापेकी विस्मरणात गेली असताना तू ती लोकांच्या स्मरणात जिवंत ठेवण्याचा खटाटोप कशासाठी करतोयेस ? ७. पुण्यामध्ये फक्त दाभोलकरांच नाव घेतलंस. शिवाजी महाराज , फुले , आगरकर , तुकाराम महाराज , ज्ञानेश्वर हे माहित आहेत का ? ८. दुष्काळासाठी निसर्गाला दोष देवू नका . दोष सरकारचा आहे म्हणताना महाराष्ट्राचा मंत्री केंद्रात कृषी मंत्री असताना सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातच झाल्यात . धरणात पाणी नाही तर मुतू का म्हणून क्रूर चेष्टा केली गेली . हे मुद्दे उपस्थित का नाही करत ?

In reply to by तुडतुडी

अजुन काहि मुद्दे ..... १. एक्नाथ खड्से लातुर भेटी दरम्यान हेलिपंड साठी १०००० लि पानी खर्च केले. दस्तुर खुद्द मुख्यंमंत्री कारने प्रवास करतात पण यांचे दॉरा हेलिकाप्टरनेच करु हा हट्ट ! २. फेसबुक, व्हाट अप्प वर कोणाच्या तोंडात कोणाचे कोटस !!! आता फक्त गांधींजींचे मुखी जिन्नाचे शुभाषित न येवो म्हणजे मिळवलि.

In reply to by तुडतुडी

एका सद् गृहस्थांनी पत्नीचे पांग फेडलेत का? नोकरी करुन आई वडिलांचे पांग फेडलेत का ? तेही विचारुन घ्या

In reply to by अनुप ढेरे

खिक्! मला तर कायम वाटत आले आहे की विमनाच्या मागल्या दारी लोहगावात चढले तर पुढल्या दाराने दादर मधे उतरता येईल!

अतीअतीअवांतरः- मला सुद्धा जाणुन घ्यायच आहे मनु कोण होता मनुस्मृती का लिहिली गेली ? कारण हे जर manuscript च भाषांतर मनुस्म्रुति असेल तर मग कहर आहे.

बिचरया शायराबानोचे पुढे काय झाले ? कोणीच कसे पुढे येत नाही, , अश्या अभागी भगिनींची मदत करायला ? प्रांजळ क न्हेय्या कुमार काही मदत करू शकतील का ?

फेसबुकवरील लेखिका शेफाली वैद्य यांच्या भिंतीवरून साभारः मास्टरजी - बेटा राजू, क्या चाहिए तुम्हे? राजू - मुझे चाहिये आज़ादी। ग़रीबी से आज़ादी। मास्टरजी - मास्टरजी - अच्छा, तो पढ़ाई पे थोड़ा ध्यान दे बेटा। मेहनत कर! डॉक्टर, इंजीनियर या शास्त्रज्ञ बन! फ़ौज में अफ़सर बन राजू - कौनसे ज़माने में हैं आप मास्टरजी? इतनी मेहनत कौन करेगा? मैं तो ‪#‎JNU‬ जाऊँगा। भारत के खिलाफ प्रदर्शन करूँगा। भारत तेरे टुकड़े होंगे के नारे दूँगा। मास्टरजी - उससे क्या होगा? राजू - मैं हीरो बन जाऊँगा। देश-बिदेश में फ्री में हवाई जहाज से घूमूँगा। लोग-बाग़ मेरा इंटरव्यू लेंगे। मुझे मुफ़्त में आय-फ़ोन देंगे। महंगे होटल में ठहराएंगे। ऐसेही तो मिलती हैं गरीबी से आज़ादी। आप क्या पढ़ने-लिखनेवाली, मेहनत करनेवाली बातें लेके बैठे हो मास्टरजी। जमाना बदल गया हैं|

In reply to by गॅरी ट्रुमन

Img विचारांचा विरोध विचारांनी करा, वैयक्तीक आयुष्याची सीमा जपली पाहीजे. नाहीतर तसेच रीप्लाय येतात, आता गरीब घरातला राजू अमेरीकेत फिरून आला, बघून बरा वाटला. Img2

In reply to by कपिलमुनी

भक्त-हिरो कोणतेही असोत, टिकाकरता येणार नाही एवढे दैवतीकरण होण्यापेक्षा, व्यक्ती प्रामाण्य आणि व्यक्तीपुजा आवरती घेता येईल एवढी हिरोत स्खलनता असलेली बरी पडावी असे काही वेळा वाटून जाते. एनी वे चर्चीत विषयावर हा एक लेख दिसला. असो.

मला वाटलं होतं की कन्हैय्या दूर्लक्षणीय वैग्रे आहे!

In reply to by सुनील

=)) देश्भर ढिंडोरा पिटून पिटून भक्त लोक, कन्हैया कसा दुर्लक्ष करण्यासारखा, महत्त्व न देन्याजोगा आहे हे शिरा ताणून ताणून सांगत आहेत. मनोरंजन होतंय.

ओ माय गॉड चित्रपटात एक स्वामी आमरण उपोषणाला बसलेला दाखविलेला होता. राणा भीमदेवी थाटात उपोषण तर चालू केले पण त्या उपोषणाचा काहीच परिणाम होत नाही हे त्याच्या लक्षात आले. एकीकडे पोटात आग तर पडलेली आणि दुसरीकडे आमरण उपोषणाला बसणार हे जाहिर केल्यामुळे प्रतिष्ठाही पणाला लागलेली. यातून मार्ग कसा काढणार? तर शेवटी त्याला संडासात लपून बटाटेवडे खावे लागले होते. या कन्हैय्या कुमारच्या आमरण उपोषणाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून त्याच्यावर तीच वेळ आणली गेली तरच या असल्या हलकटांचे विमान जमिनीवर येईल. http://www.ndtv.com/delhi-news/jnus-kanhaiya-kumar-others-go-on-hunger-…

In reply to by गॅरी ट्रुमन

एफटीआयआयमध्ये ८-८ वर्षे तळ ठोकलेले २००८ च्या बॅचचे टगे असेच उपोषणाला बसले होते. केंद्र सरकारने अत्यंत संयमाने त्यांचे आंदोलन हाताळून त्यांनी केलेली एकही मूर्खपणाची मागणी मान्य केली नाही. शेवटी त्यांना निमूटपणे आंदोलन मागे घ्यावे लागले.

In reply to by श्रीगुरुजी

८-८ वर्षे फार कमी झाली हो. १२-१३ वर्षे मुक्काक करीत असलेली मंडळी होती. चाप लावल्यावर पाय लावुन पळाले आहेत. प्रकार तोच. फुकट रहायचे आणि खायचे. इन्स्टिट्युटची सामग्री वापरुन फिल्म बनवायच्या. पण अभ्यासक्रम पुर्ण नाही करायचा. सगळी लाल माकडे भरलेली होती. कबीर कला मंच नावाखाली नक्शलवादी याच होस्टेलमध्ये आरामात रहात होते. त्यांना तेथेच अटक केली हे किती जणांना माहित आहे.

हा तर म्हणे जएनयूमध्ये बेमुदत उपोषणाला बसलाय. पण हा आता उपाशीपोटीच पाटण्याला भाषणं ठोकायला गेलेला दिसतोय. पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रबंध पूर्ण करण्यासाठी काही विशिष्ट मुदत असते का त्यासाठी कितीही वर्षे घेतली तरी चालतात? त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून जी छात्रवृत्ती मिळते ती काही ठराविक कालावधीसाठी असते का आयुष्यभर मिळत रहाते? हा तर गेले अडीच-तीन महिने पीएचडीसाठी काही वाचन, संशोधन, अभ्यास करताना दिसत नाही. तो देशभर बिझनेस क्लासमधून उंडारताना दिसतोय आणि "हमे चाहिए गरीबी से आजादी", "भूक से आझादी", "मनुवादसे आजादी" हेच सगळीकडे बरळताना दिसतोय आणि आपल्यावर भाजपवाले हल्ला करत आहेत ही नौटंकीसुद्धा जोरात सुरू आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रबंध पूर्ण करण्यासाठी काही विशिष्ट मुदत असते का त्यासाठी कितीही वर्षे घेतली तरी चालतात? त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून जी छात्रवृत्ती मिळते ती काही ठराविक कालावधीसाठी असते का आयुष्यभर मिळत रहाते?
एखाद्याच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात फरक करायला हवा हे समजत नाही का तुम्हाला श्रीगुरूजी?

In reply to by गॅरी ट्रुमन

म्हणजे काय करायला हवे? श्रीगुरुजिंनी काय चूक केली. ज न यू मध्ये आपल्या पैशावर गुण उधळणार्यांना पालखीतुन घेउन जायचे का. हे फी किती भरतात हे बघा. मग वर्षानुवर्षे मुक्काम कसे करु शकतात हे कळेल.

In reply to by श्रीगुरुजी

मी युनिवर्सिटीची परिक्षा वेळेत पास झालो असुन शिष्यवृत्तीवर नसुन स्वतः नोकरी करुन पोट भरतो. उपरोक्त घोषणा मी दिल्या तर आपला काही प्रत्यवाय असेल किंवा कसे ?

In reply to by mugdhagode

अर्थात आठ वर्षे सरकारी शिष्यवृत्ती खायची आणी सरकारलाच शिव्या द्यायच्या हे अति झालं. हे म्हणजे लंगर मध्ये फुकट जेवायचं आणी लंगरचं व्यवस्थापन कसं ठीक नाही यावर बोंब मारायची. पहिल्यांदा आपले शिक्षण पूर्ण करा. मग त्याबद्दल बोला.सरकारने तुम्हाला गरिबी दिली कि भूक दिली? सरकारने तर तुम्हाला शिष्यवृत्ती दिली ना. खाल्ल्या घरचे वासे मोजायचे का?

In reply to by सुबोध खरे

शिष्यवृत्ती न घेणारेही रस्ते , रेशन , जनबिमा योजना , गॅस सबसिडी , स्वस्त शिक्षण , मोफत लसीकरण या सरकारी गोष्टींचे फायदे घेतच असतात . त्यानाही सरकारविरुद्ध बोलायचा अधिकार नसायला हवा. ...... शिष्यवृती का देतात ? सरकारविरुध्ह न बोलता तोंड मिट्न गप्प बसायला ? ...... मनुवाद से मुक्ती भूक से मुक्ती हे बोललं तर ते सरकारविरोधात होते का?

In reply to by mugdhagode

रस्ते , रेशन , जनबिमा योजना , गॅस सबसिडी , स्वस्त शिक्षण , मोफत लसीकरण या सर्व सोयी इतर सर्वच जण घेत असतात परंतु शिष्यवृत्ती फक्त याच महाशयांनी घेतली होती आणी ८ वर्षे झाली तरीही रमणा चालूच होता. आमच्या लष्करात एखादा कोर्स दुपटीपेक्षा जास्त वेळ घेतला तर सरळ परत मूळ जागी पाठवले जाते. सरकारी पैशावर ऐश करायलापाथ्व्लेले नाही हे स्पष सुनावून. सरकार विरोधात बोलायचा अधिकार आहे हे मान्य. पण अफझल गुरु ला समर्थन देण्याबद्दल आपले काय म्हणणे आहे ते एकदा सांगाल का?

In reply to by mugdhagode

१. मनुवादसे आजादी म्हणजे नक्की काय? २. सरकार मनुवाद कसा लागू करते किंवा मनुवादाला कसे प्रोत्साहन देते? ३. तथाकथित मनुवाद संपवण्यासाठी (सध्याच्या) सरकारने काय केले पाहिजे? ४. या आधीची सरकारे मनुवाद नाहीसा करायला काय करत होती? ५. गेल्या ६५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत हा मनुवाद कसा काय गेला नाही? ६. जर का एवढी वर्षे मागच्या सरकारांनी प्रयत्न करून मनुवाद संपला नाही तर सध्याच्या सरकारने २ वर्षात याचा खातमा करावा अशी अपेक्षा का बरे करावी? प्रश्न ४, ५ आणि ६ हे भूक आणि गरिबीच्या मुद्द्याला पण लागू होतात. त्या अनुषंगाने पण उत्तरे द्यावीत.

In reply to by ट्रेड मार्क

असे अडचणीत आणनारे प्रश्न विचारुन एखाद्याची गोचि करायची नसते, मुगडाल घोड़ेना साँप सुंघला वाटते?

आपले जुनिअर युगपुरूष सिनिअर युगपुरूषांच्याही पुढे एक पाऊल गेले. जुनिअर युगपुरूषांनी बिहारमध्ये जाऊन लालूंपुढे कुर्निसात केलेला दिसतो. ध्येयनिष्ठा असावी तर या युगपुरूषांसारखी. आणि आता जुनिअर युगपुरूष भ्रष्टाचारमुक्त शासन कसे द्यावे, लोकाभिमुख प्रशासन कसे द्यावे याचे धडे लालूंकडून गिरवून सगळ्या जगाला त्यासंबंधी प्रवचने द्यायला मोकळे. Lalu परवा जुनिअर युगपुरूषांना काळा झेंडा दाखविणार्‍या एकाला त्यांच्या समर्थकांनी तर झोडपूनच काढले ( http://www.scoopwhoop.com/Kanhaiyas-Supporters-Thrash-Man-After-He-Show…) . आणि हेच ज्युनिअर युगपुरूष अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने लेक्चरबाजी करत देशभर फिरत असतात. या युगपुरूषांपेक्षाही त्यांच्या समर्थकांचे खरोखरच आश्चर्य वाटते. केवळ मोदीविरोध म्हणून या दोन्ही युगपुरूषांना कित्येक लोक डोक्यावर घेतात. मिपावरही आहेतच तसे. बिहार निवडणुकांपूर्वी मला वाटायचे की या विरोधकांची बिहार निवडणुकांच्या वेळी अडचण होईल. कारण भाजपचे समर्थन करायचा प्रश्नच नाही आणि लालूंचे उघड समर्थन कसे करायचे? तथाकथित अभ्यासू म्हणवल्या जाणार्‍या आय.डी कडूनही भाजपला विरोध म्हणून लालू-नितीश निवडून आले तर चांगले होईल हे विधान वाचले तेव्हा मी अगदी पार चुकीचा होतो हे कळून चुकले. आता मी एक भाकित करत आहे.समजा २०१९ मध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी दाऊद इब्राहिमला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहिर केले तर हे सगळे विचारवंत दाऊद इब्राहिम किती चांगला॑ आहे यावर प्रवचने झोडायला सुरवात करतील हे बघाच. दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलून ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव द्यायचा निर्णय घेतल्यावर तिकडे दिवाळीअंकात लेख लिहिणार्‍या एका महाविचारवंताने औरंगजेब किती चांगला होता यावर लंबेचवडे फेसबुक पोस्टही लिहिले होते.ते अजूनही त्यांच्या भिंतीवर तसेच आहे. हे असले विचार करणारे लोक बघितले की खरोखरच तळपायाची आग मस्तकात जाते. जर का आमच्या शंभूराजांना हालहाल करून ठार मारणार्‍या औरंगजेबाला चांगला म्हणत असतील तर दाऊद इब्राहिम म्हणजे किस झाड की पत्ती!!

In reply to by गॅरी ट्रुमन

इथे मिपावरच शिवाजी महाराजांबद्दल वैट लिहिलेले बघितलेले, इतरही हिंदूंच्या खरोखर पुजनीय व्यक्तिमत्वांबद्दल राजरोसपणे परत परत वाईट लिहिलेले बघितलेले आहे...अश्या आयडींना प्रामाणिक आणि मिपाप्रेमी म्हणून परत येणारे असे गौरवलेलेही बघितले आहे...असे असताना तुम्ही जे वर लिहिले आहे ते बघून आश्चर्य वाटले नाही

सद्गृहस्थानची बराच काळ काहीच प्रतिक्रिया दिसत नाही हे प्रेम पण अल्पकाळ टिकले कि काय

शेवटी कन्हैय्याने आपले प्राणांतिक उपोषण सोडले. हे काय? पाहिजे असलेली आझादी मिळाली वाटते? मग उपोषण कसे सोडले? की त्या ओ माय गॉड चित्रपटातील स्वामीप्रमाणे मोठ्या जोशात प्राणांतिक उपोषण सुरू तर केले पण त्याचा शून्य परिणाम होत आहे हे लक्षात आल्यामुळे अडचण झाली? तो चित्रपटच असल्यामुळे त्या स्वामीला संडासात लपून बटाटेवडे खाताना दाखवता आले.पण प्रत्यक्ष जीवनात अशा परिस्थितीत loss of face शिवाय माघार घेता येणे शक्य नसते. या कन्हैय्या कुमारबरोबर तेच झालेले दिसत आहे. याला अपेक्षित असलेल्या व्यवस्थेत अशांना एकतर डायरेक्ट वर पाठवले गेले असते नाहीतर गुलागमध्ये तर नक्कीच. किमानपक्षी असा दम भरला गेला असता की आयुष्यभर आझादी वगैरे पोपटपंची स्वप्नातही सुचली नसती.

In reply to by गॅरी ट्रुमन

प्राणांतीक??अहो इथे प्राण जायची वेळ आली कन्हैय्या ची ह्या उपोषणाने। त्याच्या शिवाय सेक्युलर लोकांचा उद्धार कोण करणार म्हणून भारताच्या लोकशाही कड़े बघुन त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने?उपोषण सोडलय

In reply to by गॅरी ट्रुमन

शेवटी कन्हैय्याने आपले प्राणांतिक उपोषण सोडले.
डोंबलाचं प्राणांतिक उपोषण. २८ एप्रिलला उपोषण सुरू केल्यावर १ व २ मे ला हा विमानाच्या बिझनेस क्लासने बिहारमध्ये लालूचा आशिर्वाद घ्यायला गेला होता. ३ दिवस पोटात अन्नाचा कण न घेतलेला माणूस असा दोन दिवस हिंडू शकतो? विमानात याने भरपूर हादडलं असेलच. बिहारमध्येही पुख्खा झोडला असेल. तो काय उपाशीपोटी २ दिवस इकडेतिकडे हिंडत होता का? नंतर त्याला २ दिवसांपूर्वी म्हणे भरपूर उलट्या झाल्या. उलट्यांचं कारण लक्षात येतंय. आता इतर विद्यार्थी उपोषण करताहेत (१० दिवस उपाशी राहून हे अजून कसे उपोषण करताहेत खुदा जाने) आणि याने उपोषण सोडून दिले. आता उंडारायला आणि हमे चाहिए आजादी असं बरळायला मोकळा.

In reply to by सुबोध खरे

माघार घेणे चर्चिल , शिवाजीमहाराज व अडवानी यानाही टाळता आले नव्हते. कन्हैय्या तर छोटं बाळ आहे अजुन .

In reply to by श्री गावसेना प्रमुख

लघुशंका चारचौघात विद्यापीठातील रस्त्यावर सर्वांदेखत करायची नसते हे ज्याला कळत नाही तो लहान बाळच आहे की. लहान बाळ इकडेतिकडे मजेत हिंडत असते. प्रेशर आले की जिथे उभा आहे तिथेच उभ्याउभ्या लघुशंका करून मोकळे होते. बाळाला व बघणार्‍यांनाही त्याचे काही वाटत नाही. कन्हैयाने तसेच केले. त्याला स्वतःला त्याबद्दल खंत नाही व त्याच्या फॅनक्लबलाही त्यात काही चुकीचे वाटले नाही. विद्यापीठाया व्यवस्थापनाला त्यात काय चुकीचे वाटले कोण जाणे. लहान बाळच तो!

फर्स्टपोस्ट च्या फेकींग न्यूज विभागात गेल्या तीनचार महीन्यात कन्हैय्या बाळा बाबत बरेच रोचक एप्रिलफूल किस्से जमा झालेले दिसताहेत. गूगल दुवा