Skip to main content

कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

लेखक विवेक ठाकूर यांनी शनिवार, 05/03/2016 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतिही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. यापूर्वी त्याचा जेएनयू कँपसमधे बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस नायप्रविष्ट असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 70244
प्रतिक्रिया 362

प्रतिक्रिया

In reply to by तर्राट जोकर

बलात्कार व खून तर कम्युनिस्टही करतात. प. बंगालमधे डाव्या सरकार्च्या काळात हे प्रकार सर्रास होत असत. त्यावर हे २९ वर्षांचे बालक काही बोलत नाही. काश्मिरी अतिरेकी व मुसलमानांनी पंडीतांवर केलेले अत्याचार अर्थातच त्याला माहीत नसणार. केरळमधे संघ स्वयंसेवकांच्या हत्या तर माओच्या तत्वात बसतातच. हा सगळा प्रकार पाहुन काय अप्पावरची एक पोस्ट आठवली, "४५ सालका युथ लिडर, २९ सालका छात्र और हमही *** है की २१ साल कि उमर में नौकरी लेके टक्स भर रहे है।"

In reply to by एक सामान्य मानव

कम्युनिस्ट म्हटले की हिंसाचार आलाच. केरळ आणि बंगाल ही राजकीय हिंसाचारात आघाडीवर असलेली राज्ये का आहेत याचे कारण तर उघडच आहे.या एका तथाकथित विचारसरणीच्या नावावर हिटलरला लाजवतील अशी हत्याकांडे झालेली आहेत. या सगळ्या गोष्टींविषयी हे नवे युगपुरूष काहीच बोलणे अपेक्षित नाही.

In reply to by विवेक ठाकूर

१) भारतीय सेना दलांच्या जवानांकडून काही चूक झाली तर कोर्ट मार्शल होते, सामान्य कोर्टापेक्षाही अधिक वेगाने शिक्षा होते. कन्हैया कोर्ट मार्शल होऊन झालेल्या शिक्षांबद्दल आणि दिलेल्या न्याया बद्दल काही बोलला आहे का ? २) कन्हैय्या म्हणतोय काही सैनिक बलात्कार करतात म्हणजे काय त्यांना सैनिक आहेत म्हणून बलात्कार करण्याची सवय असते का ? हे अपवादावरुन नियम सिद्ध करणे नाही का ? आपण कन्हैय्याच्या वक्तव्याला बलात्कारांचा अभ्यास असलेल्या अभ्यासकाची जागा देत आहोत का ? प्रश्नांचा काहीच अभ्यास नसताना एकांगी अप्रत्यक्ष सरसकटीकरण, काश्मिरी आणि मुस्लिमांच्या भावनांना भडकवणे आगीत तेल ओतणे नाही का ? ३) काही काश्मिरी मुस्लीम पुरुषही बलात्कार करत असणार, समजा एखाद्या काश्मिरी मुस्लिम तरुणाने काश्मिरात बलात्कार केला असेल तर तुम्ही उर्वरीत सर्व काश्मिरी पुरुषांना काश्मिर सोडण्यास सांगणार आहात का ? ४) कन्हैय्या उमर आणि त्यांना ह्वा देणारे प्राध्यापक सोबतचा जीनयुचा तथाकथीत एनलायटंड विद्यार्थी वर्गाने अतिरेक्यां विरुद्ध काश्मिर मध्ये जाऊन सोडून द्या दिल्लीत बसून तरी निषेध नोंदवले आहेत का ? यांना फक्त अतिरेक्यांचे मानवाधिकार दिसतात अतिरेक्यांनी मारलेल्या माणसांचे मानवाधिकार दिसत नाहीत का ? तुम्ही अतिरेक्यांना संरक्षण देणे सोडून द्या तेथे सैनिक नेमण्याची गरजच राहणार नाही हे ह्यांनी काश्मिरींना कधी सांगितले आहे का ? ५) भारतीय सैनिक धार्मीक स्थानात जावेच लागले तर पायातली पादत्राणे काढून जातात, सिव्हीलीअन्सनी रागाच्या भरात कधी दगडफेक अथवा इजा केल्या तरीही बहुतांश वेळा त्यांचा व्यक्तिगत दोष नसतानाही प्रत्युत्तर न देता दिलदारपणे सहन करतात हे तुमच्या कन्हैयाबाळाच्या भाषणात नेमके कुठे येते हे सांगण्याचे कष्ट कन्हैय्या आणि जेएनयु प्रेमी घेतील का?

In reply to by माहितगार

कन्हैय्या प्रेमींसाठी काही शंका काही प्रश्न, तुमच्या कन्हैयाबाळाच्या, कन्हैय्या आणि जेएनयु प्रेमी >> वरील शब्द वापरुन आपण चर्चा सुरु करण्याऐवजी बंद केली आहे हे नमूद करु इच्छितो. ज्याला उत्तर द्यायचे असेल तो देणार नाही. दिले तर कन्हयाप्रेमी, भक्त म्हणजेच त्याच्या विचारांना सरसकट पाठिंबा देणारा म्हटला जाईल. गुड मूव!

In reply to by तर्राट जोकर

हाच गूड मुव्ह कन्हैय्या बाळाने पण केलाय हे लक्षात घेता येईल का ? भारतीय सैनिकांच्या चुकांची चर्चा करून तिथे स्त्री सैनिक स्त्री पोलीस कसे वाढवाता येतील या विषयाकडे चर्चा नेता येते पण जर उद्देश देश विरोधी अल्टीरीअर मोटीव्ह आणि निवेदीता मेनननांसारख्यांकडून सिद्ध होताना आश्चर्य वाटावयास नको निवेदिता मेननानां मी चांगले वाचले आहे. कुणाला आवडो अथवा न आवडो, जे एन यु कर आणि त्यांची बाजू घेणारे यांच्याकडून भारतीय सैनिकांबद्दल अवाक्षरही ऐकण्याची इच्छा शिल्लक राहीलेली नाही. देशप्रेम काय सारखे फालतू प्रश्न न विचारता देशासाठी सिमेवर जिव द्या आणि मग भारतीय सैनिकांबद्दल प्रश्न विचारा हा जे एन यु प्रेमींसाठी एकमेव उत्तर आहे. देशप्रेम हि आमच्यासाठी निगोशीएट करण्याची गोष्ट नाही प्रसंगी देशासाठी जिव हसत हसत देण्याची गोष्ट आहे हे निश्चित !

In reply to by विवेक ठाकूर

तो म्हणतोयं "मानवी हक्कभंगावर मी बोलीन, एफएसपीए (Armed Forces Special Powers Act) विरुद्ध बोलीन, सैनिकांचा सन्मान करुन सुद्धा म्हणीन की काश्मिरी महिलांवर सुरक्षादलांकडून बलात्कार केले जातात" एका अथवा काही सैनिकांनी जर बलात्कारच कशाला सैनिकी अथवा नागरी कायद्याच्या विरोधात कुणाविरुद्धही काही केले असले तर त्यावर जरूर आवाज उठवा. आणि अशांना शिक्षापण झाल्या पाहीजेत आणि झालेल्या आहेत देखील. गंमत म्हणजे या संदर्भातील भारतीय मिलिटरी कोर्टाने दिलेल्या शिक्षांबद्दल भारतीय माध्यमांनी नाही पण पाकीस्तानी डॉन आणि ट्रिब्यून ने लिहीले आहे... पण त्या एका अथवा काही सैनिकांनी केलेल्या गुन्ह्यामुळे सुरक्षादलच करत आहे असे तुमचे अथवा तुमच्या लाडल्या कन्हैय्याचे आणि त्याच्या राजकीय बापजाद्यांचे म्हणणे असेल तर त्यात सरसकटीकरण होत आहे. मग सुरक्षादलापर्यंतच कशाला थांबा, भारतीय पुरूष असले प्रकार करत आहेत म्हणा की - त्यात सगळेच येतील. चालेल का हे तुम्हाला? मानवी हक्कभंग संरक्षण - हे असलेच पाहीजे. पण त्याची जी काही व्याख्या एनजीओज् करतात, त्यानुसार जेंव्हा सरकारने केलेले अन्याय (state abuses) असतात तेंव्हा त्याला मानवी हक्कभंग म्हणतात. पण व्यक्तीने केले असले अथवा दहशतवाद्याने/दहशतवादी संघटनेने केले असले तर मात्र त्याला मानवी हक्कभंग म्हणले जात नाही... मग त्यात काश्मिरी पंडीतांना दहशतवादाने बेघर केले गेले ते मानवी हक्कभंग धरले जात नाही. थोडक्यात जेंव्हा कन्हैय्या असेल नाही तर अजून कोणी असेल जेंव्हा ठामपणे म्हणतो की मानवी हक्कभंग झाला आहे, तेंव्हा तो भारत सरकार आपल्या नागरीकांवर अत्याचार करत आहे असे म्हणत असतो. आणि हे काही आत्ताचेच भारत सरकार नाही तर वर्षानुवर्षांचे.

In reply to by विकास

कन्हैय्याने हि नवीन टुम का बरं काढली असावी ? अहो सिंपल.. माल्यांना परदेशात पळुन जायला धुकं निर्माण व्हावं म्हणुन. (आणि त्या मागे केंद्र सरकाराचा हात आहे असं मला वाटतं)

मिपा वरच्या कन्हैय्या च्या समर्थकांच काय म्हणणं आहे ह्या विषयावर ,प्रतिआरोप न करता व अजून काही पुरावे न मागता किंवा अजून ह्याची सत्यता पडताळली गेली नाहीये अस काही न म्हणता हा बोललेला असू शकतो अस समजून त्याच्या कैवाऱ्यांनी ह्याबाबत त्यांचे म्हणणे मांडावे ।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

हा बोललेला असू शकतो अस समजून >> व्हाट डु यू मीन? एवढं का अधीर होताय गाववाले?

हा किती ओरडेल मे जून पर्यंत ,त्याला दिलेली चावी इलेकशन संपताच संपेल आणि ह्याचाही हार्दिक होईल ,संबंध आयुष्याचं नुकसान करू ऱ्हायला ना भो ।येचुरी चे पण दिवस संपल्यात जमा आहेत अस दिसतंय

जेएनयु प्राध्यापक निवेदीता मेनन यांच्या दृष्टीने काश्मीर हा भारताचा भाग नाही. एकवेळ भारत-पाक मधील disputed territory आहे असे म्हणले असते तरी समजू शकलो असतो. पण तसे नाही... त्यांची अशीच मते पुर्वांचल प्रदेशातील राज्यांसंदर्भात आहेत. जगात सीमावाद अनेक ठिकाणी आहे. पण असे कदाचीत एकच राष्ट्र असेल जेथे त्या देशाचे तथाकथीत "विद्वान" नागरीक हे देशाच्याच विरुद्ध बोलतात आणि वर सहीष्णुता संपली म्हणून गळा काढतात!

In reply to by विकास

मधल्या या अशा वादग्रस्त आणि टीअारपी वाढवण्यासाठी विधानं करणाऱ्याला agent provocateur हा शब्द अगदी चपखल लागू पडतो. आधी अशी विधानं करायची, मग लोकांना उकसवायचं, मग बघा कशी असहिष्णुता आणि फॅसिझम वाढलाय अशी आरोळी ठोकायची ही अगदी ठरलेली modus operandi आहे. आणि आमच्या काही मित्रांना अाणि अमित्रांना त्यात काहीही वावगं वाटत नाही. उलट तो प्रांजळपणा वगैरे वाटतो!

अजून काय बोलणार.कोणीही सोम्या गोम्या उठतो आणि.. अगदी भारतातून अमेरिकेत रोजी रोटी कमवायला गेलेले बुद्धीवादी लोक पण तेथे बसून भारतातल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गळे काढतात तेंव्हा मोठी गम्मत वाटते.

In reply to by आरोह

India under Modi

Conference/Symposium | March 11 | 8:30 a.m.-5 p.m. | To mark the impending two year anniversary of the Modi government and to assess its impact and the challenges ahead, the University of California at Berkeley, through its Institutes for South Asia Studies and International Studies, is organizing an international symposium titled, India under Modi: A look back on 2-years of BJP rule, to be held on March 11-12, 2016 in Berkeley,CA. The symposium will bring together influential political, business, policy, scientific, and academic leaders to debate six key areas of governance under the Modi government: business and industry, culture and education, digital government and service provision, health and poverty, law and minority rights, and media and its future.

मी ह्या आधीच्या प्रतिसादात जे म्हणालो होतो की कनैह्या उमरच्या लोकांचा धांगडधिगा चालू असतांना त्यांचे कवचकुंडल बनून अभाविप च्या लोकांना नडत होता. पुढे दुसर्या दिवशी प्रकरण वाढलेले पाहून कनैह्या ने पलटी खाऊन बाहेर आलेल्या लोकांना ओळखू शकलो नाही कारण अभाविप चे विद्यार्थी गुंडा गर्दी व महिलांना धक्का बुक्की करत होते असे त्याचे म्हणणे होते सदर विडीयो पूर्णपणे निर्दोष आहे. ह्यात शांतपणे भारत विरोधी घोषणा देणाऱ्या लोकांचे चित्रीकरण करणाऱ्या माणसाला कनैह्या जाब विचारत आहे मात्र मागे चाललेल्या तमाष्याला तो अजिबात थांबवात नाही आहे.

हे अगदि बरोबर अहे ते सुद्धा ह्याचा लक्षात येत नाही तर ह्याची लोणकढी थाप मला ह्या कार्यक्रमाबद्दल माहिती नव्हती अरे बाबा ह्या कार्यक्रमाचे पोस्टर त्याचे मुख्य मुद्दे तुझ्या विद्यापिठ्याच्या सर्व परिसरात होते त्याहून महात्व्याचे तूच एका मुलाखतीत हा कार्यक्रम नियोजित वेळेच्या एक तास आधी रद्द झाला तेव्हा तो का झाला ह्या बद्दल तू विध्यार्थ्यांचा अध्यक्ष म्हणून प्रशासनाला विचारणा केली असे बोलला होता तेव्हा ज्या कार्यक्रमाविषयी तुला कल्पना नाही त्यासाठी तू प्रशासनासाठी भांडला

In reply to by अनिरुध

तुरुंगातून बाहेर आलेल्यावर देशाचे नवे हिरो ,ह्यांनी रविश ह्यांना मुलाखत देतांना जो गाढवपणा केला म्हणजे कार्यक्रमाबद्दल माहिती नव्हते किंवा तेथील घटना थांबवणे माझ्या दायरे मे नही था , अशी मुक्ताफळे उधळली , म्हणजे अभाविप चे लोक हा कार्यक्रम थांबवत आहेत तर ते गुंड आणि हा कोण पण जश्या मी ह्यालाच्या आधीच्या मुलाखतीची क्लिप येथे दाखवली तसे ह्याचे जे बोलवते जे धनी आहेत त्यांनी सुद्धा त्याला ऐकवली असावी ह्यानंतर राजदीप ने त्याची मुलाखत घेतली त्यात त्याला खोदून खोदून त्या घटनेविषयी विचारले पण साहेबांनी त्यावर भाष्य करण्याचे टाळले , परत काही बोललो तर आपलाच गाढवपणा आपल्याला नडेल. किंबहुना त्यांनतर च्या प्रत्येक मुखातीत त्याने हे प्रकरण नायालयीन प्रविष्ट असल्याने मी ह्यावर काही बोलत नाहि ही भूमिका घेतली , बिचारा रविश पुढे बोलून फसला. आणि त्याचे हे खोटारडेपणा त्यांच्या नव समर्थकांना दिसत नाहि.

In reply to by निनाद मुक्काम …

त्याचे हे खोटारडेपणा त्यांच्या नव समर्थकांना दिसत नाहि >> तुम्हाला दिसतोय ना? वाजवा की ढोल. पेढे वाटा. =))

ही कन्हैय्या कुमार, निवेदिता मेनन यांचं वक्तव्य, जनेवि वगैरे प्रकरणं म्हणजे मोदींच्या मतांची सोय वाटते. म्हणून की काय कन्हैय्या कुमार बाहेर आहे आणि हार्दिक पटेल आत आहे. दोघांवरही आरोप तर देशद्रोहाचाच आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जर तुमचे तर्कट जरासे जरी तथ्त्य असेल तर डावे व त्यांचे वाक्लिनी करणे काही प्रसार माध्यमे हे मोदींच्या सापळ्यात अडकत आहेत आणि हीच जर त्यांची राजनैतिक समज आहे तर जगभरातून त्यांचा सफाया का झाला ह्याचा उलघडा होतो भांडवलशाही ने साम्यवादाची केली पारध असे शीर्षक देण्यात आले. अवांतर कलाकारांनी जे एन यु मधील आंदोलनाला पाठिंबा दिला ही लोणकढी थाप त्याने राजदीप च्या मुलाखतीत दिली कोणते कलाकार आहेत बर जे एन यु साठी समर्थन देणारे स्वर भास्कर ने सुरवातीला तो तुरुंगात होता तेव्हा कनैह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्यांची वकिली केली मात्र कोर्टाने त्यांच्या वर जे ताशेरे ओढले त्यात त्यानंतर ती सुद्धा गायब झाली आता भांडवलशाही युक्त बॉलीवूड मध्ये रमली आहे किंबहुना राम रतन धन पयो सारख्या शिनेमात जेथे राम त्याची लीला सारखी गाणी व त्याद्वारे हिंदुत्वाचा प्रचार करण्यात तिने अभिनय करून सक्रिय सहभाग घेतला ह्या बद्दल तिचा लाल माकडे निषेधाचा ठराव त्यांचा जे एन यु मध्ये पास करून घेतल्याची फेकिंग न्यूज आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद जर खरेच असे काहि असेल तर मात्र तो जबरा धुर्त पणा मानायला हवा, हि स्ट्रॅटेजि ज्याने ठरवलि असेल त्याला बहुधा ह्याचि आयडीया फिल्म इन्स्टिट्युट मधे जे काहि रंगारंग कार्यक्रम झाले त्यावरुन आलि असणार. उनके हथियार (रंगारंग कार्यक्रम + मिडिया) उनके हि खिलाफ इस्तेमाल किये. रच्याकने एक न्युज बघितलि कोणि प्रशांत किशोर आहे म्हणे जो चिफ स्ट्रेटेजिस्ट होता २०१४ ला बिजेपि चा, नंतर त्याने आपलि सेवा नितिश कुमार आणि आता काँग्रेस ला देतोय. हेच विरोधक तेव्हा मोदिं ना ईव्हेंट मॅनेजर वगैरे म्हणायचे आता ते सुद्धा मोदिं ना फॉलो करतायत त्याचे काय ? ह्यावरुन एक लक्षात येतय कि विरोधकांचे धाबे जबरा दणाणलेयत.

संपादक मंडळ यांस, खालील प्रतिसाद अयोग्य असेल तर काढून टाकावा. ___________________________________________________________________________________

Kanhaiyya's moment of right and freedom to pee in open

Amid a raging row at JNU, it has now emerged that its students’ union president Kanhaiya Kumar, who is facing sedition charge, was fined by the varsity administration last year for allegedly “misbehaving” with a girl student and “threatening” her. The incident had occurred on June 10, 2015, when the girl student asked Kanhaiya, who at the time was not the students’ union president, to not urinate in the open inside the campus. The girl, who now teaches at Delhi University, alleged that Kanhaiya “misbehaved” with her when she objected and also called her a “psychopath” while threatening her with dire consequences. (केजरीवालांनी देखील मोदींना psychopath असे म्हटले होते हे या निमित्ताने आठवले. बाल केजरीवालांनी हा शब्द आधीच वापरला. सिनिअर केजरीवालांनी त्याच्यापासूनच प्रेरणा घेतली असावी.) Following a complaint by her, the JNU administration held a proctorial inquiry that found Kanhaiya guilty. “The university… has found Kanhaiya Kumar guilty of misbehaving with an ex-student (female) and threatening her. This act is serious in nature and unbecoming of a student of JNU and calls for a strict disciplinary action against him (Kanhaiya)… keeping his career prospects in mind, the Vice Chancellor has taken a lenient view in the matter,” said the office order issued on October 16, 2015 by the then Chief Proctor, Krishna Kumar. “Kanhaiya is fined Rs 3,000 and also warned to be careful and not get involved in any such incidents in future. Otherwise, strict disciplinary action will be taken against him,” the order said. While an unsigned order was shared on social media by the girl, who accused Kanhaiya of being a “false revolutionary making claims about upholding the dignity of women”, the university administration confirmed in a statement that the letter was authentic and action was taken against the student leader. “I am dejected and pained to see how my JNU community has ganged up to create false revolutionary. I want to ask, do you really understand the D for Dignity of a female, Mr Kanhaiya? Unzipping your private part in public and urinating on road – are these your revolutionary tools to uphold a female’s dignity? I am shocked to see how a misogynist like Kanhaiya is being hailed as revolutionary,” she said in an open letter that is circulating online. आणि हा ऐआयएसफने केलेला कन्हैय्याचा बचाव - Meanwhile, All India Students Federation (AISF), the outfit to which Kanhaiya belongs, said in a statement “talk about public urination and threatening are being spread to malign Kanhaiya’s image. He had a verbal argument with the girl following which she had registered a complaint. “We do respect the girl’s right to criticise Kanhaiya but we want to reiterate that he has always stood for gender justice. Also, when the incident took place, he was not the president of the students’ union,” it added. http://indianexpress.com/article/india/india-news-india/kanhaiya-was-fi…

In reply to by श्रीगुरुजी

हा अगदी कांगावा झाला... त्या बिचार्‍या कन्हैय्याला गुंतवण्यासाठी काहीही! तो जे काही करतो ते प्रांजळपणे हे लक्षात असुंदेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने फक्त विद्यालयांसाठी स्वच्छतागृहे बांधायच्या योजना केल्या, विश्वविद्यालयांसाठी नाही... मग सांगा खर्‍या दोषी कोण? ;)

In reply to by श्रीगुरुजी

नैसर्गिक वातावरण म्हणजे वास्तविकता आणि तिथे मुक्तपणे नैसर्गिक विधी करणे म्हणजे प्रांजळपणा. आत्ता कुठे मला या धाग्याच्या शीर्षकाचा अर्थ समजायला लागला होता. असं टाचणी लावून फुगा फोडायचं काम नाही सांगून ठेवतो!

In reply to by बोका-ए-आझम

आणि एका विद्यार्थिनि / अध्यापिकेला ला त्रास देणे हि झालि ह्यांचि वास्तविकता वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट! बोका भौ जमला कि जांगडगुत्ता ;)

In reply to by श्रीगुरुजी

चला निधर्मांधांचा आणखी एक मसिहा पडला. असे एकामागोमाग एक मसिहे त्यांना उभे करू देत आणि एकामागोमाग एक असेच उघडे पडूदेत. या निमित्ताने लिबरल लोकांची दातखिळ बसलेली नाहीतर 'त्यावेळी तो विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष नव्हता' वगैरे मल्लीनाथी करायचे प्रयत्न बघून अगदी असुरी आनंद होत आहे. शेवटी डावे लोक जे कोण मसिहे उभे करतील ते त्यांच्यासारखेच असणार--एक नंबरचे ढोंगी आणि good for nothing!!

In reply to by श्रीगुरुजी

यासंबंधी काही चित्रे इथे डकवत आहे. घाबरू नका-- कन्हैय्याच्या मूत्रविसर्जनाची (शब्दप्रयोग श्रेय-- थ्री इडियट्समधला चतुर रामलिंगम) ही चित्रे नाहीयेत. तर लिबरल लोकांची दातखिळ कशामुळे बसली आहे नाहीतर त्यांना उसने अवसान आणून मल्लीनाथी का करायला भाग पडत आहे याविषयीची ही चित्रे आहेत. हो कन्हैय्या म्हणतो ते बरोबर आहे. आम्हाला भारतातच आझादी हवी आहे. पण ती आझादी या असल्या ढोंगी आणि कुठल्याकुठल्या तत्वज्ञानाच्या नावावर देश विकायलाही कमी न करणार्‍या लिबरल लोकांपासून हवी आहे. Pic 1 Pic 2 Pic 3 यातील तिसरे चित्र -- जे.एन.यु च्या लेटरहेडवर पब्लिक रिलेशन्स ऑफिसने म्हटले आहे---"It is to confirm that an office order dated 16 October 2015 was issued by the Chief Proctor Office for a strict discliplinary action against Shri Kanhaiya Kumar and he was fined Rs. 3000". (दिनांक १० मार्च २०१६)

Also, when the incident took place, he was not the president of the students’ union मग ? तो ? सो व्हॉट ?

तरीही विडीओत व्यक्त केलेल्या त्याच्या साम्यवादी विचारांशी मी शेवटपर्यंत सहमत असेन . व्यक्ती चूक करू शकते आणि त्याचे परिणाम तिला भोगावे लागतील . पण विचारांकडे निर्वयैक्तिकपणे पाहिल्यास ते योग्य आहेत आणि ते व्यक्त करणारी व्यक्ती चूक ठरली तरी विचारांचं मूल्य अजिबात कमी होत नाही .

In reply to by विवेक ठाकूर

तरीही विडीओत व्यक्त केलेल्या त्याच्या साम्यवादी विचारांशी मी शेवटपर्यंत सहमत असेन . व्यक्ती चूक करू शकते आणि त्याचे परिणाम तिला भोगावे लागतील . पण विचारांकडे निर्वयैक्तिकपणे पाहिल्यास ते योग्य आहेत आणि ते व्यक्त करणारी व्यक्ती चूक ठरली तरी विचारांचं मूल्य अजिबात कमी होत नाही .
विचार कितीही उदात्त वाटले तरी तसे विचार करणार्‍या व्यक्तीचे आचरण तसे नसेल तर विचार व्यर्थ आहेत. साम्यवादी विचार (म्हणजे संपत्तीचे समान वाटप, जमिनीचे समान वाटप, सर्वांना समान न्याय, जमीनदारीचा नाश इ. इ.) हे कितीही आदर्श वाटत असले तरी अधिकृतरित्या साम्यवादी देशांमध्ये (रशिया, चीन, उत्तर कोरिया, पूर्व युरोपिअन देश इ.) हुकुमशाही, दडपशाही, लाखो विरोधकांना तुरूंगात टाकून, छळ करून, मृत्युदंड देणे, इ. शिवाय दुसरे काहीही नव्हते. त्याचमुळे आज चीन, क्यूबा व उत्तर कोरिया व्यतिरिक्त सर्वत्र साम्यवाद नष्ट झाला. कन्हैय्याच्या मुलाखतीतील विचार कितीही आदर्श वाटले तरी प्रत्यक्षात त्याचे वर्तन पूर्ण वेगळे दिसते. विद्यापीठात भर रस्त्यावर चारचौघात उभे राहून लघवी करणे आणि ते करताना ज्या मुलीने हटकले तिला धमकावून सायकोपाथ म्हणणे, महिषासूरपूजनानिमित्त काढलेल्या पत्रकात दुर्गादेवी बद्दल अत्यंत हीन लेखन केलेल्या पत्रकावर याची सही असणे, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतर दोषी सिद्ध होऊन फासावर गेलेल्या अफझल गुरूच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमावरील बंदीला विरोध करणे, देशद्रोही घोषणा सुरू असताना विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असूनही विरोध न करणे (तो घोषणा देत होता असे पुरावे उपलब्ध आहेत असा पोलिसांचा दावा आहे व न्यायालयाने देखील त्याच्यावरील देशद्रोहाचा आरोप न काढता सशर्त तात्पुरता जामीन दिला आहे) अशा अनेक घटनातून त्याच्या मुलाखतीतील विचारांचा व प्रत्यक्ष आचरणाचा संबंध नसल्याचे दिसत आहे.

In reply to by विवेक ठाकूर

पण विचारांकडे निर्वयैक्तिकपणे पाहिल्यास ते योग्य आहेत आणि ते व्यक्त करणारी व्यक्ती चूक ठरली तरी विचारांचं मूल्य अजिबात कमी होत नाही . अगदि अगदि हे पार जेएनयु पासुन ते ईसिस पर्यंत तंतोतंत लागु पडते.

In reply to by विवेक ठाकूर

म्हणजे थोडक्यात, मोठ्या मोठ्या गोष्टींबद्दल फुकाच्या गप्पा मारा, ते शब्द आचरणात आणले नाही (किंवा आचरण त्या शब्दांच्या अगदी विरुद्ध असले) तरी काहीच हरकत नाही, जै हो !!! =))

जे एन यू मधील इतिहासाचे एक डावे प्राध्यापक रजत दत्ता यांनी मकरंद परांजपे नावाच्या जे एन यू मधील इंग्रजी प्राध्यापकांस खुले पत्र लिहिले त्या पत्रास मकरंद परांजपेंचे उत्तर मोठेच उद्बोधक आणि काही महत्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकणारे आहे. जिज्ञासूंनी आवर्जून वाचावे.

In reply to by माहितगार

दुव्याबद्दल दुवा! :) प्रा. परांजपे यांच्या पत्रातील डो दत्तांना उद्देशून असलेला आणि अगदी शेवटाला असलेला भाग विशेष महत्वाचा आणि व्यापक वाटला म्हणून येथे चिकटवत आहे... ... Isn't a call to reorient our students toward academics therefore necessary to re-intellectualise and safeguard our academic ecosystem?You claim that "this is precisely the advice RSS has been giving in its shakhas all these years." Since I don't attend RSS shakhas I wouldn't know; but perhaps you do, since you speak with such authority about what is said there "all these years." Don't worry: even if you do frequent RSS shakhas, I for one, shall not start treating you as an "untouchable." I believe that talking and listening to all sections of our ideologically and socially diverse country is one of the demands of our times, especially if we wish not to escalate the uncivil strife that engulfs us.Ironically, this morning's papers quote the recently released JNUSU President condemning outright the 9 February 2016 event: now that he has reversed his stand so diametrically and drastically, what will you say of his intentions and integrity?

आता सगळ्यांनी एवढे प्रांजळ पणे त्याच्या विरोधात पुरावे दिले तर वाहत्या ओल्गे मध्ये हात धुऊन घेतो. माझ्या मते कनैह्याच्या त्या ऐतिहासिक भाषणाचा ऐतिहासिक पंचनामा केला आहे .त्यातील आवडलेली आणि विचार करायला लावणारी वाक्य National interest has one definition, whereas Nationalism has many. If you’re not a communist before 30, you don’t have a heart. If you’re still a communist after 30, you don’t have a brain.” Kanhaiya Kumar is 28, so he has a couple of years to make up his mind. मागे मिसळपाव वर बिका ह्यांना विनायक सेन ह्यांचा पुळका आला होता त्यासंबंधी त्यांनी धागा काढला होता. आता कनैह्या च्या पार्श्वभूमीवर जे एन यु आणि माओवादि आणि त्यांचे कारनामे व त्यांचे सहानभूतीदार ह्यांचा पंचनामा सुद्धा वाचनीय आहे. जे एन यु मध्ये सध्या भूपिंदर झुस्त्शी ह्यांच्या नावाचा कनैह्या समर्थक शिमगा घालत आहेत. कारण त्यांनी सत्य नको त्यावेळी भारतीय जनतेच्या समोर आणून कनैह्या चा प्रांजळ खोटारडे पणा उघडकीस आणला. सगळ्यात शेवटी आतापर्यंत अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या निवेदिता मेनन ह्यांचे गांधीच्या देशातील हिंदू समाजाच्या बाबतीत हे ऐतहासिक वक्तव्य कनैह्या ह्यांचा पोष्टर बॉय आहे, म्हणूनच जे एन यु चे प्रकरण गंभीर आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

Hindu Society is the most violent in the world :- निवेदिता मेनन मज्जा आहे बॉ ! लोक नसलेल्या अकलेचे काय तारे तोडतिल सांगता येत नाहि. पण मुळात कम्युनिस्ट कुठल्याच धर्माच्या अस्तित्वाला मानत नाहित, ते धर्म म्हणजे अफु चि गोळि म्हणतात. मग इतका व्देष हिंदुंचाच का ?

In reply to by दुर्गविहारी

हम्म.. सुयश देसाईच्या मुलाखतीतून लोकसत्तेत उतरलेला ९ फेब्रुवारी १०१६ चा आंखोदेखा हाल वस्तुस्थितीच्या अधिक जवळचा असण्याची शक्यता वाटते. दुव्यासाठी आभार.

के. के.( कन्हैया कुमार) ची ए. के.( अरविन्द केजरीवाल ) बनण्याकडे वाटचाल http://maharashtratimes.indiatimes.com/nation/kanhaiya-kumar-slapped-and-abused-in-jnu/articleshow/51346637.cms आणि हे कमी म्हणुन काय हे बघा http://maharashtratimes.indiatimes.com/nation/kanhaiya-kumar-was-fined-by-jnu-for-alleged-misbehaviour-with-girl-student/articleshow/51347628.cms

विवेक ठाकूर, >> पण विचारांकडे निर्वयैक्तिकपणे पाहिल्यास ते योग्य आहेत आणि ते व्यक्त करणारी व्यक्ती चूक ठरली तरी >> विचारांचं मूल्य अजिबात कमी होत नाही . मान्य. पण इथे कन्हैय्याच्या मूल्यांची चर्चा चालली नसून त्याच्या मूल्याची (=किंमतीची) चाललीये. त्याची काय किंमत आहे ते सगळ्यांना माहितीये. रच्याकने : आसारामबापूंवर तर आरोपही सिद्ध झाले नाहीयेत. मग वरील तर्काच्या आधारे त्यांचं प्रवचन शाळेतून शिकवायला काय हरकत आहे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तरीही जिथे जिथे त्याची चूक आहे तिथे मी चूक आहे असंच म्हटलंय. या उप्पर अंतीमात जरी तो दोषी ठरला तरी त्याचे साम्यवादी विचार मला कायम समर्थनीय आहेत. उदाहरणार्थ : तो म्हणतो, सीमेवरच्या जवानाची शहादत, शेतकर्‍याची आत्महत्त्या आणि विद्यार्थ्याचा मृत्यू एकाच व्यवस्थेच्या दोषाचा परिणाम आहे त्यामुळे त्यांच्यात भेदभाव करणं अयोग्य आहे. कुणी नीट विचार करु शकेल तर कळेल की जवानाचा मृत्यू हा युद्धात उतरलेल्या दोन्ही राष्ट्रांच्या अमानवी दृष्टीकोनातून झालायं. शेतकर्‍याची आत्महत्या जलसंधारणात झालेल्या अफाट भ्रष्टाचाराचा परिणाम आहे आणि विद्यार्थी त्याच्या दृष्टीनं, देशात जगण्याची सर्व आशा संपल्यामुळे गेलायं. शिवाय तो म्हणतो की हे सर्व विचार पटायला सार्वत्रिक एकमताची गरज नाही. तस्मात, त्या विचारांचा एक राजकीय पक्ष होण्याची गरज नाही. ज्यांना ते विचार पटतील त्यांची एक मिनिमम युनिटी झाली आणि त्यांनी त्या दिशेनं काम सुरु केलं की किमान त्या क्षेत्रात बदल घडायला सुरुवात होईल. मला वाटतं हे देशात बदल घडवून आणण्याची वैयक्तिक जवाबदारी घेण्याचं सर्वात योग्य असं पहिलं पाऊल आहे. तो प्रांजळ आहे हे मत मी त्याच्या तीन वेगवेगळ्या पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखती बघून ठरवलं होतं. त्याच्या व्यक्तिमत्त्वात दुभंग आहे किंवा कसं ते भविष्यकाळ ठरवेल पण त्याच्या साम्यवादी विचारांनाच बाद ठरवणं म्हणजे समतेप्रती आपली वैयक्तिक जवाबदारी डावलणं आहे.

In reply to by विवेक ठाकूर

सीमेवरच्या जवानाची शहादत = शेतकर्‍याची आत्महत्त्या ! शेतकर्‍याची आत्महत्त्या = सीमेवरच्या जवानाची शहादत ! विवेकजी आपण अर्थशास्त्रामधील साम्यवादाबद्दल गप्पा करताय ना ? आग्रह नाही पण खुपणार नसेल तर खेळतं भांडवल या चर्चेत सहभागी होऊन शेतकर्‍यांच्या खेळते भांडवल विषयक समस्यांवर तुमचा काय अभ्यास आहे तो मांडून दाखवाल का ?

In reply to by विवेक ठाकूर

एक साम्यवादी माणूस चक्क शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतोय हे ऐकून मौज वाटली. त्याच तागडीत सैनिकांना तोलतो हे पाहून तर अजून वाटली. हा माणूस अस्सल कम्युनिस्ट नाहीच. शेतकऱ्यांना कम्युनिस्ट प्रतिगामी समजतात, कारण तो संपत्तीचा, म्हणजे शेतमालाचा साठा करतो. त्यांच्या दृष्टीने कामगार हाच खरा proletariat कारण त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नसतं. त्याचे श्रम हेच त्याचं भांडवल. सैनिकांविषयी कम्युनिस्टांचे असेच विचार आहेत. एकतर त्यांना देश आणि राष्ट्रवाद या संकल्पनाच मान्य नाहीत. त्यामुळे देशाच्या सीमांचं रक्षण करणारे सैनिक हे त्यांच्या दृष्टीने प्रतिगामी आणि दमनकारी आहेत. शिवाय भारतीय सैन्य हे राजकीय दृष्ट्या पूर्णपणे तटस्थ आहे, हे कम्युनिस्ट तत्वज्ञानाच्या विरोधात आहे. त्यानुसार सैन्याचा उपयोग हा राजकीय तत्वज्ञानाचं extension असा होतो. मार्क्स स्वतः, लेनिन आणि ट्राॅट्स्की यांनी मांडलेले हे विचार आहेत. त्यांच्या वाङ्मयात या विचारांचे अनेक संदर्भ आहेत. कन्हैया हा कम्युनिस्टांच्या दृष्टीने revisionist आहे, जो इस्लामींसाठी ' काफिर ' हा शब्द जसा आहे तसाच कम्युनिस्टांसाठी आहे - एक शिवी. तुम्हाला कन्हैया मांडतोय ते तत्वज्ञान साम्यवादी वाटतंय कारण तो CPI च्या विद्यार्थी संघटनेचा सदस्य आहे. बाकी त्याच्या या थ्वज्ञानाशी साम्यवादाचा संबंध नाही.

In reply to by बोका-ए-आझम

* नैसर्गीक संकटात शेतकर्‍यांना -किंवा संकटात सापडलेल्या इतर नागरीकांना- मदत करण्याचा साम्यवादी देशांचा काय इतिहास आहे ? साम्यवादी देश नैसर्गीक संकटे का लपवून ठेवत असत याचे कारणच अगम्य असते. * हे चीन मधल्या शेतकर्‍यांच्या सध्याच्या आत्महत्यांचे आकडे आहेत. * माओच्या काळातील खोटा दुष्काळ आणि साम्यवादी कव्हरअप

In reply to by विवेक ठाकूर

तो प्रांजळ आहे हे मत मी त्याच्या तीन वेगवेगळ्या पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखती बघून ठरवलं होतं.
चला हा धागा गुंडाळा. साम्यवाद वि. भांडवलशाही म्हणून नवीन धागा काढा.

In reply to by विवेक ठाकूर

तो प्रांजळ आहे हे मत मी त्याच्या तीन वेगवेगळ्या पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखती बघून ठरवलं होतं.
जर राहुल गांधींची मुलाखत कुमार केतकर, निखिल वागळे आणि प्रसन्न जोशी या ३ वेगवेगळ्या पत्रकारांनी घेतली तर राहुलबद्दल तुमचे काय मत असेल?

आसारामबापूंवर तर आरोपही सिद्ध झाले नाहीयेत. मग वरील तर्काच्या आधारे त्यांचं प्रवचन शाळेतून शिकवायला काय हरकत आहे? आणि पण विचारांकडे निर्वयैक्तिकपणे पाहिल्यास ते योग्य आहेत आणि ते व्यक्त करणारी व्यक्ती चूक ठरली तरी विचारांचं मूल्य अजिबात कमी होत नाही . अहा हा पैलवान समिकरण जुळतय कि राव ! ह्यालाच वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट अस म्ह्न्त्यात.

जवानांकडून होणार्‍या बलात्कारांबद्दल कन्हयाने काय बोलले असते तर नक्की योग्य असते? जवानांकडुंन तुरळक होणार्या बलात्कारांबद्दल कन्हैय्या ने का बोलायला पाहीजे ? त्याचा काय संबंध ? तो नाही सैन्यात ना त्याच्याकडे दोषी सैनिकांना शिक्षा देण्याचे वा अश्या केसेस मध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार आहेत !

In reply to by डँबिस००७

मग तो जर इतका बिनमहत्त्वाचा आहे तर मग त्याच्या वक्तव्याने इतके दुखी का व्हायला हवे? असे माथेफिरू भारतात खूप आहेत. प्रत्येकाला महत्त्व देऊन त्याने काय शी-शू केली हे बघत बसले तर झालेच मग. आता मोदींनी व्यापारी हे जवानांपेक्षा जास्त धोका पत्करणारे आहेत हे वक्तव्य केलंय. तुमच्या लॉजिकनुसार त्यांच्या पदानुसार ह्याला जास्त महत्त्व आहे. पण ह्यावर मोदीसमर्थक मूग गिळून बसलेत. तिकडे श्रीश्री लष्कराला घरगडी असल्यासारखे वागवत आहेत. सरकारी आस्थापनाविरुद्ध म्हणजे खुद्द देशाविरूद्ध दंड न भरणार नाही भले तुरुंगात पाठवा अशी चोर तो चोर वरुन शिर्जोर अशी वक्तव्ये करतायत. आता हे सगळं महत्त्वाचं सोडून कन्हयाने कुठे सू केली आणि काय वैगरे चर्चा करत बसणे म्हणजे...

In reply to by तर्राट जोकर

धागा कन्हैया च्या प्रांजळ वक्तव्यांबाबत असेल तर त्याबद्दलच चर्चा होणार ना! आता मोदींच्या चुका सांगायला वेगळा धागा आहे तर त्या विषयी तीथेच बोललेलं बर नाही का?

In reply to by तर्राट जोकर

कन्हैयाने लघुशंका कुठे केली यावर चर्चा नाहीच आहे. त्याने ती एका स्त्रीसमोर निर्लज्जपणे केली अाणि तिने तक्रार केल्यावर त्याने तिला उद्देशून psychopath वगैरे शब्द वापरले, जे अपमानकारक आहेत पण ते मोदींबद्दल केजरीवालांनी पण वापरल्यामुळे तुम्हाला फरक पडत नसेल हे समजू शकतो. असो. तर त्याबद्दल त्याला ३००० रूपयांचा दंड झाला. आता एका स्त्रीचा अपमान तुम्हाला मोदींच्या चुका दाखवण्यापुढे महत्वाचा वाटत नसेल. घटनेने तुम्हाला तसं वाटण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. बरं, श्री श्रींनी एकरकमी पाच कोटी रूपये दंड भरायला असमर्थता व्यक्त केल्यावर कोर्टाने त्यांना २५ लाख ताबडतोब आणि उरलेले ४.७५ कोटी पुढच्या चार आठवड्यांच्या आत भरायला सांगितले आहेत हे सोयीस्करपणे न लिहिणंही समजू शकतो. घटनेने ते न लिहिण्याचंही स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहेच.

In reply to by बोका-ए-आझम

psychopath ह्या शब्दाचं केजरीवालचे पेटंट आहे काय? ते कन्हयाने वापरले म्हणून केजरीवाल हा कन्हयाचा उत्तराधिकारी आहे हे सिद्ध करायचे आहे काय? किती ते पोकळ युक्तिवाद? काही तरी भरीव आणा राव. दिवसभर 'हाच शब्द केजरीने वापरला तोच कन्हयाने वापरला, बघा बघा कसं आहे' हेच सुरु आहे सगळीकडे. कुच्छ अलग सोचो. आता तुम्हीच ठरवा. एका कथित कॅम्पसफाईटमधे दोन व्यक्तिंदरम्यान झालेल्या बाचाबाचीला महत्त्व द्यायचे की तिकडे देशाच्या इमेज ह्या गोंडस नावाखाली लष्कराला घरगड्यासारखं वागवण्याला महत्त्व द्यायचं. लिस्ट युवर प्रायोरिटीज बाकी दंड भरण्याची समर्थतता असेल तर आणि सत्ताधारी सोबत असतील तर आपण कोणतेही कायदे बिनदिक्कत मोडू शकतो ह्याचा नविन धडा मिळाला. पुर्वीच्या सरकारात दंड भरत नव्हते, इथे दंड भरून करतायत हाच काय तो फरक. घटनेनेच तसे करायचे स्वातंत्र्य दिले आहे. आपण काय बोलणार? रच्याकने, उद्या मी खुदानाखास्ता फेमस झालो तर लहानपणी पटरीवर ***ला जात होता हा माणूस, आम्हाला काय शानपण शिकवतो अशीही टिका होईल की काय याची चिंता पडलीये मला.

In reply to by बोका-ए-आझम

फोटोशॉप करणारी बेस्ट टीम भाजपकडे आहे ना, म्हणून थांबलंय.

BJP Photoshop Politics .. Must Watch and Share..

Posted by Achhe Din Memes on Wednesday, March 9, 2016

In reply to by तर्राट जोकर

नेहमीप्रमाणे मुद्दा तुमच्या लक्षात नाही आला...असो ..आयडी चे नाव सार्थ करताय कन्हया (वयाच्या 28 साव्या वर्षी) कुठे **ला आणि कोणा समोर **ला हा मुद्दा नाही. त्याला त्या मुलीने जाब विचारल्यावर तो कसा रिऍक्ट झाला ह्याला आहे. म्हणे सिस्टिम बदलायचीय अजून भरपूर लिवायच होत पन लिवायचा कंटाळा.