पैजारबुवा, नीमोतै आणि सध्या अद्रुश्य झालेले/ल्या दमामि येऊन षटकार ठोकून जायच्या आधी दोन रन काढून ठेवते. प्रेरणा द्यायचा कंटाळा आला आहे.
घेतो खीर ओरपून
ही किमया गोडाची
बेल्ट जरा सैलावून
चिंता करतो घेराची
पुरीआड दडती भजी
भय घालती केलरी
डोळे वटारता बायको
देऊ मोत्यांच्या सरी
येता ताटात पुलाव
शोधू काजूचे काप
कसा टाकू शिल्लक
नको माथी पाप
डायट मारती माथी
इथे सारेच पापड*
जो मारतो मिटक्या
त्याला म्हणती खादाड
कशी सरता सरेना
शाक दाट वाटान्याची
गच्च भरल्या पोटाला
ओढ भारी मठ्ठ्याची
*पापड : बारीक या अर्थाने.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5111
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
च्यामारी सोताच सोताचे विडंबन
मस्त!
मस्त!
अर्ररर्ररर !!
दहशत तुमची अजून काय!
In reply to अर्ररर्ररर !! by नीलमोहर
याला
In reply to दहशत तुमची अजून काय! by रातराणी
=))
In reply to याला by नाखु
सहमत
In reply to अर्ररर्ररर !! by नीलमोहर
अर्र, काय हे!
यात एक मोठी चूक झाली आहे. शाक
छानेहो.
खाउ पोट फुगेपर्यंत नाही
च्या मायला लयच भारी
कविता आवडली.वाटाण्याच्या
छे......