Skip to main content

(शाक दाट वाटान्याची)

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 10/03/2016 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
पैजारबुवा, नीमोतै आणि सध्या अद्रुश्य झालेले/ल्या दमामि येऊन षटकार ठोकून जायच्या आधी दोन रन काढून ठेवते. प्रेरणा द्यायचा कंटाळा आला आहे. घेतो खीर ओरपून ही किमया गोडाची बेल्ट जरा सैलावून चिंता करतो घेराची पुरीआड दडती भजी भय घालती केलरी डोळे वटारता बायको देऊ मोत्यांच्या सरी येता ताटात पुलाव शोधू काजूचे काप कसा टाकू शिल्लक नको माथी पाप डायट मारती माथी इथे सारेच पापड* जो मारतो मिटक्या त्याला म्हणती खादाड कशी सरता सरेना शाक दाट वाटान्याची गच्च भरल्या पोटाला ओढ भारी मठ्ठ्याची *पापड : बारीक या अर्थाने.
लेखनविषय:

वाचने 5111
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मस्त! रच्याकने म्हाळाची आठवण झाली.:)

मस्त! रच्याकने म्हाळाची आठवण झाली.:)

आधी एवढं सुरेख काव्य लिहायचं आणि वर स्वतःच त्याचं असं भजं करायचं :p

In reply to by रातराणी

म्हंतेत आपलाच पतंग आपणच काटणे. (दुसर्याला काटण्याचं सुखंही मिळू द्यायच नाही) या असहिष्णुतेबद्दल कुणीच* पुरस्कार का वापस देईना ते !!! कुणीच* मध्ये आद्य विडंबनकार अपेक्षीत आहेत.

In reply to by नाखु

=))

यात एक मोठी चूक झाली आहे. शाक शक्यतो पातळ कटाच्या आमटीला म्हणतात. इथे वाटान्याच्या दाट्सर रस्स्याला शाक असं म्हणणं बरोबर नाही. भाजी म्हणाव तर जरा मिळमिलीत वाटतं. हम्म. ही चूक पोटात घ्या मंडळी.

अरे हे काही बरोबर नाही. मी किती उत्साहाने बाह्या सरसावल्या होत्या. एकाही बॉल न खेळता रन आउट झाल्यासारखे वाटले. हे म्हणजे अमिताभ बच्चन सारखे झाले सिनेमाचा हिरो पण तोच आणि कॉमेडियन पण तोच. हा काव्यिकदहशतवाद आहे. पैजारबुवा,