यशदा
============================
.
.
ती म्हणाली..
मी समर्पित आहे..
माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांसकट.
इतकी की आता माझी मला ही मी सापडत नाही.
.
ती म्हणाली..
मी सुखात आहे..
माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांशिवाय.
इतकी की आता दुःख माझ्या आसपास फिरकत नाही.
.
ती म्हणाली..
मी यशदा आहे..
माझ्या इच्छा.. माझे विचार.. आणि माझ्या स्वप्नांची.
इतकी की आता अपयश माझ्या नजरेस पडतच नाही.
.
.
============================
स्वाती फडणीस ............................ १०-०१-२००९
वाचने
2674
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त..
धन्यवाद
वा
मनापासून आभर..
In reply to वा by श्रावण मोडक
अच्छा...
In reply to मनापासून आभर.. by स्वाती फडणीस
हो..
In reply to अच्छा... by श्रावण मोडक
वेगळेपण
दुय्यमतेच
In reply to वेगळेपण by स्वाती फडणीस