Skip to main content

मार्गसूची

लेखक मधुरा देशपांडे यांनी शुक्रवार, 19/02/2016 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
MargSuchi नमस्कार, "काय आपल्याला एका मोठ्या सुट्टीची गरज आहे?" दूरवर कुठेतरी फिरायला जायचंय पण बॉस सुट्टी देत नाहीये, कामाचा रगाडा संपत नाहीये, पैसे आणि सुट्टीचा मेळ बसत नाहीये. हा कंटाळा घालवायचा उपाय हवा आहे पण तोही घरबसल्या. मग आम्ही आहोत ना. 'अनाहिता ट्रॅव्हल कंपनी' तर्फे आयोजित ही खास सहल अर्थात 'अनाहिता भटकंती विशेषांक'! घर, ऑफिस, ट्रेन, बस, रिक्षा कुठेही बसून कधीही एका लिंकवर क्लिक करा आणि वाचा 'अनाहिता भटकंती विशेषांक'! देश-विदेशातील अनेक प्रेक्षणीय स्थळं एका क्लिकवर फिरण्यासाठी उपलब्ध. तेही अगदी मोफत. अधिक माहितीसाठी वाचा ही मार्गसूची - सहल संपली सुद्धा? की मनाने अजून फिरत आहात सगळीकडे? मग या सहलीबद्दल तुम्हाला काय वाटले ते प्रतिक्रियांमधून आम्हाला अवश्य सांगा आणि पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागा. पुन्हा भेटूयात... मिसळपावचे सदस्य नसलेल्यांसाठी आमचे फेसबुक पेज - अनाहिता भटकंती विशेषांक
© या अंकातील लेखांचे सर्व हक्क संबंधित लेखिकांच्या स्वाधीन. या अंकातील कुठलाही भाग/चित्रे, कुठल्याही स्वरुपात पूर्वपरवानगीशिवाय वापरता येणार नाही.
(चित्र- किलमाऊस्की)
विशेष

वाचने 51630
प्रतिक्रिया 66

प्रतिक्रिया

In reply to by गवि

दोन लेख वाचले, आवडले. उरलेले देखील वाचणारच. छान उपक्रम, पण वाचनखुणा का साठवता येत नाहीयेत? कॅलेंडर आवडलं.

In reply to by गवि

जबरदस्त झालाय भटकंती विशेषांक !! आता निवांत वाचत प्रतिसाद देणार. अंकासाठी कष्ट घेणार्‍या सर्व अनाहितांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद __/\__

हेमांगी मधुरा स्वातीताई स्टॅंडिंग ओवेशन दिल्या गेले आहे.

अतिशय सुंदर झालाय अंक !!! वेल डन ! अंकासाठी कष्ट घेणार्या सर्व अनाहितांचे मन:पूर्वक अभिनंदन :)

sm

खजिना, खजिना, खजिना ! (युरेका, युरेका, युरेका च्या धर्तीवर वाचावे) अधिक प्रतिसाद सर्व लेख वाचून देण्यात येतीलच.

ये लोगां अंदरही अंदर क्या पकाया रे! एकदम ह्यदराबादी दम बिर्याणीमाफिक. थोडाबी भनक नही लगने दिया और प्लेटमें आया तो दिल खुश!!!

नोकरी घालवणार का आमची? हे असल काही आठवडयाच्या मध्ये टाकत जाऊ नका ओ. हापिसात हे लेख वाचत बसलो तर कामाचा बट्ट्याबोळ होईल. सध्या वाखू साठवत आहे. एक दिवस सिक लिव्ह घेऊन सगळे लेख वाचुन काढेन.

जबरदस्त! एअर मेलच्या पॅटर्नच्या कडा ब्राऊझरला लावणं ही कल्पकताही खूप आवडली!

अतिभन्नाट अंक!!! या अंकासाठी काहीच हातभार लावु शकले नसल्याचं दु:ख होतय पण त्यासोबतच असा दर्जेदार अंक घडवण्यासाठी मेहनत घेणार्या तुम्हा प्रत्येकीचं प्रचंड कौतुक आणि अभिमान वाटतोय. रचना,मांडणी, लेखन सर्वकाही अतिशय सुंदर झालेले आहे. हेमांगी, आणि मधुरा चे विषेश कौतुक! वेल ड्न अनाहिता!

अतिशय सुरेख हालाय अंक अभिनंदन मधुरा तै आणि टीम

उत्तम उत्तम उत्तम ..... यात भाग घेतलेल्या अनाहितानचे मनःपूर्वक अभिनंदन . आता सवडीने सर्व अंक वाचेनच.

उत्तम उत्तम उत्तम ..... यात भाग घेतलेल्या अनाहितानचे मनःपूर्वक अभिनंदन . आता सवडीने सर्व अंक वाचेनच.

व्वाह..सुंदर अंक!!! मार्गसूची अगदी छान.... आता एकेक लेख वाचायला घेते.

छानच दीसतय सगळं.. सवडीने वाचून बघतो आता.

मार्गसूची आवडली. अनुक्रमणिकेचे एकेक ओळीत वर्णन मस्त केलय. लेख वाचून प्रतिसाद देईनच.

सुरेख सजावटीचा बहारदार अंक ! बघूनच मन प्रसन्न ! सवडीने वाचते आहे. मधुर, स्वाती आणि किलमाऊस्की तिघींना काँप्लिमेंट्स !

सुंदर! मस्त! झकास! अप्रतिम! भन्नाट! मार्गसुची आणि मांडणी उत्तम. कॅलेंडर आवडलं. खजिनाच आहे. पण लेख निवांत वाचून प्रतिसाद देइन. अंकासाठी कष्ट घेणार्‍या सर्व अनाहितांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. आणि अशा अंकाचा मी एक छोटासा भाग असण हि माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.

मस्त मस्त मस्त.... अप्रतिम झालाय अंक... अंकासाठी मेहेनत घेतलेल्या सगळ्या अनाहितांचे मनापासुन अभिनन्दन..

झकासच झालाय अंक...पहिल्या पानापासुन सगळंच वैशिश्ट्यपूर्ण.. आभिनंदन आणि धन्यवाद इतकी मेहनत घेउन असा वाचनीय अंक दिल्याबद्दल....__/\__

अनुक्रमणिकेऐवजी मार्गसूची! भन्नाट कल्पना!

आता ह्या मार्गावरून रमतगमत फिरायला जाता येईल. थँक्यु अनाहिता :)

अतिशय भारी अंक झालाय! कौतुक करावं तितकं कमी. मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत सगळं एक नंबर !

अंक एकदम देखणा झालाय. मधुरा, स्वाती अभिनंदर!

ठराविक साच्यातल्या अनुक्रमणिकेऐवजी विषयानुरुप मार्गसुचीचा पर्याय वापरण्याच्या कल्पकतेला सलाम.

सुंदर अंक आहे. मला चित्रे खूप आवडली. खास करुन background image ! आता एक एक ले़ख वाचते.

काय भारी आहे. मार्गसूचीचे स्टार्टरच एवढे भारीये की पुर्ण जेवण किती छान असेल. पुरवून खाणार. हे तहान लाडू भुक लाडू.जियो रे.....लौ यु

नेहमीच्या साचेबद्ध आणि काहीश्या रटाळ अनुक्रमाणिकेपेक्षा खूपच वेगळी आणि कल्पक. एखादी गोष्टच वाचल्यासारख वाटतंय. संपादक मंडळ तुमच्या कल्पकतेला सलाम.

छान दिसतोय अंक. आत्ता एकेक लेख वाचेन. Animated Thanks

जवळपास सगळ्याच लेखांच्या खाली (चित्र- किलमाऊस्की) असं लिहीलयं . कोणते चित्र? ते खालचे का? आणि त्याचा अर्थ काय आहे? कि लेखातले सगळेच फोटो त्यांनी टिपले आहेत? मला सुरुवातीला तर असेच वाटले!

In reply to by जव्हेरगंज

प्रत्येक लेखातले 'फोटो' त्या त्या लेखिकांचे आहेत. बाकी अंकातली सर्व 'चित्र' माझी आहेत. प्रत्येक लेखात नाव असण्याचं कारण लेखातली हेडर, फुटरची चित्र आहेत ती माझी आहेत.

In reply to by किलमाऊस्की

ओह! असे आहे तर ते! तरीही गैरसमज होण्यास वाव आहे हे नमूद करू इच्छितो!

In reply to by जव्हेरगंज

माझ्या मते लेखांमध्ये जोडलेले चित्र (पेंटिंग) किलमाऊस्की यांनी केले आहे. चित्र या शब्दाचा अर्थ छायाचित्र म्हणून घेतला जाऊ नये असे मला वाटते.

खूपच छान! आतापर्यंत वाचलेले: साप गावाविषयी (माझ्या मामाचे ऐतिहासिक गाव), स्पेनमधला पासपोर्ट हरवल्यानंतरचा थरारक अनुभव (स्पेन - परतीचा प्रवास), एका आजी-आजोबांच्या घरी जाऊन राहण्याचा अनुभव (खेड्यामधले घर कौलारू), विम्बल्डनची सफर (भटकंती लंडनची)...हे सगळे लेख अप्रतिम! हळूहळू वाचतोय. फोटो एकदम मस्त!! मला खरं म्हणजे हा विशेषांक वाचन-मेजवानी वाटतोय. चव घेत वाचणार. :-) अनाहिता, अभिनंदन!

मार्गसुचीची कल्पना आवडली. खासच. ०दिलीप बिरुटे

चांगले लेख आणि उत्तम सादरीकरण याचा सुंदर मिलाफ म्हणजे अनाहिताचा भटकंती अंक. आजवर मिपावर कधीही न दिसलेल्या अनेक नवनविन कल्पना या अंकातून मिपाकरांच्या समोर सादर करणार्‍या अनाहिता आणि विशेषकरुन सर्व लेखिका - इडलीडोसा, ईशा१२३, गिरकी, Mrunalini, पलाश, पिलियन रायडर, प्रश्नलंका, प्रीतमोहर, पूर्वाविवेक, पद्मावति, रेवती, सानिकास्वप्निल, सुरन्गी, अजया, पैसा, किलमाऊस्की, मधुरा देशपांडे, स्वाती दिनेश यांना

कडक सॅल्यूट!

Salute

मार्गसुची ची कल्पना आणि मांडणी खूप आवडली, अंक वरवर चाळला होता, उत्कृष्ट झालाय, तुमची मेहनत दिसतेय. आज वाचते अंक :)