~*~*~*~ साप ~*~*~*~

नाव आडनाव's picture
नाव आडनाव in काथ्याकूट
6 Mar 2016 - 9:38 am
गाभा: 

मित्रांनो,
मी ज्या सोसायटीत राहतो तिथली एक समस्या आहे. त्यावर काही उपाय माहित असतील तर सुचवा.

तर समस्या अशी आहे की आमच्या सोसायटीत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात / ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साप दिसायला लागले. लोक घाबरले कारण लहान मुलं खेळत असतात. साप लहान मुलांना चावण्याची भिती होती. मी कमिटीत असल्यामुळे मी या समस्येवर उपाय शोधायला पाहिजे असं कार्यकर्त्यांचं मत होतं. एका जणाने सांगितलं की उपाय नाही पण रिपेलंट म्हणून कंपाउंड भिंतीच्या बाजूला थायमेट टाकून बघा. तसं केल्यानंतर साप गेले - म्हणजे नंतर दिसले नाहीत. पण "कावळा बसायला आणि फांदी तुटायला" असा उपाय झाला काय ही एक शंका आहे. जर पुढच्या वर्षी परत साप आले तर? तयारी असावी म्हणून हा धागा काढत आहे. येऊंद्या उपाय .....

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Mar 2016 - 9:41 am | प्रचेतस

ज्याक डनियल्सला तुमच्या सोसायटीत राहायला बोलवा.

तर्राट जोकर's picture

6 Mar 2016 - 10:17 am | तर्राट जोकर

तुम्ही रंगवली नाय राव कथा. ती बाई, तीचे तुम्हाला साप का कुच करो म्हणणे, इत्यादी. जरा डीट्टेल टाका. खफवर टाकला होता तसा.

नाव आडनाव's picture

6 Mar 2016 - 11:42 am | नाव आडनाव

:)

सोसायटीत सापांची चर्चा सुरू होऊन दोन-तीन दिवस झाले होते. एक दिवस हापिसातून घरी येतांना एक लै लै मोठ्या साहेबांच्या आईंनी (ललमोसाआ) मला थांबवलं. त्यांचं आणि माझं संभाषण -

ललमोसाआ - "बहुत साप हो गये है. प्रसांतभैया कुछ करो".
मी - (एकतर मी भैया नाही. मराठी माणूस आहे. आणि साप काय मी पाळून सोसायटीत सोडतो काय. कुछ करो म्हणजे?) आंटी बाजूवाले प्लॉट का काम चालू है. वो लोग खुदाई करते है तो अपने सोसायटीमे साप आते है.
ललमोसाआ - बेटा (लक्षात घ्या - आधी भैया होतो) प्लॉट के मालिक को जाके कह दो बना ले अपना बिल्डिंग जल्दी से.
मी - (बाजूचा प्लॉट ३/४ एकरचा आहे. किंमत कमीत कमी ४०-५० करोड असणार. माझ्यासारख्या दळभद्री माणसाने प्लॉट मालकाला असे सल्ले दिले तर तो नक्की मला घडी करून परत पाठवणार). आंटी ऐसा नही कर सकते. साप वो प्लॉटसे निकलके कंपाऊंड वॉल मे कुछ बिल है, उन बिलोमे छिप जाते है.
ललमोसाआ - साप बिलोंसे ऐसेही बाहर नही निकलते. उसके लिए बीन बजानी पडती है.
मी - (मी माझी अ‍ॅक्टिव्हा घेऊन गारूडी शोधत फिरतोय असं इमॅजिन केलं. आणि एखादा गारूडी नाही मिळाला / तो यायला तयार नसला तर मीच त्याची पुंगी दीड दोन तासाच्या भाड्याने आणून कंपाऊंड वॉलच्या बाजूला बिळं शोधून वाजवत बसलोय असं इमॅजिन केलं) :)

सापांना काही उपाय नसतो हे माहित होतं. माझ्या गावाकडे साप दिसला तर लोक तो घरापासून लांब असला तर / घरा जवळ असेल आणि निघून जात असेल तर काहीच करत नाहीत. घरात घुसला तर मारावा लागतो. त्यात सप्टेंबर / ऑक्टोबर हा सापांचा मेटिंग पिरिएड असल्यामुळे पण ते बिळांतून बाहेर आले अशी एक शक्यता होती. पण लोकांना काय सांगणार. कोणीही भेटलं की तोच विषय असायचा. पार वैताग आणला होता पब्लिकने. इमेल मधे तोच विषय. मी कायप्पा वर नाही, पण कायप्पा वर पण तेच. शेवटी एकाने सांगितलं की रिपेलंट म्हणून थायमेट टाकून बघू. तसं केलं आणि नंतर सापाने काही दर्शन दिले नाही. सुटलो एकदाचा :)

उगा काहितरीच's picture

6 Mar 2016 - 12:02 pm | उगा काहितरीच

:-D लोल.
एक उपाय: (खरे खोटे देव जाणे) तुळशीचे रोपं लावा सगळीकडे . तुळशीच्या झाडामुळे साप येत नाही असे म्हणतात . जसे बाड, मेहंदीचे कुंपण करतात तसे कुंपण करावे लागेल मात्र . (फायदा झाला तर ठीक नाहीतर फुकट अॉक्सिजन तरी मिळेल)

तर्राट जोकर's picture

10 Mar 2016 - 6:43 pm | तर्राट जोकर

हांगाशी =)) हे धाग्यात अ‍ॅडवून घ्या.

मुंगुस पाळा.दुहेरी फायदा होईल.
१) सापांपासुन सुटका..
२) मुंगुसाचे तोंड सकाळी पाहणे लाभदायक असते, असे समजतात,त्यासाठी शुल्क आकारा,मुंगसाच्या खाण्यापिण्याचा खर्च निघेल.

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 12:30 pm | प्रसाद गोडबोले

मुंगुस ??

त्या पेक्षा बेयर ग्रिल ला पाळा . तो कच्चे खातो साप ! =))

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 12:33 pm | प्रसाद गोडबोले

b

बाळ सप्रे's picture

11 Mar 2016 - 12:34 pm | बाळ सप्रे

मग मुंगूस काय तंदूरी साप खातं ??
:-)

आजकाल संस्थळांना डुआयडींनी जसे छळलेय तसे तुमच्या सोसायटीला सापांनी छळलेय असे दिसते. एक काम करा, 'ही आमची श्रीदेवी, हिच्यावर आमचा भारी जीव!' असे कॅप्शन असलेली 'नगीना', 'निगाहें' इ. चित्रपटातली पोष्टरे तुमच्या सोसायटीच्या कंपाउंड वॉलच्या बाहेरून चिकटवा. सगळे सर्पपुरूष तिथे डुलत बसतील आणि सगळ्या सर्पिणबाया त्यांच्या नावाने धूसफूस करतील. तुमची सोसायटी मोकळी!

अन्नू's picture

6 Mar 2016 - 12:38 pm | अन्नू

मल्लीकाला विसरलात का? ;)

आम्हांला रीना रॉय नाहीतर श्रीदेवी आठवतात हो. कोण ही मल्लिका?

अन्नू's picture

6 Mar 2016 - 1:16 pm | अन्नू

कोण ही मल्लिका?.>>>
तुंम्ही जलेबीबाईला ओळखत नाही? ;)
jalebi bai

छे! ही होय! ओंगळवाणी दिसलीये त्यात.

जव्हेरगंज's picture

6 Mar 2016 - 12:39 pm | जव्हेरगंज

हे एकदभ सुसाट !!

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Mar 2016 - 1:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड लावा "सापांना सोसायटी मध्ये येण्यास सक्त मनाई आहे. बेकायदेशीर घुसखोरी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल."

तरी देखील साप आले तर सुशिक्षीत सापांना नोटीसा बजावा व अशिक्षीत सापां करता एका प्रौढ शिक्षण वर्ग सुरु करा.

सापांची नसबंदी करुन घ्या त्यामुळे सापांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल व भविष्यातला त्रास कमी होण्यास मदत होईल.

सापांच्या बिळात ए.सी, आणि झी च्या कनेक्क्ष्न सकट टीव्ही बसवुन द्या म्हणजे सर्पिणी बाहेर पडायच्या कमी होतील. सापांसाठि एखादा स्मोकिंग झोन तयार करुन द्या म्हणजे ते इकडे तिकडे फिरत बसणार नाहीत.

सोसायटी मध्ये एक तक्षकयाग करुन घ्या. व त्याला सर्व सापांना बोलवा.

साप दिसला कि त्याच्या मागे "सापड्या सापड्या" असे चिडवत फिरा. म्हणजे ते चिडुन येईनासे होतील. नाग असेल तर काय चिडवायचे ते तुम्ही ठरवा.

नाग पंचमिला सर्पिणिंसाठि हळदी कुंकु व सापांसाठि कोकटेल पार्टीचे आयोजन करा.

सापांच्या मुलांना जे एन यु मध्ये दाखला मिळवुन द्या.

पैजारबुवा,

पैजारमाउली काहीतरी 'शेष' ठेवा इतरांसाठी. ;)
.
लास्टचा नागकिडस साठी जेएनयु म्हणजे जेनुइन नाग युनिवर्सिटी का? चांगलेय चांगलेय.

सुबोध खरे's picture

6 Mar 2016 - 5:01 pm | सुबोध खरे

लै भारी

बाबा योगिराज's picture

7 Mar 2016 - 8:51 am | बाबा योगिराज

पैजारबुआ,

साष्टांग दंडवत स्वीकारा.
____/\____

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Mar 2016 - 8:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

सापड्या सापड्या अन नाग दिसला तर मेलो.. =))

-दिलीप बिरुटे

बिळाबाहेर पडताना हेल्मेट घालून बाहेर पडायची सक्ती करा. त्यातही सर्पिणींचा हेल्मेट सोन्याचाच असला पाहीजे असं म्हणा. म्हणजे एकमेकींचे हेल्मेट बघून जळफळाट होऊन बिळाबाहेर पडायच्या नाहीत.

सतीश कुडतरकर's picture

11 Mar 2016 - 11:50 am | सतीश कुडतरकर

नाग असेल तर काय चिडवायचे ते तुम्ही ठरवा. :-)) :-))

बोका-ए-आझम's picture

11 Mar 2016 - 11:06 pm | बोका-ए-आझम

का नागांसारखे सरपटता आजकाल?

नन्द्या's picture

6 Mar 2016 - 5:29 pm | नन्द्या

तुळस नि मुंगूस आणण्यात अडचणी बर्‍याच!

तुळशीला पाणी कोण घालणार? त्याचा खर्च कोण देणार?
मुंगुसाचा तीच अडचण. समजा साप गेले, तर नंतर काय करायचे त्या मुंगुसाचे? त्याच्याकडे कोण बघणार, त्याचा खर्च कोण करणार?

सोसायटीत मराठी बोलणारी माणसे रहातात म्हंटले! त्यातून मिपा वर लिहिणारे - वाद घालून शिव्या दिल्याशिवाय सोडणार नाही हां, सांगून ठेवतोय!

- अंघोळीच्या पाण्याच्या टाकीत नियमितपणे थायमेट टाकत चला, मुले या पाण्याने आंघोळ करतील व साप त्यांच्याजवळ येणार नाहीत.
- मुलांसाठी सकाळ-संध्याकाळ नवनाग स्तोत्राचे पाठ आयोजित करा. सर्पविषाच्या धोक्यापासून मुक्ती मिळवा.
- शिड्यांची तसेच फाशांची व्यवस्था करा. साप आले कि सापशिडी स्पर्धा आयोजित करा.

- सोसायटी स्वच्छ ठेवत चला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Mar 2016 - 9:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नागस्त्रोत्र नावाचं एक अष्टक आहे. सदरील अष्टक सकाळ संध्याकाळ पाठांतर करुन म्हटल्यास कोणत्याही सापाची आपल्या सोसायटीत यायची हिंमत होणार नाही. तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी सोसायटीच्या मैदानात लहान थोरांनी येऊन खालील स्त्रोत्र मोठ्या आवाजात म्हणावे, म्हणजे सोसायटीत साप येणार नाहीत. (स्त्रोत्र म्हणुनही साप आपल्या सोसायटीत आल्यास मला जवाबदार धरु नये)

''अनंतं वासुकि शेष पद्मनाभं च कम्बलम् ।
शड्खपाल धार्तराष्ट्र तक्षकं कालियं तथा ।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् ।
सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः ।।
तस्मे विषभयं नास्ति सर्वत्र विजयीं भवेत् ।''

(माहिती सौजन्य : विकिपीडिया)

-दिलीप बिरुटे
(गारुडी)

प्रा डॉ. हा श्लोक संस्कृत मधे आहे. संस्कृत न समजणार्‍या सापांसाठी काय करायचे? सापांच्या नावाखाली तुम्ही संस्कृत ची छुपी सक्ती अशी चालवून घेणार नाही.
अवांतरः मुंबईत सध्या टॅक्सी परमीट साठी मराठीचे जुजबी ज्ञान आवश्यक आहे. त्यासाठी त्या उमेदवाराला मराठीत प्रश्न विचारतात उदा डावा हात म्हणजे कोणता. वडिलांचे नाव काय वगैरे. शिवसेनेतुन बाहेर पडलेले व काँग्रेसचे खंदे नेते संजय निरुपम यानी या मराठीच्या सक्ती विरुद्ध कडक्क आंदोलन छेडू असे सांगितले आहे.

खटपट्या's picture

8 Mar 2016 - 1:42 am | खटपट्या

संस्कृत न समजणार्‍या सापांसाठी काय करायचे?

बॅटमन गुर्जींचा क्लास लावायला सांगा.

महाभारत काळापासून सापांना संस्कृत समजत असल्याचे पुरावे आहेत त्यामुळे ही अडचण येऊ नये.

ह्याने पूर्ण सोसायटीला फायदा होइल कि फक्त स्वतच्या फ्लॅटला?

गवि's picture

7 Mar 2016 - 9:14 am | गवि

www. sap. com

इथे काही "सोल्युशन" मिळतंय का बघा.

तुषार काळभोर's picture

7 Mar 2016 - 10:02 am | तुषार काळभोर

सापांना दूर ठेवण्यासाठी खरोखर उपयोगी असते. पण त्याचा वास लई बेक्कार असतो.
मागच्या अनुभवावरून जर तो वास सहन होत असेल (कुंपण इमारतीपासून/खेळण्याच्या जागेपासून दूर असेल तर कमी त्रास होईल) तर वापरा. शेतकरी सापांना जनावरांपासून दूर ठेवण्यासाठी गोठ्याच्या आजूबाजूला वापरतात. फक्त थायमेट पाण्याच्या प्रवाहात मिसळणार नाही वा कोणाच्या पोटात जाणार नाही याची काळजी घ्या.

गारूडी बनायचे प्रशिक्षण घ्या.

नाव आडनाव's picture

7 Mar 2016 - 6:26 pm | नाव आडनाव

इतके वेगवेगळे उपाय सुचवण्यासाठी धन्यवाद मित्रांनो :)

हाण्ण्ण्ण तेजायला. लेख अन प्रतिसाद दोन्ही कहर =)) =)) =))

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2016 - 12:55 am | श्रीरंग_जोशी

लेख अन प्रतिसाद दोन्ही कहर!!

वाचक्नवी's picture

10 Mar 2016 - 3:23 pm | वाचक्नवी

सापांना दूर ठेवण्यासाठीचा परंपरागत उपाय म्हण्जॅ वेखंडाची पूड. वेखंडाचा वास बेक्कार नसतो, तर वेखंड सुगंधी असते. लहान मुलांच्या अंथरुणाभोवती वेखंडाच्या पावडरची रांगोळी काढण्याची पूर्वापार प्रथा आहे. .

नूतन सावंत's picture

10 Mar 2016 - 11:06 pm | नूतन सावंत

हेच सांगायला आले होते.

कविता१९७८'s picture

10 Mar 2016 - 3:40 pm | कविता१९७८

गाणं लावा - "तु मेरी दुश्मन , दुश्मन मै तेरा... तु नागिन मै सपैरा.... तु नागिन मै सपैरा..........." निदान नागिणी यायच्या बंद होतील. मग नागिणींच्या धाकाने नागही बाहेर पडणार नाहीत.

सोसायटीतल्या लोकांनी 'बिलानशी नागीन निंगाली, नागोबा डुलाया लागला' गाण्यावर समुहनृत्य करा.

सतीश कुडतरकर's picture

11 Mar 2016 - 11:54 am | सतीश कुडतरकर

हे गाणं लावलं तर नागिणी पाहायला अख्ख्या गावातले नाग सोसायटीत येतील.

होबासराव's picture

10 Mar 2016 - 4:15 pm | होबासराव
हेमंत लाटकर's picture

10 Mar 2016 - 10:48 pm | हेमंत लाटकर

हसुन हसुन वाट लागली.

पियुशा's picture

11 Mar 2016 - 10:40 am | पियुशा

अर्रे काय हे --/\--

सुबोध खरे's picture

11 Mar 2016 - 11:46 am | सुबोध खरे
मराठी कथालेखक's picture

11 Mar 2016 - 11:55 am | मराठी कथालेखक

वाढलेले तण काढून टाका
काही काळ हिरवळ पण साफ केलीत तर बरे
अंधार्‍या जागा राहू देवू नका, सगळीकडे प्रकाशाची व्यवस्था करा

बाळ सप्रे's picture

11 Mar 2016 - 12:05 pm | बाळ सप्रे

जॅक डॅनिएलशी मैत्री करा. तो सर्पमित्र आहे. मग मित्राचा मित्र अशी ओळख सापाला सांगा. मग एकदा साप ओळखीचा झाला की मग काय घाबरायचं.. एखादं बीळ खणून घ्या आवारात मग सोसायटीला सिक्युरीटीचीपण गरज नाही :-)

गवि's picture

11 Mar 2016 - 12:20 pm | गवि

सापाची जनरल चालः ~~~~~~
माणसाची जनरल चालः ------

पुरेश्या जॅक डॅनियलनंतर माणसाची चाल: ~~~~~~

पुरेश्या जॅक डॅनियलनंतर सापाची चाल: ??

बाळ सप्रे's picture

11 Mar 2016 - 12:37 pm | बाळ सप्रे

जॅक डॅनिएल फक्त माणसाला द्यायची.. सापाला नाही.. मग दोघांची चाल सारखी होइल.. मग मैत्री होइलच की चालताचालता..

सस्नेह's picture

11 Mar 2016 - 12:59 pm | सस्नेह

पुरेश्या जॅक डॅनियलनंतर सापाची चाल: ??

/\/\/\^^\/\/$$^^/\/\^^\/\/\/ ******** (इथे साप गटारात पडला आहे.)

नीलमोहर's picture

11 Mar 2016 - 5:00 pm | नीलमोहर

म्हणजे सापांमध्येही गटारी अशीच साजरी होते तर..

साप आला तर नागिन डान्स करायचा ही फेमस युक्ती वापरा ओ. ते नागिन म्हटल्यावर एकच एक पेटंट म्युझिक नसतं का, त्यापैकीच हा प्रकार.

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 12:44 pm | प्रसाद गोडबोले

तुम्ही सापांमध्ये लव्ह जिहाद ला समर्थन देताय का ?

बॅटमॅन's picture

11 Mar 2016 - 6:08 pm | बॅटमॅन

आँ? हे कुठून आलं मधेच?

मी म्हणतोय की तो डान्स करावा फकस्त. बाकी कै नै.

प्रसाद गोडबोले's picture

11 Mar 2016 - 6:22 pm | प्रसाद गोडबोले

पण सापांना नागिन डान्स करुन मोहित करुन नागांच्या प्रेमपाशात अडकवण्याचे कुटील कारस्थान रचले जात आहे त्याचे काय ?

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2016 - 4:54 pm | गॅरी ट्रुमन

त्यापेक्षा सरळ सापाला न आल्यास अर्धे राज्य बक्षिस द्यायची घोषणा करा.मग साप गपगुमान जातो की नाही बघा.

हेमंत लाटकर's picture

11 Mar 2016 - 5:16 pm | हेमंत लाटकर

सापाला पप्पुचे भाषण एेकवा.

मी-सौरभ's picture

11 Mar 2016 - 5:25 pm | मी-सौरभ

अरे येऊ द्या की त्या सापाला, तुम्ही त्याची नैसर्गिक वसतीची स्थाने तोडून स्वतः साठी घरे बांधता ना? मग त्यांना घरात घ्या खाऊ पिऊ घाला.

कलयुग(जुना) - यात अनंत नाग आहे.
विश्वात्मा - यात अमरीश पुरीचं सर्पिल खानदान आहे. तो अजगर, त्याचा भाऊ राजनाग, त्याचा मुलगा नागदंश वगैरे.
पा - यात अरुंधती नाग आहे.
बुनियाद (सीरियल) - यात विनोद नागपाल आहे.

एवढं बघून नाग/साप कंटाळतील आणि परत तुमच्या सोसायटीत येणार नाहीत.

अजया's picture

12 Mar 2016 - 9:08 am | अजया

=)))))

अन्नू's picture

12 Mar 2016 - 12:23 am | अन्नू

हे सगळं राहू द्या तुंम्ही सरळ आपलं सिमरला बोलवून घ्या, अशा बर्‍याच केसेस तिने आपल्या ससुरालमध्ये हाताळलेल्या आहेत.

घराभोवती अस्लेल्या मोकळ्या जागेत सध्या बिळ खोदलेली दिसली.सुरवातीला हा घुशीचा प्रकार असावा म्हणुन प्रतिबंधात्मक
उपाय करुन पाहिल..पण पुन्हा बिळे खोदलेली दिसली.
काल घरी असताना खुडखुड आवाज आला आणी खालील मंडळी दिसली अक्षरक्षहा झुंडीन हजर..
1
1

महासंग्राम's picture

12 Mar 2016 - 10:23 am | महासंग्राम

१. तिथे पुपा लावा ' इथे फेरीवाले, सेल्समन आणि सापांना सक्त मनाई आहे. सोसायटीच्या आवारास **वर चटके देण्यात येतील (हवा काढण्यात येईल या धर्तीवर).(चटके कसे द्यायचे त्यासाठी वेगळ्या धाग्याचे पैसे पडतील). साप जर साक्षर असेल तर तुमचा प्रश्न तडीस जाईल.

२. साप एकटा राहतो कि फ्यामिली वाला आहे ते विचारा, ब्याचलर एकटा असल्यास ' सोसायटीमध्ये ब्याचलर सापांना राहणयास परवानगी नाही अशी नोटीस बजावा'.

३. नाहीतर आणखी एक गांधीवादी उपाय आहे. सापाशी मैत्री करून त्याला घरात बोलवा. त्याला भरपूर उंदीर खायला घाला आणि घरातल्या सोफ्यावर बसवा. मग तो एक तर सोफ्यावर झोपेल किंवा सोफ्याची वाट लावेल. पण बिळात घुसणार नाही.

४. सापाला बिन वाजवून मी मनपा कडे तक्रार करेन अशी विनंती करा

५. टीव्ही वाहिन्यांना बोलवा त्यात त्या सापाची मिडिया ट्रायल घ्यायाला सांगा, त्यात त्या सापाला सुद्धा आमंत्रण द्या, लगेच बिळ काय देश सुद्धा सोडून जायची शक्यता आहे.

६. ते नाहि जमल्यास सोसायटीची मिटिंग अटेंड करायला सांगा, परत सोसायटीच्या आसपास पण नाही फिरकणार तो दुत्त दुत्त साप.

७. अथवा हे हि नाही जमल्यास साप : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट! असा लेख लिहा व बिळाजवळ जाउन मोठ्याने वाचन करा आपोआप त्रास दूर होईल