Skip to main content

कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

लेखक विवेक ठाकूर यांनी शनिवार, 05/03/2016 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतिही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. यापूर्वी त्याचा जेएनयू कँपसमधे बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस नायप्रविष्ट असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 70244
प्रतिक्रिया 362

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तो राजकीय नेताच होईल, ते कैम्पस मधे मुलाखत घेऊन लाखोंचे पॅकेज, कोण आपल्या पायावर धोंडा मारून घेईल? रच्याकने तो काय अभ्यासक्रम करतो आहे तो पास होईल काय? बेणं नाय ते करण्यात जास्त गुंतल आहे. त्याच्या एकूण भाषणावरुन डाव्याचां पप्पू बनणार बहुतेक!

In reply to by भंकस बाबा

तो राजकीय नेताच होईल, ते कैम्पस मधे मुलाखत घेऊन लाखोंचे पॅकेज, कोण आपल्या पायावर धोंडा मारून घेईल? हो अगदी खरे आहे. डाव्याचां पप्पू बनणार बहुतेक तो पप्पू नाही आहे. महा चालू आहे. कम्युनिस्टांना सध्या खोगिरभरती करायची आहे. आधीच जनता भिक घालत नाही, केजरीवाल कडून अपेक्षा होती, पण त्याने वेगळेच दुकान थाटले, त्यात असलेले नेते कमी होऊ लागले आहेत. म्हणून त्याला तयार केले जात आहे. तसे मला राजकारणातल्या आदीपप्पू राहूलजींची खरेच दया येते. बिचारा! काँग्रेस शेंदूर फासला आणि हा नको त्या क्षेत्रात फसला...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जे एन यु मधले भाषण तर धडाक्यात झालेले दिसतेय. वेशभुषा पण एखाद्या रॉकस्टार सारखी होती , फारच गरीब घरातुन आल्यासारखा वाटतोय हा. wardrobe courtesy कुणाची ते मात्र कळले नाहीये अजुन.

In reply to by कुंदन

वेशभुषा पण एखाद्या रॉकस्टार सारखी होती , फारच गरीब घरातुन आल्यासारखा वाटतोय हा. wardrobe courtesy कुणाची ते मात्र कळले नाहीये अजुन.
वॉर्डरोबपे मत जाइएगा, रावसाहेबांना मैत्रिणी पण आहेत. आणि लिडर म्हटल्यावर अगदीच अवघड नसावे, कम्युनिस्टांपासून सुरवात करेल पण कम्युनीस्ट पठडीत फार काळ टिकणार अवघड रहावे.

In reply to by माहितगार

वृंदा कारत च्या साड्या बघून आमच्यासारखे लोक तोंडात बोटे घालतात असल्या भारी कॉटन साड्या आम्हाला का परवडत नाहीत!

In reply to by पैसा

राजीव गांधी पंतप्रधान होण्याच्या पुर्वि त्यांना कुणितरी तुमच्या घरी सिमिंग पूल ठेवणे कसे काय (आर्थीकदृष्ट्या) जमते असे विचारल्यावर त्यांनी त्यात काय एवढे प्रत्येकाच्या घरी असावयास हवे असे उत्तर दिले, तसेच काहीसे वृंदा करातही उत्तर देतील का ?

In reply to by पैसा

तुम्हाला कोणी अडवलयं? ;) एखाद्या चळवळीत तुम्ही देखील उडी घेऊ शकता. हवी असली तर एखादी एनजीओ चालू करा. धरणे धरा, घोषणा-निषेध करा, धर्मोच्छेदक होण्याचा समाजाला मार्ग दाखवा, परदेशी फंडींग मिळवा.. मग कॉटनच्या साड्याच कशाला, ड्रायवरसकट गाड्यापण मिळतील. :)

मला उच्चशिक्षणासाठी युनिव्हर्सिटीत जायच.माझी देशासाठी काहि तरी करायची इच्छा होती. पण बापुस पेकाडात लाथ घालील"घोडा झालास आता.काम धंदे करा,अभ्यासाची थेर बंद करा." अश्या तर्हेने एक नेता वाया गेल?

In reply to by तर्राट जोकर

आधी कुठल्यातरी युनेवर्शीटीमध्ये ५-७ वर्षे तळ ठोक्कून दाखव (कोण रे तो डिग्री मिळव म्हणतोय हाणा त्याला व्य्क्तीस्वातंत्र्यावर घाला घाल्तात लेकाचे) नंतर माधोपूर्,हुशांगबाद्,बोलीकुट्टी असल्या ठिकाणी एखादी विद्यार्थी विरूद्ध प्रशासन अशी घटना असेल तर लगेच सभा घे तुझ्या उनिवर्सीटीत आणि त्या सभेआडून ज्यांना ज्यांना शिव्या घालायच्यात, आणि अजून कुणाला कंडशमनार्थ बेलगाम निर्ल्लज नारेबाजी कर.अगदी अंगाशी आले तर मी नारेबाजी करायला सांगीतली नव्हती,मी त्या नार्यांच्या विरोधात होतो (हे पोलिसांचे फटके किती पडतात त्या नुसार) तदनंतर चुकुन पोल्सांनी चौकशी साठी बोलावले तर बगल बच्च्यांना सांगून तुझ्या जंगी आगमनीची तयारी कर (आधिक माहीतीसाठी संजूबाबा+सल्लुबाबा दोस्तांची मदत घे) पुढे कुणी ना कुणी दुखावलेला/पराभुत खासदार+आमदार तुला हार्दीक अरविंद स्वारी अभिनंदन करेलच करेल. पुढे काही वर्षानी कोण जेप्या हे ही होईल (मधल्या काळात एखादा साखर कारखाना,शिक्षाण संस्था काढलीस तर मग अडचण नाही)

In reply to by नाखु

अगदी अगदी. तंतोतंत. ह्याच मार्गाने आपल्याला अभाविपच्या माध्यमातून कितीतरी दिग्गज नेते मिळालेत.

In reply to by तर्राट जोकर

अहो मी गंमतीत लिहिला होता. एव्हढं मनाला लावून घ्याल असं वाटलं नव्हतं. एकदा योद्धा रणात उतरला की त्याला त्वेष चढतो तसं झालं की काय तुमचं? असो. दुखावणे हा हेतू नव्हता.

In reply to by सतिश गावडे

व्हाय सो सिरियस? तुम्ही पण माझा प्रतिसाद अतिशय विनोदपूर्ण घेतला नाही ह्याचे आश्चर्य वाटले.

In reply to by तर्राट जोकर

आधी कुठल्यातरी युनेवर्शीटीमध्ये ५-७ वर्षे तळ ठोक्कून दाखव (कोण रे तो डिग्री मिळव म्हणतोय हाणा त्याला व्य्क्तीस्वातंत्र्यावर घाला घाल्तात लेकाचे) नंतर माधोपूर्,हुशांगबाद्,बोलीकुट्टी असल्या ठिकाणी एखादी विद्यार्थी विरूद्ध प्रशासन अशी घटना असेल तर लगेच सभा घे तुझ्या उनिवर्सीटीत आणि त्या सभेआडून ज्यांना ज्यांना शिव्या घालायच्यात, आणि अजून कुणाला कंडशमनार्थ बेलगाम निर्ल्लज नारेबाजी कर.अगदी अंगाशी आले तर मी नारेबाजी करायला सांगीतली नव्हती,मी त्या नार्यांच्या विरोधात होतो (हे पोलिसांचे फटके किती पडतात त्या नुसार) तदनंतर चुकुन पोल्सांनी चौकशी साठी बोलावले तर बगल बच्च्यांना सांगून तुझ्या जंगी आगमनीची तयारी कर (आधिक माहीतीसाठी संजूबाबा+सल्लुबाबा दोस्तांची मदत घे) पुढे कुणी ना कुणी दुखावलेला/पराभुत खासदार+आमदार तुला हार्दीक अरविंद स्वारी अभिनंदन करेलच करेल. पुढे काही वर्षानी कोण जेप्या हे ही होईल (मधल्या काळात एखादा साखर कारखाना,शिक्षाण संस्था काढलीस तर मग अडचण नाही)
ते सगळे असे पाहिजेत पण. तुम्हीच तुमच्या प्रतिसादात तंतोतंत असं म्हटलंय.अभाविपमधून भाजपमध्ये आलेले विनोद तावडे, आशिष शेलार, पराग अळवणी, पूनम महाजन, आधीच्या पिढीतले गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन - हे सगळे माहिती आहेत. याव्यतिरिक्तही असतील. वरती नाखुकाकांचा प्रतिसाद दिलाय, तसा एखादा आहे का?

In reply to by बोका-ए-आझम

एवढंच मागे लागायचं असेल ना बोकाशेठ तर निव्वळ वरवर विचार करणार्‍या नादखुळांच्या मागं का नाही लागत? कन्हय्याविरुद्ध बोलायला ठोस मुद्दे नाहीत तर असल्या आढ्यताखोर टिप्पण्या तरी कशाला कराव्यात ह्या अर्थाने तो प्रतिसाद आहे. मुद्दा एवढाच आहे की अभाविपमधूनही अनेक तळठोकू, जेलगोईन्ग, तोडफोड विद्यार्थी निघालेत त्याबद्दल कधी ओरड होतांना दिसली नाही. खुद्द अभाविपचे जुने मेंबर वैंकेया नायडू (he started his career in politics as a student leader of the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad in the year 1973–74 after being elected as the president of the students union of Andhra University Colleges. He came into spotlight for his prominent role in the Jai Andhra Movement of 1972. While Kakani Venkataratnam led the movement from Vijayawada, Venkaiah Naidu took active part in the agitation in Nellore, until it was called off a year later. हे करत असतांना ते २५-२६ वर्षाचे होते.) विद्यार्थ्यांनी शिक्षण करावे राजकारण करु नये म्हणतात तेव्हा तुम्ही असेच सल्ले भाजपसरकारमधल्या कमीत कमी अर्ध्या मंत्रिमंडळाला द्याल का असा सवाल कोणी करतांना दिसत नाही. इथे कन्हयाकुमारवर शेलके टोमणे मारण्याचे कारण फक्त त्याने आपल्या आवडत्या मोदींना, संघ, भाजपाला शिव्या घातल्यात. तो विद्यार्थी आहे म्हणून हे टोमणे नाहीत. हेच त्याने काँग्रेसविरूद्ध केले असते तर हेच लोक आनंदाने नाचले असते. निवडनूका जिंकण्यासाठी कितीतरी अट्टल गुन्हेगार, घोटाळेबाज, पूर्वकॉंग्रेसी यांना पायघड्या घालून भाजप्ने टिकिट्स दिलेत. त्याबद्दल भाजपभक्त कधी शेलके टोमणे मारतांना दिसत नाहीत. असो. विचारांमधे संतुलन ठेवा असे आपण सगळ्यांना म्हणायचे आणि शेंबुड आपल्यच नाकाला आहे हे विसरुन जायचे. अभाविपने खालील उद्योग करतांना विद्यार्थ्यांनी शिक्षण करावे, इतर उद्योग करु नये असले सल्ले द्यायला भाजपभक्त पुढे आलेले दिसले नाहीत. ABVP has been in the news due to violent incidents and alleged right-wing extremism: 23 April 2011 : Student activists of ABVP attacked the anchors of MTV's Roadies show in Pune. 18 August 2011 : ABVP cadres ransack missionary school over Anna protest in Jharkhand. 26 January 2012 : ABVP members set ablaze reels of Telugu film 'Businessman (film)' on the Osmania University campus. 29 January 2012 : ABVP protested against the screening of Sanjay Kak's documentary Jashn-e-Azadi, forcing Symbiosis College of Arts and Commerce, Pune to indefinitely postpone the seminar Voices of Kashmir. 14 April 2012 : ABVP members attacked Beef Festival in Osmania University. 24 August 2013 : After the screening of Jai Bhim Comrade and the performance by Kabir Kala Manch, ABVP attacked students of Film and Television Institute of India, Pune and KKM members blaming them as Naxalite, and asked them to say Jai Narendra Modi. 7 September 2013 : A Kashmiri film fest was targeted by the group of right wing extremists in Hyderabad. A group of ABVP workers entered the venue just few hours after the programme started and indulged in vandalism. 30 December 2014 : PK, the film, was obstructed by ABVP. वरील सगळ्या घटना शिक्षणाशीच संबंधित आहेत ह्यावर भक्तांचा दुर्दम्य विश्वास असेल. किंवा हे सर्व अभाविप जाज्वल्य देशाभिमानासाठी करते आणि बाकीचे..... पुन्हा, असो.

In reply to by तर्राट जोकर

हायला! कुठे ते, कुठे आम्ही.;-)
हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, परंतू डांगेंची उणीव तुम्ही जाणवू देत नाहीत हे ही खरे आहे. अगदी मुद्देसूद विचार मांडत आहात..

In reply to by वैभव जाधव

जाधवसाहेब आपल्या प्रतिसादात मात्र आम्हाला वर्मावर अचूक घाव घालणारे एक जुने जाणते व्यासंगी मिपाडेटाबँक सदस्य दिसतात. ;)

In reply to by अभ्या..

ओ मालक, मी वैभव जाधव. सध्या सुट्टीवर आलोय म्हणून मिपावर जमतंय. काय बोलून ऱ्हायला बे उगा?

In reply to by जेपी

जाऊ दे. फार मनावर नको घेऊ. तू तुझ्या या अनुभवांवर "आमचा बापूस आणि आम्ही" असं पुस्तक लिही. मी ते वीस टक्के सवलत असेल तर विकत घेईन.

सुंदर विनोदी लेख ! और आंदो !! =)) =)) =)) कल्पनाविलास = वास्तविकता कांगावाखोरपणा = प्रांजळपणा बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू = सादगीपूर्ण इंटरव्यू अश्या मराठी भाषेत अनेक नवनवीन क्रांतीकारक व्याख्या करणारा, "इतर जनतेला डोके नाही, मी त्यांना काहीही विकू शकेन" हे (नेहमीप्रमाणेच) केवळ स्वानुभवावर आधारलेले वैश्विक सत्य मांडणारा व एक नवीन वैचारीक रस्ता तयार करणारा लेख (मात्र, तो रस्ता कुठे घेऊन जाईल ते विचारू नका. पण हरकत नाही. म्हणतातच ना की गंतव्याला पोचण्यापेक्षा प्रवासात जास्त मजा असते. ते अक्षरशः खरं आहे, हे पटून जातं. :) ;) ) एक सावधगिरीची सुचना : लेखात बरखा दत्त यांच्यावर लेखकाने केलेल्या आरोपांबद्दल, दत्त यांच्याकडून पूर्वपरवानगी घेतली नसली तर, लेखकावर त्या कायदेशीर कारवाई करतील की काय असा संशय येत आहे ! और आंदो, और आंदते रहो ! मज्जा येते वाचायला... म्हंजे... लेखापेक्षा जास्त प्रतिक्रिया वाचायला मज्जाच मज्जा येते. ====== रच्याकने : सुटून आल्यावर जनेविमधे केलेल्या संपूर्ण भाषणभर कन्हैया कुमार स्मितहास्य करत होता किंवा चक्क हसतही होता... इतका की अन्यायाविरुद्ध आणि सद्यव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे स्वतःच्याच भाषणातले शब्द त्यालाच विनोदी वाटत होते का, असा संशय यावा इतके !!!

क्षीरसागर सर,तुम्हाला १-२ वर्षापूर्वी केजरीवाल सुद्धा असेच वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट असणारे वाटले होते.मिपा वर तुम्ही या अशाच प्रकारचा केजारीवालांचा धागा काढला होता. तीन वर्षानंतर त्यांच्या बद्दल जनतेची मते काय आहेत हे सुद्धा जगासमोर आहे. आणि आत्ता तुम्ही कन्हैय्या बद्दल असाच धागा काढलाय………. तुम्ही तुमची चूक काही काबुल करू नका.अजून २-३ वर्षानंतर तुम्हाला एखाद्या नवीन व्यक्तीच्या प्रांजळपणाची खात्री पटेल//साक्षात्कार होईल ! तुमच्या साक्षात्काराची सामान्य मिपाकराने काय किंमत मोजायची ते एकदा ठरवून द्या.

चार दिन की चांदनी, फिर अंधेरी रात है. भारतीय अशा कन्हयांवर कायम चेकाळत आलेले आहेत. हे आज नाही कैकदा घडले आहे. लोकांना असलं कायतरी लागतंच. आपल्या मनातल्या आदर्शवादाला दॄश्यरुपात बघित्लं की एक भावना सुखावते. त्या सुखावणार्‍या भावनांच्या नादात लोक अशा कन्हय्यांवर फिदा होतात. मसिहा करतात. तो आला म्हणजे आपले सगळे दुख-दर्द दूर होतील अशी वेडी स्वप्ने बघतात. स्वतःच्या स्वप्नांना पुरं करायला स्वत: खपायला लागतं हे विसरतात. मग भ्रमनिरास होतो. मग केज्रीवालला पडतात तशा शिव्या पडतात. पवारसारखे लोक आयुष्यभर राज्य करतात. अजून काय काय घडतं. पण लोक आशा सोडत नाहीत. कोनतरी उत्थान करणारा येईल ह्याची वाट बघत बसतात. असले कन्हया त्या वाट बघण्यातले हुरळलेले क्षण असतात. काही असो. भारतीय लोकांचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तान, चीन नाही तर त्यांचा आळस आहे. सर्वच बाबतीतला. विचार करण्यापासून ते कृती करण्यापर्यंतचा. त्याला एक मोठं कारण आहे. ते हे: यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् | परित्राणाय साधुनाम विनाशाय च: दुष्कृताम, धर्मं संस्थापनार्थाय सम्भावामी युगे युगे || असले कन्हय्या हेच नेहमी अधोरेखीत करत आले आहेत.

In reply to by तर्राट जोकर

'अवतारा'ची अपेक्षा, आणखी काय? अवांतर : मला मिपासदस्य 'अवतार' ह्यांचे विचार पटतात आणि आवडतात.. बाकी ह्या असल्या अवतारांमुळे आता 'विना न्युजचॅनेल' कुठला सबस्क्रिप्शन पॅक आहे का, हे बघावसं वाटतं.. कचर्‍याचे पैसे का द्या?

In reply to by चिगो

दूरदर्शन चे फ्री DTH घेऊन टाका . डोक्याला शॉट नाही . आवश्यक तेवढ्याच बातम्या . वर अजून सासू सुनांच्या कट कारस्थानी मालिकांपासून मुक्तता . मुलेही निमूटपणे अभ्यास करतात कार्टून नसल्यामुळे हा एक अवांतर फायदा .

...असले कन्हया त्या वाट बघण्यातले हुरळलेले क्षण असतात. काही असो. भारतीय लोकांचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तान, चीन नाही तर त्यांचा आळस आहे. सर्वच बाबतीतला. विचार करण्यापासून ते कृती करण्यापर्यंतचा. त्याला एक मोठं कारण आहे. ते हे:
=))

विठांनी २ वर्षांपूर्वी "अरविंदबरोबर दीड तास" असा धागा काढला होता. परंतु अरविंद बद्द वाजणारे नाणे निघाल्याने ते नवीन नायकाच्या शोधात होते. आता कन्हैय्याच्या रूपात त्यांना "बाल केजरीवाल" सापडला आहे. बादवे, मोदी विरोधक सातत्याने एका हीरोच्या शोधात असतात. २०१४ मध्ये आधी केजरीवाल व नंतर राहुलचा प्रयोग करून झाला. २०१५ मध्ये आधी केजरीवाल व नंतर नितीशकुमार आणि लालूच्या रूपात त्यांना मसीहा सापडला आहे. आता २०१६ मध्ये बाल केजरीवाल सापडलाय.

In reply to by नाना स्कॉच

न जमायला काय झालं? सीताराम केसरींना तर स्वच्छतागृहात कोंडून बाहेरून श्रीफल प्रदान करण्यात आले होते.

In reply to by श्रीगुरुजी

मग पार्टी विथ डिफरेंस जुमला का? :D , केसरींच्या पार्टीने शेण खाल्ले म्हणून तर अडवाणी ह्यांच्या पार्टीला आणले , की आता ,"त्यांनी शेण खाल्ले म्हणून आम्हीही खाणार, आम्हाला बोलायचे नाही वगैरे आहे म्हणणे?"

In reply to by नाना स्कॉच

अडवाणींना "नारळ" दिला म्हणजे नक्की काय केलं हे जरा समजावून सांगितलं तर बरं होईल.

In reply to by नाना स्कॉच

मग पार्टी विथ डिफरेंस जुमला का?
अडवाणींच्या नेतृत्वाखाली २००९ मध्ये भाजपने निवडणुक लढविली होती. त्यावेळी अडवाणींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते. परंतु त्या निवडणुकीत भाजपला फक्त ११६ जागा मिळाल्या (२००४ मध्ये १३८ जागा होत्या). २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी अडवाणींचे वय ८६ होते. अडवाणींचा जनमानसावरील प्रभाव संपल्याचे २००९ मध्येच दिसून आले होते. अडवाणी-वाजपेयी युग संपुष्टात आल्याचे स्पष्ट दिसत होते. अडवाणींच्या नावावर फारशी मते मिळू शकत नाहीत हेही दिसून आले होते. काँग्रेसविरोधी लाट स्पष्ट दिसत होती, पण त्या लाटेवर स्वार व्हायला योग्य ते नवीन नेतृत्व हवे होते. यात अडवाणींचा नारळ द्यायचा प्रश्नच उद्भवत नव्हता कारण मधल्या काळात अडवाणी तसेही फारसे पक्षकार्यात नव्हते. अडवाणींना संधी दिलेली होती आणि सुषमा स्वराज, रा़जनाथसिंग, नितीन गडकरी, अरूण जेटली यांच्या तुलनेत लागोपाठ ३ निवडणुका जिंकलेल्या मोदींचा प्रभाव खूप जास्त आहे हे स्पष्ट दिसत होते. नितीन गडकरी व अरूण जेटली हे यापूर्वी कधीही निवडणुकीला उभे राहिले नव्हते. राजनाथसिंग हे उत्तरप्रदेश पुरते मर्यादित होते. सुषमा स्वराज नक्कीच बर्‍यापैकी तुल्यबळ होत्या, परंतु मोदींचा करिश्मा जास्त होता. हे सर्व लक्षात घेऊनच २०१३ च्या जूनमध्ये मोदींचे नाव कार्यकारिणीने पुढे आणले व रीतसर लोकशाही मार्गाने त्यांची निवड केली. यात अडवाणींना नारळ देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांचे वय, संपलेला करिश्मा, पक्षकार्यातून कमी झालेला त्यांचा सहभाग आणि जनतेसाठी त्यांच्याकडे असलेल्या नवीन कल्पनांचा अभाव हे लक्षात घेऊनच त्यांची निवड झालेली नव्हती. याऊलट सीताराम केसरींचे प्रकरण आहे. सीताराम केसरी हे १९९७ मध्ये काँग्रेस अंतर्गत झालेल्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण मतांपैकी तब्बल ८५% मते मिळवून पक्षाध्यक्ष झाले होते. त्यांच्याविरूद्ध उभ्या असलेल्या शरद पवार व राजेश पायलट या दोघांना एकत्रित १५% मते होती. केसरींची निवड ३ वर्षांसाठी होती. १९९८ मध्ये सोनिया गांधींना राजकारणात आणण्यासाठी सर्व कॉंग्रेस नेते (शरद पवारांसकट) प्रयत्नशील होते कारण त्यांच्याकडे मते मागण्यासाठी प्रभावी चेहरा नव्हता. पोस्टर्सवर केसरी, तिवारी, अर्जुनसिंग इ. ची चित्रे छापून मते मिळणार नाहीत हे काँग्रेसजनांनी ओळखले होते. मार्च १९९८ च्या निवडणुकीत काही प्रचारसभेत भाषण करताना सोनिया गांधींच्या सभेला उसळलेली गर्दी स्पष्ट संकेत देत होती. १९९६ मध्ये फक्त १४० जागा मिळालेल्या काँग्रेसला १९९८ मध्ये सुद्धा १४० च जागा मिळाल्यामुळे आपल्याला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही हे काँग्रेसजनांनी ओळखले. त्यामुळे केसरींच्या हकालपट्टीची योजना निश्चित करून कार्यकारिणीची बैठक सुरू असताना ते स्वच्छतागृहात गेल्याचे निमित्त करून कार्यक्रमपत्रिकेवर नसलेला नेतृत्वबदलाचा विषय अचानक पुढे आणून सोनिया गांधींनी पक्षाध्यक्ष व्हावे असा ठराव बहुमताने मंजूर केला गेला. त्यावेळी ठराव मंजूर होईपर्यंत स्वच्छतागृहाचे दार बाहेरून लावून घेण्यात आले होते असे छापून आले होते. केसरी हे विद्यमान अध्यक्ष असताना त्यांना सन्मानाने राजीनामा द्यायला सांगून मग रीतसर सोनिया गांधींची अध्यक्षपदी निवड केली असती तर ८५% मते मिळवून अध्यक्ष झालेल्या केसरींचा मान राखला गेला असता व त्यांची अवहेलना टाळता आली असती. या दोन्ही प्रकारांची तुलना करा आणि मग 'पार्टी विथ डिफरेंस' हे खरे का खोटे हे ठरवा.

In reply to by श्रीगुरुजी

हैला मला हे माहीत नव्हते. पण याचा डिफेन्स करायला कसे कोणी येत नाहीत अजून.

चघळायला नविन विषय मिळेपर्यंत दोन-चार दिवस मिडियावाले याला डोक्यावर घेतील. नविन विषय मिळाल्यावर इतरांप्रमाणे यालासुध्दा अडगळीत टाकतील.

बाल कन्हैय्या ने डोहात उडी मारलिये पण त्याला झेपता येतंय का,कि नाका तोंडात पाणी जाईल।

बाल कन्हैय्या ने डोहात उडी मारलिये पण दोघेही एकमेकांना 'तूच कालिया' असं म्हणत एकमेकांचे मर्दन करत आहेत.

या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते. हे सर्व मान्य केले तरीही के के-- कन्हैया कुमार ना ( ए के -- अरविंद केजरीवाल सारखे) या सिस्टीम पासून स्वातंत्र्य हवंय. पण म्हणजे काय आणि कसं ते त्यांनि कोणत्याच मुलाखतीत सांगितलं नाही. हि प्रणाली नीट चालत नाही पण त्याला त्यांच्याकडे पर्याय आहे का? असे या व्यवस्थेला झुगारून द्या म्हणणारे पाहत आमचे किती पावसाळे गेले पण दुसरी पर्यायी व्यवस्था काय याचे उत्तर यापैकी कुणाकडेच नाही. न नक्षलवाद्यानकडे आहे ना कम्युनिस्तांकडे ना क्रांतीवाद्यांकडे. अव्यवस्था (anarchy) हेच जर त्यांचे साध्य असेल तर त्यांच्यात आणि दहशतवाद्यामध्ये फरक काय? आम्हाला लग्न संस्था नको म्हणणारे तरुण शेवटी गपचूप लग्न करून संसाराला लागतात तसेच हे के के साहेब उच्चभ्रू नोकरी पत्करून जनेवि ( JNU जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) सारख्या कोणत्यातरी विद्यापीठात प्राध्यापकी करत राहतील असे माझे भाकीत आहे. माझ्या स्वतःच्या अंदाजाप्रमाणे यांची बौद्धिक लायकी आणि चातुर्याची पातळी केजरीवाल यांच्या इतकी वरची नाही. त्यामुळे चार दिवस झाले कि लोक यांना विसरतील

In reply to by आनन्दा

गुगल मधे सर्च किती झाला हे लोकांचा इंटरेस्ट किती आहे हे पहाण्याचे एक साधन आहे. (एकच नाही)... त्यात गंमत म्हणून मोदी, केजरीवाल, रागा आणि कन्हैय्या यांच्याबद्दलची माहिती पाहीली. त्यांच्यात तुलना करायचा संबंध नाही कारण कन्हैय्या - नया है वह... ;) तरी तरी देखील साधारण गेल्या एक दोन आठवड्यात त्याच्याबद्दल किती शोधले गेले ते समजले...

In reply to by सुबोध खरे

तुम्ही मुलाखत बारकाईनं पाहिलीत तर तोच कन्हैयाचा वेगळेपणा आहे. तो म्हणतो की समतेसाठी प्रत्येकाला राजकारणात उतरायची गरज नाही, एक मिनिमम युनिटी पुरेशी आहे. त्यासाठी वेगळा पक्ष देखिल असण्याची गरज नाही. जो ज्या क्षेत्रात आहे तिथे त्यानं समतेसाठी काम केलं की झालं. उदाहरणार्थ, एक कामगार मालकाच्या एकाधिकारशाही विरुद्ध लढू शकतो. एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना देशातली गरीबी हटवण्यासाठी प्रेरित करू शकतो. एखादा सरकारी अधिकारी स्वच्छ प्रशासनाचा आदर्श निर्माण करु शकतो. एखादा कन्हैया राजकारणाला समाजाभिमुख करु शकतो.... आणि मला वाटतं हा विचार फार मूलगामी आहे. इथे सगळे प्रत्येक विचाराला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करुन बदलाची शक्यताच पुसून टाकतायंत. एक कन्हैया काय करणार ? आपली अशी कल्पना आहे की एक त्राता यावा आणि त्यानं सर्व परिस्थिती बदलावी. मला लोकांच्या विचारसरणीचं नवल वाटतं. कन्हैयाकडे एक व्यक्ती म्हणून पाहून त्याला कम्युनिस्ट ठरवून टाकला की झालं ! त्याच्या साहसाकडे एक निष्पक्ष विचारसरणी आणि बदल घडवून आणण्याची जिद्द म्हणून आपण पाहात नाही. इथेच कुणीतरी लिहीलंय की विशीत बहुतेक सर्व साम्यवादी असतात आणि चाळीशीनंतर बदल घडणार नाही हे पटून भांडवलवादी होतात. जवळजवळ सर्व प्रतिसादातून याचाच प्रत्यय येतोयं. समता, साम्यवाद, गरीबांना समान संधी, त्यांच्या विकासाठी मनात जागा ही गोष्ट इतक्या सहजी पुसली जात असेल तर आपली संवेदनक्षमता संपली का असा प्रश्न कुणाला पडू नये? राजकारणी स्वतःच्या तुंबड्या भरतात म्हणून आपण असहाय्य होऊन प्राप्त परिस्थितीत काहीच करायचं नाही ? की तो समतेचा भाव जागा ठेवून शेवटापर्यंत आपल्याकडून त्यासाठी काही ना काही करत राहायचं ? एखाद्याला कम्युनिस्ट पप्पू ठरवून आपण काय मोठं काम करतो ? वृंदा कारतच्या साड्या आणि त्याचे विचार किंवा त्याला सिपीआयचा नवा पित्त्या म्हणून आपण जो लोकांचा बुद्धीभेद करतो त्यातून काय साधतो? आपण फक्त तो विचार आणि बदल घडवून आणण्याची आपली जवाबदारी झटकून टाकतो. मग पुन्हा व्यवस्था अशीच राहाणार म्हणायला आपण मोकळे ! मला वाटतं इतका ढोबळ विचार हीच वैचारिक पप्पुगिरी आहे.

In reply to by सुबोध खरे

+१ मला तर मिपावर कधी कधी एखाद्या टिनपाट कवितेची समीक्षा करतात त्याची आठवण आली.

In reply to by विवेक ठाकूर

कन्हैयाकडे एक व्यक्ती म्हणून पाहून त्याला कम्युनिस्ट ठरवून टाकला की झालं ! त्याला विकी वरील पहीलेच वाक्य बदलायला सांगा ना साहेब! Kanhaiya Kumar is a leader of the All India Student Federation (AISF), the student wing of the Communist Party of India (CPI). He was elected president of the Jawaharlal Nehru University Students' Uni

In reply to by विवेक ठाकूर

तुम्ही खरोकरच भाबड़े आहात हो! जागतिक राजकारणात जिथे जिथे कमुनिस्ट राजवटित जनता भरडली गेली तेथील नेते अगदी ऐषोआरामात रहात होते. कमुनिस्ट राजवटित भरडणे जाणे हां शब्दप्रयोगच फसला आहे कारण कमुनिस्ट राजवट म्हणजे सामान्य जनतेचे मरणच! जरा तुम्हीच प्रकाश टाका कुठे कमुनिस्ट सुखी आहेत ते. आता ग्रीस , स्पेन ,पोर्तुगालचे उदाहरण देऊ नका. या देशानी सुबत्ता उपभोगलि आहे. पण कमुनिस्ट भिकारी होते व् भिकारिच रहाणार. हुकुमशाहित तुम्हाला माहीत अस्त की तुम्ही सत्ताविरोधी बोलू शकत नाही, पण कमुनिस्ट राजवटित तुम्हाला व्यक्तिस्वातंत्र्यचे गाजर दाखवले जाते, दाखवले जाते , खायला देत नाहीत. कन्हैयाला फ़क्त राजकीय फायद्यासाठी डावे वापरणार नंतर फेकून देणार. एकतर तो धोबीचा कुत्ता झाला आहे. खाजगी क्षेत्रात या पराक्रमामुळे कोणी घेणार नाही आणि राजकारणात डाव्याच्या बाजूने उतरल्यास फक्त भाषणासाठी त्याचा उपयोग करून घेतील. म्हणजे आज इटालियन बहू आणि पप्पू जशे आपल्या पूर्वजाच्या बलिदानावर रड़तात तसाच हां देखिल जेनयूमधे त्याच्यावर झालेल्या तथाकथित अत्याचारांचे दळन दळत बसणार.

In reply to by विवेक ठाकूर

बाकीचं सगळं जाऊंद्या पण... तुमाला तुमचं सोडून इतर कोणाचं (कन्हयाचं का होईना) मत पटलं याचंच लई कौतीक वाटतया बगा ! (आजचा दिवस फार वेगळा दिसतो आहे. बाहेर जावून सूर्य कोठून उगवला ते पहावे असे प्रकर्षाने वाटले, पण त्याची चर्चा इथे नको.) कन्हैय्या म्हणतोय सगळ्याच पक्षांची स्ट्रक्चर्स चुकीची आहेत आणि त्यांचा नाश करायला पाहिजे. पण त्याजागी काय आणायचे याची कल्पना तो देत नाही. म्हणजे त्याला फक्त प्रस्थापित व्यवस्थेला सुरुंग लावायचा आहे... ही कम्युनिझमची जुनी परंपरा आहे. पण, इथे मुख्य फरक असा की, भारताबाहेरच्या कम्युनिस्टांकडे, वाईट का होईना, पण निदान एका पर्यायी व्यवस्थेची कल्पना (पक्षी : कामगारांच्या नावाखाली त्यांच्या नेत्यांनी चालवलेली हुकुमशाही) असते/आहे. कन्हैय्या "प्रस्थापित व्यवस्थेला सुरुंग लावायचा" इथेच थांबतो... म्हणजे थोडक्यात तो स्ट्रक्चर(व्यवस्था)विरहित अराजकाला आमंत्रण देतो आहे... भारताला सद्याचा इराक करायला यापेक्षा जास्त उत्तम पर्याय मिळणे कठीण आहे ! अराजक निर्माण करण्याच्या मुद्द्यावर कन्हैय्या व (स्वघोषीत अराजकसंवर्धक) केजरीवाल यांचे जमले हे आश्चर्याचे नाही. मग, कट्टर केजरीवालसमर्थक असलेल्या धागालेखकाने कन्हैय्याचे कौतूक करावे यात आश्चर्य ते काय ! कन्हैय्याच्या वागण्यामागे दोन मुख्य कारणे शक्य आहेत... १. तो काहीही करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी घटं भिंद्यात...; स्फोटक बोलून; वेळप्रसंगी फुटीरवादाला / अतिरेक्यांना पाठींबा देऊन; आणि इतके सर्व करून ज्या भारतिय घटनेला सुरुंग लावायच्या घोषणा करायच्या तिचाच दाखला देऊन तिचेच संरक्षण मागायचे; इ काहीही त्याला वर्ज्य नाही. जनेविच्या प्रसंगाने तर त्याला आयतीच संधी मिळाली आहे. तो राजकारणी आहे हा त्याचा स्वतःचा दावा आहे. तेव्हा, सद्याच्या कोणतीही साधनशुचिता न पाळण्याच्या (अगदी देशहिताकडे प्रत्यक्ष/दुरान्वयाने दुर्लक्ष करणे वर्ज्य नसणे) गढूळलेल्या राजकारणात तो असे करतो आहे यात फारसे आश्चर्य नाही... पण याचा अर्थ ते क्षम्य आहे असे निश्चितच नाही. २. वरचे खरे नसले आणि अराजकातून आपोआप काही चांगले बाहेर येईल असा खरा खरा विश्वास कन्हैयाला वाटत असला तर मात्र त्याला (आणि त्याच्या पाठीराख्यांना) एखाद्या चांगल्या वैद्यकिय तज्ञाच्या सल्ल्याची गरज आहे. पण, बोलताना त्याच्या डोळ्यात येणारी चलाख चमक पाहता ही दुसरी शक्यता फार कमी आहे... ती केवळ दूरची सैधांतिक शक्यता (रेअर थिएरेटिकल पॉसिबिलिटी) म्हणुनच नोंदली आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आहो तेच तर तो सांगतोयं! वरती सुबोधजींना मी दिलेला प्रतिसाद वाचलात तर कल्पना येईल. तो काहीही करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत आहे... भारीच ज्योक मारतायं ! सत्तेविरुद्ध लढायला हिंमत लागते असं नाही वाटत ? तेव्हा, सद्याच्या कोणतीही साधनशुचिता न पाळण्याच्या (अगदी देशहिताकडे प्रत्यक्ष/दुरान्वयाने दुर्लक्ष करणे वर्ज्य नसणे) तो कायम कायद्याच्या मर्यादेत राहतोयं. तुम्ही त्याचं बेल मिळाल्यावरचं जेएनयूमधलं भाषण ऐका, बरखा दत्तची तिथली मुलाखत पाहा किंवा पोस्टमधे दिलेला विडिओ पाहा. वरचे खरे नसले आणि अराजकातून आपोआप काही चांगले बाहेर येईल असा खरा खरा विश्वास कन्हैयाला वाटत असला तर मात्र त्याला (आणि त्याच्या पाठीराख्यांना) एखाद्या चांगल्या वैद्यकिय तज्ञाच्या सल्ल्याची गरज आहे. पण, बोलताना त्याच्या डोळ्यात येणारी चलाख चमक पाहता ही दुसरी शक्यता फार कमी आहे. अजिबात नाही ! तो प्रत्येकानं आपापल्या दायर्‍यात समतेसाठी काम करावं असं म्हणतोयं... म्हणजे तुम्ही वरचा विडिओ बहुदा पाहिलाच नाही. आणि सुहासजी किमान तुमच्याकडून तरी इतर तद्दन आयडींसारखी ` वैद्यकीय उपचार' वगैरेची भाषा निदान मला तरी अपेक्षित नाही.

In reply to by विवेक ठाकूर

बाकी प्रतिसादाबाबत काही लिहिण्यासारखे नाहीच. पण... सुहासजी किमान तुमच्याकडून तरी इतर तद्दन आयडींसारखी ` वैद्यकीय उपचार' वगैरेची भाषा निदान मला तरी अपेक्षित नाही. या भागाबद्दल काही... त्या शब्दयोजनेअगोदरची "वरचे खरे नसले आणि अराजकातून आपोआप काही चांगले बाहेर येईल असा खरा खरा विश्वास कन्हैयाला वाटत असला तर मात्र..." ही वाक्यरचना गाळून केवळ काही संदर्भविरहित शब्द उचलून आपल्याला हवा तो अर्थ लावण्याचे आश्चर्य वाटले नाही, इतकेच ! तुमच्यासाठी खास शास्त्रिय विश्लेषण : "अराजकातून" "आपोआप" काही चांगले बाहेर येईल असा "खरा खरा विश्वास" असणार्‍या कोणत्याही माणसाचे मानसिक संतुलन ढळले आहे असे मानसशास्त्राच्या आधारे म्हणता येईल.

In reply to by विवेक ठाकूर

>> एक कामगार मालकाच्या एकाधिकारशाही विरुद्ध लढू शकतो मालकाची एकाधिकारशाही म्हणजे? मालकाच्या कारखान्यात मालकाची एकाधिकारशाही नसणार तर कोणाची असणार युनियनची? सध्या मार्केट इतकं खुलं आहे की नोकर न सांभाळू शकणारा मालक आत्मघातास कारणीभूत ठरतो आणि त्याच कारणामुळे अतिरेकी आकांक्षा असणारा नोकरही. आता मालकाची एकाधिकारशाही संपवायची म्हणजे काय बरे? >> समता, साम्यवाद, गरीबांना समान संधी बर मग समता साम्यवाद समान संधी ही चैन श्रीमंतांसाठी नाही का? का त्यानी फक्त आयकर भरत बसायचे? समान सम्धी जर हवी तर ती 'सर्वाना' का नको?

In reply to by विवेक ठाकूर

'वैचारिक पप्पुगिरि' हि टर्म भारी आहे. आवडली.... बाकीचं चालू द्या.

In reply to by विवेक ठाकूर

गरिबांना कुठल्या संधी नाकारल्या गेल्यात हे जरा विस्ताराने सांगाल का? कन्हैयाच्या कुटुंबाचे उत्पन्न रु. ३००० प्रती महिना आहे. म्हणजे तो गरीब म्हणून गणला जावा. त्याला कुठली संधी नाकारली गेली? जनेवि मध्ये Ph.D करतोय याचा अर्थ मास्टर्स केलं असेलच. ते पण सरकारने दिलेल्या शिष्यवृत्तीवर. वय २८/२९ असून, घराची परिस्थिती हलाखीची असून दुसरा कुठला काम धंदा न करता एवढे उच्च शिक्षण मिळतंय. मग कुठला अन्याय होतोय? कोणावर होतोय? कुठल्या विषमतेबद्दल बोलतोय हा? बरं हा आणि अश्या बाकी गरीब मुलांना संधी मिळू नये म्हणून कोणी काही काड्या केल्यात का? संधी तर सर्वांना समानच आहेत किंबहुना आरक्षणामुळे एका गटाला संधी पण नाकारली गेलीये. जगात प्रत्येक माणूस वेगळा आहे मग सगळं समान कसं असेल? प्रत्येकाला त्याच्या वकुबाप्रमाणे यश, पैसे, प्रसिद्धी, मान मरातब मिळतो. उगाच सर्व सगळ्याच बाबतीत समान असावेत ही इच्छा धरणे हे निसर्गनियमांविरुद्ध आहे.