नकोत मजला टाळ्या चुटक्या
वाहवाही अन मान बढाई
कोऱ्या पाट्या तुमच्या आमच्या
रसिक आपुली बाप नि आई
कुणी कल्पतो आकाशगंगा
कुणी वर्णीतो प्रीत पतंगा
नाद कुणासी विठू रायाचा
रंगून जातो भलत्या रंगा
अलंकारे सजवी कुणी कविता
कुणाची वाहे दुःख सरिता
भलत्या भलत्या कल्पना स्फुर्ती
शब्द निराळे भाव पेरिता
नवकवी मीही धडपड करतो
फाटके तुटके शेले विणतो
तुमच्या दारी हात जोडुनी
कृपाप्रसादा निशिदिनी झुरतो
रांगत्या मुलासी उचलुनी घ्यावे
अनुभव अंजन नयनी दयावे
तुम्हीच दावा चूक आमुची
दिशा दावूनी मार्गस्थ करावे
शब्दास शब्दांनी न्याय मिळावा
नवजात प्रवाहे सहज रुळावा
कल्पवृक्ष हा बहरत राहो
नव्या कळ्यांनी सदा फ़ुलावा
:हरिदास पाटील
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3309
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहवा वाहवा, सुरेख
कविता जितकी मनस्वी, तितकी ती
व्वा माऊली
धन्यवाद
In reply to व्वा माऊली by लीलाधर
वाह वाह
धन्यवाद
छान कविता!
स्वागत !
झ्याक भट्टी जमलिया!
मस्त! कविता आवडली!
छान
सहजसुंदर कविता.
धन्यवाद
झकास सुरुवात! कविता आवडली.
क्लास कविता ! वाचनखुण साठवली
सुरेख!
सुंदर कविता. आवडली.
काय सुरेख काव्य आहे हे.
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, .......
In reply to काय सुरेख काव्य आहे हे. by मिसळपाव
वाहवा!!
In reply to काय सुरेख काव्य आहे हे. by मिसळपाव
वाह वाह सर....
In reply to काय सुरेख काव्य आहे हे. by मिसळपाव