कायप्पावर आमच्या एका ग्रुप मध्ये एका डाव्या काकांनी उच्च मध्यमवर्गीयांवर ताशेरे ओढले. ते उजवे असतात आणि आता खूप खूप बोलू लागले आहेत, निव्वळ जोक्स फॉर्वर्ड करतात हा त्यांच्या आक्षेप होता. त्यावर तिथे मी दिलेले उत्तर इथेही द्यावेसे वाटले. तिकडची धुणी इकडे धुवायची नसल्याने मी नामोल्लेख खोडले आहेत. मुद्दे स्वतंत्र आहेत, व्यक्तिगत काही नाही. तरी संपादक मंडळ धागा उडवायला स्वतंत्र आहे. >>>>>>
'अबक'च्या लेखातील एक बाब खटकली होती ती म्हणजे त्यांनी उच्च मध्यमवर्गीय म्हणजे सरसकट उजवे, मोदीसमर्थक, वाचनशून्य, उठवळ, फालतू जोक्स फॉरवर्ड करणारी, गुडी गुडी आयुष्य जगणारी जमात असे एक gross generalisation केले आहे. त्यात त्यांनी 'उच्च मध्यमवर्गीय उजवे' हा शब्द वापरलेला नाही तर 'उच्च मध्यमवर्गीय लोक' हा प्रयोग केला आहे. सरसकट generalisation कधीही चूकच! त्यांचा दुसरा आक्षेप आहे उच्च मध्यमवर्ग खूप खूप बोलतात('त्यांच्या त्यांच्या' व्हाट्सअप्प, फेसबुक खासगी कट्टे) ह्यावर! ह्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे कळत नाही! त्यांनी 'त्यांच्या त्यांच्या गटात' का बोलू नये? बाहेरसुद्धा का बोलू नये? त्यांना ते स्वातंत्र्य का नाही? किंवा त्यांनी प्रत्येक वेळी विद्वत्तापूर्ण चर्चाच करावी का? खासगी कट्टयांवर त्यांना हव्या त्या भाषेत हवे ते बोलायचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. सार्वजनिक नियम नक्कीच वेगळे असू शकतात.
मुळात आपण उच्च मध्यमवर्गीय म्हणजे 'नवश्रीमंत' म्हणजे 'इतरांचे शोषण करून वर आलेले' किंवा 'नवशोषक वर्ग' असा काहीसा समज करून घेतला आहे. त्यामुळे सतत त्यांना अपराधीपणाची जाणीव करुन देत असतो. they are less equal अशी आपली समजूत असते.त्यांची वैचारिक चर्चा करण्याची बौद्धिक क्षमता किंवा अभ्यास नसतो असा आपला समज असतो. याच गैरसमाजातून मग आपण सरसकट या वर्गाला 'उजव्या'चा शिक्का मारून मोकळे होतो. एकदा का आपण त्यांच्यावर आपल्याला सोयीस्कर असा शिक्का मारला की मग आपण आपल्या जबाबदारीतून मोकळे होतो! त्याने विरोध व्यक्त केला तर ' तू उजवा, तू शोषक, तुला काय कळणार गरिबांच्या व्यथा, तुझा अभ्यास काय? तुला बोलायचा अधिकार काय? तुझी लायकी काय? तू फक्त संता बंता जोक्स फॉरवर्ड करू शकतोस' असे म्हणून आपण मोकळे व्हायचे!! मग हा वर्ग, जो आधी उजवा नसेलही, पण तो निव्वळ उच्च मध्यमवर्गीय असल्याने अशी वागणूक मिळताना पाहून उजवीकडे वळला तर त्यात त्याची काय चूक?
अतिडाव्यांच्या 'आम्हालाच सर्वकाही कळते' ह्या अहंगंडाचाच ह्या वर्गाला जास्त राग आहे. इतकी वर्षे बोलायला व्यासपीठच मिळाले नाही या वर्गाला, कारण व्यासपीठावर बोलायची ह्यांची लायकी नाही, हे आपणच ठरवले होते. हे दाबले गेलेले आवाज आता उफाळून बाहेर पडत आहेत असे वाटते. त्यांना सार्वजनिक व्यासपीठ आधी मिळू दिले नाही, ते आता सोशल मीडियावर व्यक्त होताहेत. हे सर्व उजवे आहेत असा फार मोठ्ठा गैरसमज अबकचा झाला आहे. शिव्याशाप, फोटोशॉप मला सोशल मीडियावर सगळीकडून मिळताहेत. हे 'खूप खूप बोलणारे' सगळ्याच विचारधारांचे आहेत, कसलीही विचारधारा नसलेलेही आहेत. प्रत्येकाने व्यासंगी असावे, निश्चित विचारधारा असलेले असावे, उच्च अभिरुचीसंपन्न असावे वगैरे आपले गैरसमज आहेत, ते चूक आहेत. त्यांना चारचौघांसारखे, मौजमजेत जगावेसे वाटत असेल तर जगू द्यावे. ते त्यांचे आयुष्य आहे. डावी भूमिका जगणे म्हणजेच उत्तम आयुष्य असे का असावे? तसेच, उजवी राजकीय भूमिका वाईट्ट आणि डावी उत्तम असे का मनाशी गच्च बांधून ठेवावे? कारण जर हिटलर आणि मुसोलिनी उजवे असतील तर स्टालिन आणि पॉल पॉट डावे होते, अमेरिका भांडवलवादी क्रुरकर्मा असेल तर उत्तर कोरिया साम्यवादी क्रुरकर्मा आहे. म्हणजे कोणतीही विचारधारा, जर ताणून धरली तर वाईटच! अती तिथे माती. पण आपण, भारतात मात्र सातत्याने उजव्यांनाच vilify, victimize केले आहे असे नाही वाटत का?
मी स्वतः उच्च मध्यमवर्गीय आहे( नव्वदोत्तर उदारीकरणानंतर उदयाला आलेला) आणि तरीही मी डावीकडे झुकलेला आहे, माझा व्यासंग कदाचित एवढा नसेल, पण मी वाचनशून्य नक्कीच नाही, मी विचार करतो आणि भरपूर विचार करूनच मी extreme left आणि extreme right ह्या दोन्ही विचारधारा नाकारून किंचित डावीकडे झुकलेली centre leftist विचारधारा स्वीकारलेली आहे, right of the centre नाही. पण जेव्हा डावे माझ्या सांपत्तिक आणि सामाजिक स्थितीकडे पाहून माझ्यावर थेट उजवा, संघी असे शिक्के लावतात तेव्हा मला वेदना होतात. हे एकदाच झालेले नाही तर सातत्याने होत असते. मी कधीही संघसमर्थक नव्हतो, कधीही नरेंद्र मोदी as a PM candidate मी समर्थन केले नव्हते ,तरीही मला न पटलेल्या डाव्यांच्या एखाद्या गोष्टीविषयी बोललो तर लगेच लेबल लावले जाते. एवढ्या victimizationनंतरही मी अजूनही माझ्या centre leftist भूमिकेशी चिकटून आहे, कारण त्याला विचारांचे अधिष्ठान आहे, पण सगळेच चिकटून राहत नाहीत. ते अखेर उजवीकडे वळतात.
थोडक्यात काय तर डावे उजव्यांपेक्षा फार वेगळे नाहीत. डावेसुद्धा उजव्यांप्रमाणेच generalisation करतात, शिक्के मारून मोकळे होतात, इतरांना बोलू देत नाहीत, त्यांचा व्यक्त होण्याचा अधिकार नाकारतात, त्यांचे मनोबल खच्ची करतात; फरक हाच की डाव्यांची भाषा संयमित असते 'बरेचदा', 'well articulated rant' असे म्हणेन मी. उजव्यांची भाषा अनेकदा gross आणि आक्रमक असते. (पण उजव्यांची भाषा gross आणि आक्रमकच असते असे generalisation मी करणार नाही. अतिशय संयमित भाषेत, मुद्देसूद प्रतिवाद करणारे उजवे माझे मित्र आहेत.)
मुद्दा हाच की सातत्याने एकाच गटाला vilify करू नये, कमअस्सल म्हणून हिणवू नये. दुसरी बाजू ऐकून न घेणारा अतिडावा 'विचारवंत' आणि दुसरी बाजू ऐकूण न घेणारा अतिउजवा 'uncivilized raccoon' कसा?
वाचने
32479
प्रतिक्रिया
137
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो, बरोबर.
In reply to मला वाटते by विकास
पत्रकार म्हणजे,
In reply to मला वाटते by विकास
मला एक साधा प्रश्न पडलाय,
हे विचारवंत नेहमी डावेचं का
In reply to मला एक साधा प्रश्न पडलाय, by गणामास्तर
हे विचारवंत नेहमी डावेचं का असतात ?जशी सेक्युलर मंडळी शांतताप्रिय धर्माची सतत पाठराखण करतात तसेच काहीसे प्रकरण आहे.का फक्त डाव्या विचारसरणीच्या लोकांनाच विचारवंत म्हणायचे असे काही आहे ?अर्थातच. प्रवाहाच्या विरोधी लिहून, बोलून प्रकाशझोतात राहिले की हा शिक्का मिळतो. त्यानंतर रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यापासून दहशतवाद्यांपर्यंत सर्वांच्या ह्युमन राईट्सची आठवण येते. गांधी विथ गन्स वगैरे वगैर..कम्युनिस्ट दिसला कि त्याला पोत्यात घालून बुडवला पाहिजेअसाच विचार डाव्यांकडून उजव्यांप्रती अंमलात आणला जातो. मात्र प्राण गमावलेली व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची, विचारधारेची आहे त्यावर आवाज उठण्याची तीव्रता अवलंबून असल्याने आवाज ऐकू येण्याचे प्रमाणही बदलते.ठ्ठो!
In reply to हे विचारवंत नेहमी डावेचं का by मोदक
विचार
In reply to हे विचारवंत नेहमी डावेचं का by मोदक
सगळ्या जगाने नाकारलेल्या या
In reply to विचार by गॅरी ट्रुमन
शेवटचे वाक्य षटकार आहे साहेब
In reply to सगळ्या जगाने नाकारलेल्या या by गुलाम
हाणुमोदन.
In reply to शेवटचे वाक्य षटकार आहे साहेब by नाना स्कॉच
+१ जोरदार वाक्य आहे. अर्ध
In reply to शेवटचे वाक्य षटकार आहे साहेब by नाना स्कॉच
++ सहमत
In reply to सगळ्या जगाने नाकारलेल्या या by गुलाम
हा हा हा
In reply to सगळ्या जगाने नाकारलेल्या या by गुलाम
भारतात कम्युनिस्टांचे राज्य
In reply to हा हा हा by गॅरी ट्रुमन
दगडापेक्षा वीट मऊ
In reply to भारतात कम्युनिस्टांचे राज्य by बाळ सप्रे
_/\_
In reply to दगडापेक्षा वीट मऊ by गॅरी ट्रुमन
अर्रर्र!!! गॅरी ट्रूमैन
In reply to हा हा हा by गॅरी ट्रुमन
जशी आपली इच्छा.
In reply to अर्रर्र!!! गॅरी ट्रूमैन by नाना स्कॉच
इथे कोणी कट्टर 'देशी'प्रेमी
In reply to जशी आपली इच्छा. by गॅरी ट्रुमन
तर्राट जोकर म्हणून एक आयडी
In reply to इथे कोणी कट्टर 'देशी'प्रेमी by स्वामी संकेतानंद
देशप्रेम कट्टर झाले की विदेशी
In reply to इथे कोणी कट्टर 'देशी'प्रेमी by स्वामी संकेतानंद
अजुन एक
In reply to जशी आपली इच्छा. by गॅरी ट्रुमन
जरूर
In reply to अजुन एक by नाना स्कॉच
Objectivity
In reply to अर्रर्र!!! गॅरी ट्रूमैन by नाना स्कॉच
हा हा हा.
In reply to हा हा हा by गॅरी ट्रुमन
मुद्दा
In reply to हा हा हा. by गुलाम
पण मी आधिच म्हणल्याप्रमाणे
In reply to हा हा हा. by गुलाम
भारतीय डावे विरुद्ध अमेरीकन लिबरल्स
In reply to हा हा हा. by गुलाम
- अमेरीकेत लिबरल्स म्हणवणार्यांना स्वतःला ख्रिश्चन अथवा ज्यू म्हणवून घेताना कमी पणा वाटत नाही. किंबहूना ते धर्म हे देखील जीवनाचे अंग मानतात. फक्त ते इतर धर्मांना आणि धर्मियांना कमी लेखत नाहीत. त्याच मुळे सगळे लिबरल्स यात येत नसले तरी, युनिव्हर्सल युनिटेरीयन चर्च हा जो प्रकार आहे तो लिबरल्स चे चर्च म्हणून ओळखला जातो. पण असे अनेक लिबरल्स आहेत जे इतर प्रकारच्या चर्चेस मधे (उदा रोमन कॅथलिक, मेथॉडीस्ट आदी) तसेच ज्यूंच्या सिनॅगॉगशी संलग्न असतात आणि स्वत:ला त्या समुदायाचा भाग समजतात.
- लिबरल्स चे स्थानिक पातळी पासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत राज्य आले तरी त्यांना त्या त्या ठिकाणच्या अधिकृत सभा/अधिवेशने चालू करायच्या आधी प्रार्थना म्हणायला कमी पणा वाटत नाही आणि तशा ते त्या करतात.
देश- अमेरीकन लिबरल्स देखील देशाला कॉन्झर्वेटीव्हज इतकेच मानतात. त्याच्या सीमा राखण्यासाठी ते देखील कमी नसतात. म्हणूनच ९/११ नंतरच्या इराक युद्धाच्या वेळेस त्यांना (अमेरिकन काँग्रेसला) जी गोपनियतेत माहिती देण्यात आली होती ती खरी मानून अनेक लिबरल डेमोक्रॅट्स नी त्या युद्धाला पाठींबा दर्शवला होता. ९/११ च्या ९ महीने आधीच बुश-गोअर यांची निवडणूक गाजलेली होती. बुश वरती अविश्वास होता. तरी देखील ज्यावेळेस (लिबरल) गोअरना ९/११ नंतर प्रतिक्रीया विचारली तेंव्हा त्यांनी बुश हे त्यांचे सर्वोच्च सेनापती आहे असे म्हणून त्यांना जी काही मदत हवी असेल ती विनाशर्त करण्याची तयारी दाखवली.
- नंतरच्या काळात गाँटोनोमो बे क्युबामधील कैद्यांसंदर्भात इथल्या लिबरल्सनी योग्य तोच आवाज केला. पण परदेशात (टेक्निकली मित्रदेशात) जाऊन ओसामाला का मारले म्हणून एकानेही प्रश्न विचारला नाही. किंबहूना तसा निर्णय घेणार्यात लिबरल्सच होते. आणि हो त्यांचे कौतुक करण्यात रिपब्लीकन काँडोलिजा राईस पण पुढे होत्या.
सामाजीक प्रश्न- धार्मिकतेचा संदर्भ देत विज्ञान अथवा वैद्यकीय ज्ञानाला बंदी घालण्यावर आहे - त्यात सगळ्यात तापलेला मुद्दा असतो तो गर्भपाताचा, नंतर दुसरा असतो तो समलिंगी लग्नाचा ("लग्नाचा" - नुसत्या राहण्याचा नाही).
- आर्थिक आघाडीवर लिबरल्स राष्ट्रीय पातळीवर नुसतेच दाखवताना आणि स्थानिक पातळीवर खरेच हे प्रोटेक्टीव्ह असतात. त्यामुळे, युनियन्स त्यांच्या बाजूच्या असतात. या देशात, काहीच क्षेत्रात असेल पण, युनियन्स ना जितके महत्व आहे तितके भारतात देखील नाही असे वाटते. पण मोठ्या प्रमाणावर विचार करताना ते देखील मुक्त अर्थव्यवस्थेचाच स्विकार करतात.
- बंदुकांच्या राजकारणात अधिक नियंत्रण असावे असे म्हणतात. पण बंदुकांवर बंदी आणायला तयारी नसते. किंबहुना यांच्याकडे देखील बंदुका असतात...
अजून पण बरेच असतील पण तुर्तास इतकेच. आता भारतीय डावे कसे आहेत?EPW
In reply to भारतीय डावे विरुद्ध अमेरीकन लिबरल्स by विकास
बोकाजी आणि विकासजी दोघांना
In reply to भारतीय डावे विरुद्ध अमेरीकन लिबरल्स by विकास
धन्यवाद
In reply to बोकाजी आणि विकासजी दोघांना by गुलाम
अंनिस?
In reply to बोकाजी आणि विकासजी दोघांना by गुलाम
२३ मार्च १९३१
In reply to सगळ्या जगाने नाकारलेल्या या by गुलाम
मला वाटते सुखदेव ह्यांचे
In reply to २३ मार्च १९३१ by बोका-ए-आझम
बरोबर.
In reply to मला वाटते सुखदेव ह्यांचे by नाना स्कॉच
शक्य आहे
In reply to २३ मार्च १९३१ by बोका-ए-आझम
प्रतिसाद चुकून भलतीकडे पोस्ट झाला
In reply to २३ मार्च १९३१ by बोका-ए-आझम
सहमत,
In reply to विचार by गॅरी ट्रुमन
असाच विचार डाव्यांकडून
In reply to हे विचारवंत नेहमी डावेचं का by मोदक
वैयक्तिक मत : कम्युनिस्ट
In reply to मला एक साधा प्रश्न पडलाय, by गणामास्तर
असहमत पोते का फुकट घालवायचे?
In reply to मला एक साधा प्रश्न पडलाय, by गणामास्तर
अवांतर : किती उत्पन्न
आपल्या देशात हा प्रश्न सापेक्ष आहे.
In reply to अवांतर : किती उत्पन्न by वगिश
हल्ली सरकारनेच व्याख्या ठरवून
In reply to अवांतर : किती उत्पन्न by वगिश
लेखन आवडले
आवडले...
अगदी परस्परविरोधी!!
____/\_____ अगदी कोपरापासून.
In reply to अगदी परस्परविरोधी!! by सुनील
डावे आणि भाषण स्वातंत्र्य
मुळात
लेख
उजवे असो वा डावे,काही फरक पडत
दोघांच्या "राष्ट्र" या
In reply to उजवे असो वा डावे,काही फरक पडत by चेक आणि मेट
हम्म
In reply to दोघांच्या "राष्ट्र" या by मोदक
निदान संविधानाचा तरी मान
In reply to हम्म by चेक आणि मेट
निदान संविधानाचा तरी मान ठेवावा,असे वाटते.ज्यांना देश ही संकल्पनाच मान्य नाही ते संविधानाचा काय मान ठेवणार?कन्हैयाला जामिन दिल्यावर कोर्टाने छान स्टेटमेंट दिलय.येथे देता येईल का?हम्म
In reply to निदान संविधानाचा तरी मान by मोदक
जल्लोष
In reply to हम्म by चेक आणि मेट
लाल सलाम
हे पोस्टरपण JNU मधलं आहे. :(
उत्तम संतुलित लेख!!!
डावलले गेलेले ते डावे
↓↓↓
In reply to डावलले गेलेले ते डावे by गामा पैलवान
संघाची विचारसरणी बऱ्यापैकी
In reply to डावलले गेलेले ते डावे by गामा पैलवान
असू शकेल
In reply to संघाची विचारसरणी बऱ्यापैकी by तर्राट जोकर
कम्युनिस्ट विचारसरणीही
In reply to संघाची विचारसरणी बऱ्यापैकी by तर्राट जोकर
सगळे पोथीबाज झापडबंदच असतात.
In reply to कम्युनिस्ट विचारसरणीही by बोका-ए-आझम
कम्युनिस्ट मूळ विचारसरणी
डाव्यांमधे कुणी श्रद्धा वगैरे
सध्याच्या गदारोळाच्या दिवसात.