भारतीय डावे आणि भारतीय उच्च मध्यमवर्ग
लेखनप्रकार
कायप्पावर आमच्या एका ग्रुप मध्ये एका डाव्या काकांनी उच्च मध्यमवर्गीयांवर ताशेरे ओढले. ते उजवे असतात आणि आता खूप खूप बोलू लागले आहेत, निव्वळ जोक्स फॉर्वर्ड करतात हा त्यांच्या आक्षेप होता. त्यावर तिथे मी दिलेले उत्तर इथेही द्यावेसे वाटले. तिकडची धुणी इकडे धुवायची नसल्याने मी नामोल्लेख खोडले आहेत. मुद्दे स्वतंत्र आहेत, व्यक्तिगत काही नाही. तरी संपादक मंडळ धागा उडवायला स्वतंत्र आहे. >>>>>>
'अबक'च्या लेखातील एक बाब खटकली होती ती म्हणजे त्यांनी उच्च मध्यमवर्गीय म्हणजे सरसकट उजवे, मोदीसमर्थक, वाचनशून्य, उठवळ, फालतू जोक्स फॉरवर्ड करणारी, गुडी गुडी आयुष्य जगणारी जमात असे एक gross generalisation केले आहे. त्यात त्यांनी 'उच्च मध्यमवर्गीय उजवे' हा शब्द वापरलेला नाही तर 'उच्च मध्यमवर्गीय लोक' हा प्रयोग केला आहे. सरसकट generalisation कधीही चूकच! त्यांचा दुसरा आक्षेप आहे उच्च मध्यमवर्ग खूप खूप बोलतात('त्यांच्या त्यांच्या' व्हाट्सअप्प, फेसबुक खासगी कट्टे) ह्यावर! ह्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे कळत नाही! त्यांनी 'त्यांच्या त्यांच्या गटात' का बोलू नये? बाहेरसुद्धा का बोलू नये? त्यांना ते स्वातंत्र्य का नाही? किंवा त्यांनी प्रत्येक वेळी विद्वत्तापूर्ण चर्चाच करावी का? खासगी कट्टयांवर त्यांना हव्या त्या भाषेत हवे ते बोलायचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. सार्वजनिक नियम नक्कीच वेगळे असू शकतात.
मुळात आपण उच्च मध्यमवर्गीय म्हणजे 'नवश्रीमंत' म्हणजे 'इतरांचे शोषण करून वर आलेले' किंवा 'नवशोषक वर्ग' असा काहीसा समज करून घेतला आहे. त्यामुळे सतत त्यांना अपराधीपणाची जाणीव करुन देत असतो. they are less equal अशी आपली समजूत असते.त्यांची वैचारिक चर्चा करण्याची बौद्धिक क्षमता किंवा अभ्यास नसतो असा आपला समज असतो. याच गैरसमाजातून मग आपण सरसकट या वर्गाला 'उजव्या'चा शिक्का मारून मोकळे होतो. एकदा का आपण त्यांच्यावर आपल्याला सोयीस्कर असा शिक्का मारला की मग आपण आपल्या जबाबदारीतून मोकळे होतो! त्याने विरोध व्यक्त केला तर ' तू उजवा, तू शोषक, तुला काय कळणार गरिबांच्या व्यथा, तुझा अभ्यास काय? तुला बोलायचा अधिकार काय? तुझी लायकी काय? तू फक्त संता बंता जोक्स फॉरवर्ड करू शकतोस' असे म्हणून आपण मोकळे व्हायचे!! मग हा वर्ग, जो आधी उजवा नसेलही, पण तो निव्वळ उच्च मध्यमवर्गीय असल्याने अशी वागणूक मिळताना पाहून उजवीकडे वळला तर त्यात त्याची काय चूक?
अतिडाव्यांच्या 'आम्हालाच सर्वकाही कळते' ह्या अहंगंडाचाच ह्या वर्गाला जास्त राग आहे. इतकी वर्षे बोलायला व्यासपीठच मिळाले नाही या वर्गाला, कारण व्यासपीठावर बोलायची ह्यांची लायकी नाही, हे आपणच ठरवले होते. हे दाबले गेलेले आवाज आता उफाळून बाहेर पडत आहेत असे वाटते. त्यांना सार्वजनिक व्यासपीठ आधी मिळू दिले नाही, ते आता सोशल मीडियावर व्यक्त होताहेत. हे सर्व उजवे आहेत असा फार मोठ्ठा गैरसमज अबकचा झाला आहे. शिव्याशाप, फोटोशॉप मला सोशल मीडियावर सगळीकडून मिळताहेत. हे 'खूप खूप बोलणारे' सगळ्याच विचारधारांचे आहेत, कसलीही विचारधारा नसलेलेही आहेत. प्रत्येकाने व्यासंगी असावे, निश्चित विचारधारा असलेले असावे, उच्च अभिरुचीसंपन्न असावे वगैरे आपले गैरसमज आहेत, ते चूक आहेत. त्यांना चारचौघांसारखे, मौजमजेत जगावेसे वाटत असेल तर जगू द्यावे. ते त्यांचे आयुष्य आहे. डावी भूमिका जगणे म्हणजेच उत्तम आयुष्य असे का असावे? तसेच, उजवी राजकीय भूमिका वाईट्ट आणि डावी उत्तम असे का मनाशी गच्च बांधून ठेवावे? कारण जर हिटलर आणि मुसोलिनी उजवे असतील तर स्टालिन आणि पॉल पॉट डावे होते, अमेरिका भांडवलवादी क्रुरकर्मा असेल तर उत्तर कोरिया साम्यवादी क्रुरकर्मा आहे. म्हणजे कोणतीही विचारधारा, जर ताणून धरली तर वाईटच! अती तिथे माती. पण आपण, भारतात मात्र सातत्याने उजव्यांनाच vilify, victimize केले आहे असे नाही वाटत का?
मी स्वतः उच्च मध्यमवर्गीय आहे( नव्वदोत्तर उदारीकरणानंतर उदयाला आलेला) आणि तरीही मी डावीकडे झुकलेला आहे, माझा व्यासंग कदाचित एवढा नसेल, पण मी वाचनशून्य नक्कीच नाही, मी विचार करतो आणि भरपूर विचार करूनच मी extreme left आणि extreme right ह्या दोन्ही विचारधारा नाकारून किंचित डावीकडे झुकलेली centre leftist विचारधारा स्वीकारलेली आहे, right of the centre नाही. पण जेव्हा डावे माझ्या सांपत्तिक आणि सामाजिक स्थितीकडे पाहून माझ्यावर थेट उजवा, संघी असे शिक्के लावतात तेव्हा मला वेदना होतात. हे एकदाच झालेले नाही तर सातत्याने होत असते. मी कधीही संघसमर्थक नव्हतो, कधीही नरेंद्र मोदी as a PM candidate मी समर्थन केले नव्हते ,तरीही मला न पटलेल्या डाव्यांच्या एखाद्या गोष्टीविषयी बोललो तर लगेच लेबल लावले जाते. एवढ्या victimizationनंतरही मी अजूनही माझ्या centre leftist भूमिकेशी चिकटून आहे, कारण त्याला विचारांचे अधिष्ठान आहे, पण सगळेच चिकटून राहत नाहीत. ते अखेर उजवीकडे वळतात.
थोडक्यात काय तर डावे उजव्यांपेक्षा फार वेगळे नाहीत. डावेसुद्धा उजव्यांप्रमाणेच generalisation करतात, शिक्के मारून मोकळे होतात, इतरांना बोलू देत नाहीत, त्यांचा व्यक्त होण्याचा अधिकार नाकारतात, त्यांचे मनोबल खच्ची करतात; फरक हाच की डाव्यांची भाषा संयमित असते 'बरेचदा', 'well articulated rant' असे म्हणेन मी. उजव्यांची भाषा अनेकदा gross आणि आक्रमक असते. (पण उजव्यांची भाषा gross आणि आक्रमकच असते असे generalisation मी करणार नाही. अतिशय संयमित भाषेत, मुद्देसूद प्रतिवाद करणारे उजवे माझे मित्र आहेत.)
मुद्दा हाच की सातत्याने एकाच गटाला vilify करू नये, कमअस्सल म्हणून हिणवू नये. दुसरी बाजू ऐकून न घेणारा अतिडावा 'विचारवंत' आणि दुसरी बाजू ऐकूण न घेणारा अतिउजवा 'uncivilized raccoon' कसा?
वाचने
32426
वाचनखूण
प्रतिक्रिया
137
संयमित लिखाण ! आवडले !
योग्य मार्ग
In reply to योग्य मार्ग by आतिवास
हे नक्की कसे होत असेल
In reply to योग्य मार्ग by आतिवास
सहमत. याचे जनरलायझेशनही करता
In reply to योग्य मार्ग by आतिवास
लेख आणि आतिवास यांचा प्रतिसाद
@डावेसुद्धा उजव्यांप्रमाणेच
लेख आवडला. एकंदरीतच चर्चेची
In reply to लेख आवडला. एकंदरीतच चर्चेची by राजेश घासकडवी
+१
In reply to लेख आवडला. एकंदरीतच चर्चेची by राजेश घासकडवी
सहमत
In reply to सहमत by स्वामी संकेतानंद
+१
मुळात उजवे आणि डावे हा प्रकार
In reply to मुळात उजवे आणि डावे हा प्रकार by स्पा
+१
In reply to +१ by असंका
+१
In reply to +१ by नीलमोहर
मले बी सांग जा
In reply to मले बी सांग जा by चिनार
आधी मला तर कळू द्या,
In reply to आधी मला तर कळू द्या, by नीलमोहर
+१
In reply to +१ by स्पा
लेफ्ट राईट..
In reply to मुळात उजवे आणि डावे हा प्रकार by स्पा
धुत्या आणि जेवत्या हातांकडे
In reply to धुत्या आणि जेवत्या हातांकडे by प्रचेतस
धुत्या हाताचे महत्व जाणून
In reply to मुळात उजवे आणि डावे हा प्रकार by स्पा
माझे २ पैसे.
In reply to मुळात उजवे आणि डावे हा प्रकार by स्पा
जनरलायझेशन करायचे झाले तर तू
In reply to मुळात उजवे आणि डावे हा प्रकार by स्पा
या विषयावर अगदी सोप्या
In reply to मुळात उजवे आणि डावे हा प्रकार by स्पा
स्पावड्या...
In reply to मुळात उजवे आणि डावे हा प्रकार by स्पा
स्पा साहेब
In reply to स्पा साहेब by नाना स्कॉच
हे खरं आहे
In reply to हे खरं आहे by बोका-ए-आझम
म्हणजे ही राजानेच भरवली असणार
In reply to म्हणजे ही राजानेच भरवली असणार by नाना स्कॉच
राजाला भरवावी लागली होती.
In reply to राजाला भरवावी लागली होती. by बोका-ए-आझम
धन्यवाद
In reply to स्पा साहेब by नाना स्कॉच
कधीतरी कुणीतरी कुणाच्यातरी
In reply to कधीतरी कुणीतरी कुणाच्यातरी by असंका
ह्याहुन गमतीशीर एक प्रथा आहे ऐकिवात
In reply to ह्याहुन गमतीशीर एक प्रथा आहे ऐकिवात by नाना स्कॉच
ऐकावं ते नवल!!
म्हणजे कोणतीही विचारधारा, जर
:)
In reply to :) by पैसा
तुमचा अंदाज चुकलेला असण्याची
In reply to तुमचा अंदाज चुकलेला असण्याची by स्वामी संकेतानंद
हाहाहा!
विचारसरणी
जन्तर मन्तर वर जमलेले उच्च
अधिकांश मुले/ मुलींच्या होतात सिगरेटी होत्या
अधिष्ठान
In reply to अधिष्ठान by llपुण्याचे पेशवेll
नाही, माझ्या विचारांचे आहे,
भारतामाजी डावे उजवे :)
लेखन भावलं
हृदय आणि मेंदू
In reply to हृदय आणि मेंदू by हुप्प्या
तुम्ही विशीत असताना डाव्या
In reply to तुम्ही विशीत असताना डाव्या by गॅरी ट्रुमन
हा हा हा!
In reply to हृदय आणि मेंदू by हुप्प्या
तुम्ही विशीत असताना डाव्या
जेव्हा डावे आपल्याला उजवे
अमाले फक्त लारा न तेंडुलकर
In reply to अमाले फक्त लारा न तेंडुलकर by स्पा
आमच्या काळातील डावे-उजवे....आणि त्यांच्यातील लढती....
In reply to आमच्या काळातील डावे-उजवे....आणि त्यांच्यातील लढती.... by मुक्त विहारि
लिली आणि सोबर्स
In reply to लिली आणि सोबर्स by बोका-ए-आझम
सोबर्स आणि लिली...
In reply to आमच्या काळातील डावे-उजवे....आणि त्यांच्यातील लढती.... by मुक्त विहारि
आमच्या काळात फेडरर आणि नदाल :
उजवं असणं चुकीचं नाही, डावं असणंही चुकीचं नाही
प्रत्यक्ष व्यवहारात उजवे,
In reply to प्रत्यक्ष व्यवहारात उजवे, by डॉ सुहास म्हात्रे
:)
मूळ समस्या कुठली विचारधारा चांगली हा नाहि
भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस
In reply to भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस by जयंत कुलकर्णी
भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस
भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस तरुणपणी डाव्या विचारसरणीकडे झुकलेला असतो. त्या काळात तो दाढी खाजवत हॉटेलमधे बसून भांडवलशाहीवर ताशेरे झाडत असतो. क्रांतीच्या गप्पा मारतो, चे गवेराबद्दल बोलतो.बालशाखेपासून संघात जाणारे सुद्धा? ;) बाकी चे गवेराचे टीशर्ट घालणार्यांना "चे चा इतिहास माहिती आहे का?" असे दर वेळी विचारावेसे वाटते. (हलके घ्यावे. सरसकटीकरण वाटते आहे म्हणून असा प्रतिसाद दिला आहे)In reply to भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस by मोदक
डावी विचारसरणी म्हणजे केवळ
In reply to डावी विचारसरणी म्हणजे केवळ by आनन्दा
विशीत तुम्ही पैसा म्हणजे
In reply to डावी विचारसरणी म्हणजे केवळ by आनन्दा
एखादा माणून पूर्णपणे डावा
एखादा माणून पूर्णपणे डावा नसेल्, पण वयाच्या विशीपेक्षा वयाच्या चाळीशीत तो नक्कीच जास्त उजवा असेल.सहमत. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :)In reply to एखादा माणून पूर्णपणे डावा by मोदक
चाळिशीत डावे
In reply to चाळिशीत डावे by पैसा
विचारवंत.
In reply to चाळिशीत डावे by पैसा
चाळिशीत डावे राहिलेले लोक,
चाळिशीत डावे राहिलेले लोक, त्यांना काय म्हणावे? स्वप्नात जगणारे?ह्म्म.. विचार करण्यासारखा प्रश्न आहे. माझ्यामते चाळीशीमध्ये डावे राहणार्यांमध्ये तीन प्रकार असतात. एक डाव्या चळवळीमध्ये आत्तापर्यंत पूर्ण आयुष्य घालवल्याने (नाईलाजाने) डावे राहिलेले लोक. विचार बदलणे म्हणजे चळवळीशी प्रतारणा किंवा आत्तापर्यंत घेतलेली भुमिका कशी बदलायची असे विचार असलेले "गोंधळलेले" लोक्स. दुसरे म्हणजे कोणताही एक विशिष्ट विचार किंवा चळवळ किंवा भुमिका यांच्याशी एकनिष्ठ न राहता केवळ प्रसिद्धीसाठी डावे राहिल्याचा ढोल पिटणारे लोक्स. "प्रसिद्धीलोलूप" यातलेच काही लोक्स उजव्यांचा तिरस्कार करणारे म्हणून "डावे" असेही असतात. राहिलेले खरेखुरे डावे लोक. त्यांना बरेच काही बदलायचे असते परंतु फारसा पाठिंबा नसतो आणि जो पाठिंबा मिळतो त्या पाठिंब्याचा 'बदल घडविण्यासाठी' फारसा उपयोग नसतो. त्यामुळे हे लोक नेहमी सत्ताधार्यांवर चिडलेले असतात. श्रीमंतीचा घाऊक तिरस्कार करतात. पोकळ आंदोलने वगैरे करतात आणि अशी आंदोलने करूनच आपण "सत्याचा आवाज बुलंद ठेवत आहोत" अशा भ्रमामध्ये जगतात. प्रत्यक्षात असेच आहे का?In reply to भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस by मोदक
चे चे टीशर्ट घालून मोदींच्या सभांना हजेरी
In reply to चे चे टीशर्ट घालून मोदींच्या सभांना हजेरी by गॅरी ट्रुमन
चे गवेरावर लिहिले तर तो
In reply to चे गवेरावर लिहिले तर तो by जयंत कुलकर्णी
नाही
In reply to चे गवेरावर लिहिले तर तो by जयंत कुलकर्णी
मी जेव्हा तरुण होतो तेव्हा चे
मी जेव्हा तरुण होतो तेव्हा चे गवेराच्या बर्यापैकी प्रभावाखाली असायचो..म्हणजे तुम्ही आता प्रभावाखाली नाही आहात. मग तर तुम्ही लिहायलाच हवे. विचार बदलण्याचे नक्की काय कारण, प्रभावातून बाहेर का आलात? एकंदर स्थित्यंतर कसे झाले वगैरे वगैरे. नक्की लिहाच.In reply to चे गवेरावर लिहिले तर तो by जयंत कुलकर्णी
जरुर लिहा.
In reply to जरुर लिहा. by बोका-ए-आझम
मला वाटते
In reply to मला वाटते by विकास
हो, बरोबर.
In reply to मला वाटते by विकास
पत्रकार म्हणजे,
मला एक साधा प्रश्न पडलाय,
In reply to मला एक साधा प्रश्न पडलाय, by गणामास्तर
हे विचारवंत नेहमी डावेचं का
हे विचारवंत नेहमी डावेचं का असतात ?जशी सेक्युलर मंडळी शांतताप्रिय धर्माची सतत पाठराखण करतात तसेच काहीसे प्रकरण आहे.का फक्त डाव्या विचारसरणीच्या लोकांनाच विचारवंत म्हणायचे असे काही आहे ?अर्थातच. प्रवाहाच्या विरोधी लिहून, बोलून प्रकाशझोतात राहिले की हा शिक्का मिळतो. त्यानंतर रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यापासून दहशतवाद्यांपर्यंत सर्वांच्या ह्युमन राईट्सची आठवण येते. गांधी विथ गन्स वगैरे वगैर..कम्युनिस्ट दिसला कि त्याला पोत्यात घालून बुडवला पाहिजेअसाच विचार डाव्यांकडून उजव्यांप्रती अंमलात आणला जातो. मात्र प्राण गमावलेली व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची, विचारधारेची आहे त्यावर आवाज उठण्याची तीव्रता अवलंबून असल्याने आवाज ऐकू येण्याचे प्रमाणही बदलते.In reply to हे विचारवंत नेहमी डावेचं का by मोदक
ठ्ठो!
In reply to हे विचारवंत नेहमी डावेचं का by मोदक
विचार
In reply to विचार by गॅरी ट्रुमन
सगळ्या जगाने नाकारलेल्या या
In reply to सगळ्या जगाने नाकारलेल्या या by गुलाम
शेवटचे वाक्य षटकार आहे साहेब
In reply to शेवटचे वाक्य षटकार आहे साहेब by नाना स्कॉच
हाणुमोदन.
In reply to शेवटचे वाक्य षटकार आहे साहेब by नाना स्कॉच
+१ जोरदार वाक्य आहे. अर्ध
In reply to सगळ्या जगाने नाकारलेल्या या by गुलाम
++ सहमत
In reply to सगळ्या जगाने नाकारलेल्या या by गुलाम
हा हा हा
In reply to हा हा हा by गॅरी ट्रुमन
भारतात कम्युनिस्टांचे राज्य
In reply to भारतात कम्युनिस्टांचे राज्य by बाळ सप्रे
दगडापेक्षा वीट मऊ
In reply to दगडापेक्षा वीट मऊ by गॅरी ट्रुमन
_/\_
In reply to हा हा हा by गॅरी ट्रुमन
अर्रर्र!!! गॅरी ट्रूमैन
In reply to अर्रर्र!!! गॅरी ट्रूमैन by नाना स्कॉच
जशी आपली इच्छा.
In reply to जशी आपली इच्छा. by गॅरी ट्रुमन
इथे कोणी कट्टर 'देशी'प्रेमी
In reply to इथे कोणी कट्टर 'देशी'प्रेमी by स्वामी संकेतानंद
तर्राट जोकर म्हणून एक आयडी
In reply to इथे कोणी कट्टर 'देशी'प्रेमी by स्वामी संकेतानंद
देशप्रेम कट्टर झाले की विदेशी