"काय झालां तेतेबाय?"
"अगो! काय सांगतलंय कमळ्या? हेनी माकां खूपच वैताग आणलोसा.रोजचो उच्छाद. भांडाक काय तरी तेंका निमित्त लागता झालां."
"भावडो आता म्हातारो झालो.लहान पोरा सारखो भांडतां कित्या? मोठ्ठ्या मोठ्ठ्यान सकाळी तुमच्या घरातून आवाज येय होते."
"कमळ्या,अगो ऐक तर खरां, काल गुंडू जोश्यांचा बायजा आपल्या घोवांक घेओन आमच्याकडे इला. बायजाचा आत्ताच लगिन झालां मां?.मी आपलो त्येंका चहाचो आग्रह केलंय.होती नव्हती ती चहाची पूड घालून चहा केलंय.मग चहाची पूड संपतली नाय?
सकाळी हो उच्छाद.
"मी साखरपाणी पिंवचंय नाय."
आता माकां सांग आपल्या पुरतो हे चहाची पूड आणतत.आणि आम्ही सगळ्यांनी साखरपाणी पिऊक व्होयां.
एकदिवस हेंनी पिलांतर काय झालां?"
"अगे तेतेबाय,तू माझ्याकडून चहाचीपूड न्हेवची होतंस."
"कित्याक?रोज रोज तुझ्याकडे कायनाकाय तरी मागूग माका लाज वाटतां.
गो कमळ्या,ते तेंच्यापुरतीच पूड आणतत.आम्ही सगळे साखरपाणी सदीना पितो."
"मोठो कंजूष आसा भावडो."
"कंजूष? अगो, महाकंजूष.
न्हाताना लाईफबॉयची खापटी आम्ही आंगाक चोळूची.आणि हे लक्स लावतले."
"मेल्याच्या आंगांक घाण येत असतली."
"तसां नाय आपण छंदीफंदी र्हवतले,मग बायकापोरां मरेनात."
"आता सहा पोरा झाली भावड्याक अक्कल कधी येतली.?"
"अगो कमळ्या,पोरां होवची काय आपल्या हातात असतां? देवाची करणी आणि नारळात पाणी."
"कसल्यो तेतेबाय तुझ्यो जुनाट समजुती?.अगे ह्या सगळां माणसाच्या हातात असताला नाय तर कोणाच्या?"
"अगो कमळ्या,माकां "माणसाच्या हातात नाय" म्हणजे बायलमाणसाच्या हातात नाय असां म्हणूचा आसां.नाय तरी पुरूषाची आणि कुत्र्याची जात एक असां म्हणतंत तां काय चुकीचा नाय.कुत्रे तरी निदान फक्त मार्गशिर्षातच येतंत कांडावर. पुरूष मेलो दिवस नाय रात्र नाय.सदाचा आपला तांच.दुसरो धंदोच नाय.
मात्र तुझ्या घोवांक, कमळ्या, मी वायट म्हणूचंय नाय हां! तुझो श्रीरंग, देव माणूस आसा. त्या देवपुरुषाक काय मी नांवां ठेवलंय तर माकां पाप लागात.अगदी धुतलेल्या तांदाळांसारखो आसा तुझो श्रीरंग.नाय म्हटलां तरी तुझ्या घोवांसारखे आसत अजून काही पुरूष देवमाणासारखे."
"अगे तेतेबाय,माकां नेहमीच विचार येतां,रोजचे तुम्ही भांडतात.बारा महिने तेरा काळ तुमचा आपला तूं,तूं मी,मी चालूंच असतां, भावडो साळसूद कसो बाहेरच्या पडवीत झोपतां आणि तूं पोरांक घेऊन माजघरात झोपतंय तरी पण दर दोन दोन वर्षांक आपला तुझा चालूच आसां.?"
"काय सांगतंलय कमळ्या,माझी कर्मदशा! दुसरां काय?
घासत्याल बुदलीत घालून दिवो पेटतो ठेव्न माजघरात मी झोपतंय.ही सहाही पोरां आजूबाजूक लोळत असतंत.एकमेकाक लाथो मारीत असतंत झोपेत.ह्या आता दोन
वर्षाचा कुसधुणा, तेचां नांव शेवटचा समजून "सरला" म्हणून ठेवलंय.पण माका खात्री नाय तुझ्या भावड्याची.तालात इले की रात्री माझघरात येव्न बुदली मालवतत,
काम झाला की वाघासारखे घोरत पडत्तंत. मग आंगा खाली मुलगी चिरडली जातली हेंचो आगो नाय पिछो. सकाळ झाली की उठून जातंत.गम्मत ऐक,
सकाळी साखरपाणी पितानां हो बारा वर्षाचो दाजी माका कसो सांगता,
"आये, रात्री माझघरात वाघ खैसून येतां?माका रात्रभर झोप लागणां नाय."
ऐकून शरम वाटतां माकां.ह्या दाजग्याक मी काय सांगू माझा कर्म.?
कमळ्या,आतां तुमच्याकडे साधना इलीत.गोळ्यो काय?निरोध काय? काय काय सांगूक नको.
आमच्या वेळेक फक्त साधना नावाची नटी होती.आणि काय नाय."
"तेतेबाय,इतक्या होवून सुद्धा तुका विनोद बरे सुचतंत.ह्या तुझ्याकडून शिकण्यासारख्या आसां हां!"
"तां जावदे,माकां एक सांग कंपीटर म्हणजे गो काय?"
"कंपीटर नाय गे, कंप्युटर.तेचां काय झालां? भावड्यान कंप्युटर घेतलो की काय?"
"तांच ता.
रात्रीचो लावून बसतत.सगळी पोरां झोपली की माकां झोपेतून उठवून बोलवतंत.
तुका गंमत दाखवतंय म्हणून सांगतत.माका गो काय माहित?उठून बघतंय तर,कसली गो ती घाणयारडी चित्रां बघीत असतां तुझो भावडो?फाजिल,चावट फोटू बघूक माकां बाये लाज वाटतां.
मी नाय येवचंय.माका किळस येतां म्हणून तेंका सांगीतलंय.माका बावळट म्हणतंत.माकां म्हणतंत कसे,हल्ली बायलमाणसांपण असलां बघतंत.पुर्ष्यांबरोबर कंपीटरवर चर्चापण बायलमाणसां करतंत. मी तेकां सरळ सांगीतलंय हल्लीच्यो बायलमाणसां इटांबल्योत मी तेंच्यातलां नाय. माझो नकार बघून दोन दोन दिवस बोलणंत नाय माझ्याशी.काय ही नवी अवदसा?"
"तेतेबाय,अगे जमानो आता बदलतासा.अजून नको नको तां बघूक लागताला.तेव्हा काळोखात होवचां, आतां उघड्यावर होतां एव्हडोच फरक.पुढच्या खेपेक मी तुका समजावून सांगीन हां."
"बरां,बरां.वशाडपडो,गजालीन घो खाल्लो.अगो, तांबे भटजी इलेत असां वाटतां.ह्या रोजच्या क्लेषातून शांती मिळूची म्हणून भटजीक मी एकादशण्यो करूक सांगितलंय.
बरां जातंय मी.कधी सवड काढून येन,मग आपण बोलूयां.
बाकी तांबळेश्वराक काळजी. "
श्रीकृष्ण सामंत.(सॅन होझे कॅलिफोरनीया)
वाचने
2578
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारीये बरंका आवडली.
आणि हो, मी पयला हे राह्यलंच..
कथा थोडी विचारात पाडणारी आहे.
+१००
In reply to कथा थोडी विचारात पाडणारी आहे. by एस
+१०००
In reply to +१०० by सुबोध खरे
कथा आवडली
ह्म्म!!
छानच लिहीलय हो.. पैसा ताई
+1