नागपुरात..
मोठ्ठाल्ले रस्ते..
ट्राफिकले हसते ..
ढोरं बसते..
नागपुरात..
डी पी ची हिरवळ
नागनाल्याचा चिखल
उन्हाळ्यात तळमळ
नागपुरात
नागपुरीचा थाट
हिंदी बम्बाट
इंग्लिशलेबी वाट
नागपुरात
के सी पार्कचा पोहा
पहाटे चारले चहा
उधारीच वाहा
नागपुरात
माहोल पोट्टे
रिकामचोट्टे
संत्र्याचे कट्टे
नागपुरात
मिहानची भरारी
लफडे भारी
दिल्लीची वारी
नागपुरात
बी इ करी
बेरोजगारी
पुण्याची वारी
नागपुरात
मस्तीत चित्त
पाहुणचार मस्त
फॅमिली संग
नागपुरात
---------------------------------------------
बम्बाट = भरपूर .
विदर्भात "बम किंवा बम्बाट " हा शब्द बराच कॉमन आहे.. "अबे,बम मजा आली बे .." एकदम सहज निघणारा उद्गार !
माहोल = हा "भारी /लै भारी" चा समानार्थी..आणि इतरही अनेक अर्थ सुचवतो हा शब्द .. म्हणजे बघा ," क्या भाई, आजकल बम माहोल कर रा तू ! " इथे वेगळाच अर्थ आहे ना ?
डी पी = धरमपेठ .. इथल्या वेस्ट हायकोर्ट रोडवर( WHC Road) बरीच 'हिरवळ' असते. शंकरनगर वा लक्ष्मीभुवन चौकात उभे राहायचे.. :)
के सी पार्क = कस्तुरचंद पार्क . इथले पोहे खूप प्रसिद्ध आहेत. पण भल्या सकाळीच जायचे.
पहाटे चारले चहा = शंकरनगर चौकात पहाटे ४-५ ला जायचे आणि चहा घ्यायचा किंवा रामदासपेठेत लोकमत चौकात जायचे. हा तरुणांचा फेवरेट विरंगुळा..
कवितेत बर्डी ( सीताबर्डी ) सुटली.. :( बर्डीचा महिमा शब्दांत बांधता येणार नाही .. ;) प्रयत्न करेन परत एकदा :)
स्वाम्या माहोल
मस्त
अरे वा! मस्त!ते सावजी रायले
आता काही न काही सुटूनच जाते!
संत्राबर्फी पण राहिली :)
संत्रा बर्फिले उगाच डोक्यावर
कविता आवडली.
झक्कास स्वामीजी
वा!
मस्त कविता
ऐ सरजमीन-ए-
शिरुदाजी तर बम कवतिक करुन रायले वं स्वामीजी!
स्वामिज्जि ज़िंदाबाद!
स्वामी
एक नम्बर..
एकदाच गेलेलो नागपुरास, ते
छान! अशे सम्द्या गावाव हुन जौ
:)
काय भाउ आजकल बम्बाट माहोल
छान माहिती .
ते वाळ्याचे पट्टे आठवले
वा मस्त!! नागपुरची लोकं
=))
कविता आवडली.
एवढंच कौतुक?
डी पी ची हिरवळ
आम्ही तर घरीही घेउन आलो..
खुपच सुरेख !
हाहा
हाहा
मस्त !
:) क्लास!!
मस्त,नागपूर डोळ्यांसमोर उभं
माहोल, भाई..
अड्डे अजून बी थेच् हाएत पर
बापट बंधू
एकदोन नागपूरकर डोकी आठवली.