Skip to main content

नागपुरात..

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 29/02/2016 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
मोठ्ठाल्ले रस्ते.. ट्राफिकले हसते .. ढोरं बसते.. नागपुरात.. डी पी ची हिरवळ नागनाल्याचा चिखल उन्हाळ्यात तळमळ नागपुरात नागपुरीचा थाट हिंदी बम्बाट इंग्लिशलेबी वाट नागपुरात के सी पार्कचा पोहा पहाटे चारले चहा उधारीच वाहा नागपुरात माहोल पोट्टे रिकामचोट्टे संत्र्याचे कट्टे नागपुरात मिहानची भरारी लफडे भारी दिल्लीची वारी नागपुरात बी इ करी बेरोजगारी पुण्याची वारी नागपुरात मस्तीत चित्त पाहुणचार मस्त फॅमिली संग नागपुरात --------------------------------------------- बम्बाट = भरपूर . विदर्भात "बम किंवा बम्बाट " हा शब्द बराच कॉमन आहे.. "अबे,बम मजा आली बे .." एकदम सहज निघणारा उद्गार ! माहोल = हा "भारी /लै भारी" चा समानार्थी..आणि इतरही अनेक अर्थ सुचवतो हा शब्द .. म्हणजे बघा ," क्या भाई, आजकल बम माहोल कर रा तू ! " इथे वेगळाच अर्थ आहे ना ? डी पी = धरमपेठ .. इथल्या वेस्ट हायकोर्ट रोडवर( WHC Road) बरीच 'हिरवळ' असते. शंकरनगर वा लक्ष्मीभुवन चौकात उभे राहायचे.. :) के सी पार्क = कस्तुरचंद पार्क . इथले पोहे खूप प्रसिद्ध आहेत. पण भल्या सकाळीच जायचे. पहाटे चारले चहा = शंकरनगर चौकात पहाटे ४-५ ला जायचे आणि चहा घ्यायचा किंवा रामदासपेठेत लोकमत चौकात जायचे. हा तरुणांचा फेवरेट विरंगुळा.. कवितेत बर्डी ( सीताबर्डी ) सुटली.. :( बर्डीचा महिमा शब्दांत बांधता येणार नाही .. ;) प्रयत्न करेन परत एकदा :)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 18573
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

स्वाम्या, माहोल करून राहिला बे मिपावर आजकाल. बाप्पा, बाप्पा कविता भल्लीच आवडली ना मले.

:)

In reply to by नाव आडनाव

संत्रा बर्फिले उगाच डोक्यावर बसोल हाय बाहेरच्यांन नागपुरात कोणी संत्रा लावून बी पायात नाई त्याले.

मस्तय!

LAD कॉलेज, शंकरनगर चौकातले पोहे साऱ्या आठवणी जाग्या केल्यात. रामभंडारची लस्सी, बर्डीजवळचे पकोडे.

"त्रिकाल(स्थ्ल) दर्शी" आहेत याचा पुन्हा प्रत्यय आलाच. पंखा नाखु

एक नम्बर लिव्हल न भाऊ . च्याभिन, या पुण्याले आलो, न सुधरुनच गेलो पार , थे मजा गेली राव नागपुरीची :)

एकदाच गेलेलो नागपुरास, ते सगळं आठवू राहिलं. बाकी बम = खूप, म्हणूनच शंकररावांना 'बम भोले' म्हणतात की काय?

लै भारी.

ते वाळ्याचे पट्टे आठवले . माहोल पोट्टे रिकामचोट्टे संत्र्याचे कट्टे नागपुरात

=))

आम्हाला तर भारी आवडली, आम्ही तर घरीही घेउन आलो. तरीही तिथली हिरवळ आहे तशीच आहे.

खुपच सुरेख ! पण संत्र्याचे कट्टे म्हणजे काय ?

भारी लिहून -हायले तुम्ही तर.

भारी लिहून -हायले तुम्ही तर.

बम माहोल पिट रहा भाऊ तू.. एक नंबर.. बरंच काही आठवून गेलं.. नागपुरात/विदर्भात उन्हाळ्याची जी मजा आहे ना, ती कुठंच नाही.. (असं प्रत्येकालाच आपल्या गावाबद्दल वाटतं, ही गोष्ट अलहीदा.. ;-) ) टरबुज, पन्हं, कुलरनी थंडावलेलं घर, गच्चीवर झोपण्याची मजा, झालंच तर मामाच्या घरातलं थंडगार तळघर ह्याची मजा घ्यायची तर बाहेर ते सन्न ऽ ऽ तापणारं उनंच पाहीजे.. कविता घाप्प ऽऽ किन्या भिडलीच ना भाऊ.. बाकी, कवितेत बर्डी, सावजी, बजाजनगरातल्या भेल्/पानीपुरी इत्यादींच्या हातगाड्या/ पकोडेवाला / जिल्ह्यासमोरचा पाटोडीवाला सुटलंय, स्वामीजी. आता अड्डे बदलले असल्यास ठाऊक नाही..

आपली कविता वाचून बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १९६० ते १९६३ मी फार्मसीचा अभ्यासक्रम नागपूर विद्यापीठात करत होतो. तेव्हा वसतीगृहापासून धरम पेठ आणि रामदास पेठ या दोन 'हिरवळी' आम्हाला जवळ असल्यामुळे सोयीच्या होत्या. तेथील बापट बंधू यांचे किराणा आणि इतर मालाचे मोठे दुकान मध्यवर्ती होते. जवळच्या एका उपहारगृहात (नाव विसरलो) दुधी हलवा चांगला मिळे. तेथेच आमचा मुक्काम असे.